गुरुवार, १८ एप्रिल, २०१३

हरीणमा-या रामाचा निषेध!!!संजय दत्तला शिक्षा झाली. आजून चार आठवड्याची जरी सवलत मिळाली आहे तरी आज न उद्या जेलात जायचे आहेच. कारावास हा अटळ आहे. उभ्या भारतानी दत्तच्या शिक्षेबद्दल समाधान व्यक्त केले अन न्यायव्यवस्थेची प्रशंसा करताना शुभेच्छांचा वर्षाव झाला. जोडीला काटजू व सिनेक्षेत्रातली कॅंडलधारी मंडळी हळहळी. संजय दत्तला माफी मिळावी म्हणून काही लोकानी नाना उद्योग चालविले अन शेवटी ते ही शांत झालेत. त्याच्या पाठोपाठ आजून एक बातमी झडकली...
हरणाच्या शिकार प्रकरणात सलमानला शिक्षा होणार...!!!
संजू बाबाच्या सोबतीला हा बाबाही जाणार म्हणून जल्लोश उडाला. जागो जागी चकाट्या पिटणे सुरु झाले. गुन्हा काय? तर हरणाची शिकार. आपल्या देशात हरणाची शिकार करायला कायद्याने बंदी आहे अन सलमानवर शिकारीचा अरोप आहे. सलमानला शिक्षा झालीच पाहिजे जर त्यानी हरणाची शिकार केली असेल. हरणाचा बळी घेणारा सलमान  एकटा नाही काही. त्याची या मातीला मोठी परंपरा आहे. आजच्या कायद्याच्या कसोट्या लावल्यास तो दोषी ठरतो हे खरे. त्याला शिक्षा व्हावी म्हणून उभा देश कायद्याकडे बोट दाखवतो आहे अन ते योग्यही आहे. अन संविधानाचा आदर करणारा असल्यामूळे मी सुद्धा सलमानला शिक्षा झाली पाहिजे याचा आग्रह धरतो. पण एक मात्र आपण विसरुन गेलो. सलमान सारखीच एक शिकार हजारो वर्षा आधी राम नावाच्या एका व्यक्तीने केली. तेंव्हा हा कायदा नव्हता... वा हे संविधान नव्हते. म्हणून रामाला ना शिक्षा झाली ना आरोप झाले.
पण...
पण नैतिकतेच्या कसोट्या लावल्यास राम सुद्धा सलमान एवढाच दोषी ठरतो. आजचा समाज हरणाच्या प्रती अत्यंत संवेदनशील झाला आहे. त्या न्यायाने रामाचा किमान हरिणमा-या म्हणून निषेध तरी व्हायला पाहिजे. पण आपण  नाही कारणार. का? रामाने मारलं तर क्षत्रीयधर्म अन सलमानने मारलं तर प्राणिहत्या... हे असले कसले आमचे निकष? तेंव्हा हा कायदा नव्हता वगैरे अगदी तांत्रीक मुद्दे पुढे केले तरी एक संवेदनशील समाज म्हणून एका हरिणमा-या रामाचा निषेध व्हायला हरकत नव्हती. पण आमची संवेदनशीलता ही व्यक्तीसापेक्ष आहे. रामाला तर ईथे चक्क देव बनवून टाकले. प्राण्यांची ह्त्त्या करण्याचा त्याला जन्मसिद्ध अधिकार होता असं पुराणांतून कथन केल्या गेलं. क्षत्रीयाला तो अधिकार बहाल केल्या गेला. त्याच बरोबर त्या घटनेचा कालावधी पाहता त्याचा संदर्भ देताना ती घटना फार जुनी झाली असं म्हणत सूट मागणारे प्रतिक्रिया आता येतीलच. मग त्यावर माझं असं उत्तर असं आहे की मग तोच कालमापनाचा न्याय लावत त्याचे आदर्शही फेकून द्या. तोच न्याय रावणालाही लावा अन रावणदहन थांबवा. पण नाही त्या टुकार आदर्शांचा मात्र प्रचार करणार. लोकांच्या माथी मारणार अन एक हरीणमा-याला देव बनवून बहुजनांची लुबाडणूक करणार. हे कधीतरी थांबणार की नाही? की असचं आपल्या सोयीचं ते उचलून धरणार? समाजाचं व ओघाने या देशाचा –हास करणार?
सलमानला शिक्षा झालीच पाहिजे म्हणताना आपण कायद्याचा आग्रह धरतो नि तो धरलाच पाहिजे. पण त्याच गुन्ह्या बद्दल  रामाला का बरं सूट द्यायची? कारण त्या प्राचिन घटनेला तांत्रीक पातळीवर घातल्यास हे सगळं गैरलागू पडतं हे त्यावरील उत्तर मलाही माहित आहे. पण मग नैतिक पातळीवर घाला ना... नैतिक पातळीवर नको का तपासायला? नैतिकतेला कुठे काळाचं बंधन आहे. कायदा बाजूल ठेवा. घटना प्राचिन आहे हे ही मान्यच. पण रामाचा आज उदो उदो करताना व उद्या जन्मोत्सवात उड्या मारताना रामाचे गुणगाण करणारा समाज नैतिक पातळीवर रामाचे दुर्गूण तपासणार का? अन नैतिक पातळीवर हरिणमारण्याच्या कृत्यामूळे राम आरोपी ठरतो त्याचा किमान आपण निषेध तरी करणार का? नसाल करणार तर मग सलमानच्या बाबतीतच तुमची नैतिकता का बरं एवढी उफाळून येते ते सांगाल का? तिकडे न्यायालयाचा निर्णय येण्या आधीच इकडे त्याला शिक्षा व्हायला हवी वगैरे मत नोंदविण्याचा आततायीपणा कशाला? तो अधिकार आपणास आहे का?
नैतिक पातळीवर रामाला सूट द्यायला निघाणा-याना मी रामाच्या क्रुरकृत्याचे आजून एक दोन उदाहरणे देतो. रामाने शंबूकाचे मुंड्के उडविले होते. काय करत होता हो शंबूक? बिचारा तपश्चर्या करत होता. त्याच बरोबर धोक्यानी वालीचा खूण केला. अन एवढेच नव्हे तर चक्क रावणालाही धोक्यानेच मारले. म्हणजे बघा. हरणाला मारलं ईथून सुरु होणारी रामकथा कशी एकेकाला धोक्याने मारत पुढे सरकते. शंबूकाला मारणारा राम माणूसमा-या नाही का? वालीला मारणारा राम भ्याड-राम नाही का? अन रावणाला मारणारा राम धोखेबाज राम नाही का? थोडक्यात राम नुसतं हरिणमा-याच नसून तो माणूसमा-याही आहे, तो भ्याडही आहे अन तो धोखेबाज नि कावेबाजही आहे. हे सगळं असताना प्रचार काय चालू आहे तर म्हणे... पुरुषोत्तम!!! वारे भगव्यानो...!
मी तर म्हणतो हरणाला मारण्यात बिचा-या सलमानचा काही दोष नाही. त्यानी एकतर रामायण ऐकलं असावं (हा माझा अंदाज आहे) अन रामाला आदर्श मानत(शिकारीपुर्ता) ही शिकार केली असावी किंवा मग त्या बायका ज्या सोबत होत्या त्यानी हे घडवून आणलं असावं.  या देशात मागच्या हजारो वर्षापासून रामाच्या हरिणमा-या कथांचा प्रवचनांतून प्रचंड मारा सुरु आहे. किंबहून पुरुषोत्तम नावाखाली रामाची हरिणमारी कृती ईथल्या लोकांवर बिंबविली जात आहे. मग एखादा सलमान सारखा उठतो अन मारतो हरणला. दोषी कोण? बिंबविणार प्रवचनकार नाही का? मुल्ला मौलवींच्या प्रवचनातून मुसलमानात कट्टरवाद रुजत गेला अगदी त्याच धर्तीवर ईथे हरिणमारी रुजत गेली नसेल कशावरुन? न्यायलयाचे कागद तपासल्यास असे दिसते की सलमानला हे करण्यास भाग पाडण्यात रामाला मानणा-यांचा हात आहे. सोनाली बेंद्रे व निलम वगैरे बायकानी सलमानला उकसवून दिलं असं न्यायालयीन कागदं म्हणतात.  या बायका हिंदू आहेत, म्हणजेच त्यांची  जड्णघडण होताना रामायणही बिंबविल्या गेलं.  ओघानेच हरिणहत्याही त्यांच्यावर बिंबविली गेली. त्यामुळेच या बायकानी सलमानला हरणाची शिकार करायला भाग पाडले(हे मी नाही न्यायालय म्हणते). थोडक्यात तेंव्हा सीतेनं अन आज सोनालीने... अन बळी कोण? तर सलमान. बिच्चारा सलमान!!!
कशाचा परिणाम आहे हा? रामायणाचा... आजून कशाचा असणार!
खरंतर सलमानला या हिंदू बायकानी फसवलं. त्या सोबत नसत्या तर सलमानी हरिण मारलच असतं असं म्हणता येणार नाही. हिंदू बायकाना हरणाची मोठी आवड. ही आजकालची खोड नाही या बायकांची. अगदी रामायण काळापासून याना हरणाची कातडी आवडते असे पुरावे खुद्द रामायणातच आहेत. त्याचाच परिणाम म्हणजे या सगळ्यानी मिळून स्वत:ची हौस भागवायला हरणाचा बळी घेतला व आता सलनाचा बळी जाण्याचे संकेत आहेत. तरी मात्र कोणी रामाला व सीतेला दोष देत नाहीत. युक्तीवाद काय तर म्हणे तितक्या जुन्या गोष्टीचा काय संबंध? अरे पण रामायणातून मोठं रंगवून रंगवून सांगितल्यावर त्याचा परिणाम होत नाही का? कसं काय म्हणता काय संबंध? संबंध आहेच आहे!
थोडक्यात उद्या रामनवमीच्या निमित्ताने उभा भारत एका हरिणमा-याचा जन्मदिन साजरा करणार आहे अन त्याच बरोबर त्याच्यापासून प्रभावीत होत हरणाला मारणा-या दुस-या एकाला(सलमानला) मात्र त्याच गुन्ह्यासाठी शिक्षा मिळावी असे नवसही केले जातील...
 आहे की नाही गंमत!!!
रावणाला (जो लंकावतार सुत्ताप्रमाणे बौद्ध आहे) दर वर्षी दहन केले जाते. ही प्रथा धरुन ठेवली व जनमानसानी जोपासावी म्हणून सतत प्रयत्न केले जात आहेत. रावण मरुन हजारो वर्ष झाले म्हणून विसरुन जायला हवं. पण नाही. रावण मरुन हजारो वर्षे उलटली तरी त्याचे दर वर्षी दहन सुरुच आहे. अन रामाचं हरिण-प्रकरण मात्र.... ते मात्र जुनं... वारे वा... हे कसं काय?  कायद्याच्या कसोटीत बसत नसले तरी नैतिक पातळीवर हरिणमा-या रामाचा निषेध झालाच पाहिजे. 
मी हरीणमा-या रामाचा निषेध करतो!!!
----
टिप:-  निनावी किंवा खोट्या नावाने लिहलेल्या प्रतिक्रीया छापल्या जाणार नाही याची दखल घ्यावी.

