शनिवार, २५ मे, २०१३

कम्युनिजम एक अभिशाप: भाग-३ (कम्युनिस्ट जाहिरनामा)


कार्ल मार्क्सचं व कम्युनिजमचा अभ्यास करण्याआधी कार्ल मार्क्सचा कम्युनिस्ट जाहिरनामा काय म्हणतो हे आधी समजावून घेणे आवश्यक आहे. २१ फेब्रुवारी १८४८ रोजी हा जगप्रसिद्ध जाहिरनामा प्रसिद्ध झाला. उभ्या युरोपात क्रांतीची लाट उसळली. भांडवलदार थरथर कापायला लागले. पोप व धर्मगुरु व त्यांच्या प्रथा याना प्रचंड हादरे बसू लागले. जर्मनीचे गुप्त पोलीस, झारची ताकद, धर्मगुरु नि ईतर शासकीय यंत्रणा सगळे कम्युनिस्टांचा विरोधात अचानक एकवटुन उभे ठाकले. या सगळ्य़ांचा कॉमन शस्त्रू कम्युनिस्ट होता. यावरुनच या जाहिरनाम्याची ताकद काय ती लक्षात येते. अर्ध्या जगाने डोक्यावर घेतलेला जाहिरनामा अत्यंत विंध्वसक तर होताच पण पण तो समाज घातकिही होता हे कळायला १९९० उजाळावा लागला. म्हणजे जवळ जवळ दिडशे वर्ष या जाहिरनाम्याने जगात धुमाकूळ घातला.
तर हा जाहिरनामा काय म्हणतो ते पाहु या!
------------------
या जाहिरनाम्याची सुरुवात अशी होते...
“आतापर्यंतच्या समग्र समाजाचा इतिहास म्हणजे वर्गलढ्यांचाच इतिहास होय.
स्वतंत्र नागरीकांचा वर्ग नि गुलामांचा वर्ग. पॅट्रीशिअनांचा वर्ग नि प्लीबेयनांचा वर्ग. सरंजामदारांचा वर्ग नि भूदासांचा वर्ग. कारागीर व मजूर यांचा वर्ग... थोडक्यात सांगायचे म्हणजे या जगात हजारो वर्षा पासून असे वर्ग नांदत आले आहेत. त्यातील एक वर्ग नेहमी वरचढ राहीला तर दुसरा मात्र चेपत गेला. दारिद्र्यात खितपत पडला. अत्यंत हालाखीच्या प्ररिस्थीतीत जगू लागला. सरंजामशाहीनी ईथे हजारो वर्ष राज्य केले.
पण कालांतराणे सरंजामदारी नष्ट होऊन भांडवलदारी समाज उदयास आला. पण त्यातूनही वर्ग नि वर्गविरोध काही नष्ट झाला नाही. दोन वर्ग हजारो वर्षा आधिही होते अन आज या भांडवलशाहीतही आहेतच. त्याच बरोबर वरचा वर्ग खालच्या वर्गाचे शोषण आधिही करायचा व आजही करतोच आहे.”
अशा प्रकारे या जाहिरनाम्याची सुरुवात होते. भांडवलदार हे पैसे कमविण्यासाठी वाट्टॆल ते करतात हे सांगताना त्यांच्या व्यापारविस्तारावर बोट दाखवत हा  जाहिरनामा पुढे म्हणतो...
“...अमेरीकेचा शोध लागला.  त्याच बरोबर दक्षिण आफ्रिकेला वळसा देऊन पुर्वेकडे जाण्याचा जलमार्ग सापडला. त्यामुळे भांडवलदाराना नवे मार्ग खुले झाले. यातून भांडवलदारानी मजूरांची पिळवणूक करत जास्तीत जास्त माल उत्पादन करण्याचे ठरविले. हा उत्पादीत माल या नव्या बाजारपेठेत विकून पैसे कमविण्याचा नवा सपाटा सुरु झाला.  अमेरीका, चीन व भारतात भांडवलदारांच्या वसाहती स्थापण झाल्या. कारखाण्याची प्रचंड भर पडत गेली. यातून युरोपात मजूर वर्गाला कामाला जुंपण्यात आले व शोषण सुरु झाले.”
