मंगळवार, १६ एप्रिल, २०१३

दिवसभर झाडू मारुन थकलो बघा!!!

ब्लॉग सुरु करुन पाच वर्षापेक्षा जास्त काळ झाला. मी लेख लिहत गेलो अन प्रतिक्रीया येत गेल्या. नुसत्या आल्या म्हणन्यापेक्षा अनेक प्रकारच्या प्रतिक्रीया येत गेल्या. प्रतिक्रीया देणारा वाचक वर्ग दोन प्रकारचा होता. काहिनी माझी पाट थोपट्ली तर काहिनी शिव्या हासडल्या. सुरुवातील दोन्ही प्रतिक्रीयांचा प्रचंड प्ररिणाम व्हायचा. पाट थोपटली ही सुखावून जायचो तर शिवी हासडली की पेटून उठायचो. पण हळू हळू या संवेदना न्य़ुट्रल होत गेल्या. आजमितीला दोन्हीचा परिणाम शून्य आहे. किंबहून आलेल्या प्रतिक्रीयां कित्येक दिवस तपासत सुद्धा नाही. मात्र मोडरेटचा पर्यात बंद केला नाही. म्हणजे मी तपासल्यावरच प्रतिक्रीया ब्लॉगवर छापली जाते. थोडक्यात प्रतिक्रीया जरी आधीसारखा परिणाम करत नाहित तरी त्या  छापायच्या की नाही याचं नियंत्रण मात्र माझ्याकडे ठेवलं आहे. अन ते नेमहीच असेल.
प्रतिक्रीयांच्या बाबतीत एक महत्वाची गोष्ट सांगावशी वाटते ती म्हणजे आजकाल निनावी प्रतिक्रीयांचा पाऊस सुरु झाला आहे. हा असाच पवसाळा मधे एका हिवाळ्यात ब्रिगेड विरोधी लिखानानंतर सुरु झाला होता. अगदी तसाच आत्ता परत एकदा रेणके विरोधी लिखानामुळे ऐन उन्हाळ्यात सुरु झालाय.  मधे कधीतरी एकदा अशा प्रतिक्रीया छापणार नाही अशी सुचना फलकावर टांगली खरी पण त्याचा काही परिणाम झाला नाही. पाऊस सुरुच होता. मग मी फक्त त्याच निनावी प्रतिक्रीया छापू लागलो ज्या फार टोकाच्या नसायच्या.
आज मात्र एक अशी निनावी प्रतिक्रीया आली जी मला टोकाचं निर्णय घ्यायला भाग पडून गेली. यापुढे एकही निनावी प्रतिक्रीया छापायची नाही. पण त्याच बरोबर जुन्याही निनावीना साफ करायचं ठरवलं अन मी हातात झाडू घेऊन लागलो साफसाफाईच्या कामाला.  माझ्या ब्लॉगवरील सगळ्या पाच वर्षातल्या प्रतिक्रीयांचा कचरा झाडू मारुन साफ केला. सकाळीच झाडू मारण्याचे काम सुरु झाले. हाश्श हुश्श करत एकदाचा हा निनावी प्रतिक्रीयांचा कचार साफ करुन टाकला... हुश्श....

यापुढे नाही रे बाबा एकही निनावी प्रतिक्रीया छापणारे ईथे!!!
---

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा