शुक्रवार, २४ मे, २०१३

कम्युनिजम एक अभिशाप: भाग-२ (कार्ल मार्क्स)

5  मे १८१८ रोजी जर्मनीतील (प्रशियातील) –हाईनलॅंड भागातील ट्रीयर शहरात कार्ल मार्क्सचा जन्म झाला.  मार्क्सचे वडील पेशाने वकील असल्यामुळे घरची परिस्थीत सुखवस्तू होती.  त्याच बरोबर मार्क्सचे वडील हे धर्माने ज्यू होते परंतू नंतर त्यानी धर्मांतर करुन ख्रीस्ती धर्म स्विकारला. एकंदरीत सगळं व्यवस्थीत अशा घरात कार्ल मार्क्सची जडण घडन होत होती.
१९३५ मध्ये कार्ल मार्क्सचे शालेय शिक्षण पुर्ण झाले. पोरानी पुढील शिक्षन कायद्याच्या क्षेत्रातच करावे नि वडलाचा धंधा चालवावा असे मार्क्सच्या वडलाना वाटे. त्यामुळे त्यानी मार्स्कला वकिलीच्या अभ्यासासाठी बॉन येथे पाठविण्यात आले. पण ह्याला काही तिथे मन लागेना... तो पुढे बर्लिनला गेला व तत्वज्ञान आणि इतिहास विषय घेऊन शिक्षण पुर्ण केले. ग्रीक तत्वज्ञानातील प्रमेयांची तुलना करणारा प्रबंध लिहून, मार्क्स १८४१ मध्ये पदविधर झाला. तत्वज्ञानाचा डॉक्टर Ph. D. ही पदवी कार्ल मार्क्सला मिळाली.
वयाच्या २४ व्या वर्षी कार्ल मार्क्सने “-हाईन समाचार” मध्ये संपादकाची नोकरी स्विकारली. प्रचंड वाचन, चिंतन व मनन असल्यामुळे लिखानाला एक धार होती. त्याच बरोबर मजूर वर्गाबद्दल कळवळा असल्यामुळे लेखनीतून निघणारा लावा भांडवलदारांवर तर कधी सरकावर उसळायचा. याचा एकंदरीत परिणाम असा झाला की सरकार दरबारी मार्क्सचे विरोधक निर्माण झाले. ईकडे मात्र गोरगरीब व कामगार वर्गात मार्क्सची लोकप्रियता प्रचंड वाढत गेली. अखेर सरकारने –हाईन समाचारवर बंदी घालण्याचे ठरविले. ही बातमी वा-या सारखी पसरली व देशाच्या काना कोप-यातून सरकारच्या दरबारात प्रत्रांचा वर्षाव झाला. मार्क्सच्या बंदीला विरोध करणारा एवढा प्रचंड प्रतिसाद लोकांमधून उसळेल याची सरकारला कल्पना नव्हती. सरकार जरा चरकलेच. पण शेवटी संचलकाना दमात घेतले. संचालक मंडळ मात्र घाबरलेत नि यापुढे असे लिखान होणार नसल्याची  शाश्वती देऊन मार्क्सवर दबाव आणला. यातून निराश झालेला मार्क्स १७ जून १८४३ रोजी –हाइन समाचारचा राजिनामा देऊन बाहेर पडला. आता मात्र जर्मनीत राहून मजूरांच्या बाजूनं लिहणे व चळवळ चालविणे अशक्य होते हे मार्क्सने हेरले. देश सोडण्याचा निर्णय घेतला. देश सोडण्या आधी आपली बाल मैत्रीण  जेनी फॉं वेस्टाफालेन हिच्या बरोबर १८ जून १८४३ रोजी कार्ल मार्क्सने विवाह केला. म्हणजे कधी? नोकरीचा राजिनामा दिल्याच्या दुस-याच दिवशी. पाच महिने सासूकडे राहून नंतर फ्रान्सला स्थलांतर केला.
फ्रेडरिक एंगल्स:
जर्मन-फ्रेंच वार्षीक पत्र नावाचं वृत्तपत्र फ्रान्स मधून प्रकाशीत होत असे. १८४४ च्या फेब्रुवारीत कार्ल मार्क्सचे तत्वज्ञानावर, राज्यशास्त्र नि अर्थशास्त्रवरचे लेख या वृत्तपत्रातून येऊ लागले. एंगल्सनी जेंव्हा हे लेख वाचले तेंव्हा तो भारावून गेला. लगेच त्यानी पॅरीसला येऊन कार्ल मार्क्सची भेट घेतली. अन दोघांच्या विचाराची व्हेव्हलेंथ अशी काही जुडली की ती आयुष्याच्या शेवट पर्यंत टिकून राहिली. अशा जिवाभावाच्या मित्राची भेट अगदी तरुण वयातच झाली.