“...भांडवलदारांचा विकास होत गेला तसतसे त्यानी सरंजामशाहीवर वचक बसविण्याचे काम सुरु केले. एकेकाळी सरंजामदाराच्या हाताखाली असलेला हा भांडवलदार वर्ग अता शिरजोर होताना सरंजमदारांवर पैशाच्या बळानी अंकुश ठेवू लागला. याचा पुढचा टप्पा म्हणजे तो शस्त्रधारीही बनत गेला. हा वर्ग ईतका बोकाळत गेला की लवकरच त्यानी डॉक्टर, वकील, धर्मगुरु, कवी, शास्त्रज्ञ याना आपले पगारी मजूर बनवून टाकले. थोडक्यात भांड्वलदारच आता अप्रत्यक्षरित्या सत्ताधीश बनला आहे.”
अशा प्रकारे भांडवलदारांवर तोफ डागत हा जाहिरनामा पुढे अत्यंत हास्यस्पद विधाने करतो. तो म्हणतो...
“सर्व उत्पादन-साधनांत झपाट्याने सुधारणा करुन दळवळणाची साधने सोपी करत ही भांडवलशाही अनेक राष्ट्राना जोडत गेली. कित्येक रानटी व असंस्कृत राष्ट्रेही संस्कृत बनत गेली. सा-या जगाला वळसा घालून या भांडवलशाहीने त्यांच्या देशात अनेक उत्पादनं अगदी स्वतात उपलब्ध करुन देत त्याना नव्या वाटा दाखविल्या. सगळ्या जगालाचा आपल्यात समावून घेणारा हा भांडवलदार वर्ग केवळ नफ्यासाठीच हे करत असतो.”
आज आपण जागतिकीकरणाच्या उंबरठ्यावर असून प्रत्येक देशाशी संबंध सुधारण्यावर भर देत आहोत. कार्ल मार्क्स मात्र अगदी उलट लिहून ठेवतो. बाबासाहेब म्हणाले प्रगती करायची असल्या शहराकडॆ जा... हा जाहिरनामा मात्र अगदी याच्या उलट बोलतो. तो म्हणतो...
“...भांडवलदारामुळे खेड्यातील माणसे शहरात स्थालांतरीत होऊ लागली. त्यानी कारखान्यातून काम करताना पसे कमावले खरे पण त्यातून भांडवलदारांचे फावत गेले. प्रचंड शहरे निर्माण होते गेली. याचाच जागतीक परिणाम असा झाला की मागास देशांची विकसीत देशांशी नाड जोडली गेली. ते एकमेकांवर अवलंबून राहू लागले.”
असा हा विनोदी जाहिरनामा पुढे म्हणतो...
“आज  भांडवलदारांसमोर उभा ठाकलेला फक्त कामगार वर्गच खराखुरा क्रांतीकारी वर्ग असून बाकी सगळे वर्ग नष्ट पावत आहेत. आधूनिक भांडवलशाहीतून अत्यंत जोमाने विकसीत झालेला जर कुठला वर्ग असेल तर तो आहे कामगार वर्ग. या जगात आता फक्त कामगारच काय तो बदल घडवून आणू शकेल.”
बुर्झ्वा:
या जारिनाम्यात मार्क्सचा एक अत्यंत आवडीचा शब्द आहे जो त्यानी प्रत्येक पानावर शक्य तितक्या जास्त वेळा वापरला तो शब्द म्हणजे “बुर्झ्वा” कार्ल मार्क्स जर कुणाचा सगळ्यात जास्त तिरस्कार करत असेल तर तो म्हणजे बुर्झ्वा समाजाचा वा गटाचा. बुर्झ्वा समाज/गट हा कार्ल मार्क्सच्या तत्वज्ञानातील सगळ्यात नालायक, मुर्ख व समाज घातकी गट आहे.  कोण कोण मोडतं या बुर्झ्वा गटात? कार्ल मार्क्सने याच जाहिरनाम्यात बुर्झ्वा गटात मोडणारे कोण याची यादी दिली आहे. छोटे कारखानदार, दुकानदार, दुकानदार, कारागीर, शेतकरी वर्ग हे सगळे बुर्झ्वा होत. एवढ्यावरच थांबत नाही तर पुढे कार्ल मार्क्स या बुर्झ्वा गटावर एक गंभीर अरोप करतो. जाहिरनाम्यात तो पुढे म्हणतो...
“...हे बुर्झ्वा क्रांतीकारी नसतात. किंबहूना ते प्रतिगामी असतात व ईथल्या लोकांचा ते नुकसान करतात. हे बुर्झ्वा नेहमी इतिहासाचा गाडा मागे रेटण्याचा प्रयत्न करत राहतात. हे सगळे  बुर्झ्वा अत्यंत स्वार्थी असून त्यांचा क्रांतीशी काही संबंध तर नसतोच पण कधी संबंध आलाच... तर तो फक्त स्वार्थापोटी आलेला असेल. कामगार मात्र या बुर्झ्वांपेक्षा वेगळा आहे. तो खरा क्रांतीकारी असून बुर्झ्वा वर्ग तसा नाही.”
धर्म हे थोतांड:
धर्मावर आघात घालताना कार्ल मार्क्स या जाहिरनाम्यात म्हणतो की...
“धर्म हे थोतांड असून ते भांडवलशाहीला पोषक असते. कायदा, नीती, धर्म ही सर्व भांडवलदारांची यंत्रणा असून ती भांडवलदारांच्या हितासाठी राबविली जाते. आपणावर म्हणजेच कामगार वर्गावर वाट्टॆल तेंव्हा वाट्टॆल तेथे झडप घालण्यासाठी व भांडवलदारांचे रक्षण करण्यासाठी धर्म नावाच्या थोतांडाचा व यंत्रणेचा वापर केला जातो. कामगाराची स्वत:ची मालमत्ता नसते. त्याचे आपल्या बायका मुलांशी असलेले नाते भांडवलदारांच्या तुलनेत टोकाचे विरोधाभासी असते. एकंदरीत अशा परिस्थीत जगणा-या कामगाराला धर्माची अजिबात गरज नसते. ते जर कुणाच्या हिताचे असेल तर ते भांडवलदारांच्याच. म्हणून धर्म हे भांडवलदारांचे थोतांड आहे”
कामगारांची हुकूमत:
पुढे जाऊन हा जाहिरनाम असे म्हणतो की या जगात कामगारांची हुकूमत आली पाहिजे. तो म्हणतो...
“कम्युनिस्टांचा लढा सुरुवातील जरी तुम्हाला कामगारांचा लढा वाटला तरी त्याचे स्वरुप ईतकेच नाही. हा कामगार भांडवलदारांच्या विरोधात लढता लढता सत्ता हातात घेणार अन हाच एकमेव टार्गेट असला पाहिजे. भांडवलदारांच्या हातून सत्ता हिसकावणे व कामगारांचे राज्य वा सत्ता प्रस्थापित करणे हाच एकमेव उद्देश आहे. कारण जोवर कामगारांची सत्ता अस्तीत्वात येत नाही तोवर कामगारांचा विकास होणार नाही. भांडवलदारांचे जबरदस्तीने उच्चाटन करुन कामगारांची हुकूमत(सत्ता नाही बरं का) प्रथापित करणे कम्युनिजमचा उद्देश आहे.”
पुढे हाच सिद्धांत अधिक स्पष्ट करत लेनीन लिहतो “कामगारांची हुकूमशाही” आली पाहिजे. यावर प्लेखानोव्ह, ट्रोटस्की व ईतर सदस्य आक्षेप घेऊन सत्ता लिहायचे विनवणी करतात. पण लेनीन स्पष्ट शब्दात सांगतो. आम्हाला सत्ता नकोय... आम्हाला कामगारांची हुकूमशाहीच आणायची आहे हे स्पष्ट झाले पाहिजे. असो.
तो पुढे म्हणतो...
“कामगार वर्गाला वर्ग या नात्यानी संघटीत करणे. भांडवलदारांची सत्ता उलथून लावत कामगारांची हुकूमत प्रस्थापित करणे हेच कम्युनिजमचे ध्येय नि उद्देश आहे.”
वयक्तीक संपत्ती नष्ट करणे:
या जाहिरनाम्यातील मार्क्सचा सर्वात आवडता सिद्धांत काय तर कामगारांची हुकूमत आल्यावर सगळ्यांची वयक्तीक संपत्ती नष्ट करुन ती राष्ट्रीय संपत्तीत जमा करणे. हा कार्ल मार्क्सचा सगळ्यात आवडता व लाडका सिद्धांत होता.  या जाहिरनाम्यात तो पुढे म्हणतो...
“खाजगी मालकी रद्द करुन सर्व संपत्ती राष्ट्राच्या नावे जमा करणे हा कम्युनिजमचा पाया आहे. भांडवदारानी प्रचंड माया गोळा केली असून त्याची मालकी नष्ट होताचा व राष्ट्रिय संपत्तीत जमा करताच मजुरांचा प्रश्न निकाली निघेल. आम्हा कम्युनिस्टांवर असा अरोप करतात की स्वत:चे कष्टाचे फळ व त्यातून निर्माण झालेली संपत्ती याची मालकी रद्द करणे म्हणजे आमच्या स्वातंत्र्यावर गदा आणणे असे होय.”
 यावर उत्तर देताना कार्ल मार्क्स म्हणतो..
“आजच्या घटकेला बहुसंख्य असलेला मजूर वर्ग बेघर आहे. त्याच्याकडे स्वत:ची संपत्ती नाही, जमीन नाही, घर नाही वा कसलेच मालकी हक्काचे भांडवल नि संपत्ती नाही. म्हणजे ईथला प्रचंड मोठा समाज पुर्णत: संपत्तीहिन झालाच आहे. मग ज्याच्या कुणाकडे आज संपत्ती आहे तो भांडवलदार वर्गच आहे. खरे तर वरील स्थीतीतून हेच सिद्ध होते की ईथे भांडवलदाराने ऑलरेडी मजूराना संपत्ती रहीत करुन टाकले आहे. आता त्यानी स्वत: या वाटेवर येऊन उभे राहावे नी संपत्तीरहीत व्हावे. मोलमजुरीतून संपत्ती निर्माण होत नसून त्यातून भांडवल निर्माण होते. म्हणजे मालमत्ता निर्माण होते जी भांडवलदाराच्या मालकीची बनत असून मजुरांची कधीच नसते.”
हा युक्तीवाद त्या काळात अत्यंत अपिलींग असावा यात मात्र तिळमात्र शंका नाही. पण आजच्या घडीला हे सगळं हास्यस्पद ठरते.
भांडवल नष्ट झाले तर:
भांडवलाच्या विरोधात गळा काढणारा कार्ल मार्क्स बेमालूमपने व अत्यंत शिताफिने कमुनिस्टांच्या भांडवलशाहीचे समर्थन करुन बसतो. याच जाहिरनाम्यात एका शंकेला उत्तर देताना कार्ल मार्क्स म्हणतो...
“खाजगी मालकी रद्द झाल्यावर सर्व कामं बंद पडतील व सर्वत्र आळसाचे राज्य येईल असा एक आक्षेप नेहमीच येतो. पण वर्गीय मालकी नाहीशी होणे म्हणजे प्रत्यक्ष उत्पादन नाहीशे होणे असे थोडीच आहे. उत्पादन थांबणार नाही. फक्त त्या उत्पादनावर जी भांडवलदारांची मालकी होती ती नष्ट होऊन कामगारांची मालकी येईल.”
काय म्हणतोय कार्ल मार्क्स वरील वाक्यात?
भांडवलशाही  नावाचं उच्चाटन करुन त्या ठिकाणी मजूरशाही/कामगारशाही आणायचं बोलतोय. म्हणजे एकाकडून अधिकार काढून दुस-याकडे देण्याचं बोलतोय. यात मूळ शोषणाचा व दारिद्य निर्मूलनाचा विचार व त्यावरील उपाय अजिबात सुचवलेले नाहीत. अन हे जाहीर आहे की कार्ल मार्क्स हे उत्पादन करणार आहेत. म्हणजे त्याना श्रमिक लागणार... म्हणजे कामगार काम करणार. मग त्यात उत्पादनाचे टार्गेट आलेच. वस्तूची किंमत आलीच. त्यातून बाजारपेठ आलेच. म्हणजे व्यापार आलाच. याचाच अर्थ नफाही आलाच. म्हणजे भांडवलदार जे करत होते ते सगळं कार्ल मार्क्सही करणार आहे. फक्त भांडवलदाराच्या विरोधात आरोडा करताना तो कामगारांची-सत्ता असे गोंडस नाव देण्याची शक्कल लढवित आहे. बास!
कुटुंब संस्था नष्ट करणे:
कुटूंब संस्था रद्द करणे ही घोषणा म्हणजे जगातील सगळयात मुर्खपणाची घोषणा आहे. त्यावर सर्वत्र विरोधात सूर उसळला होता. खुद्द मार्क्सचे कित्येक साथीदार नाराजी कळवितात. यावर उत्तर देताना कार्ल मार्क्स म्हणतो...
“आजच्या कुटुंब व्यवस्थेचा पाया काय आहे? भांडवल व खाजगी प्राप्ती हाच कुटुंब व्यवस्थेचा पाया आहे. कामगार वर्गात या कुटुंब व्यवस्थेचा जवळवळ संपुर्ण अभाव असून याच्या उलट भांडवलदाराची कुटूंब व्यवस्था खाजगी मालकीमुळे घट्ट होत गेली आहे. कामगारांकडे पैसे नसल्यामुळे ईथून यांच्या स्त्रीया वेश्या व्यवसाय करतात तर भांडवलदारांच्या घरात बसून आराम करतात. या दोन कुटुंबातील फरक आहे. कशामुळे आहे? खाजगी संपत्तीच्या मालकीमुळे आहे. त्यांच्याकडे खाजगी संपत्तीची मालकी आहे त्यांचे कुटुंब सुखात असून कामगारांचे कुटुंब म्हणजे स्त्रीया वेश्या बनल्या आहेत. थोडक्यात कामगार वर्गात कुटुंब आहेच कुठे? त्याचा ईथे जवळ जवळ अभावच आहे.  भांडवलशाही नष्ट झाल्यास हा अभावही नष्ट होईल.
आई बापाकडून मुलांची जी पिळवणूक होते आहे ती आम्ही बंद करु ईच्छीतो, असा आमच्यावर अरोप आहे काय? हा गुन्हा आम्ही जाहीरपणे कबूल करतो”
तो पुढे म्हणतो...
“आधुनिक भांडवलशाही व उद्योगंधद्यामुळे मजुराच्या कुटूंबाची पार ताटातूट होते व त्याची पोरेबाळे नि बायका मुली उघड्यावर पडतात. यातूनच ते बाजारू बनतात किंवा परत भांडवशाहीच्या आश्रयास जाऊन श्रमाची साधने बनतात. कुठे आले कुटुंब? कामगारांचे कुटुंब तर उध्वस्थ होत असते. जर कुणाचे कुटूंब असेल तर ते भांडवलदारांचे. अन ते खाजगी संपत्तीतून घट्ट बनत जात आहे. म्हणून कुटूंब व्यवस्था नष्ट झाली पाहिजे.”
राजकीय वर्चस्वाचा लढा:
कम्युनिस्टांचा लढा हा कमुरांच्या विकासा लढा नव्हता वा त्यांच्या प्रतीचाही लढा नव्हता. तो होता राजकीय वर्चस्वाचा लढा. त्यासाठी फक्त मजुराना पुढे करुन सत्ता मिळवायची होती. केवळ सत्ता नि सत्ता हेच ध्येय असलेला हा जाहिरनामा पुढे म्हणतो...
“...कामगाराला देश नसतो. त्याच्याजवळ जे नाही तो काढून घेण्याचा प्रश्नच येत नाही. कामगार वर्ग असेल त्या राष्ट्रात प्रथम राजकीय सत्ता मिळविली पाहिजे. राष्ट्रातील प्रमुख वर्ग बनला पाहिजे. कामगार वर्ग कोणा एका राष्ट्राचा नसून तो स्वत:च एक राष्ट्र असतो. त्याच्या राष्ट्राचे नाव कामगार एवढेच आहे. भलेही भांडवलदारांत या शब्दाला वेगळा अर्थ असेल. कामगारांचे वर्चस्व हाच कमेव उद्देश असायला हवा. कामगारांची सत्ता येणे अत्यावश्यक आहे.”
अशा प्रकारे युकितावद करत हा कम्युनिस्ट जाहिरनामा पुढे सरकतो. सत्ता व फक्त सत्ता एवढा एकमेव उद्देश ठेवून हा जाहिरनामा तयार करण्यात आला होता. त्यासाठी युरोपातील कामगारांचा वापर करुन सत्ता बळकविण्याची ही शक्कल कार्ल मार्क्सच्या डोक्यातून जन्मास आली. भांडवलादार व बुर्झ्वा वर्गावर प्रखर टिका करताना शेतकरी वर्गाला सुद्धा कार्ल मार्क्स झोडून काढतो. कार्ल मार्क्सच्या जागतीक सिद्धांताप्रमाणे शेतकरी हा सुद्धा भांडवलदार असून त्याची शेती जप्त करावी. शेतकरी वर्ग म्हणजे वयक्तीक संपत्ती बाळगणार भांडवलदार बुर्झ्वा होय. फक्त कामगार तेवढेच काय ते राबतात असा त्याचा सिद्धांत आहे. मग ही वयक्तीस संपत्ती नष्ट करण्यासाठी या जाहिरनाम्याच्या शेवटच्या टप्प्यात कार्ल मार्क्स आपले दहा जगप्रसिद्ध मागण्या मांडतो त्या अशा...
कम्युनिस्ट जाहिरनाम्यातील १० मागण्या


 1. ·  जमिनीची वयक्तीक मालकी संपुष्टात आणून सरकारी जमा करावे.
 2. ·   प्राप्तिकर(Income Tax) हा उत्पन्नाच्या वाढत्या प्रमाणात आकारावा.
 3. ·   वारस हक्क पद्धती बंद करावे. (म्हणजे वडलोपर्जित संपत्ती मिळले बंद)
 4. ·   श्रीमंत लोकांच्या सगळ्या इस्टेटी जप्त कराव्या.
 5. ·   देशात एकच राष्टीय बॅंक असावी अन तिचे भाग-भांडवल राष्ट्राच्या मालकीच असावे.
 6. ·   पोस्टखाते, तारयंत्रे, आगगाड्या, आगबोटी- राष्ट्राच्या मालकिचे असावे
 7. ·   सर्व कारखाने हे फक्त नि फक्त राष्ट्राच्याच मालकिचे असावे.
 8. ·  कामगाराना आपले संघ स्थापण करण्याची मुभा असावी.
 9. ·  शिक्षण सार्वत्रीक व मोफत असावे.
 10. ·  न्याय मोफत मिळावा व न्यायाधिश लोकनियुक्त असावेत.
क्रांतीचा मार्ग
वरील मागण्या पुर्ण करण्यासाठी कार्ल मार्क्सनी क्रांतीचा मार्ग सुचविला. क्रांति म्हणजे सशस्त्र उठाव करुन शासन उलथवून लावणे व कामगारांची हुकूमत प्रस्थापित करणे. या नंतर युरोपात ख-या अर्थाने क्रांतीचे वारे वाहू लागले. जागोजागी मजूरानी शस्त्र उचलेले व बंड केला. प्रत्येक ठिकाणी रक्तपात सुरु झाला. क्रांतीच्या नावाखाली मजूर वर्ग गुंडगिरी करु लागला व भांडवलदार नि शेतक-याना लुटू लागला. हा हा म्हणता ही क्रांती जगभर उसळली. सर्वत्र रक्तपात चालू झाले. अनेक संपन्न राष्ट्र जसे की रोमानीया वगैरे या कम्युनिस्टांच्या नादी लागून खिळखिळे झाले. अशा प्रकारे जगात अराजक माजविणारा हा क्रांतीचा विचार जिथून जन्मास आला तो कम्युनिस्ट जाहिरनामा व त्याचा जनक कार्ल मार्क्स यांची लाल क्रांती सुरु झाली.

आंबेडकरवाद:- शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा.
कम्युनिजम:-  शिका हा शब्द मार्क्सने सांगितलाच नाही. संघटी व्हा मात्र म्हटले. अन संघर्षा ऐवजी क्रांती(रक्तपात) करा असे म्हटले. आंबेडकरवाद व कम्युनिजम यातला हा मुख्य फरक आहे. 
***

२ टिप्पण्या:

 1. गरीबांना प्रगत करणे हा कम्युनिस्टांचा उद्देश नसून श्रीमंतांना दरिद्री बनवने व स्वत: अनिर्बंध सत्ता उपभोगणे हा खरा उद्देश आहे! अप्रतीम लेख!

  उत्तर द्याहटवा