गुरुवार, १८ एप्रिल, २०१३

शरद पवार: भाग-०१ पुरोगामी पर्व


शरद पवार म्हटलं की मराठी माणसाच्या आंगावर काटा येतो. का तर मनाची चिडचिड व्हावी ईतकं बदनाम करुन ठेवलय मिडीयानी! बरं पवारांचा स्वत:चा मिडीया वगैरे आहे पण पवार कधी त्यातून स्वत:चं शुद्धिकरण करत बसले नाहीत. सामना, तरुण भारत वगैरे वृत्तपत्र तपासले की लक्षात येते की सकाळची प्रत्रकारीता तौलनिक दृष्ट्या कशी समतोल साधून आहे. त्यांच्यावर विरोधकांनी अनेक अरोप केले. त्यातल्या त्यात खैरनार साहेबानी तर या अरोपांचा कळस करत माझ्याकडे पवारांच्या विरोधात ट्रकभर पुरावे आहेत असे आत्मचरित्रातून लिखीत रुपात बोंबा मारल्या. पण जेंव्हा खरच ते पुरावे सादर करण्याची वेळ आली तेंव्हा त्यानी वृत्तपत्राच्या ढिगा-याकडे बोट दाखवून "हेच ते पुरावे" असे म्हटले. असाच एक अत्यंत मोठा अरोप पवारांवर केला जातो तो म्हणजे  यशवंतराव चव्हान जे पवाराना गुरुस्थानी होते त्यांच्याशी गद्दारी करत पवारानी आपली पोळी शेकली वगैरे. पण तो आरोपही खोटा आहे हे मी पुढील काही भागातून मांडणार आहे. या व्यतिरिक्त अनेक लहान सहान अरोप त्यांच्यावर झाले, ज्याचा मी या लेखमालिकेतून समाचार घेणार आहे. पवार सहसा अरोप खोडत बसण्याच्या फंदात पडले नाही अन ईथेच चूक होत गेली. अरे ला कारे करण्याचा त्यांचा स्वभाव नाही. ते सगळ्यांशी सलोख्याने वागतात. लोकं जोडण्यात त्यांचा हतखंडा आहे. क्षमा करणे हा त्यांचा स्वभावच आहे. यामुळे एक प्रकारे त्यानी शत्रूच्या हातात कोलीच दिले... त्यामुळे विरोधकाना त्यांच्यावर शिंतोळे तेवढे  उडविता आले मात्र त्या पलिकडे फारशी मजल मारता आली नाही. मागच्या पन्नास वर्षातील एकहाती सत्ता(एक अपवाद वगळता) हे त्याचे फलित आहे.
पुढच्या वर्षी निवडणूका आहेत. आज सोशल मिडीयाचा नाही म्हटलं तरी माहितीच्या देवाण-घेवाणासाठी मोठ्या प्रमाणात वापर होत आहे.  आता याही मिडीयाचा वापर करत पवारांची बदनामी करणे सुरु झाले आहे. पवारांचे एकेक खंदे नेते/विचारवंत यांची बदनामी करत त्याच्या पाठिशी भक्कम असलेला मतदार काढून घेण्याचे अनेक डाव रचले जात आहेत. चहू बाजूनी नाकेबंदी केली जात आहे. या सगळ्याचा परिणाम काय तर भगव्यांच्या हाती सत्ता सोपवायची अन परत एकदा घाटकोपर सारखे हत्याकांड घडवायचे. यातून वाचायचे असल्यास पुरोगामी पक्षाच्या पाठिशी उभे राहणे हाच एकमेव पर्याय आहे. पवारांवर आज पर्यंत अनेक अरोप झाले खरे पण एकातही ते दोषी आढळले नाही. या सगळ्या मागचे कारण काय तर पवरांचे राजकारण तौलणिक दृष्ट्या ईतर कुठल्याही नेत्यापेक्षा जास्त व्यापक, समावेश नि पुरोगामित्वाची कास धरणारे राहिले आहे. त्यांची धोरणं सदैव शेतक-यांचा व पिचलेल्या लोकांचा उत्कर्ष करणारी व परिवर्तन घडविणारीच राहिली आहेत.
शरद पवार सर्वप्रथम १९६७ साली विधानसभेवर निवडून गेले अन तेंव्हा पासून आज पर्यंत त्यांची राजकीय कारकीर्द जेवढी वादविवादानी व आरोपप्रत्यारोपानी भरलेली  आहे तेवढीच जाबाबदा-यानी व ऐतिहासीक घटनानी भरलेली आहे. दलितांच्या उद्धारासाठी पवाराने अनेक वेळा स्वत:वर संकट ओढवून घेतले आहेत. यातील माझ्या दृष्टीने सर्वात महत्वाची घटना वा निर्णय म्हणाल तर नामांतर... पवार नसते तर नामांतर झालेच नसते. पवारांसारखा खंदा लोकनेता आमच्या पाठिशी उभा ठाकल्यामुळे नामांतर घडले. आज त्याच पवारांवर चौफेर टिका होत आहे. त्यांच्या बाबतीत फक्त अन फक्त वाईटच लिहले जात आहे. प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. त्यांची चांगली बाजूही  आहे पण ती कोणी मांडताना दिसत नाही. अन पवाराना त्याची पर्वाही नाही. आजचा तरुण पवाराना नंबर एकचा विल्लन समजतो. पण ते सत्य नाही. पवारांची दुसरी बाजू आजच्या तरुणाना कळावी म्हणून मी ही लेखमालिका सुरु करीत आहे.
उद्या पासून मी पवारांची ती दुसरी बाजू या लेखमालिकेतून मांडणार आहे. यामागचा हेतू एकच... आजच्या पिढीला सांगायचे आहे पुरोगामी पवार!

जयभीम.
---------------
टिप:-  निनावी किंवा खोट्या नावाने लिहलेल्या प्रतिक्रीया छापल्या जाणार नाही याची दखल घ्यावी.

३ टिप्पण्या:

 1. शरद पवारांची दुसरी बाजू मांडली पहिजे हे बरोबर आहे. कोठल्याही राजकीय नेत्याचे योग्य ते विश्लेषण झाले पाहिजे. कोठेही अधिक -उणे बघितले पाहिजे. पण उणे-अधिक बघताना उणे जास्त असेल तर जोरदार टीका होते
  .
  नामांतर, स्त्रियांना वारसा हक्क, औद्योगिक धोरण यात शरद पवार योग्य आहेत,

  माफ करा, रामटेके सर, पण १९७८ पासूनच्या मुंबईतील सुसंघटीत गुंडगिरी विषयी काय? त्याचा पाया कोणी घातला? मस्तान, युसुफ पटेल, करीम लाला, वरदराजन आणि कैक माफिया हे आपापल्या एरियातील Boss होते, पण त्यांचे संघटन कोणी बांधले? दाउद, बाबू रेशिम, रमा नाईक, गवळी हे तर तेंव्हा खिजगीणतीतही न्हवते. १९८७ पासून पप्पू कलानी, ठाकूर बंधू(भाई, हितेंद्र) यांचा उदय आणि त्यांची भरारी कशी काय झाली? हिरानंदानी, दत्ता सामंत, रजनी पटेल, गोएंका बिल्डर्स आणि कैक बिल्डर्स यांच्या Nexus विषयीचे काय? ठाकरे, शरद पवार आणि पुढे प्रमोद महाजन यांच्या दोस्ती विषयी न बोललेले बरे!!!!!????? असे कैक प्रश्न शरद पवार या पुरोगामी महाराष्ट्रातील बहुजन समाजातून पुढे आलेल्या व्यक्तीशी निगडीत आहेत. मी IPL आणि सोनिया गांधींशी मतभेद आणि कोलांटी उडी याच्याविषयी तर बोलत नाही. या प्रश्नांची उत्तरे फक्त परमेश्वर असेल तर त्याला, नाहीतर नियतीला, नाहीतर शरद पवार यांनाच माहित !!!!!……

  प्रत्युत्तर द्याहटवा
 2. दलितांची बाजू घेणारे पवार? मग खैरलांजी आणि रमाबाई नगर या दोन्ही प्रकरणांत त्यांनी हस्तक्षेप का केला नाही? उघडपणे दलित समाजाची बाजू का घेतली नाही? जर ते नामांतर करू शकतात तर हे देखील करू शकत होते. जर ते खरोखरच पुरोगामी असते तर नामांतराच्या प्रश्नावर दलितांची घरे पेटण्याची वेळच त्यांनी येऊ दिली नसती.
  इतक्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या तरी हे एका तरी घरात गेले का? तो राहुल सुद्धा येउन गेला पण ह्यांना वेळ नाही. स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी मराठा तरुणांची माथी भडकवण्याचे काम ज्या संघटना करत आहेत त्यांना पवार लगाम घालू शकत नाहीत का? जर त्यांचा पक्ष खरोखरच पुरोगामी विचारांवर चालत असेल तर महापालिकेच्या निवडणुकांमध्ये शिवसेना आणि भाजपशी मैत्री कशी काय चालते? १९९५ चे युती सरकार ज्या अपक्ष आमदारांच्या पाठींब्यावर टिकले ते कोणाच्या सांगण्यावरून? न्यायालयात काही सिद्ध होऊ शकत नाही हा काय बचाव म्हणायचा का? स्वातंत्र्यवीर सावरकरांचा गांधीहत्येत सहभाग असल्याचेही न्यायालयात सिद्ध झालेले नाही. पण इतकी वर्षं त्यांची बदनामी होतेच आहे ना? मग पवारांबद्दलच इतका पुळका का?

  प्रत्युत्तर द्याहटवा
 3. आपल्या लेखातील "..दलितांच्या उद्धारासाठी पवाराने अनेक वेळा स्वत:वर संकट ओढवून घेतले आहेत... पवार नसते तर नामांतर झालेच नसते.." अशा काही वाक्यांनी जितके मनोरंजन झाले तितकेच वाईटही वाटले की, आपण ‘दलित’ शब्दातील सामर्थ्य व शक्ती अजूनही ओळखलेली नाही व अशाप्रकारे भडमुंजाना मोठे करण्याची सुपारी घेऊन आपण कोणता व्यक्तीगत फायदा पवारांच्या माध्यमातून करु ईच्छिता हे आगामी काळ स्पष्ट करेलच.

  प्रत्युत्तर द्याहटवा