सोमवार, ८ एप्रिल, २०१३

अजित पवाराच्या विनोदावर एवढा बाऊ का?


शनिवारी अजित पवारानी जरा मूड मधे येऊन काय दोन चार विनोद हाणले अन मिडीयानी नैतीकतेचे डोस पाजत उभा महाराष्ट्र पेटवून दिला. माझ्या घरी टि.व्ही. नसल्यामूळे मला हा सगळा प्रकार कळला नाही. पण माझे मित्र संजय सोनवणी यांचा काल(रविवारी) फोन आला व मला ही बातमी कळली. ऐकल्या ऐकल्या मलाही राग आला व मी सुद्धा अजित पवाराना (भावनेच्या भारात) दोन शिव्या हाणुन मोकळा झालो. आज मात्र आफिसला आल्यावर सगळे पेपर चाळून पाहिले तर याचा नको तेवढा बाऊ करण्यात आल्याचे जाणवले. काय म्हणाले अजित पवार? जे काही म्हणाले ते एवढां बाऊ करण्या एवढे नव्हतेच.  यापेक्षा खालच्या थराला जाऊन अनेक लोकानी कमेंट केल्याचे पुरावे आहेत.  ज्याना आपण महाराष्ट्राचे लाडके वगैरे म्हणतो व डोक्यावर घेऊन नाचतो ते लाडके अनेक जाहीर कार्यक्रमातून यापेक्षा खालचे व जास्त अपमानास्पद कोट्या हाणल्याचे पुरावे आहेत. तेंव्हा मात्र मिडीया त्या अश्लिल कोट्याना हजर जबाबीपणा म्हणून मोकळा झाला. एवढेच नाही तर असल्या अनेक अश्लिल कोट्यां एकत्र करुन महाराष्ट्राच्या लाडक्या लेकाच्या हजरजबाबीपणाचे एक लहानसे पुस्तक छापून ते विकायला काढले. आता बोला? गंमत बघा, अजित पवार बोलले तर नैतिकतेच्या कसोट्या अन ईथले तथाकथीत लाडके बोललेल तर तो हजरजबाबीपणा? आहे की नाही कमाल? म्हणजे कुठल्या वाक्याचा अर्थ काय लावायचा व काय नाही लावायचा हे या नालायक मिडीयानी आम्हाला सांगायचं अन आम्ही तोच अर्थ घ्यायचा? हे आजून किती दिवस चालणार?    

काय म्हणाले अजित पवार?

"माझ्याकडे आलेल्या निवेदनात पाणी सोडण्याची मागणी करणारी निवेदने जास्त आहेत. तलावाजवळ राने असणारे म्हणतात तलावात पाणी सोडा कालव्याच्या फाट्याला राने असणारे म्हणतात, फाट्याला सोडा, नदीजवळ राने असणारे म्हणतात नदीला पाणी सोडा; पण पाणीच नाही तर सोडायचे कुठून. तरीही पाणी सोडण्यासाठी आमदार बबनदादा शिंदेंनी उपोषणाचा इशारा दिला आहे. उजनीतून पाणी सोडा म्हणून कोण देशमुख पंचावन्न दिवस उपोषणाला बसला; पण सुटलं का पाणी. नाही ना, अहो धरणातच पाणी नाही तर पाणी आणायचे कुठून आम्ही काय त्यात मुतायचे काय?

हे जाहीरपणे बोलल्यानंतर ते पत्रकाराना म्हणाले "पत्रकारांनी गमतीचा भाग सोडून द्यावा, मी विनोदाने बोललो, नाही तर पेपरला टीव्हीला यायची आमची ब्रेकिंग न्यूज म्हणून" असा लगेच खुलासाही केला. याच बरोबर त्यानी खालील विनोदही केले. इंदापूर परिसरात रात्रीच्या वेळी होणाऱ्या भारनियमनासंदर्भात आलेल्या निवेदनाचा संदर्भ देत त्यांनी सभेतच अधिकाऱ्यांकडे विचारणा केली व भारनियमन वाढले असल्याची खात्री करून घेतली. यावर बोलताना ते विनोदाने म्हणाले
"तरी मी विचार करतोय की, अलीकडे मुले जन्माला येण्याच्या प्रमाणात कशी काय वाढ झाली?''   अन उपस्थीत लोकानी हसून दादही दिली. विषय ईथेच संपायला हवा होता. जर छापायचेच होते तर मग दादांच्या करारा स्वभात लपलेली विनोद बुद्धी इंदापूरकराना लोटपोट करुन गेली असे छापायला हवे होते. पण नाही. माणूस बदलला रे बदला की आमचे निकष व कसोट्याही बदलतात. मग सुरु होते बदडसत्र.... जे कालपासून सुरु आहे.
 
वरील सगळं प्रकरण पाहता अजित दादांचा मूड विनोदाचा होता व खेळीमेळीच्या वातावरणात निव्वळ विनोद बुद्धिने त्यानी वरील वाक्ये बोलली. पण आपला मिडीया लबाड त्यानी या दोन वाक्याचा धागा धरून दादांची पार इभ्रत काढायचे ठरवले अन काल पासून ते सुरु आहे.

अगदी या पेक्षा खालच्या स्थराला जाऊन ईतर कोणी जेंव्हा बोलले तेंव्हा मात्र याच मिडीयानी त्याल हजरजबाबीपण म्हणत महाराष्ट्राचा लाडका वगैरे उपमा दिल्या. त्यातील सर्वश्रूत नाव म्हणजे पु.ल. देशपांडे. हा माणूस जेंव्हा या पेक्षा खालच्या दर्जाच्या कोट्या करत हिंडायचा तेंव्हा याच मिडीयानी त्याना कसे उचलून धरले ते पाहू या.

१) बाकी काही घालूच नये....
भक्ती बर्वे नावाची एक नटी होती. ती फूलराणीच्या प्रयोगाच्यावेळी तीनी एका सराफाच्या दुकानातून सुंदरसं नेकलस आणाला होता. ते तीला ईतकं आवडलं की हे सांगताना बर्वे बाई म्हणाल्या  हे नेकलेस ईतकं सुंदर आहे की ते घातलं ना, की बाकी काही घालावस वाटतच नाही....! पु.ल. तिथे हजर होते. लगेच चोमडेपणा करत ते म्हणाले अरे व्वा, खरच की काय?” अन उपस्थीत हेच तथाकथीत सभ्य लोकं खिदळू लागले. खरं तर हा विनोद थेट लैगिक पातळीतला होता. तरी म्हणे हजरजबाबीपणा.....

२) जयश्रीबाईची पार्श्वभूमी.
जयश्री गडकर यांचा एकदा पुण्यात सत्कार होता. त्यात भाषणासाठी पु.ल. ना बोलावताना निवेदक सहज बोलून गेले... आता या नंतर भाई (म्हणजे पु.ल.) जयश्रीबाईंची पार्शभूमी आपल्याला उलगडून दाखवतील भाषणाला उभे राहिलेलं पु.ल. अत्यंत निर्लज्जपणे यावर म्हणाले जयश्रीबाईंची पाश्वर्भूमी मी देखील आपल्या प्रमाणे दुरूनच पाहिलेली आहे . ती चांगली आहे या पेक्षा त्या बद्दल अधिक उलगडा करण्यास मी असमर्थ आहे " परत एकदा हा सो-कॉल्ड समाज खिदडला. 

हे फक्त दोन उदाहरण ईथे देतोय. असे कित्तेक किस्से आहेत. माझ्याकडे एक लहान ५० पानी पुस्तक आहे अशा किस्यांचा. हे सगळं जाहीर कार्यक्रमातून होत असे अन ते आम्हाला याच मिडीयानी हजरजबाबीच्या नावाखाली पाजलं. अन आज एक बहुजन नेता थोडं काय विनोदी बोललारे बोलला.... नैतिकतेचे डोस झाले सुरु.

लक्ष्मण देशपांड्यांच व-हाड नावाचं नाटक 
या नाटकाला असले नसले सगळे पुरस्कार मिळालेत. त्याच बरोबर हे नाटक गिनीज पर्यंत जाऊन धडकलं. पुण्या-मुंबईत जेंव्हा हे नाटक व्हायचं व आजही होते तेंव्हा ईथला तथकथीत वर्ग व स्त्रीया आवर्जून हे नाटक पाहतात. काय आहे हो या नाटकात? हागणे, मुतने, पादणे हे सगळं भरुन वाहतं. अन हाच तथाकथीत वर्ग नाटकातील या हागण्या मुतण्यावर टाळ वाजवून दाद देते. अन प्रत्रकार लोकं या हागण्यामुतण्याच्या गोष्टीला रंगविताना अस्सल ग्रामिण मराठीचं दर्शन घडविणारं नाटक असा शेरा मारतात. मग आजितदादा अशाच एका ग्रामिण भागात जाऊन तिथल्या पट्टीत मुतणे वगैरे शब्द बोलल्यावर मिडीयानी खरं तर दादांचं कौतूक करायला होतं "बघा.... मंत्री असूनही मातीशी नातं आहे..." असा शेरा यायला होता. पण मिडीयानी लगेच मारा चालू केला. केवढी ही लबाडी. 
तुम्ही आमचे ग्रामिण जिवन व भाषा रंगविता तेंव्हा ती कला व ग्रामिण संस्कृती असते व आम्ही जेंव्हा ती बोलतो वा त्यात समरस होतो तेंव्हा मात्र तुमची मोजपट्टी लगेच बदलते अन ते घाणेरडे शब्द ठरतात. तुम्ही जेंव्हा आमची भाषा बोलता तेंव्हा तुम्हाला पुरस्कार मिळतो अन आम्ही तीच भाषा बोलल्यास म्हणे लोकांचा अपमान होतो. व्वारे मिडीया...! ही लबाडी असून ती थांबली पाहिजे. दादू कोंडदेवचा पुतळा हटविल्या पासून मिडीया अजितदादाना प्रत्य्के ठिकाणी कोंडीत पकडायला तत्पर असतो. ही बदनामी त्याचाच भाग आहे.
    
कालपासून मिडीयानी जे चालविले ती शुद्ध लबाडी आहे. नसेल तर मग वरील पुलंच्या उदाहरणांचा धागा धरुन उद्या मिडीयानी पु.ल. हा अश्लिल कोट्यांच्या लिंगपिसाट होताअशी बातमी छापावी अन चर्चा घडवून आणावे. जर हे करणार नसेल तर अजित पवारच्या कोट्यांवर ब्र शब्द बोलण्याचा मिडीयाला अधिकार नाही.

तुम्ही केला तो विनोद अन ईतरानी केला तो अनैतिक व असंवेदनशील???? 
ही लबाडी थांबली पाहिजे.
!!!

९ टिप्पण्या:

 1. Ramteke saaheb, aapan uttam vichaar lokaanparyant pochva ashi pan ek shikvani Gautam Buddhane keli aahe, tumhi jar itake prabhaavi lihita tar maanus kuthalya jaatichaa aahe hyacha kholaat na shirta, bharat ha pragatisheel desh kasa hoil aani garib talagaalatil lok nidan 100 rupaye roj swakashtaane kase milavateel hyacha vichaar kara. Jaatiche raajkaaran Bharat budavilyashivaay raahnaar naahi,

  उत्तर द्याहटवा
 2. देश'पांडू' एवढा Third Class होता हे आजच कळले.

  उत्तर द्याहटवा
 3. आपण पु. लं. च्या ज्या भाषणाचा उल्लेख केलात त्याचा सुस्पष्ट रेफेरेन्स दिलात आणि तो उल्लेख जिथे नोंदला असेल ते सांगितलेत तर कृपा होईल.

  उत्तर द्याहटवा
 4. कालच मी म्हणालो होत कि मारी आंत्वानेत ने भाकरी नाही तर केक खा हे वाक्य गरीब लाचार जनतेला उद्देशून म्हनालि , त्या मारी राणीचा विनाश शेवटी सडके अन्न खावूनच , झाला अजित पवार याचे पाणी नाही तर मूत प्या हे वाक्य त्या आंत्वानेत च्या वाक्यापेक्षा हि अत्यंत भयानक आहे , हा असला मनुष्या आपण मुख्यमंत्री म्हणून निवडून देतो याची महाराश्त्रिअन जनतेला लाज वाटली पाहिजे ., अजित पवार ला आत्ता आवरायची वेळ आली आहे , पवार महाराष्ट्रातील जनता भिकारी नक्कीच नाही , भारतातील सर्वात मोठ्ठ्या घाडमोडी याच जनतेने केल्या आहेत आणि हीच जनता आहे जी उपाशी राहून एके काळी मोघालांशी जिंकली , तुम्ही २ वर्षे कृष्णा खोरे , पात्बांधारे विभाग कवटाळून बसला आहात त्याचेच हे परिणाम आज मराठवाड्याच्या दुष्काळा मुळे दिसत आहेत . लोक पाण्याची भिक मागत नाहीत त्यांच्या हक्कच पाणी जे तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात चोरी करून नेत आहात तेच मागत आहेत , पाणी नको तर मूत प्या काय ? तुम्ही तरी कधी पिलय का ?

  उत्तर द्याहटवा
 5. तुम्हाला मुद्दा समजलाच नाही किंवा समजूनही तुम्ही वेड पांघरलेले आहे. जर दुष्काळ पिडीतांसाठी आंदोलन करणार्‍यांबद्धल दाखवलेली मग्रूरी तुम्हाला दिसली नसेल तर तुम्ही नुसत्या तपशीलांमधे गुंतला आहात. पु.ल.देशपांडे यांचे जे काही किस्से तुम्ही लिहिले आहेत त्यात अशी मग्रूरी दिसत नाही (तुम्हाला दिसली तर अर्थात त्यात नवल नाही).

  उत्तर द्याहटवा
 6. पु.लं. नि केलेले विनोद हे कोणत्याही दुखीः जनतेच्या जखमांवर मीठ चोळणारे नव्हते. ते वैयक्तिक होते, आणि ते ज्यांना बोलले होते त्यांनाही ते झोंबले नव्हते.
  बाकी, अनिता पाटील (हि बाई कि बुआ तो वेगळा विषय आहे.) यांना भेटून आलेला नसाल तर ठीक, अथवा सांगून काही उपयोग नाही. नसाल तर तिच्या ब्लॉग वर अजून माहिती मिळेल तुम्हाला पूरक.
  पु.लं. च्या बद्दलचा द्वेष तुमचा तुम्हालाच लखलाभ. न्यूनगंड हे यामागचे कारण असावे, बाकी काही नाही.

  उत्तर द्याहटवा
 7. मला तर वाटतंय अजित पवारांचं हे भाषणही पु.लं नीच पुर्वी लिहून त्यांना दिलं होतं... पवारांनी फक्त ते वाचलंय. मुळ लेखक पुलंच असणार. हा हा हा.

  उत्तर द्याहटवा