पहिले पुस्तक:
दोघानी मिळून कित्येक विषयावर तासोन तास चर्चा केल्या. वाद प्रतिवाद केला. अनेक दृष्टीकोनात विचाराची व ज्ञानाची तपासणी केली.  अशा प्रकारे विचाराचे मंथन झाले अन पहिले पुस्तक जन्मास आले त्या पुस्तकाचे नाव होते “पवित्र कुटूंब”  हे पुस्तक दोघानी मिळून लिहले होते. प्रचलित समाजाचा समाचार घेणार हे पुस्तक हजारो वर्षाच्या बेड्या तोडणारे ठरले. ठेवले तैसे अनंती... वाल्या सुस्ताळ समाजाला खळबळून जागे करताना प्रतिगाम्याना मात्र हादरवून सोडले. अशा प्रकारे कार्ल मार्क्स व फ्रेडरिक एंगल्स ही जोडी आता नवा विचार घेऊन युरापात मोठी वैचारीक उलथापालथ करायला सज्ज झाली.
याच दरम्यान युरोपातला मजूर वर्ग भांडवलदारांच्या अत्याचारानी त्रस्त झाला होता. मजूर वर्गाच्या मनात  मालकांच्या विरोधात खदखदणारी आग कित्येक वर्षापासून तशीच डांबून ठेवण्यात आली होती. पण कधीतरी त्याचा भडका उडतोच... शेवटी जून १८४४ मध्ये जर्मनीतल्या विनकरानी पहिला उठाव केला.  ज्या जोमाने हा उठावा झाला त्याच्या दुप्पट जोमाने तो दडपण्यातही आला. पण ठिणगी पडली ती पडलीच... विझते कुठे आता! कार्ल मार्क्सनी या लढ्याची स्तूती गाताना “फॉर्वर्ट्स” या वृत्तपत्रातून मजुरांवर अभिनंदनाचा वर्षाव केला. फ्रॉन्स सरकारने मार्क्सची हाकलपट्टी केली. त्या नंतर म्हणजे १८४५ पासून कार्ल मार्क्सने बेल्जियम मधील ब्रुसेल येथे आश्रय घेतला. ब्रिसेलच्या वास्तव्यास असताना ही जोडी मध्ये लंडनला जाऊन आली. त्या नंतर “जर्मन विचार प्रणाली” नावाचा मोठा ६०० पानी ग्रंथ लिहून काढला. १८४७ साली कार्ल मार्क्सने “तत्वज्ञानाचे दारिद्र्य” नावाचे ग्रंथ प्रकाशीत केले. अन त्या नंतर होतो प्रवास कामगार चळवळीच्या दिशेनी.

कामगार चळवळीत उडी
आता पर्यंत वैचारीक लेख व तत्वज्ञानाच्या माध्यमातुन ओरडणारा कार्ल मार्क्स आता मजुरांचा आवाज बनून भांडवलशाही विरुद्ध हुंकारणार होता. पॅरीस मध्ये कामगारांची एक गुप्त संघटना होती. तीचे नाव होते “न्यायी जनांचा संघ” या संघटनेचे कार्यकर्ते भूमिगत राहून कार्य करु लागेल. पण फ्रेंच सरकारची करडी नजर सतत त्यांच्या शोधात असे. त्यामुळे १८४० मध्ये ही गुप्त संघटना लंडन मध्ये हलविण्यात आली होती. आता संघटनेची मुख्य कचेरी लंडन मध्ये होती व सगळे सुत्र तिथूनच हलविले जात होते. कार्ल मार्क्स व एंगल ही जोडी आता या संघटनेच्या संपर्कात आली. देशोदेशीच्या कम्युनिस्ट व समाजवादी चळवळीशी त्यांची ईथे ओळख झाली. अनेक देशातील कामगार नेते व चळवळे लोकं याच संघटने मार्फत मार्क्सच्या संपर्कात आले.
१८४७ मध्ये लंडन येथे या संघटनेच्या सभासदांची परिषद भरली अन या संघटनेनी जुने नाव टाकून “कम्युनिस्ट लिग” असे नवे नाव धारण केले. अशा प्रकारे कार्ल मार्क्स एक समाजवादी विचारवंत कम्युनिस्ट नावाच्या चळवळीत उतरला. आणि पुढे तो कम्युनिस्ट चळवळीचा जनक म्हणून ओळखल्या गेला. पुढच्या सगळ्य़ा कम्युनिस्ट इतिहासाचीसुरुवात अशी झाली. वर्षभरातच कम्युनिस्ट लीगने युरोपात मोठी ढवळाढवळ करुन सोडली. आजवर नुसते कामगार नेते होते आता जोडीला विचारवंत येऊन उभे झाले. चळवळीला जोर आला अन वर्षभरातच म्हणजे १८४८ मध्ये फ्रांसच्या सत्ते विरुद्ध उठाव सुरु झाला.
