गुरुवार, २३ मे, २०१३

कार्ल मार्क्स हा बुद्धाचा लहान भाऊ! कम्युनिस्टांचा नवा शोध.कम्युनिजमचे खंदे प्रचारक व नंतर बाहेर पडून वेगळा कम्युनिस्ट पक्ष काढणारे तसेच आंबेडकरी  चळवळीत बरेच प्रसिद्ध असलेले विचारवंत नि प्रसिद्ध लेखक शरद पाटील कम्युनिजमचा प्रचार करण्याच्या नादात नवीन नातीगोती जुडविण्याचा धंधा सुरु केल्याचे दिसते. त्यानी ही नाती गोती ईतर कुणाची जुडविण्याचा प्रयत्न केला असत तर हरकत नसती पण पाटलानी चक्क भगवान बुद्ध व कार्ल मार्क्स यांच्यात चक्क नातं शोधलं.  त्याच बरोबर ते बाबासाहेबांच्या बौद्धत्वावरही प्रश्न उभा करतात. ते आपल्या "मार्क्सवाद व फुले आंबेडकरवाद" या ग्रंथात पान नं. २२ खालून दुसरा पॅरा मध्ये लिहतात...

"आंबेडकरानी तरी संबंध बौद्धवादाचा स्विकार केला होता काय?"
काय होतो याचा अर्थ?

शरद पाटील थेट बाबासाहेबांवर शंका घेत आहेत हे स्पष्ट आहे. बाबासाहेब खरे बौद्ध नसून खोटे बौद्ध होते असा त्याचा गर्भार्थ आहे. मग खरे बौद्ध वा पाटलांच्या व्याख्येतला बौद्ध कोण हे सांगताना पाटील आटापिटा करतात की मार्क्सवादाला धरुन जो बौद्ध धम्म स्विकारतो तो खरा बौद्ध... व्वारे पाटिल. आपलं म्हणनं कसं बरोबर आहे हे सिद्ध करण्यासाठी पाटलानी चक्क आपल्याच(बौद्धांच्या) एका आदरणीय व्यक्तीची आवेशातलं एक वाक्य दिमतीला घेतलं. ते वाक्य आहे असं... "बुद्ध बडे भाई थे, और मार्क्स उनके छोटे भाई!"
भदंत आनंद कौशल्यायान हे बौद्ध धम्मात मानाचे स्थान असलेले आदरणीय व्यक्तीमत्व असून त्यानी कुठेतरी आवेशात येऊन कार्ल मार्क्स बद्दल बोलताना दोन शब्द स्तूतीचे बोलले असतील. त्यात काय एवढं. जाहीर सभांतून व कार्यक्रमातून बोलताना असे बोलावे लागते. एवढ्याने ते बौद्ध धम्माचं अधिकृत तत्वज्ञान ठरत नसते. पण पाटील मात्र कहर करतात. वरच्या वाक्याचा  धाग घेऊन पाटील सुसाट सुटले. पान नं. २३ वर पाटील लिहतात...

बुद्ध बडे भाई थे, मार्क्स उनके छोटे भाई!


वरील वाक्य भदंताचं असल्यामुळे पाटील ओरडा करतात की वरील वाक्य हेच एकमेवाद्वितीय बौद्ध तत्वज्ञान असून आता मार्क्सला बुद्धाचा लहान भाऊ मानाच... अन मानलच पाहिजे असा हट्ट करतात. अन पुढे शरद पाटील याच वाक्याच्या आडून हळूच बाबासाहेबाना बगल देत मार्क्सची महती गातात. क्रांतीगीत गाणे कम्युनिस्टांना चुकले नाही पण ईथे पाटील चक्क कावागीत गाताना थेट बाबासाहेबांवर हळूच घाव घालतात. त्याना बगल देण्याचा खेळ खेळतात. मार्क्सला मोठ म्हणता? खुशाल म्हणा! पण त्याला थेट बुद्धाचा भाऊ बनवून टाकता, हा काय प्रकार आहे? आता कोणी म्हणेल ते भदंताचं वाक्य आहे, त्याला आपण काय करणार? असेल भदंताचं वाक्य, तर काय झाले. भदंतावर कलकत्याचा व बांगाल्याचा बराच प्रभाव होता. तिथल्या बंगाली कम्युनिस्टांच्या प्रभावातून भदंतानी असे म्हटलेही असेल. म्हणून काय ते बौद्ध तत्वज्ञान ठरत नाही. त्या वाक्याला काडीचा अर्थ नाही हे जाहीर आहे. ते एक टाकाऊ वाक्य आहे. उलट तुम्ही विवेक बुद्धि दाखवत ते वाक्य गाडाण्या ऐवजी  त्या वाक्याचा धागा धरुन थेट कार्ल मार्क्सला बुद्धाचा भाऊ बनवता?  कमाल झाली तुमची. एक टाकाऊ वाक्य धरुन तुम्ही जो प्रचार चालविला आहे ते पाहता पाटील व कम्युनिस्ट किती कावेबाज आहेत हे सिद्ध होते. भदंतानी सहज म्हटलेल्या वाक्याचा तुम्ही नाती-जोड कार्यक्रम राबविण्यासाठी जो उपयोग करत आहात हे निषेधार्ह आहे.

भदंताच्या वाक्यावरुन मार्क्सला नात्यात आणन्या बरोबरच बाबासाहेब खरे वा संपुर्ण बौद्ध नव्हते अशा आशयाचें लिखान करणे हा आजून एक आंबेडकद्वेषी कार्यक्रम याच पुस्तकात अधोरेखीत होतो. भदंताच्या नावाखाली हळूच कार्ल मार्क्सला बुद्धाचा लहान भाऊ बनवित लबाडी करणारे शरद पाटील हे ब्राह्मणांपेक्षा मोठे आंबेडकरद्वेषी नाहीत काय? अन वरुन तोंड वर करत ते विचारतात की आंबेड्कर तरी खरे बौद्ध होते का? आहे की नाही लबाडी...

बौद्ध बांधवानो, सावध व्हा. हे कम्युनिस्ट  लोकं महाकलंत्री आहेत. जगाचा इतिहास तपासून पहा. यानी प्रत्येक वेळी त्या त्या देशातल्या मुख्य चळवळीत अशीच घुसखोरी केली.  कम्युनिस्टानी प्रत्येक देशात संघटन बांधताना हीच रणनिती अवलंबली. नंतर आपल्याच या सहका-यांशी फारकत घेताना हातात शस्त्र घेतले नि ज्याच्या बळानी स्वत:चं अस्तीत्व उभं झालं त्याच चळवळीचा गळा कपला. हाच प्रकार केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा