सोमवार, १५ एप्रिल, २०१३

हरी नरके याना जाहीर विनंती.


लक्ष्मण माने नावाच्या बौद्ध विचारवंतावर बलात्काराचे अरोप झाले आहे उभा महाराष्ट्र ढवलून निघाला. बहुजन विरोधी मिडीयाच्या हातात जणू कोलीतच मिळाले अन सर्व स्थारातून मानेच्या निमित्ताने आंबेडकरी चळवळीवर वार घातले गेले. नितिमत्ता व नैतिकतेच डोस पाजणे सुरु झाले. एकंदरीत वातावर्ण असे तापविले गेले की हा जणू आंबेडकरी जनतेचाच व चलवळीतल्या कार्यकर्त्यांचा गुन्हा आहे. कुठल्याही वृत्तपत्राने या प्रकरणाला वयक्तीक प्रकरण आहे असे न घेता तो थेट आमच्या समूहावर मारण्याचा प्रयत्न केला गेला. हा माझा व माझ्या समाजाचा घोर अपमान आहे. एखाद्या व्यक्तीच्या वयक्तीक गुन्हयाला ईतकं व्यापक रुप देण्याच कारण का? विचार करायची वेळ आली आहे, आपण सगळ्यानी यावर विचार केला पाहिजे.  पोलिस गुन्हयाचा तपास करीत असून न्यायालयात काय तो निर्णय लागेल अन जर माने खरच दोषी असतील तर त्याना काय व्हायची ती शिक्षा होईलच. आपले काम काय तर आता न्यायनिवाडा येईस्तोवर शांत बसून वाट पहावे. शांत बसणे हेच शहाणपणाचे व पुरोगामित्वाचे लक्षण आहे.  
माने प्रकरणात हात धूवून घेण्यात सगळ्यात अग्रणी जर कुणी असतील तर  लोकसत्ता-विद्याबाळ-रेणके हे त्रिकूट. या त्रिकूटानी जणू काही मानेंचे अपराध सिद्ध झाले आहेत असा आव आणत नुसतं मानेनाच नाही तर समस्त बौद्धांची व बौद्द विचारवंतांची निंदा नालस्ती चालविली आहे. लोकसत्ताने तर चक्क “साडेतीन टक्क्याचा पदमश्री उपरा” अशी हेडींगच छापली. खरं तर ही हेडींग अत्यंत आक्षेपार्ह आहे. साडेतीन टक्याचा पदमश्री???? काय अधोरेखीत होतं यातनं? कोणाचा अपमान केला जात आहे??? जरा तुम्ही नीट विचार करा. या हेडींगमधे बरच काही दडलं आहे. बहुजनांची बदनामी करण्याची नामी संधी चालून आल्यामुळे आनंदाच्या भरात  लोकसत्तानी गरळ ओकली. वरील हेडींग मानेंचा नाही तर पदमश्री या सन्मानाचा अपमान करते आहे. उद्या मानेंवर अरोप सिद्ध झाले तरी पदमश्री या पुरस्काराचा असा अपमान करता येणार नाही.  म्हणे काय तर साडेतीन टक्क्याचा पदमश्री...!  अरे राग कुणावर अन काढताय कुणावर. मानेना बोला ना! पद्मश्रीवर घसरण्याचे कारण काय. काय झोंबलं होतं एवढं की तुम्ही थेट पदमश्रीवर घसरलात?  तरी आम्ही गप्पच...
असो... त्या त्रिकूटाकडून मला फार अपेक्षा नाहीतच मुळी...!

पण...
पण हरी नरके हे मात्र आंबेडकरी चळवळीतले. त्यांच्याकडून मलाच नाही तर समस्त आंबेडकरी समाजाला फार अपेक्षा आहेत. मानेवर नुसते आरोप झाले असून गुन्हा सिद्ध व्हायचा आहे. गुन्हा सिद्ध होईस्तोवर त्यानी शक्यतो “नो कमेंट्स” असं म्हणत या वादात न पड्ता ईतर सगळे आंबेडकरी कसे दूर आहेत तसे दूर राहायला हवे होते. प्रकरणाचा संपूर्ण तपास होऊन न्यायालयाचा निकाल येईस्तोवर वाट पाहायला हवे होते. पण या वेळेस मात्र नरके सर बहुजनांच्या विरोधात रान पेटविणा-या मिडीयाच्या सुरात सूर मिळवून माने विरोधी राग आळवायला लागलेत. का बरं?  याचं कारण आहे पल्लवी रेणके....

कोण आहे पल्लवी रेणके?????
नरके सरांची साली आहे!  पल्लवी रेणकेचे वडील बाळकृष्ण रेणके हे भटक्या-विमुक्तांचे कालचे नेते (मागच्या ३० वर्षापासून ते या चळवळीत नाहित असे मानेनी जाहीरपणे म्हटले होते) होते. मागच्या आठवड्यात पल्लवी रेणकेचा एक लेख आला होता त्यात पल्लीवीनी असा अरोप केला की मानेनी त्याच्या वडलांकडून चळवळ पळवून नेली. म्हणजे दोन्ही विधानांतून हेच सिद्ध होते की बाळकृष्ण रेणके चळवळीतून बाहेर फेकले गेले अन चळवळ मानेंच्या हातात गेली. हे आहे खरं दुखनं त्या रेणके कुटूंबाचं!
मग काय, मानेंवर झालेला हा बलात्काराचा अरोप म्हणजे रेणकेंना पोरीला चळवळीत घुसळविण्य़ाची संधीच चालून आल्याचे वाटले अन त्यानी मनूवादी व्यक्ती(बाळ वगैरे) व वृत्तपत्राच्या सहाय्याने माने विरुद्ध मोहीम उघडली. हे सगळं ठीक आहे. 
पण...
पण नरके सरानी मानेविरुद्धच्या मोहीमेत सामिल होण्य़ाचे कारण काय?
मानेंवर अजून कसलेच अरोप सिद्ध झाले नसताना नुसतं सास-याला व सालीला मदत म्हणून माने विरोधी मोहिमेत नरकेनी उडी टाकायला नको होती. आजकाल सगळ्य़ा वृत्तपत्रातून जणू अरोप सिद्धच झाले असल्याचा आव आणत लेख लिहले जात आहेत. त्यात नरके सरांचे लेख अत्यंत महत्वाची भूमिका बजावत आहेत. ओघानेच निकाला आधी  मानेंची बदनामीचे काम नरकेंच्या हातून घडत आहे. अरे पण एवढी  घाई कशाला? जरा धीर धरा ना! कोर्टाचा निकाल येईस्तोवर वाट पाहायला नको का? पण नाही... नरके सराना दाखवायचं आहे की ते कसे सच्चे व अच्चे जावई आहेत. पण यात एक मोठा धोका आहे तो त्याना दिसलाच नाही.
तो धोका म्हणजे...
समजा उद्या माने निर्दोष सुटले तर...
तर मात्र आंबेडकरी समाजातून चहू बाजूनी नरकेंवार वार होईल. मानेंवर नुसते आरोप झाल्या झाल्या आततायीपण केल्याची जी किंमत त्याना मोजावी लागेल ती काय असेल याचा अंदाज आजतरी बांधता येणार नाही. नरके सराना आज आंबेडकरी चळवळीत सर्वत्र मान सन्मान मिळतो आहे याचे मुख्य कारण म्हणजे ते आंबेडकरी तत्वानूसार वागतात असाच सगळ्यांचा समज आहे. पण माने प्रकरणात न्यायालयाची वाट न पाहता स्वत:च मानेना अरोपी ठरविल्यामुळे नरके सरानी ईथे आंबेडकरी तत्व मोडीत काढला आहे. सालीच्या हितासाठी जर आंबेडकरी तत्व अशा प्रकारे धाब्यावर बसवल्या गेला तर उद्या आंबेडकरी समाज त्याना धाब्यावर बसविणार यात तिळमात्र शंका नाही. किंबहूना या प्रकरणामूळे नरकें आंबेडकरी चळवळीतून बाहेर फेकले जाऊ शकतात. असे झालीच तर पुढच्या पाच वर्षा नंतर त्यांची ओळख "माळी विचारवंत" अशी बनायला वेळ लागणार नाही.
शेवटी नरके सराना एवढीच विनंती करेन. माने प्रकरणाचा पोलिस तपास करत आहेत. ते दोषी आढळल्यास कात ती शिक्षा त्याना होईलच पण निर्दोष सुटल्यास तुम्ही केलेले सगळे अरोप तुमच्या विरोधात रान उठवायला पुरावा म्हणून व आग तेवती ठेवायला ज्वलंत तेल म्हणून वापरले जाऊ शकते. मित्र म्हणून एक सल्ला देतो. न्यायालयाचा निकाल येईस्तोवर वाट पहा. नंतर काय लिहायचे ते लिहा...बघा पटतं का!!!

------------------

1 टिप्पणी:

  1. गांधी हत्येच्या आरोपातून सावरकरांना न्यायालयाने सन्मानाने निर्दोष म्हनून मुक्त केले,पण तो आरोप काही लोकांच्या मनातून जात नाही.

    प्रत्युत्तर द्याहटवा