हा सगळा उठाव बेल्जियमला बसलेला मार्क्सच घडवून आणतोय असा ओरडा झाला व बेल्जीयम सरकारनी मार्क्सची हाकलपट्टी केली.  मार्क्सने ब्रुसेल सोडले.
तिथून निघून थेट पॅरीस गाठले व कामगारांची सशस्त्र सेना तयार करुन थेट जर्मनीवर धडकण्याची मोहीम आखण्यात आली.  पण काही कारणास्तव लीगच्या सदस्यानी विचार बदलला व एक एक करुन कम्युनिस्ट लीगचे नेते जर्मनीत उतरू लागले. जर्मनीतल्या कामगाराना एकत्र करुन नंतरच सशस्त्र उठाव करण्याचा विचार झाला होता. याच दरम्यान कम्युनिस्ट लीगने या विचारवंतावर एक नवी जबाबदारी सोपविली अन जगातील अजरामर असा जाहीरनामा प्रसिद्ध झाला... हाच तो The Communist Manifesto कम्युनिस्ट जाहिरनामा.

लंडनला स्थलांतर:
ईकडे मायदेशी म्हणजे जर्मनीमध्ये सरकार कार्ल मार्क्सच्या मागे हात धुवून लागले तर तिकडे फ्रेंच सरकारनी मार्क्सला पिटाळून लावले. राहण्याचा प्रश्न उभा झाला. शेवटी ऑगस्ट १८४९ मध्ये कार्ल मार्क्सनी लंडना प्रयाण केले. आता कार्ल मार्क्स लंडनवासी झाला. डीन स्ट्रीटवरील दोन खोल्याचे घर घेतले व तिथेच लिखान व अभ्यास चालू केला. या दरम्यान प्रचंड आर्थिक अडचण निर्माण झाल्यामुळे त्याचा मित्र एंगल्स हा नोकरी करुन मार्क्सची आर्थिक गरज भागवित असे. पण मार्क्सला मात्र लिखान व चळवळ चालविण्याच्या ध्येयापासून दूर जाण्याची वेळ येऊ दिली नाही. मित्र असावा तर एंगल्स जैसा...
आयुष्यातील चढ-उतार
याच दरम्याने कार्ल मार्क्सने बरेच चढ उतार पाहिले. दारिद्र्य पाहिले. आजार अनुभवला. गरीबीच्या नुसत्या बाता होत्या त्या प्रत्यक्षा आता वाट्याला आल्यावर त्याची धग अनूभवली. यातून तावून सुलाखून निघताना वैचारीक बैठक अधिक घट्ट होत गेली. पण कशाची? कम्युनिजमची. जगाला नव्या संकटात ढकलणारी कम्युनिस्ट विचारधार याच दरम्यान विकसीत झाली. भांडवल नावाच्या ग्रंथाची सुरुवात ईथेच झाली.
१८५२च्या हिवाळ्यात त्यांची ११ वर्षाची मुलगी अल्पशा आजाराने मरण पावली. १८५५ मध्ये त्याचा लाडका मुलगा एडगर वयाच्या ९ वर्षी मरण पावला. मुलाच्या मृत्यूने कार्ल मार्क्स कोसळा. पार प्रकृती बिघडली.  खाण्या पिण्याचे वांदे झाले. पैशाची अडचण दिवसेंदिवस वाढत गेली. अन याच दरम्यान म्हणजे मे १८५५ मध्ये कार्ल मार्क्सची सासू वारली. पण तिनी पोरीच्या नावाने काही पैसे मागे ठेवले होते. या पैशातून कार्ल मार्क्सने १८५६ मध्ये हॅमस्टेड टेकडीजवल एक लहानसे घर विकत घेतले. ही जागा कार्ल मार्क्सला अत्यंत प्रिय होती. म्हणून या वेळी तो जरा खूष दिसू लागला.
भांडवल नावाचा ग्रंथ:
आता मात्र मार्क्स जरा स्थीरावला होता. लिखाणाचे काम जोमाने सुरु झाले. ब्रिटीश म्युजीयम लायब्ररीत तासोन तास पडीक असायचा. एकसे बढकर एक पुस्तकांचे वाचन ईथेच झाले. अन एक विध्वंसक विचार ईथेच आकार घेत गेला. जगात रक्ताचे पाट वाहविणारा कम्युनिस्ट विचार याच लायब्ररीत जन्मास आला. त्या नंतर कित्येक वर्षानी लेनीनही याच लायब्ररीत येऊन विचाराना धार लावून रशीयात परतला. लेनीननंतर काही वर्षानी आजून एक माणूस या लायब्ररीत ज्ञानसाधनेसाठी आला...मिळालेल्या ज्ञानाचा वापर करत अन जगातील सगळ्यात मोठी गुलामी झुगारण्याचा चमत्कार घड्वून दखविताना रक्ताचं एक थेंबही सांडू दिला नाही. तो विचारवंत म्हणजे बाबासाहेब........ केवढा विरोधाभास. एकाच ठिकानी अभ्यास करुन दोन व्यक्ती रक्तपाताचा सिध्दांत मांडतात तर बाबासाहेब सत्याग्रहाची कास धरतात. म्हणून बाबासाहेबाना तोड नाही.
१८५९ पासून सुरु झालेल्या अभ्यासातून कार्ल मार्क्सचा जगाला हादरवून सोडविणारा ग्रंथ जन्मास येऊ लागला.  अथक परिश्रमातून, चिंतन व मननातून साम्यवादी विचाराला एक भक्कम पाया घालून देणारा हा ग्रंथ १८६७ मध्ये पुर्ण झाला व जगातील सगळे भांडवलदार हादरुन गेले.  या ग्रंथाचे नाव होते Capital.

चळवळीचे नेतृत्व
२८ सप्टे १८६४ साली लंडनमधील  सेंट मार्टीन हॉलमध्ये उभ्या युरोपातल्या कामगार संघटनांची एक भव्य अशी परिषद भरली. याच परिषदेत “इंटरनॅशनल वर्किंग मेन्स असोसिएशन” नावाची एक नवी संघटना उदयास आली.  पुढे हीच संघटना “फर्स्ट इंटरनॅशनल” या नावाने प्रसिद्ध झाली. अशा प्रकारच्या संघटनांचे नेतृत्व आता मार्क्सकडॆ येऊ लागले व देश विदाशातल्या विविध कामकारांचे व नेत्यांचे मार्गदर्शन करण्याचे काम कार्ल मार्क्स करु लागला.  हा हा म्हणता ही चळवळ आता युरोपभर पसरली. प्रत्येक देशातील कामगार कम्युनिजमकडे खेचला जाऊ लागला. आज पर्यंत प्रत्येक देशात स्थानिक पातळीवर संघटना होत्या. पण आता मात्र आंतरराष्ट्रीय पातळीवरील ही संघटना सर्व देशातील कामगार वर्गाला कवेत घेऊ लागली.

पहिले कम्युनिस्ट राज्य स्थापन
१८७१ ला फ्रान्समध्ये कामगारानी पहिले कामगारांचे उठाव करुन फ्रान्समध्ये जगातील पहिले कम्युनिस्ट राज्य स्थापन केले. पॅरिस कम्युन म्हणून या पहिल्या कामगारांच्या राज्याची इतिहासात नोंद केल्या गेली.  कार्ल मार्क्सनी या पॅरिस कम्युनचे मोठ्या उत्साहात स्वागत केले व त्यांच्यावर स्तूतीचा वर्षाव करताना अनेक लेख लिहले. कार्ल मार्क्स म्हणतो की आता  लवकरच जगातील सर्व देशात असेच उठाव होतील व कामगारांचे राज्य स्थापन होतील. पण कार्ल मार्क्सची ही भविष्यवाणी खरी तर झाली नाहीच पण दुसरा उठाव व्हायला १९१७ साल उजाडावे लागले. ईथेच काय ते सिद्ध होते. कार्ल मार्क्सकडे खळबळ उडवून देण्याचं तत्र होतं. यापलिकडे काहीच नव्हतं.
भांडवलशाहीचे समूल उच्चाटन हाच काय तो प्रगतीचा व विकासाचा मार्ग आहे असे सांगत फिरणारा कार्ल मार्क्स आजच्या कसोट्या लावल्यास एक वेडा होता असेच म्हणावे लागेल. डिसेंबर १८८१ मध्ये कार्ल मार्क्सची बायको जेनी मरण पावली. बायकोच्या निधनानी मार्क्स खचून गेला.
१४ मार्च १८८३ रोजी कार्ल मार्क्स मरण पावला.
--------------------
कार्ल मार्क्सचा वारसा चालविणारा १८७० मध्ये जन्मला होता. कार्ल मार्क्स मरण पावला तेंव्हा हा त्याचा वारसदार अगदी तेरा वर्षाचा होता. पुढे ज्यानी साम्यवादी खरे सरकार आणले तो लेनीन युरोपातील एक अविकसीत राष्ट्र म्हणून ओळखल्या जाणा-या रशीयात वाढत होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा