शनिवार, २७ एप्रिल, २०१३

इंग्लडमधील जातीयवाद

Jo Swinson (The Equalities Minister)
भारतीय हिंदू कितिही शिकला अन जगाच्या कोणत्याही कोप-यात गेला तरी तो जातीयवाद सोड्णार नाही हे परत एकदा सिद्ध झाले. साहेबांच्या देशात वर्षानुवर्षे राहणा-या हिंदूनी जातीयवादाचा ईतका कळस गाठला की उच्च वर्णीयांच्या ढुंगणावर लाथ घालत तिथल्या संसदेनी जातीयवाद प्रतिबंधक कायदा पास केला. ही खरतर हिंदू व सर्व भारतीयांची लाज काढणारी घटना आहे. हिंदू धर्म हा मानवी समाजाला मिळालेला अभिशाप आहे जो समस्त हिंदू नष्ट झाल्याशिवाय नष्ट होणे अशक्य वाटते. बाबासाहेबानी जातीयवादाच्या विरोधात मोठा लढा उभारुन या देशाला हिंदूच्या जातीयवादातून मुक्त करण्यासाचा प्रयत्न केला. पण हिंदू काही दाद देईना... शेवटी धर्मांतर करत ईथे बौद्ध धम्म रुजवून या देशाची गेलेली अब्रु वाचवण्याचा प्रयत्न झाला. पण हिंदू काही सुधरेणा... त्या नंतरही ईथे अनेक घटना ज्या निव्वड जातीयवादातून नि वर्चस्ववादातून घडल्या होत्या. अन त्या घट्नानी वेळॊवेळी मानवतेच्या कसोटीवर देशाची अब्रू घालवली होती. खैरलांजी, घाटकोपर हत्याकांड ते अगदी काल परवा नगरमध्ये जातीयवादातून केलेल्या कत्तली... असे अनेक उदाहरण आहेत. पण ह्या झाल्या देशातल्या घटना व ईथला जातीयवाद. पण हा जातीयवाद चक्क सातासमुद्रापार गेल्याची बातमी वाचून मी तर हबकलोच... केवढा पातळयंत्रीपणा...!!! पोटापाण्यासाठी जगात स्थलांतर करताना इंग्लडमध्ये मोठ्या प्रमाणात राहू लागलेला हिंदू तिथेही जातीयवाद करुन देशाची अब्रू घालवित आहे.  धर्माचा संस्कार किती विखारी व समाजघातकी असू शकतो हे याचं धडधडीत उदाहरण आहे. जगातील इतर लोकं शिकून जुन्या अनिष्ठ प्रथाना मूठमाती देत प्रगती करत आहेत व ईतराना समान पातळीवर स्विकारत आहेत. हिंदू मात्र उलट दिशेनी प्रवास करतोय. त्याला हे सगळे आधुनिक सोयी हवेत पण जातीयवादही हवाय. ईतरना कमी लेखण्याची वृत्ती काही सुटेना. मग इंग्लडमध्येही सुरु झाला जातीयवाद. मग तू खालच्या जातीचा व मी वरचा जातीचा हे प्रकारे तिकडे हजारो मैल साहेबांच्या देशातही सुरु झाले. मग तिथे विरोध होणे क्रमप्राप्त होते. त्यातून संवर्ण हिंदू व दलित हिंदू यांच्यात खडाजंगी होऊ लागली. तिथे जातीयवाद उग्र रुप धारण करु लागलं अन त्याचा प्रतिध्वनी थेट गो-यांच्या संसदेत गुंजला.
२६ एप्रिल २०१३ च्या टाईम्स ऑफ इंडियाच्या बातमी नुसार इंग्लडमधील हिंदूची संख्या ८,१६,८३३/- एवढी आहे. हा आकडा २०११च्या जणगणनेचा आहे. म्हणजे आज त्यात आजून भर पडले असेलच. अन यात दलितांची संख्या साधारण ४,००,००० एवढी आहे. म्हणजे इंग्लडधील एकून हिंदूपैकी जवळपास ५०% हे दलित आहेत.
साहेबांच्या देशात गेले खरे पण जातीयवाद्यांची जातपात करण्याची खोड काही गेली नाही. हे सगळं सुरुवातीला कुणी फारसं मनावर घेतलं नाही कारण एवढ्या शिकल्या सवरल्या हिंदूना काय पडलं जातीयवाद करायचं? असा साधारण समज होता. पण हिंदू हा नालायका तो नालायकच असणार... तो शिकला काय अन सवरला का... तो जातीयवाद कधी सोडू शकणार नाही हे त्या गो-यासाहेबाना कुठे माहित होत? एकदा तालिबानी सुधरतील पण हिंदू मात्र जातीयवाद सोडणार नाही हे पक्क. हा दोन जातींचा व वर्णवर्चस्वाचा झगडा संसदेत पोहचावा एवढा उग्र बनत गेला तरी हिंदुना चेव आला नाही. केवढा तो माज!
हाऊस ऑफ लॉर्डस व हाऊस ऑफ कॉमन्स या दोन्ही सभागृहातील सदस्याना हा मोठा धक्का होता. सुरुवातीला तर हाऊस ऑफ लॉर्ड्सचे सदस्य यावर विश्वास ठेवायला तयारच नव्हते. शिकलेला व ते ही इंग्लडला राहणारा हिंदू जातीयवाद करेल हे त्यांना पट्तच नव्हतं. पण त्या नंतरच्या अनेक रिपोर्टस व पुरावे तपासल्यावर हाऊस ऑफ लॉर्डस खडबडून जागा झाला. गो-यांच्या देशात रुजत गेलेला जातीयवाद पाहून सगळे सदस्य थक्क झाले.  त्याच्यासाठी हा मोठा धक्का होता. आता मात्र या विखारी वृत्तीवर जालीम उपाययोजना करणे आवश्यक होते. अन Jo Swinson  (समता मंत्रीनी) शेवटी इंग्लडमधे जातीयवादावर बंदी घालण्याचा बील पास केल्याची घोषणा केली. दलितानी जल्लोष केला. आजच्या काळात ही वेळ यावी यापेक्षा वाईट काय असेल?  पण याही पेक्षा लाजिरवानी घटना म्हणजे जातीयवाद हवा म्हणून संवर्ण हिंदूद्वारा या बीलाचा निषेध करण्यात आला. आहे की नै कमाल? व्वा...रे... हिंदुनो मती मेली की काय तुमची? 
अनेक वेळा जातीयवादामूळे या देशाला मान शरमेने झुकवावी लागली अन काल परत एकदा भारताची मान साहेबांच्या देशात शरमेनी झूकली.

---------------
टाईम्सची बातमी खालील धाग्यावर वाचा
 Times Of India

टिप:- निनावी प्रतिक्रीया छापल्या जाणार नाहीत

२ टिप्पण्या:

 1. हा तर जातीवादीचा कळस आहे.या सर्वणांनी जातिवाद साता समुद्रा पार पोहचवला.

  उत्तर द्याहटवा
 2. हिंदूंमध्ये अनेक जातीयवादी शक्ती आहेत हे मान्य. त्यांनी स्वतःच्याच धर्मीयांच्या अब्रूची लक्तरे पार वेशीला टांगली. इतकी, की जग हिंदू हा धर्म नसून संस्कृती आहे हे पुरते विसरून गेले. हिंदुधर्माचाच पंथातले बौद्ध लोक स्वतःच्या धर्माला वेगळे समजू लागले.
  हिंदुधर्म हा समाजाला मिळालेला शाप आहे हे म्हणणे मात्र अतिशयोक्तीचे वाटते.
  प्रत्येक धर्मात व संस्कृतीत चुकीच्या रूढी-परंपरा इतिहासात एकदा तरी येऊन गेल्या आहेत आणि हजारो वर्ष टिकल्याही आहेत. चीनमधली स्त्रियांचे पाय ठेचण्याची प्रथा सर्वश्रुत आहेच. युरोपच्या इतिहासातही अगदी सरंजामशाहीच्या काळापासून ते हिटलरी अत्याचारांपर्यंत वर्णद्वेषाचे आणि वर्गद्वेषाचे प्रकार पदोपदी आढळतील. अमेरिकेत टेक्सास कॅरोलीना आदि कर्मठ ख्रिश्चन प्रांतात गेलात तर आजही हे प्रकार सर्रास आढळतात. ऑस्ट्रेलियात भारतीयांची हत्या होते, आफ्रिकी लोकांना आजही काही प्रमाणात त्रास सहन करावा लागतो हे प्रकार नवे नाहीत. साहेबांनीच त्यांच्या राजवटीच्या काळात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे या सर्व गोष्टींना खतपाणी घातले. त्यामुळे त्यांना फार सभ्य समजण्याची गरज नाही. मुळात साहेबांच्या देशाचा इतिहास वाचला तर असे लक्षात येते की मूळच्या ब्रिटन प्रांतात अनेक ethnic groups व वेगवेगळ्या संस्कृतचे समूह नांदत होते, ज्यांच्या संस्कृतीची ब्रिटीशांनी अत्यंत निर्दयपणे कत्तल केली, स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी!

  असो. भारतातही चातुर्वर्ण्य व्यवस्थेच्या विपर्यासातून अशाच परंपरा निर्माण झाल्या हे आपले दुर्दैव. पण भारतात आज परिस्थिती मोठ्या प्रमाणावर बदलली आहे. तथाकथित उच्चवर्णीयांना ज्याप्रमाणे आपले विचार बदलण्याची गरज आहे त्याचप्रमाणे हिंदू, दलित, बौद्ध, शीख या सर्व हिंदूंच्या उपांगांना हिंदुत्वाचा अधिक व्यापकतेने विचार करण्याची गरज आहे असे वाटते. हिंदू धर्माकडे धर्म म्हणून न पाहता एक जीवनपद्धती व राष्ट्रीयत्व म्हणून पाहणे गरजेचे वाटते.

  आसिंधुसिंधुपर्यन्ता यस्य भारतभूमिका
  पितृभू पुण्यभूश्चैव स एव हिन्दुरीति स्मृतः

  उत्तर द्याहटवा