मंगळवार, २३ एप्रिल, २०१३

शरद पवार : भाग-०२ महाविद्यालयीन कारकिर्द

                                          शारदाबाई  या सत्यशोधक चळवळीतल्या एका खंद्या कार्यकर्त्याच्या घरी वाढलेलं नि अत्यंत शिस्तीत जड्णघडण झालेलं तळागळातल्या लोकांबद्दल कळवळा असणारं व्यक्तीमत्व. त्याच बरोबर स्वाभिमान नि बाणेदारपण हा त्यांच्या ठायी असलेला उपजत गूण परिश्रम व निष्ठा याचा अग्रह धरणारा होता. अखंड नि अविश्रांत परिश्रम घेतल्यास जगात काहिही असाध्य नाही व त्याच बरोबर हातात घेतलेले काम निष्ठेने केल्यास अडचणी स्वत:हून बाजूला सरकतात व तुमच्या यशाची वाट मोकळी होते असं त्यांचं तत्वज्ञान होतं.  जोडीला लाघवी रूप, मोठ्यांचा आदर नि विनयशीलता लाभलेल्या अशा या मुलिसाठी वर शोधणे सुरु झाले. हा हा म्हणता गोविंदराव पवार यांचे स्थळ चालून आले अन एक अभूतपुर्व सोहळा पार पडला.  शारदाबाई पवारांच्या घरी सून म्हणून आल्या.
१२ डिसेंबर १९४० रोजी या दांपत्यानी एका मुलास जन्म दिले. त्या मुलाचे नाव शरद... हेच ते शरद पुढे लोकनेते शरद पवार म्हणून उभ्या भारतात नावारुपास आले. घरची परिस्थीत बरी होती. बारामतीपासून जवळच असलेल्या काटेवाडी नावाच्या एका लहानशा खेड्य़ात पवारांचा जन्म झाला. प्राथमिक शिक्षण काटेवाडीतच झाले. पुढे बारामती येथे शिक्षण घेतले. त्या नंतर प्रवरानगर मधून हायस्कूलचे शिक्षण घेत असताना गोवा मुक्तीसंग्रामाचा वणवा पेटत होता. या वणव्याचे लोण दिवसेंदिवस पसरतच गेले. याच दरम्यान डॉ. लोहीया यानी पोर्तूगीज सरकारच्या विरोधात आंदोलन छेडले होते. शरद पवारानी प्रवरानगर हायस्कूलच्या विध्यार्थ्याना एकत्र करुन लोहियाना पाठिंबा दर्शविण्यासाठी एक जंगी मोर्चा काढून गोवा सरकारचा निषेध केला. काय वय होतं? १६ वर्ष... या वयात पोरं एकतर अभ्यासात गुंतलेले असतात किंवा टुकारक्या करत हिंडत असतात. पण जी माणसं ध्येयानी झपाटलेली असतात ते अखंड लढत असतात. त्या अखंड लढ्याची सुरुवात ईथे झाली जो आजही अविरतपणे चालू आहे.
सन १९५८ ला पुण्यातील बी.एम.सी.सी. महाविद्यालयात वाणिज्य शाखेतील पदवी अभ्यासक्रमासाठी शरद पवारानी प्रवेश घेतला अन महाविद्यालयीन शिक्षणाची सुरुवात झाली. पवार बारामतीसारख्या खेड्यातून आल्यामूले पुण्या सारख्या शहरात त्याना फारशी मानाची वागणूक मिळात नसे. वर्गातील शहरी विद्यार्थी खेडवळ म्हणून हीनवत, अनेकदा टाकून बोलत. गावाकडून येणा-याची आजही हीच अवस्था असते. तिथे लढा उभारायचा असतो. अन लवकरच ती संधी चालून आली. त्या काळात विद्यालयातील निवडणूका मोठ्या रंगतदार असत. महाविद्यालयीन निवडणूका आल्या नि पवारानी अर्ज भरला. हा काय निवडून येणार म्हणून टर उडविणारे कमी नव्हते पण ते पवार होते... माणसं जोड्ण्याचा निसर्गदत्त गूण पवारांच्या ठायी होता. त्या बळावर त्यानी लवकरच महाविद्यालयातील मुलांशी मैत्री वाढविली निवडणूक जिंकण्याचा आराखडा तयार करुन त्या दिशेनी मोर्चेबांधणी सुरु झाली. हा हा म्हणता पवारानी प्रचारात आघाडी घेतली. निवडणूका झाला अन निकाला लागले तेंव्हा सगळे थक्क होऊन पवारांकडे पाहात राहिले. तथाकथीत प्रतिस्पर्ध्याना धूळ चारत शरद पवार नावाचं बारामतीचं पोरटं थेट निवड्णूक जिंकत पुण्यातील महाविद्यालयीन इतिहासात नवे पान लिहले. ईथली पोरं मात्र पवारांच्या या विजया धास्तावली. कारण त्यानी पवाराचा अनेक प्रसंगी तेजोभंग केला होता. आता पवारांची पाळी होती त्या विरोधकांचा अपमान करण्याची. पण हे पोरगं निराळं होतं. वृत्तीने अत्यंत सामंजस्य, संयत नि समावेशक गूण ज्याच्या ठायी ठासून-ठासून भरले होते असे ते पवार होते.  पवार  विजयानी हुरळून न जाता पराजित झालेल्या विरोधकाना मोठ्या मनाने मैत्रीचा हात दिला अन त्याना सोबत घेऊन एक नवीन आदर्श त्या महाविद्यालयाला घालून दिला. पवारांच्या या गुणानी पोरं अवाक झाली. पवार हे मुळातच मोठ्या मनाचे, शांत स्वभावाचे नि क्षमाशील वृत्त्तीचे असल्यामुळे लोकं जुळत गेली अन त्यांचे विरोधकही त्यांच्या या गुणाचा गौरव करु लागली. हा हा म्हणता पुण्यातील सर्व कॉलेजात पवार पॅनलचे विद्यार्थी निवडून येऊ लागली अन शरद पवार हे पुण्यातील महाविद्यालयीन राजकारणातील एक अत्यंत महत्वाचे  विद्यार्थी म्हणून नावा रुपास आले.
वर्ल्ड यूथ फोरम
पवार जेंव्हा महाविद्यालयीन शिक्षण घेत होते तेंव्हा तीन अंत्यत महत्वाच्या घटना घडल्या एक १९६१ साली पानशेतचे धरण फुटले अन पुण्यात हाहाकार उडाला. दुसरं १९६२ मध्ये चीननी “हिंदी-चीनी भाई भाई चा” नारा तोडत देशावर हल्ला चढविला अन देशात चिन्यांविरोधात जनक्षोभ उसळला. अन तिसरी घटना म्हणजे महाविद्यालयाच्या शेवटच्या वर्षाला असताना ऐन परिक्षेच्या तोंडावर पवारांची वर्ल्ड यूथ फोरम नावाच्या जागतीक परिषदेसाठी निवड झाली. या तिन्ही घटना वेगवेगळ्या जरी होत्या तरी या घटनानी पवारांच्या व्यक्तीमत्वाला नवे आयाम मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली. वर्ल्ड यूथ फोरमची परिषद इजिप्तमधे भरणार असल्यामूळे या परिषदेस गेल्यास त्यांचे एक वर्ष वाया जाणार होते हा त्यातील एक तोट होता.  
पानशेतच्या धरणफुटीत पवारानी आपल्या विद्यार्थी मित्राना सोबत घेऊन पुण्यातील लोकाना मोठी मदत करताना रात्र-रात्र जागून अन्न-धान्य वाटप सारख्या कार्यात मोठी आघाडी घेतली अन सगळं सुस्थीर होईस्तोवर जिवाचं रान करत ते पुणेकरांसाठी झटत राहिले. पुण्यातील व्यापारी वर्गानी पुराचा तडाखा बसलेल्या लोकाना अनेक मदती पुरवल्या होत्या अन त्यात शरद पवार व त्यांची टीम  व्यापारानी देऊ केलेली मदत प्रत्येका पर्यंत पोहचवीण्यासाठी रात्रंदिवस झटत राहिली. 
चीनच्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी पवारानी विद्यार्थ्यांचा एका जंगी मोर्चा आयोजित केला जो पुणेकरानी या आधी कधी न पाहिला होता न ऐकला होता. एकंदरीत या दोन घटनां पवारांसाठी संधी घेऊन आल्या होत्या. पवार नावाचं तडफदार विद्यार्थी नेतृत्व पुण्यात आकार घेत असताना ईथे नवा इतिहास रचाला जात होता. हा इतिहास इथेच थांबणार नव्हता कारण पवाराच्या कार्याचा आवाका ईतका प्रचंड होता की या विद्यार्थ्याची दखल महाष्ट्रातील दिग्गजाना घ्यावी लागली. पवार थेट मुख्यमंत्री यशवंतराव चव्हान यांच्या संपर्कात आले अन सुरु झाली राजकीय वाटचाल...
पण...
पण याच बरोबर जी तीसरी घटन घडली जिनी पवारान अगदी वयाच्या वीशीत जागतीक पातळीवर नेऊन ठेवलं ती म्हणजे जागतीक विद्यार्थी परिषद. पवार शेवटच्या वर्षात शिकत होते अन त्यांची या परिषदेसाठी निवड झाली. आता प्रश्न असा होता की जर या परिषदेला गेलं तर वर्ष बुडणार अन नाही गेलं तर चालून आलेली सोन्यासारखी संधी परत कधीच मिळणार नव्हती. पवारानी या बद्दल घरी विचारणा केल्यावर वडील दरडावले “नसते उद्योग सोडून दे अन गपगूमान परिक्षेला बस. पुढे वकिलीचे शिक्षण घे अन तळागळातल्यांसाठी काम कर...” वडलांचही बरोबर होतं. प्रकाशझोतात येण्यापेक्षा प्रत्यक्ष अंधारात जाऊन खितपत पडलेल्या बहुजनासाठी राबणारे स्वत: गोविंदराव स्वत:च्या मुलाला यापेक्षा वेगळा काय सल्ला देऊ शकत होते? नंतर त्यानी हा विषय हळूच आईकडे काढला. आई मात्र स्वत: कर्तबगार तर होतीच पण आलेल्या संधीचं मोल जाणणारी, अत्यंत चाणक्ष बुद्धिची व दूरदर्शी विचारसरणीची आधूनिक स्त्री होती. त्या काळात मराठा स्त्रीयाना साधं डोक्यावरुन पदर काढायला परवानगी नव्हती. डोक्यावर पदर घेतल्या शिवाय बाहेर पडायचं नाही अशा काळात शारदाबाई पवार ह्या जिल्हा लोकल बोर्डाच्या सतत १७ वर्ष सदस्या राहिल्या होत्या. त्याच बरोबर शेतात कामाला जाताना स्वत: टांगा चालवत जायच्या. भोवताचले मराठे जे रुढीवादी नि विषमतेचे पुरस्कर्ते होते त्यांच्या भूवया उंचावत. रुढीवादी परंपराना थेट उध्वस्थ करत शारदाबाईची वाटचाल सुरु झाली. सत्यशोधक चळवळीचा वारसा भक्कम असल्यामुळे त्या सहसा डगमगत नसत. तेंव्हाच्या चालिरीतींची पर्वा न करता थेट पुरुषाच्या खांद्याला खांदा भिडवून वाटचाल करणारं ते तेजस्वी व्यक्तीमत्व होतं. आपल्या पोराकडे पाहून त्या म्हणाल्या “तू जा... परिक्षेचं काय, ती नंतरही देता येईल” अन शरद पवाराचं जिव भांड्यात पडलं. हा धडाडीने निर्णय घेण्याचा गूण अजित पवारांत उतरला. प्रशासनावर भक्कम पकड नि जागच्या जागी निर्णय घेण्यात अजित पवारांची ख्याती आहे. 
हा हा म्हणता शरद पवार ईजिप्तच्या परिषदेस दाखल झाले. तिथे जगातील प्रत्येक कानाकोप-यातून पोरं आली होती. प्रत्येकाची संस्कृती निराळी, अनूभव वेगळे, भावविश्व वेगळे नि शिक्षण पद्धती, आर्थिक विकास ते रुढी परंपरा या सगळ्या आघाड्यावर प्रत्येक विद्यार्थी हा त्या त्या देशाचा जणू सांस्कृतीक साठा होता. अन त्यांच्यातला तो ठेवा पारखण्याची पवारांची नजर नि ती अभ्यासू वृत्ती याचा एकंदरीत परिपाक असा झाला की पवार सगळ्यांशी एक कंफर्ट-लेवल तयार करु शकले. जागतीक पातळीवरील या भिन्न संस्कृतीच्या विविध लोकांशी  अजोड असा संवाद घडवू शकले. लोकं जोड्ण्याचा गूण त्यांच्या अंगी ठासून भरला होता व तो जागतीक पातळीवर प्रयोगण्याचा हा पहिला वहिला प्रयोग नि अनूभव मोठा परिणाम साधणारा होता.  हा हा म्हणता सगळ्या जगातील विद्यार्थ्यांत ते लोकप्रिय विध्यार्थी ठरले. इजिप्तच्या त्या परिषदेली पवारांचे भाषण उभ्या जगानी ऐकले. शरद पवार त्या परिषदेतील सर्वात गुणी विध्यार्थी म्हणून गौरवले गेले. ही परिषद पवारांच्या आयुष्यातील एक अपूर्व घटना होती. ख-या अर्थाने या परिषदेनी पवाराना जागतीक पातळीवर नेम-फेम मिळवून दिले. भारतात परत आल्यावर त्यांचं जंगी स्वागत झालं. मोठा गौरव करण्यात आला. अशा प्रकारे महिविद्यालयीन शिक्षण पुर्ण करत ते १९६२ मध्ये वाणिज्य शाखेतून पदवीधर झाले. 
-----------
पुढील भागात- यूवक कॉंग्रेसमधे प्रवेश

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा