शनिवार, २० एप्रिल, २०१३

ईथले बलात्कार हे कृष्णलिलांच्या आधुनिक आवृत्या आहेत!!!


Photo: इनसे लोग क्या प्रेरणा लेते होंगे और प्रेरित होकर कैसे कर्म करते होंगे ? सोचो तो जरा ।मागच्या वर्षी दिल्लीत रेप झाल्यावर कॅंडलकंपूनी मोठा दिखावा करताना मोर्चेच्या मोर्चे काढले अन स्त्री अत्याचाराच्या विरोधात कडक कायदा व्हावा म्हणून आरडाओरडा केला होता. त्या घटनेनी उभा भारत हादरून गेला होता. सरकारने थातूरमातूर करत एक अभया नावाचा कायदा पास करण्याचं सोग केलं अन एकून प्रकरणावर पडदा पडला. त्या नंतर परत रेप चालू झालेत ते झालेतच. कशाचा काही प्रभाव नाही अन कायद्याचा धाक नाही, का बरं? काय आहे असं या देशात जो ईथल्या तरुणाच्या मनात ईतक्या खोलवर जाऊन रुजला आहे की जो याना कायदा झुगारुन बलात्कार करायला भाग पाडतो? उत्तर सोपं आहे. थोडसं चिंतन केल्यास लक्षात येईल की ईथला धार्मिक संस्कार जो अगदी बालवयातच रुजविला जातो तो स्त्रीचा आदर नाही तर खोड्या काढायला शिकवतो. तीची अब्रू लुटायला शिकवतो. तीला विवश्त्र करुन नदीच्या काठावर विनविण्या करायला भाग पाड्णे शिकवतो. हे सगळे संस्कार रुजविण्यात ईथल्या स्त्रीयाच अग्रेसर आहेत. त्याना त्या लिला वाटतात. अन कधीतरी मग एखादी स्त्री उठते अन या लिला नाहित तर बलात्कार आहेत वगैरे ओरड्ते. अन पुरुषाना दोषी ठरविले जाते. पण खरा दोषी जो पुरुषाना स्त्रीचा अनादर करण्याचं बाळकडू देतो तो म्हणजे ईथला धार्मिक संस्कार व कृष्णलिला..... यावर कोणी बोलत नाही.  स्त्रीवरील अत्याचार थांबले पाहिजे म्हणून दर दोन दिवसानी कुठलीतरी संगठना गळा काढते खरं पण “ते अत्याचार थांबवायचे म्हणजे नेमकं काय करायचं?” हे मात्र कुणी सांगत नाहीत. त्याच बरोबर स्त्रीयांवर बलात्कार का होतात या कारणांचाही शोध घेताना आजवर मला कुणी दिसले नाही.

बलात्काराची कारणे हिंदू ग्रंथात आहेत.
जगभर ओरडा करताना हे लोकं आपल्या धर्मातच बलात्काराची कारणे लपलेली आहेत हे मात्र जाणिवपुर्वक लपवतात. हिंदू धर्मातील स्त्रीयांचा छळ करणारे सगळ्यात मोठे उदाहरण म्हणजे श्रीकृष्ण. श्रीकृष्णानी आंघोळ करणा-यां बायकांचे कपडे पळविले म्हणून सांगताना ते अश्लिल कृत्य होते हे कधीच सांगितले जात नाही तर ती लिला होती असे म्हणतात. मग होते एखाद्या मुलाला ती लिला करण्याची ईच्छा. दोषी कोण?   बायकाना नदीत गाठून आंघोळ करताना झाडामागून लपून पाहण्याचा प्रसंग व त्या नंतर त्या नग्न बायका आपले वस्त्र मिळविण्यासाठी केलेल्या विणवण्यांचं कौतूक केलं जातं. मग पाहतो कोणीतरी एखादीला नग्न करुन. नुसतं पाहून गप्प कसं बसणार... त्या वेळी जे नैसर्गिक असते ते करतो तो.... यात जरी तो दोषी असला तरी त्याला तसे बनविणारे आपण मुळीच दोषी नाही का? असले अनेक प्रताप रोज भागवतातून देशभर प्रवचनाच्या नावाखाली मुलांच्या मनात ठासविले जाते. 
आंघोळ करणा-या बायकाना चोरून पाहणे, त्या नंतर त्यांचे कपडे पळवून नेणे व त्या कपड्याच्या बदल्यात अश्लिल चाळे करणे हे सगळे प्रकारे कृष्णलिला नावाखाली ईथल्या पोरांच्या बालमनावर रुजविल्यावर बिचारी पोरं मोठे झाल्यावर त्यातले प्रयोग करणार नाही तर आजून काय करणार? मग ते ठरतात बलात्कारी... मग त्याना प्रश्न पडतो की हेच सगळं कृष्ण करतो तर त्या लिला... अन आपण केलं तर बलात्कार... कसं काय बुवा? खरच बलात्का-याचा दोष आहे का? आहेच... पण ईथल्या समाजाचा व संस्काराचाही आहे.

दांडिया व गरभारास 
याच कृष्णाच्या नावाने गरभा व दांडीयाचा खेळ अगदी पुरातनकाळापासून खेळला जातो. आज कालतर याला कार्पोरेटरुप प्राप्त झाले आहे. मुंबईत तर चक्क एन्ट्री फी वगैरे आकारुन हा खेळ आयोजित केला जातो. मग ईथेही कृष्णलिला चालू होतात. नवरात्रीच्या काळात या खेळाच्या मैदानात चक्क कोंडोम विकायला ठेवले असतात. अन त्याही पेक्षा कहर म्हणजे कोंडोम्सची विक्रमी विक्री होते. हा सगळा प्रकार काय तर म्हणे... संस्कृती...!!! दांडीया व गरभारास आपली संस्कृती अन कोंडोम??? तुम्हीच विचार करा.

कायद्याच्या कसोट्यात जरी दोषी असला तरी...
बलात्कार केलेल्या माणसाला फाशीचीच शिक्षा द्या म्हणणारा हा समाज हे कधीतरी तपासून पाहणार आहे का, की एखादा माणूस बलात्कार का करतो? त्याची जड्ण घड्ण ज्या संस्कारात होते तो संस्कारच बलात्काराचा पुरस्कार करणारा असल्यामूळे ही मुले मोठी होऊल बलात्कार करतात याचा कधी विचार होणार की नाही? नदित आंघोळ करणा-या बायकाना नागडं पाहण्याची व नग्न शरीर धरुन आपल्यापुढे येऊन कपड्यासाठी विणवणी करणारी प्रकरणं व त्या प्रसंगाचा फायदा उचलत बायकांशी चाळे करण्याची शिकवण अतिप्रंगाची पायभरणी बालमानातच करत असतात याचं भान कोण ठेवणार? नसाल ठेवणार तर मग नुसतं बलात्काराची कृती हे एकमेव मापदंड धरुन बलात्का-याला दोषी ठरविताना त्या कृत्याची बिजं ज्या प्रवचनातून कृष्णलीला रुपात रुजविली गेली अन घरातल्या आया बहिणीनी त्या लिलांचं कौतूक करत कृष्णाचे गोडवे गायले यातून एखाद्या मुलाच्या मनात असल्या लिला करायचा विचार आकार घेत गेला अन त्याचा परिपाक म्हणून त्याच्या हातून जर बलात्कार घडला तर तो बलात्कारी दोषी कसा काय ठरतो. त्याला लहानपणापासून स्त्रीला असं छळायचं व तिच्याशी चाळे करायचे याची शिकवण देणारा समाज दोषी नाही का? म्हणजे एखाद्यानी अशा धार्मिक प्रवचनातून आदर्श घेत स्त्रीची अब्रू लुटली तर ती वासना की धार्मिक कृती हे कसं ठरवणार? हा विषय अत्यंत गुंतागुंतीचा आहे. आपण जे धार्मिक संस्कार पोरांवर करतो त्यातून एक बलात्कारिही घडवतो हे संपुर्णपणे नाकारता येणार नाही. धर्माच्या नावाखाली रुजविल्या जाणारे संस्कार ज्यात खास करुन कृष्णलिलांचा उल्लेख करावा लागेल हे या देशातूल तरुणांवर बलात्काराचा संस्कार रुजवित आहेत. सर्वप्रथम या अशा कथांची प्रवचनातून हद्दपारी झाली पाहिजे. अन बायकांचा आदर करणा-या नव्या आदर्शांचा प्रसार झाला पाहिजे. म्हणजे त्यातून नवी पिढी स्त्रीचा आदर करायला शिकेल...

पण आजच्या घडीला आमच्याकडे तसा कार्यक्रम नाही व असेल तरी कृष्णलिलांच्या माध्यमातून हे बलात्काराचे  विष पेरणे  जोवर थांबत नाही तोवर बलात्कार होतच राहणार अन याला बलात्कारी दोषी नसून कृष्णलिला व ओघानेच हिंदू संस्कार जबाबदार आहे. हा संस्कार जोवर टाकून देत नाही तो वर बलात्का-या दोष देता येणार नाही.
एकिकडे धर्मग्रंथातून स्त्रीयांशी केलेल्या चाळ्याना कृष्णलिला म्हणायचे अन दुसरीकडे त्याच लिलाना बलात्कार म्हणायचे. हा दुटप्पीपणा थांबेल तेंव्हा बलात्कारही थांबेल.

आता कोणीतरी उठून विदेशातले उदाहरण देत असे म्हणेल की जिथे कृष्ण पोहचला नाही तिथे बलात्कार कसे काय होतात.  यावर आत्तात उत्तर देऊन ठेवतो. 
जिथे कृष्णलिला रुजविल्या जात नाही तिथे होणारे बलात्कार हे खरोखरच वासनेतून झालेले बलात्कार असून ईथेही वासनेतून बलात्कार होतात. पण ईथले अधिकांश बलात्कार मात्र कृष्णलिलांचा पगडा म्हणून झालेले आहेत. त्या कृष्णलिलेतून जन्मास येणा-या विकृत आवृत्या आहेत. कृष्णलिला थांबल्या की त्याच्या आवृत्याही थांबतील...!!!

म्हणून म्हणतो, भारतातले अधिकांश बलात्कार हे बलात्कार नसून कृष्णलिलांच्या आधूनिक आवृत्या आहेत!
-----------------------------------------------------
टिप:-  निनावी किंवा खोट्या नावाने लिहलेल्या प्रतिक्रीया छापल्या जाणार नाही याची दखल घ्यावी.

१० टिप्पण्या:

 1. Wa wa wa Ramteke... khup sundar bar ka.... khupch abhays karata rao tumhi.......
  Krushna lila - chhan varnan kelet... pan ajun kuthe pravachan chalu astat tyavar.... an te aikayla tarun por/pori jatat???..... va va.va.. evdhi bhavik lok aplyat janmala ali asti tar.......
  Ek pan bhar krushna lila vishayavar kharadlet pan TV ani serial, movie ya madhe kiti uttung adarsha dakhavale jatat na rao (swarg tyapudhe fika pade.....) bahutek tumhi Hindu Dharma var kuthe dag deta yetil yachich sandhi shodhata kay... asu dya... tumchi drushti tase asel tar tyala elaj nahi.....
  Krushna lila kharadlet tevha ek goshta tumhi saaf visaralat ki jevha DROPADI che vastraharan chalu hote tevha tyamadhe ek se badhkar ek maha parakrami raje upasthit hote pan kunachi himmat navhti te thambanyachi.. ... te fakt EK ANI EKCH KRUSHN ANI KRUSHNACH Karu jane.........

  उत्तर द्याहटवा
 2. तुम्ही आंबेडकरवादी कमी आणि हिंदूद्वेषी जास्त आहात.

  उत्तर द्याहटवा
 3. रामटेके हलकट पण सोडून द्या तुमची नजर वासनांद आहे म्हणून जग तुम्हास तसे दिसत आहे , वाईट मनाची माणसेच वाईट घेतात

  उत्तर द्याहटवा
 4. आपल्या म्हणण्यात अंशत: सत्य आहे.पण बलात्कार करणारे सर्व हिंदू नसतात.तसेच सर्वच बलात्कार करणार्यांनी कृष्णलीलेपासून प्रेरणा घेतली असेल असे वाटत नाही.लक्ष्मण माने यांना कुठून मिळाली असेल प्रेरणा?

  उत्तर द्याहटवा
 5. घत जातकात भगवान बुद्ध म्हणतात की सारिपुत्त हाच वासुदेव[कृष्ण] होता.
  2 minutes ago · Like
  Madhusudan Cherekar भागवतातील कथेत कृष्णाने गोपींना नग्न केले नव्हते.त्या स्वत:च नग्न हो ऊन पाण्यात उतरल्या होत्या.त्यांचे असे नग्न होणे ६-७ वर्षाच्या बालकृष्णास आवडले नाही.त्यांची ही नग्न हो ऊन पोहण्याची खोड मोडावी या साठी त्या लहान बालकाने हे कृत्य केले.यात वासना किंवा बलात्कार कुठे आहे?

  उत्तर द्याहटवा
 6. हिंदू धर्मामध्ये राम आणि रामायणकालीन व्यक्तिरेखा या आदर्श म्हणून समाजापुढे ठेवल्या जातात. आपण रामाप्रमाणे एकवचनी, एकपत्नी, सदाचारी, वैयक्तिक आयुष्यापेक्षा सामाजिक आयुष्याला महत्व देणारे आणि व्यक्ती पेक्षा विचारांचे महत्व समजून घेऊन जगावे.

  मनुष्य हा स्खलनशील प्राणी आहे.

  या पृथ्वीवर जन्म घेतलेला कोणताही मनुष्य परिपूर्ण नाही.

  आपण चांगले ते घ्यावे.

  प्रत्येकामध्ये काही ना काही चांगले जरूर आहे हे हि लक्षात ठेवावे.

  उत्तर द्याहटवा
 7. पिंपरी न्यायालयाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात बोलताना माजी न्यायमूर्ती, बी.जी.कोळसे पाटील यांनी सध्या च्या महिलांवरील अत्याचार व बलात्कारांना जबाबदार हिंदू पुरुषसत्ताक धर्मांध संस्कृती वर बोट ठेवत, आपल्या मुलांना लहानपणापासूनच चांगले संस्कार घडवा, मुला मुलीत भेद करू नका, मुलांना संविधानाची ओळख करून द्या, कायद्याचा आदर करायला शिकवा, स्त्रियांचा सन्मान राखायला शिकवले तर तो मोठेपणी स्त्री विटंबना करणार नाही...त्याचबरोबर लहान मुलांना ज्ञानेश्वरी, गीते पेक्ष्या "भारतीय संविधानाचे पारायण करायला लावा...असे मत त्यांनी मांडले...!

  मुल जन्माला आल्यानंतर त्या बाळाला माहित असते का....ते स्त्री आहे कि पुरुष...? जसे जसे ते मोठे होईल आपण त्यांना सांगतो...तू मुलगा आहेस हे कर...तू मुलगी आहेस ते करू नको...जन्मल्यापासून दोघांमध्ये आपणच भेद करतो आणि आपल्या कुटुंबात पुरुषसत्ताक वातावरण पोसतो....!

  पुरुषी विकृत्ती वाढली कि, समोरची स्त्री दुर्बल दिसू लागते, तिला काहीही केले किंवा तिचा कसाहि छळ केला तरीही ती काही करू शकत नाही, त्यामुळे स्त्रियांवरील अत्याचार वाढतच राहतात, आणि याला दुजोरा नक्कीच धर्मग्रंथातून आणि पुराणातून मिळतो, त्यांनी म्हटलेच आहे, पशु, शुद्र,नारी ताडन के अधिकारी....!

  उत्तर द्याहटवा
 8. हा हा हा ! आधी तुमच्या नावातून "मधुकर" आणि "राम"टेके हे शब्द वगळा आणि मग असले लेख लिहा.

  उत्तर द्याहटवा
 9. रामटेके साहेब ,

  आपला धर्म बुद्ध आहे. आणि जर बुद्ध धर्मप्रसार करायचा असेल तर तसे सरळ सरळ सांगत का नाही ?

  हिंदू देव देवता आणि धर्म यांची निंदा नालस्ती करायची आणि आव मात्र आणायचआ तात्विक / सामाजिक चर्चा करत असल्याचा.

  फार कष्ट करू नका थोडक्यात लिहा , हिंदू धर्म वाईट आहे आणि माझा स्वतःचा धर्म बुद्ध धर्म श्रेष्ठा आहे .

  उत्तर द्याहटवा
 10. as per boudh dharma krishna is who?
  Since Jataka tales are given from the perspective of Buddha's previous lives (as well as the previous lives of many of Buddha's followers), Krishna appears as one of the lives of Sariputra, one of Buddha's foremost disciples and the "Dhammasenapati" or "Chief General of the Dharma" and is usually shown being Buddha's "right hand man" in Buddhist art and iconography.[128] The Bodhisattva, is born in this tale as one of his youngest brothers named Ghatapandita, and saves Krishna from the grief of losing his son.[125] The 'divine boy' Krishna as an embodiment of wisdom and endearing prankster forms a part of worshipable pantheon in VAIBHAV RAI .[

  उत्तर द्याहटवा