मंगळवार, १६ एप्रिल, २०१३

मी श्री. रामटेके नाही, आयु. रामटेके आहे.आंतरजालावरील सर्वाना एक विनंती.... मी आयु. रामटेके आहे. श्री नाही.........!!!
आंतारजालावर माझा संदर्भ देताना मला चक्क श्री. रामटेके करुन टाकण्यात आले. बिचा-याना मी बौद्ध आहे हे जरी माहीत असले तरी बौद्धांच्या नावापुढे  श्री लावत नसतात हे माहीत नसल्यामुळे हा  घोळ झालेला दिसतो.  
मी धर्माने बौद्ध असून बौद्धांच्या नावापुढे आयु.(आयुष्यमान) असे लावण्याची पद्धत आहे. अन हिंदू धर्मात श्री. लावण्याची पद्धत आहे.  म्हणून मी सर्वाना विनंती करतो की माझा आदरयुक्त संदर्भ द्यायचाच झाल्यास यापुढे श्री ऐवजी आयु. असे लावाले. अन आदरयुक्त उल्लेख करायचा नसल्यास (ज्याची मला आता सवयच झाली आहे) काहीच लावू नये पण श्री. मात्र कृपा करुन लावू नका. 

परत एकदा सर्वाना विनंती आहे की मी श्री नाही.... आयु. आहे!

-आयु. एम.डी. रामटेके.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा