मंगळवार, २३ एप्रिल, २०१३

विक्रम गोखले:- ताठ चेह-याचा अभिनेता.

विक्रम गोखलेला नुकताचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला उभ्या महाराष्ट्रातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. वृत्तपत्रानी तर भरभरुन लिहलं अन पुढचे काही दिवस पुरवण्यांमधून त्यांची कारकिर्द उलगडणारे अनेक लेख आलेत. अनेक वर्षापासून ते या क्षेत्रात असल्यामुळे मी सुद्धा त्यांचे काही सिनेमे पाहिले आहेत. चेह-याचे हावभाव, डोळ्यातील भावना नि संवाद या तीन गोष्टी तीन वेगवेगळ्या दिशेनी सुसाट पळविण्यात त्यांचा हतखंडा असून एकमेकांत ताळमेळ कसे नसावे याचा उत्तम नमुना म्हणजे विक्रम गोखले. किंबहून अभिनय कसे नसावे हे सांगण्यासाठीच त्यांचा जन्म झाला असावा असे अधुन मधुन वाटून जाते. अन जेंव्हा वाचलो की त्याना चक्क राष्ट्रिय पुरस्कार........मी तर पार उडालोच. कसं काय बुवा? मी डोकं आपटून आपटून थकलो पण मला काही कळलं नाही. खरतर विक्रम गोखलेला अजिबात अभिनय येत नाही या गोष्टिवर माझा प्रचंड विश्वास आहे. का? कारण त्याचा चेहरा... चेहरा हा अभिनयाचा सर्वात प्रभावी माध्यम. चेह-यातून अनेक भाव व्यक्त केले जतात अन आपण रोज ते अगदी सामन्य संवादात सुद्धा करत असतो. पण गोखलेंच्या चेह-याला भावना व्यक्त न करण्याचा जणू शापच आहे. त्यांनी किती कूंथुन अभिनय केला तरी ते भाव काही चेह-यावर उमटत नाहीत.
ताठ चेहरा:
विक्रम गोखलेचा चेहरा ताठ/राठ असा तो चेहरा आहे. त्याना कुठलिही भुमिका द्या... तो चेहरा मात्र ताठच. मग त्या ताठ चेह-या पर्यंत येता येता अभिनय कुठे बुजून जातो ते कळतच नाही. टिकास फावडा धरुन तो चेहरा खोदून  काढला तरी अभिनय काही सापडायचा नाही. चेह-यावर अनेक भाव तरळायला हवेत ही अभिनयाची प्राथमिक अट व गरज. गोखलेंचा चेहरा हा दगडा सारखा असल्यामुळे अभिनयाची ती पिल्लं बिचारी पार कंसाने गरगर फिरवून कसं आपटलं तस गोखलेच्या चेह-यावर आपटले जातात अन तुकडे तुकडे होऊन फेकले जातात. मग उरतो तो राठ चेहरा... मी मात्र बिच्चारा बनून अभिनय शोधत बसतो. चेह-याच्या हालचाली वगैरे गोष्टी गोखलेच्या गावीच नाहीत. थोडक्यात चेह-यावर व्यक्तिरेखा उमटविण्याची पहिली अटच विक्रम गोखले पुर्ण करु शकत नाहीत. कारण त्यांच्या दगडा सारख्या चेह-यावर ते अभिनयाचे विविध रंग पार टिकतच नाहीत. सटासट घसरुन जातात अन उरतो तो दगड.... त्या दगडावर जर एखादी माशी बसली तर माशिही हालणार नाही अन दगडालाही कळणार नाही तो जिवंत दगडी चेहरा म्हणजे गोखलेंचा चेहरा. मला एकदा त्यांच्या चेह-यावर माशी बसलेली पाहायची आहे.  असे काही ताठ चेहरे या इंडस्ट्रीत होते खरे पण ते दगडाच्या खालचे होते. विक्रम गोखलेचा चेहरा मात्र नुसता दगड नाही तर उच्च कोटीचा असा दगड आहे ज्यावर भावना कधी उमटतच नाहीत...
डोळे:
अभिनयातील दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे डोळे. प्रत्येक भाव हा डोळ्यात उमटत असतो. माणूस एकही शब्द न बोलता डोळ्यानी बरच काही बोलू शकतो अन पुढचा ते समजूही शकतो ईतकं ते प्रभावी संवादाचं माध्यम आहे. पण विक्रम गोखले मात्र ईथेही मार खातो. गोखलेच्या डोळ्यातून कायम एकच भाव वाहताना मी पाहिले आहे. सिंहाच्या डोळ्यात पाहताना जसे सूई हृदयात टोचते ती सुई गोखलेच्या डोळ्यात नेहमी दिसते. थोडक्यात धडकी भरविणारी ती करारी नजर आहे. खरं तर ही नजर मिळने वरदानच असते पण कलाकारानी ती नजर भुमिकेनुरुप बदलावी... तेंव्हा ते अभिनय. नाही बदलली तर त्याला अभिनय म्हणताच येणार नाही. गोखलेंच्या बाततीत हेच घडते. त्यांची ही करारी नजर अभिनयात मात्र वरदान न ठरता हसा ठरते. ते जेंव्हा एखादी भुमिका करताते तेंव्हा गोखलेच्या अभिनयातील नजर पात्राशी मेळ खात नाही. भावनेशी एकरुप होत व्यक्त होताना ही करारी नजर तशीच राहते अन अभिनयाचं पाणी होतं. 
आवाज व संवादफेक: 
आवाजाच्या बाबतीत मात्र गोखले उजवे आहेत. पण संवादफेकीत परत तोच ताठरपणा... आवज-डोळे-चेहरा या तिन्ही गोष्टी वेगवेगळ्या तीन दिशेनी सैरभैर धावत असतात. चेह-याचे भाव ताठर... मग पात्र काहिही असो, नजर करारी.... अगदी केविलवाणा प्रसंग असला तरी, अन संवाद भलताच... कोणाचा कोणाशी मेळ नसतो. थोडक्यात अभिनयातील तिन्ही प्रभावी माध्यमं चेह-याचे हावभाव-नजर-संवाद हे दिशाहिन धावताना पाहायचे असल्यास विक्रम गोखलेना पहा........ तरी ते अभिनयात कसे काय टिकून आहेत? हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. बहुतेक त्यांच्या त्या करारा नजरेनी लोकाना ईतर मापदंड लावून मुल्यमापना पर्यंत येऊच दिले नाही. त्या नजरेच्या प्रभावात सगळं दडून गेलं.

तरी त्याना राष्ट्रिय पुरस्कार मिळाला...कमाल आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा