शनिवार, ११ मे, २०१३

कम्यूनिजम एक अभिशाप: भाग-१ (साम्यवादाची सुरुवात )

सन १८१८ हे वर्ष आपल्यासाठी अत्यंत महत्वाचे वर्ष ठरले. १ जाने १८१८ रोजी अत्यंत धूर्त, बलाढ्य नि गनिमी काव्यानी चढाई करणा-या पेशव्याच्या सैन्याचा महार सेनेनी कोरेगावभीमा येथे लोखंडी चणे चारत पाडाव केला. हजारो वर्षापासून दारिद्र्यात नि दैनावस्थेत खितपत पडलेल्या समाजानी ख-या अर्थानी या एक क्रांतीपर्व सुरु केले.  इंग्रजांच्या नजरेत तो एक सैनिकी विजय होता पण आमच्यासाठी तो गुलामी झुगारण्याचा एक तेजस्वी दिवास्वप्न प्रत्यक्ष आकार घेण्यारा क्रांतीदीन होता. पेशवाई बुडालेले हे वर्ष म्हणून आपल्यासाठी महत्वाचेहि व अभिमानाचेहि.
अन योगायोग म्हणजे याच वर्षी भारतापासून हजारो मैल दूर तिकडे युरोपातील जर्मन नावाच्या देशात एक चमत्कार झाला. ५ मे १८१८ रोजी कार्ल मार्क्स नावाच्या एका मुलाचा जन्म झाला. हा तोच कार्ल मार्क्स ज्यानी पुढे जाऊन कम्युनिजमचा वणवा पेटवला अन  हा हा म्हणता या वणव्यानी अर्धी पृथ्वी कवेत घेतली. साम्यवादाच्या आगीत अर्ध जग होरपळून निघालं. रक्ताची होळी खेळणे हा कम्युनिस्टांचा पहिला व शेवटाचाही आवडता खेळ. मार्क्स, लेनीन, माऒ ते स्टॅलीन असा तो नंतरचा साम्यवादाचा प्रवास झाला. अनेक देशं सुरुवातील मोठ्या आशेनी साम्यवादाचं स्वागत करायला धावली. अन नंतर मात्र पश्चाताप करत साम्यवादाला पिटाळून लावले. त्याची सुरुवात झाली अशी....
ते वर्ष होते सन १८४८...
१८४८ वर्ष माझ्यासाठी अविस्मरणीय तर आहेच पण आमच्या इतिहासातील एक सुर्वण पान म्हणून नोंदविल्या गेलेले हे वर्ष सर्व आंबेडकरी समाजानी क्रांतीपर्वाची सुरुवात म्हणून कोरून ठेवावे असे वर्ष. कारण १८४८ रोजी आमच्या समाजक्रांतीचे प्रवर्तक मा. ज्योतीबा फुले यानी पुण्यात मुलींची पहिली शाळा काढली अन भारतात शिक्षणाची नवी लाट उसळून गेली. अन याच वर्षी तिकडे युरोपात कार्ल मार्क्स नावाच्या विद्वानाने “द कम्युनिस्ट मेनिफिस्टो” नावाचं पुस्तक प्रकाशीत केलं अन तिकडे साम्यवादाची एक क्रांतीकारी लाट उसळली. भारतात स्त्री शिक्षण सुरु झाले अन युरोपात मजूरांना कम्युनिस्टाच्या रुपात एक नवी वाट सापडली होती. भारतातील स्त्री शिक्षणाची लाट पोकळ समाजाला आतून भक्कम करत गेली तर याउलट साम्यवादाची लाट युरोपीयन समाजाला आतून पोखरत गेली. पण हे कळायला काही मार्ग नव्हता. साम्यवाद स्विकारताना सर्व मजूराना हेच वाट्त होते की आपला आता उत्कर्ष होईल. आजवरचं दारिद्र्य निघून जाईल अन उरलेलं आयुष्य सुखात जाईल. असं वाटण्याचं कारण होतं खालील घोषणा... म्हणून युरोपातल्या प्रत्येक देशातल्या लोकानी कार्ल मार्क्स याचा सिद्धांत डोक्यावर  धरला अन कम्युनिजम झपाटयानी पसरत गेला.

“असं काय होतं कम्युनिजममध्ये की सगळे देश पटापट त्या आगीत उड्या टाकत होते?”

१८४८ व तेंव्हाच्या काळाचा जरा अभ्यास केल्यास आपल्या लक्षात येईल की यंत्राचा शोध लागून कारखानदारी उदयास आली होती. सर्वत्र भांडवलादारांची चंगळ होती. गुंतवणूकदार मोठमोठाले कारखाने उभारत गेले व कवडीमोल पैशात मजुरांचे अतोनात शोषण सुरु झाले. गरीब हा गरीब होत चालला होता व श्रीमंत हा आजून श्रीमंत होत चालला होता. मजूर वर्गाच्या मनात भांडवलदाराविरुद्ध  खदखदणारी आग नुसत्या ठिणगीनी भडका घेण्याच्या अवस्थेत येऊन ठेपली होती. मालदार वर्ग अय्याश, उधळा नि बेफिकीर बनत चालला होता तर मजूर वर्ग आजून दुबळा, कंगाल व खंगत चालला होता. दोन समाजातील दरी दिवसागणिक रुंदावत होती तर द्वेष कैक पट्टीने वाढत होता. अशी एकंदरीत स्फोटक परिस्थीती होती. अन त्याच वेळी तिकडे रशियात तर खेड्या पाड्यात जमिनदारांकडे जो मजूर वर्ग होता तो मोठ्या प्रमाणावर गुलाम म्हणून राबत होता.  अशा स्फोटक परिस्थीतीत दोन समाज विभागले जात असताना जाहीर झाला “द कम्युनिस्ट मॅनिफेस्टो” अन जगभर जल्लोष उडाला... न उडाला असता तर नवल.
का बरं? कारण... कम्युनिस्ट मॅनिफेस्टो म्हणतो...
 1.   जमिनीची वयक्तीक मालकी संपुष्टात आणून सरकारी जमा करावे.
 2.  प्राप्तिकर(Income Tax) हा उत्पन्नाच्या वाढत्या प्रमाणात आकारावा.
 3.  वारस हक्क पद्धती बंद करावे. (म्हणजे वडलोपर्जित संपत्ती मिळले बंद)
 4.  श्रीमंत लोकांच्या सगळ्या इस्टेटी जप्त कराव्या.
 5.  देशात एकच राष्टीय बॅंक असावी अन तिचे भाग-भांडवल राष्ट्राच्या मालकीच असावे.
 6.  पोस्टखाते, तारयंत्रे, आगगाड्या, आगबोटी- राष्ट्राच्या मालकिचे असावे
 7.  सर्व कारखाने हे फक्त नि फक्त राष्ट्राच्याच मालकिचे असावे.
 8. कामगाराना आपले संघ स्थापण करण्याची मुभा असावी.
 9. शिक्षण सार्वत्रीक व मोफत असावे.
 10. न्याय मोफत मिळावा व न्यायाधिश लोकनियुक्त असावेत.

ह्या होत्या त्या मुख्य १० मागण्या ज्या कार्ल मार्क्सनी १९४८ मध्ये "कम्युनिस्टांचा जाहिरनामा" यातून मांडल्या होत्या.
वरील गोष्टी नीट तपासल्यास तुमच्या लक्षात येईल की कम्युनिजमच्या घोषणा किती लुभावण्या होत्या. प्रचंड प्रमाणात ज्यांचे शोषण होत होते त्याना त्या आवडणारच. त्या व्यवहार्य आहेत की नाही याची तपासणी करण्याची कुवत मजूरवर्गात नव्हतीच. त्या काळात भांडवलशाही बोकाडत गेली अन भांडवलदार प्रचंड शेफारली होती. मजूर वर्ग मात्र अत्यंत दयनीय अवस्थेत फेकला गेला होता. तो दिवस रात्र राबून थोडेफार पैसे कमवायचा अन मोठ्या कष्टाचे जिवन जगायचा. मजूर वर्ग प्रचंड संतापलेला होता.  अशा एखाद्या लुभावण्या योजनेची जणू तो वाटच पाहात होता अन नेमकं ही सगळी परिस्थीती हेरून कार्ल मार्क्स नावाच्या माणसानी डाव टाकला. अत्यंत धूर्तपणे त्यानी वरील घोषणा करत कम्युनिज्मचा झेंडा रोवला. दारून जिवन जगणा-या पराभूत मजूराना वरील योजना प्रंचंड आवडल्या व कम्युनिज्मच्या त्या लाल झेंड्याखालची मजुरांची संख्या नजरेच्या टप्प्यात मावेनाशी झाली. अशा प्रकारे कम्युनिजमची लाट देशो-देशीच्या सीमा ओलांडून युरोपभर उसळली.

रशीया हा पहिला देश होता जिथे कम्युनिजमनी अत्यंत वेगाने पेट घेतला. १८४८ ला कम्युनिजमची मांडणी झाली अन रशीयातील शेतगुलाम(भूदास) प्रथा (Serf) झुगारुन टाकण्यासाठी रशीयातील भूदास व मजूर वर्ग एकवटून उठला.  १८५५ मध्ये रशीयाची एकुन लोकसंख्या होती ६ कोटी ७१ लाख अन त्यापैकी ३ कोटी ३० लाख लोकं भूदास म्हणून शेतात काम करत होती. १८५५ मध्ये अलेक्झांडर द्वीतीय जेंव्हा गादीवर आला तेंव्हा हा तीन कोटी तीस लाखाचा जनसमूदाय सम्यवादाच्या दिशेनी निघाला होता. पण आजून चळवळ हवी तशी रुजायची होती(ती पुढे लेनीनने रुजवली).  भूदास आत खदखदणा-या ज्वालानी अक्षरश: थरथरु लागला होता. साम्यवादाची ठिणगी पडली होती. भडका उडायला १९१७ उजाळावा लागला खरा आज त्याची सुरुवात तर झाली होती. हा हा म्हणता भूदास क्रांतीच्या मार्गावर येऊन ठेपला होता. रशीयातील सर्व भूदास एकवटले अन भूदासांचा हुंकार राजाच्या पोलादी भिंतीना येऊन धडकला.... हे सर्व चित्र पाहून राजाही थरथरला. हा हा म्हणता १८६१ला Abolition of Serfdom ची घोषणा झाली अन रशीयन मजूर गुलामीतून मुक्त झाला . ईतक्या प्रचंड वेगानी कम्युनिजमचा प्रसार व प्रचार होण्याचं कारण कम्युनिजमच्या मेनिफेस्टोपेक्षा मजूर वर्गातील असंतोष होतं. त्या पाठोपाठ रोमानिया व ईतर अनेक देशात कम्युनिजमचा भडका उड्त गेला. वा-याच्या वेगानी युरोपातली देशं या कम्युनिजमच्या आगीत लोटली गेली. 
पण लवकरच मोठा विचित्र परिणाम दिसू लागला. सगळे देश ज्यानी साम्यवाद स्विकारलं ते पैशानी कंगाल, खायला मोताद नि राहायला बेघर झाले. एक वेळ तर अशी आली की रशीयामध्ये एक वेळचे ब्रेड विकत घेण्यासाठी आठ-दहा तास रांगेत उभे राहावे लागे. कारण संपत्तीचे समान वाट्प या नावाखाली माणसं आळशी बनत गेली. किंवा झटून काम करण्याची उर्जाच विरून गेली. त्यातून जो समाज तयार झाला तो अत्यंत निराश, आत्मविश्वास गमावलेला व अनकष्टी असा होता. रशीया व रोमानीया या दोन देशात अनुत्पादकीय (Unproductive)वृत्तीच्या लोकांची एक पिढी निर्माण झाली. कारखाने बंद पडत गेले. भांडवलशाहीचा नायनाट करण्याच्या नादात दिलेले पर्याय हा अर्थव्यवस्था उभी करण्यास सक्षम नव्हते. त्यातून अर्थव्यवस्था कोसळत गेली. मजूरानी कधीही संपाचे शस्त्र उगारणे अन अनाठायी मागण्या करणे वाढले. यातून कारखाने बंद पडत गेल्यामुळे बेरोजगारी वाढत गेली. साम्यवादामुळे गुंतवणूकदार प्रकार संपुष्टात आला. जे करायचे ते सरकारनी करायचे. वयक्तीक कौशल्य व कार्यकुशलता याचा उपयोग करणे बंद झाले. कुशल व अकुशल दोघे एकाच रांगेत उभं करण्यात आल्यामुळे वयक्तीक कौशल्यातून निर्माण होणारा दर्जा नष्ट झाला. अर्थव्यवस्थेला खिंडार पडत गेले. उदासीन वृत्तीनी टोक गाठला नि दोन वेळचे जेवण मिळविणे सुद्धा कठीन होऊन बसले. साम्यवादानी लोकांच्या अंगातून कष्टाची उर्मी काढून फेकली. प्रेत्य्क देश बरबादीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला. एकेकाळी पृथ्वीतलावरील एक बलाढ्य देश म्हणून ज्याची ओळख होती तो रशीय कम्युनिस्टांच्या कवेत गेल्यावर असा खंगून गेला.

कोणते देश होते ज्यानी साम्यवाद (कम्युनिजम) स्विकारल? खालच्या यादीवर जरा नजर टाका. 
तात्कालीन सोव्हीएत प्रांत: १) अर्मेनिया २)अजेर्बेजन ३) बेलरस ४)इस्टॊनिया ५) जॉर्जीया ६) कजाकिस्तान ७) किर्जीजस्तान ८) लॅटविया ९) लिथूनिया १०) माल्डोवा ११) रशिया १२) तजिकीस्तान १३) तुर्कमेनिस्तान १४) उक्रेन १५ उझबेकिस्तान
सोव्हीएक प्रशासीत:- १६) बल्जेरीया  १७) झेक रिपब्लिक १८) पुर्व जर्मनी १९) हंगेरी २०) पोलंड २१) रोमानीया २२) स्लोवाकिया.
आशिया खंड:- २३) अफगाणिस्तान २४) कंबोडीया २५ मंगोलिया २६) येमन
आफ्रिका खंड:-  २७) अंगोला २८) बेनीन २९) कोंगो ३०) इथेओपिया ३१) सोमालीया ३२) इरिट्रिया ३३) मोझंबीक
बाल्कन प्रदेश:- ३४) अल्बानीया  ३५) बोस्नीया ३६) बल्गेरीया ३७) क्रोटीया ३८) मॅकेडॊनीया ३९) मोन्टेनेग्रो ४०) सर्बिया ४१) स्लोवेनीया
आजचे कम्युनिस्ट देश:- ४२) चीन ४३) क्युबा ४४) विएतनाम ४५) उत्तर कोरीया ४६) लेओस.

जगात एकुण देश किती? 
२४९ देश आहेत अन त्यापैकी चक्क ४६ देश हे कम्युनिस्ट बनले होते. पण आजच्या घडीला ४१ देशानी कम्युनिजमला हद्दपार करत सत्तांतर केले. हे कशाच द्योतक आहे? चीन स्वत:ला कम्युनिस्ट देश म्हणवून मिरवत असतो खरा पण तो एक पक्का लबाड देश आहे. चीन हा जगातला एकमेव असा देशा आहे ज्याची अर्थव्यवस्था ही भांडवलशाही असून राज्यव्यवस्था ही साम्यवादी(कम्युनिस्ट) आहे. यावर मी नंतर कधीतरी सविस्तर लिहीनच. चीन सोडला तर उरलेले बाकी चार देश देशोधडीला लागले आहेत . कोरीयात आज खायचे वांदे झाले आहेत तर क्युबात यादवी आहे. विएतनाम आजही अमेरीकेला हारवलेल्या गप्पात गुमान असून दिवसा गणीक स्वत:ला अंधाराच्या खोईत लोटत आहे. लेओस हा देश तर कोणी आजवर ऐकलं सुद्धा नाही. अशी आहे एकंदरीत कमुनिस्टांची अवस्था. थोडक्यात कम्युनिस्टांची सर्वत्र दाणदाण उडालेली आहे.   
का?
वरील कम्युनिस्ट मेनिफेस्टो पहा... त्यातले मुद्दे अव्यवहार्य असून ती एक लबाडी आहे. 

कम्युनिस्टांचा गट कोणताही असो. त्यांच्या कामातील एक सामान धागा म्हणजे संविधान विरोधी कार्यक्रम राबविणे. अन आंबेडकरी मात्र नेहमी संविधानिक मार्गाने चळवळ करतो. हा मुलभूत फरक लक्षात घेण्यासारखा आहे.
------------
पुढील भागात 
१) कार्ल मार्क्स (कम्युनिजमचा/साम्यवादाचा जनक)
२) लेनीन व स्टॅलीन (रशीयन क्रांती)
३) माओ व चीनचा साम्यवाद (चीनची क्रांती)
४) भारतातील साम्यवादी चळवळ

1 टिप्पणी:

 1. आयुष्यमान रामटेके जी
  जनता की गरीबी दूर करने के लिये दुनिया के कर्इ देशों में कल्याणकारी राज्य की स्थापना पर जोर दिया और पैसा कमाने के सभी नीजि प्रयासों को हतोत्साहित किया गया था. उद्योगपति के सीमातीत विस्तार को राष्ट्रविरोधी कॄत्य माना गया. “व्यक्ति” यह समाज या राष्ट्र के विरूद्ध है, इसी बात को सत्य मानते हुये व्यक्ति के फैलाव या विस्तार को कुंठित करने में कोर्इ कसर बाकी नहीं रखी गयी. नतीजतन ऐसे सभी देश केवल कुछ ही सालों में प्रतिभा और प्रयासों से कंगाल हो गया. जिनमें फैलने का सामर्थ्य था, उनके कदमों में जंजीरें थी और मुफ्त का माल खिलाने वाली सरकारी योजनाओं ने हर गांव में सुदामा प्रवॄति के लोगों के समूह बना दिये. सुदामा इसलिये नहीं फैला कि उसे मुफ्त का माल मिल रहा था और कॄष्ण इसलिये नहीं फैला कि उसके द्वारका से बाहर जाने पर पाबंदी थी. नतीजतन पैसे वाले अपने पैसे छिपाने लगे और दरिद्र रेखा के नीचे जाना सम्मान का सूचक बन गया. दानशूरता बीते जमाने की बात हो गयी और दिवालिया होना शर्म की बात नहीं रही. जो काला धन ब्रिटीश सत्ता में कहीं नहीं था वही आजादी के बाद हमारी अर्थनीति और राजनीति को नियंत्रित करनेवाली सबसे निर्णायक शक्ति बन गया. नतीजा बेहद दारूण रहा.
  उद्योगपति गरीबों को लूटकर धनवान बनते है यह केवल एक मिथक है, सच्चार्इ नहीं है. वास्तव में प्रत्येक उद्योगपति अपने दौर की वस्तु या सेवा से जुडी किसी न किसी आवश्यकता को बाजार में प्रचलित कीमत से कम कीमत पर उपलब्ध करा कर ही पैसा बनाता है. यदि वह पहले से उपलब्ध सेवा या वस्तु को ज्यादा कीमत पर बेचेगा तो उसे कौन खडा करेगा, इसलिये वह प्रतियोगी मूल्य पर अपने उत्पाद प्रस्तुत करता है. इसके लिये वह नयी टेक्नालाजी का उपयोग करके अपने उत्पाद का उत्पादन और विपणन खर्च कम करता है और सस्ती से सस्ती दरों पर अपने उत्पाद बाजार में प्रस्तुत करता है. अपने इस प्रयास में वह दो तरह से समाज को समॄद्ध करता है. एक तरफ तो वह नये रोजगार निर्मित करता है वहीं दूसरी ओर वह अपने उत्पाद खरीदने वालों की कुल बचत को बडा कर उन्हें दूसरी वस्तुओं या सेवाओं को खरीदने का अवसर देता है. नतीजतन बाजार में वस्तु की कुल मांग बडती रहती है और सभी समॄद्ध होते रहते है. उसका मुकाबला कहीं भी उस गरीब से नहीं है जिसको बचाने के लिये सारी सरकारी मशिनरी या नेता खड़े है. उद्योगपति का मुकाबला तो किसी जमे जमाये पुराने उद्योगपति से ही होता है. सारी सरकारी मशिनरी गरीब को बचाने का नारा लगाती है पर बचाती तो वह उस पुराने उद्योगपति को ही है.

  दुनिया के जिस जिस देश में सरकारों की कल्याणकारी योजनायें हावी रही है, वहाँ वहाँ पर पुराने उद्यमों को बचाने के लिये नये उद्यमों के लिये दरवाजे बंद कर दिये गये. पुरानेपन के एकाधिकार को सरकारी समर्थन दिया गया. लोगों को महंगी कीमतों पर वस्तु या सेवा खरीदने के लिये मजबूर कर दिया गया. गरीबों को नयी टेक्नालाजी से होनेवाली संभावित बचत से इस उल्टे तरीके से वंचित कर दिया गया. और यह सभी कुछ उनको बचाने के नाम पर किया गया. इसलिये इस बात में कोर्इ दम ही नहीं है कि आजादी के बाद गरीब और गरीब और अमीर और अमीर होते चले गये. जिसतरह सचित टेंडूलकर के रिकार्ड में जुडनेवाला कोर्इ भी नया रन किसी दूसरे के हिस्से का रन नहीं होता, जिसतरह अमिताभ बच्चन का प्रत्येक नया रोल या भूमिका किसी दूसरे का शोषण करने से नहीं जन्मती, जिसतरह स्वर साम्राज्ञी लता मंगेशकर का प्रत्येक नया गीत केवल उन्हीं को ध्यान में रखकर लिखा जाता है, जिसतरह किसी नेता के बहुत ज्यादा वोट से जीतने से किसी देश का नुकसान नहीं होता, और जिसतरह किसी साहित्यकार के बहुत ज्यादा साहित्य रच देने से बाकी के लेखकों का कोर्इ नुकसान नहीं होता है, बस ऐसे ही, किसी भी उद्योगपति के द्वारा कमाये गये प्रत्येक नये पैसे से किसी गरीब का कोर्इ लेना देना नहीं है. जो भी आपको ऐसा कहता है वही असली डकैत है. वह गरीब का नाम लेकर, उनके समूह बना बनाकर, उनको एक ऐसे भ्रमजाल में जकड, लेता है, जिससे उन्हें पीढियों से मुक्ति नहीं मिल पायी हैं. यही लोग मानवीय प्रतिभा के सबसे बड़े दुश्मन हैं, यही लोग अनादि अनंत चक्रों में चलनेवाले गरीबों के शोषण के शिल्पकार हैं. जहां जहाँ कल्याणकारी राज्य का नाटक चला, वहां वहाँ पर जनता, गरीब और गरीब होती चली गयी और उद्योगपति समाप्त होते चले गये. वहां पर केवल नेता, तस्कर और अफसर ही धनवान से धनवान होते पाये गये हैं. यही कहानी भारत की है, यही सोव्हित रूस, वियतनाम, बर्मा, कंबोडिया, क्यूबा, पौलेंड, चीन या उत्तरी कोरिया की है. जिस किसी व्यवस्था ने मानवीय विस्तार की कामना को कुंठित किया है, उसने वास्तव में मानवता के साथ में सबसे बड़ा विश्वासघात किया है.
  दिनेश शर्मा

  उत्तर द्याहटवा