८ टिप्पण्या:

 1. करायचा तेव्हढा पोटभर निषेध करून घे. गेली हजारो वर्षे असे कित्येक निषेध पचवत आमच्या मनांवर प्रभू रामचंद्र राज्य करत आहेत. लवकरच देशावरही त्यांचेच राज्य येणार आहे. तेव्हा तुझ्या कोणकोणत्या गोष्टींचा निषेध होईल त्याची कल्पना करून बघ.

  प्रत्युत्तर द्याहटवा
 2. HAJARO NISHPAP JIAVNACHA BALI GHENARA SAMRAT ASHOK HA TUMHALA CHALTO PAN FAKT HINDU DWESH MAHNUN HINDUCHAY DEWTAT WISHAYI KAHIHI BARLANYA ADHI APALYA ADNAVATIL RAM KADUN TAKA MAGA KAY KIMMAT URATE THUMALA MD..TAKE SAHEB

  प्रत्युत्तर द्याहटवा
 3. भगवान बुद्ध म्हणतात,"मीच दशरथाचा पुत्र राम"-http://www.sacred-texts.com/bud/j4/j4025.htm
  The Jataka, Vol. IV: No. 461.: Dasaratha-Jātaka.
  www.sacred-texts.com

  प्रत्युत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. भ्रमात व अंधविश्वासातच जगा व तसेच मरा .

   SGawai

   हटवा
  2. भ्रमात व अंधविश्वासातच जगा व तसेच मरा .

   SGawai

   हटवा
 4. Abhijit aplyala ase nahi vatat ki apan aplya ya asha vagnyamule vinashacha dishene chalalo ahot.....

  प्रत्युत्तर द्याहटवा
 5. अतिशय विनोदी लेखन ! अभ्यास करा राजे...
  जर रामाच्या हरण वधाची कथा खरी धरली तर ते हरीण हे खरोखरचे हरण नसून मारीच नावाचा राक्षस होता हे ही खरे मानायला हवे. जर हे खरे मानले तर तो रावणा च्या सीता हरणाच्या योजनेचा एक हिस्सा होता हे ही मान्य करावे लागेल. मग राम दोषी कसा काय ठरतो ?

  प्रत्युत्तर द्याहटवा
 6. ramteke.. navat ram.. kadhun ka nahi takat...
  yanche sampurn likhan mhanje gatar aahe.. je kuni vachatil te gatarat padtil...

  प्रत्युत्तर द्याहटवा