बुधवार, २४ एप्रिल, २०१३

शरद पवार : भाग- ०४ विधानसभेत पहिले पाऊल.१९६७ वर्ष शरद पवारांसाठी अत्यंत महत्वाचे वर्ष ठरले. या वर्षाच्या अगदी सुरुवातीलच निवडणूक आयोगानी महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणूका जाहीर केल्या. ठरल्या प्रमाणे निवडणूका १९६७ च्या मार्च महिन्यात होणार होत्या. वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील अन यशवंतराव चव्हाण हे तीन दिग्गज नेते महाराष्ट्राच्या राजकाराणाचे  स्तंभ होते. त्याच बरोबर त्यांचे अनेक सहकारी महाराष्ट्रातील कॉंग्रेस पक्षाचा डोलारा सांभाळत होते. पण १९६४ मध्ये नेहरुंचा मृत्यू झाला असल्यामूळे देशात कॉंग्रेसची स्थीती फार चांगली नव्हती. याचा फायदा उचलत डावे भक्कमपणे उभे राहण्याच्या प्रयत्नात होते नि वेगवेगळे प्रयोग करत सत्तापालट करण्याच्या सर्व आघाड्यावर ते झट्त होते. एकंदरीत परिस्थीती बिकट होती.  अशा बिकट प्रसंगी शरद पवार महाराष्ट्रातील राजकारणात उतरले होते. आता पर्यंत ते राज्याच्या राजकारणात नव्हते. तरुणांची संघटना बळकट करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती नि त्यानी मोठ्या कष्टाने पार पाडली. देशातील कॉंग्रेसची डळमळीत असताना पवारानी मात्र ईथे संघटना बळकट केली. यशवंतराव चव्हाण मात्र पवारांच्या या कष्टाळू वृत्तीवर नि संघटन कौशल्यावर बारीक नजर ठेऊन होते. हा हा म्हणता विधानसभा निवडणूका येऊन ठेपल्या अन पवाराना तिकीट देण्याचा विचार त्यांच्या मनात चमकून गेला. पण अनेक अडचणी होत्या.  विधानसभेची तिकीट मिळविण्यासाठी पक्षातील ईतर जुने खेळाडू उभे ठाकले होते. तुलनेने लहान असलेल्या पवाराना तिकीट मिळू नये यासाठी बारामती मतदार संघातील अनेक वजनदार नेते आपलं वजन वापरुन तिकीट मिळविण्याच्या प्रयत्नात होते.  महाराष्ट्रातील ईतर नेत्यांच्या तुलनेत शरद पवारांचा जनसंपर्क नि संघट्न बांधणी याची ज्याना कल्पना होती त्याना व ईथल्या सर्व तरुणांचा पवारांच्या बाजूनी कौल होता. थोड्याच अवधीत जबरदस्त जनाधार लाभलेला हा लहानसा मुलगा मोठ मोठ्याना आडवं करण्याचं बळ अंगी बाळगून होता.  हे सगळं पाहता महाराष्ट्र प्रदेश कॉंगेस कमिटीने दिल्लीत पवारांची शिफारस केली. त्याकाळी अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटी उमेदवारी घोषीत करत असे. प्रदेश कॉंग्रेसच्या शिफारशीवरुन अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीने पवारांना बारामतीचं तिकीट दिल्याची घोषणा केली अन तरुणाईत एकच जल्लोश उडाला. हा हा म्हणता प्रचारास सुरुवात झाली. गावोगावी हिंडून, खेडोपाडी लोकाना भेटून पवार व टीम प्रचार करु लागली. दलितांच्या वस्त्या वस्त्यात जाऊन पवारानी दलित नेत्यांच्या भेटी घेतल्या. प्रत्येक जाती धर्माच्या लोकानी भेटून मतदान करण्याची विनंती केली. बारामती तालूका प्रचारानी दणाणूक सोडला. एकदाच्या निवडणूका पार पडल्या अन शरद पवार विक्रमी मतानी निवडून आले. वर्ष... १९६७... वय काय? तर फक्त २६ वर्षे. आयुष्यातील पहिली सार्वजनिक निवडणूक लढवून ख-या अर्थाने राज्याच्या राजकारणात पहिले पाऊल ठेवले. अन सुरु झाले पुरुगामी पर्व...!!!
रोजगारहमीची योजना:
आता शरद पवार विधानसभेतील सर्वात तरुण आमदार म्हणून काम पाहू लागले. अन याच दरम्यान त्यांची महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस म्हणून नियुक्ती झाली. पवारांचे वडील हे सत्यशोधक चळवळीतले सक्रिय कार्यकर्ते. त्याच बरोबर त्यांच्या आई सुद्धा सत्य शोधक परिवाराचा वारसा घेऊन आलेल्या. दलितांच्या प्रती कळवळा असणा-या या दांपत्याने पवारांवरही तसे संस्कार केले होते. सत्यशोधक चळवळीचा पाया समतेचा आहे नि ही समता पवारात खोल खोल रुजलेली होती. आता ती इतर लोकामध्ये रुजविण्याची जबाबदारी पवारांवर येऊन पडली होती. समता रुजविण्याच्या दिशेने वाटचाल करताना समाजातील तळागळातल्याना मुख्य प्रवाहात आणने अत्यंत गरजेचे आहे हे पवार ओळखून होते. ज्योतीबा फुले व बाबासाहेबाना  जी समता हवी होती ती रुजविण्याची अलौकीक संधी पवारांकडे चालून आली होती. आईवडलांच्या संस्काराचं व स्वप्नाचं सोनं करण्याची ही संधी होती. फुले-शाहू-आंबेडकर चळवळीचा ज्याना स्पर्श होतो ते विचार करतात अन पुढच्यालाही विचार करायला लावतात. यातूनच पवारानी ठरवलं की आपण उभ्या महाराष्ट्राला विचार करायला लावू. एक वैचारीक राज्य घडवू... अन त्याची सुरुवात करावी लागेल ती कार्यकर्त्याना विचार करायला लावून. अन त्यातून जन्मास आला “कार्यकर्त्यांचा वैचारीक शिबीर” पवार हे परिवर्तनवादी विचार सरणीचे होते अन आता ती विचारसरणी कॉंग्रेस पक्षाच्या सहाय्याने गतीमान करत राज्याला विकासाच्या नव्या वाटेवर नेऊन ठेवण्यासाठी त्याना मोठी संधी चालून आली होती. त्यासाठी त्यानी कार्यकर्त्यांचे वैचारीक शिबीर घेण्याचे ठरविले ही एक अपूर्व नि अलौकिक घटना होती. आज पर्यंत कोणाच्या मनालाही न शिवणारा हा विषय नि युक्ती पवारानी मात्र प्रत्यक्ष कृतीत उतरविण्याचे जाहीर केले. वरिष्ठांशी चर्चा करुन कार्यकर्त्यांचा वैचारीक शिबीर घेण्याचे ठरले. 
हा हा म्हणता महाबळेश्वर हे ठिकाण पक्के झाले अन राज्यातील काना कोप-यातून तरुण कॉंग्रेस कार्यकर्ते शिबीरासाठी येऊन धडकले. १९६७ चे हे शिबीर म्हणजे नुसते शिबीर नव्हते तर ईथे महराष्ट्राच्या पुढील वाटचालीची पायभरणी केली गेली. रोजगार हमी सारख्या कायद्याचा व धोरणाचा जन्म ईथे झाला. त्याच बरोबर ईथल्या रंजल्या गांजल्यांच्या व मुख्य प्रवाहातून बाहेर फेकले गेलेल्या आणि हजारो वर्षापासून दारिद्र्यात खितपत पडलेल्या दीन दुबळ्याना नि जातीयवादाची झड बसून उध्वस्त झालेल्या दलिताना मुख्य प्रवाहात आणण्याच्या कार्यक्रमाची रुपरेषा खुद्द पवारांच्या पुढाकारणे ईथे ठरली. त्याच बरोबर शेती-व्यवसायास प्रोत्साहन, नियोजन नि विविध मदती देण्यासाठी अनेक अंगानी चर्चा करुन त्या अनुषंगाने कार्यक्रम आखण्याचा व तो राबविण्याचा निर्णय ईथेच झाला. साखर कारखाणे, सूत गिरण्या व दूधसंघ अशा कृषी-औद्योगिक समाज निर्मीतीचा पायाही ईथेच घातला गेला. एकंदरीत पवारांच्या नेतृत्वातून महाराष्ट्राच्या प्रगतीच्या दिशा ठरविल्या गेल्या... अन कधी तर  अगदी वयाच्या २६-२७ व्या वर्षी.

----------------- 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा