सोमवार, १३ मे, २०१३

कबीर कला मंच : (कम्युनिस्ट कला मंच)

महाराष्ट्र पोलिसांच्या रडारवर आलेलं कबीर कलामंच प्रकाश आंबेडकरांच्या समर्थनामुळे वेगळच वळण घेणार असे दिसते. शितल साठे व सचिन पोलिसाना शरण आले तेंव्हा खुद्द प्रकाश आंबेडकर त्यांच्या पाठीवरुन हात कुरवाळत होते. जणू ते म्हणत होते की “जा बाळानो तुम्ही बेधडक आत जा... बाहेर काय ते मी पाहून घेईन” असे ते आश्वासन देत असावेत असे वाटते.
कबीर कला मंच नावाची ही संघटना पुण्यात बांधली. ईथून माथेफिरू गाण्यांचा प्रचार चालू झाला. आज तीचा पत्ता व संस्थापक कोण याचा कुठे धागादोरा सापडत नाही. मी वेबसाईटवरील त्यांच्या ईमेलवर विचारणा केली पण उत्तर आले नाही. या संघटनेचे मायबाप कोण याचा खुलासा न होणे यांच्या बद्दल शंका घ्यायला जागा करुन देते.   या संघटनेच्या कलाकारांची गाणी ऐकल्यावर लक्षात येते की ही संघटना कम्युनिस्ट लोकांची आहे. आता कम्युनिस्ट म्हटले की परत दोन गट, त्यातला एक शस्त्रधारी तर दुसरा निशस्त्र... पण दोघांचाही उद्देश एकच... क्रांती! म्हणजे सध्याचे राज्य व संविधान हे त्याना मान्य नाही. तर त्याना मान्य आहे कार्ल  मार्क्सचे संविधाने ज्याला कम्युनिस्ट मेनिफेस्टो असे नाव आहे.
काय म्हणते मार्क्सचे संविधान?
मजुरांचे राज्य हवे, संपत्तीचे समान वाटप करा, धर्माचे निर्मूलन करा असे म्हणते. महत्वाचं म्हणजे समता हवी पण स्वातंत्र्य व बंधूता मात्र नको आहे.  पण गंमत अशी की ते आमच्या लक्षात येतच नाही. साम्यवादी म्हणतात जिथे समता आहे तिथे माणूस सुखी असेल. पण ते खरे नाही. कम्युनिजममध्ये बंधूभावाचा अतीव अभाव आहे व त्याच बरोबर स्वातंत्र्याचाही. तुम्हाला एखाद्या गोष्टीचा विरोध करायचा असल्यास ते करण्याचे स्वातंत्र्य कम्युनिस्ट राष्ट्रात अजिबात नाही. अन त्याच बरोबर तुम्ही कम्युनिस्टांच्या विरोधात बोललात तर ते तुम्हाला पार चिरडुन टाकतात... म्हणजे बंधूत्वाही नाही. असो.

काय आहे कबीर कला मंच? कम्युनिस्ट शाहीरांचा मंच म्हणजे कबीर कला मंच होय. खेड्या पाड्यात जाऊन कम्युनिस्टांची क्रांती गितं गाऊन नवीन राज्यक्रांती घडविण्याचा कार्यक्रम चालविणारी शाहीरांची ही फडी आहे. कबीर कला मंचाचे कलाकर सध्याची राजकीय व्यवस्था बदलून टाकण्याचा प्रचार करतात. त्यांची गाणी म्हणजे ही आत्ताची संसदीय व्यवस्था उधळून लावून कम्युनिस्टांचे म्हणजेच मजूरांचे राज्य आणण्याचा आग्रह धरणारी गाणी आहेत.  ज्याना हे तपासायचे आहे त्यानी “जयभीम कॉम्रेड” हा माहितीपट पहावा. त्यात कबीर कला मंचाचे अनेक कलाकार अशा प्रकारची गाणी गाताना दिसतात.
आज देशातील तरुणाची परिस्थीती अत्यंत हालाखीची आहे. तरुण शिकतो आहे खरा पण नोकरी व्यवसाय न मिळाल्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात बेरोजगार झाला आहे. त्यात भर म्हणजे सरकार भ्रष्ट असून रोज नवनवीन घोटाळे बाहेर पडत आहेत. श्रीमंत व गरीबातील दरी वाढत चालली आहे. राजकारणी लोकांची असंवेदनशीलता तर त्यावर कळस असून देशातील खास करुन खेड्या पाड्यातील तरुणाच्या मनात राजकारण्यां विरुद्ध सर्व स्थरातून खदखदत आहे.  लाचखोर अधिकारी, उदासीन सरकार व भ्रष्ट राजकारणी यांच्यावर तरुण वर्ग प्रचंड संतापलेला आहे. याचा फायदा घेत कम्युनिस्टानी तरुणांची माथी भडकविण्याचा प्लॅन आखला असून त्यातूनच निर्माण झाले हे कबीर कला मंच...
करीअरच्या दृष्टीकोणातून खेड्यातला तरुण आणिबाणीच्या परिस्थीतीतून जात असताना कोणी एखादा कम्युनिस्ट पुढे जाऊन जर त्याना म्हणत असेल की आपण क्रांती करु व त्यातून बेरोजगारी मिटेल वगैरे. तर त्या बिचा-या तरुणाला हे खरे वाटणारच नि तो कम्युनिस्टांच्या जाळ्यात अडकणारच. हा असाच प्रकार कबीर कला मंचाच्या पोरांचाही झाला. जयभीम कॉम्रेड मध्ये एक गाणं गाताना शितल साठे म्हणते “एक ईस्ट ईंडीया कंपनीला बाहेर काढायला दिडशे वर्ष लागली तर आज साडेचार हजार विदेशी कंपन्या आहेत. त्याना आपल्याला बाहेर काढायचे आहे. विचार करा किती वेळ लागेल?” आहे की नाही गंमत. तुलना करताना कही तर्क वगैरे असावा की नाही? कबीर कला मंचाचं हे गीत थेट राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या माहिती पटात आहे. हा प्रोब्लेम त्या पोरांचा नाहीये. त्याना तसं बनविणा-या विखारी वृत्तीच्या कम्युनिस्टांचा आहे. हे सगळं शितल साठे वा आजून कोणी त्यांच्या मनातलं बोलत नसून कम्युनिस्ट नेते या पोरांच्या तोंडातून बोलत आहेत. 
ज्या काही अडचणी आहेत त्यावर शांत मार्गाने तोडगा काढला जाऊ शकतो. संविधानीक मार्गानी लढता येऊ शकतं. पण कम्युनिस्टाना हे सगळं थोडी जमायचं? त्याना एकच मार्ग माहीत आहे तो म्हणजे क्रांती. अन यांच्या नादी लागून तरुण वर्ग संविधानीक मार्गानी विरोध करणे सोडून क्रांतीची स्वप्न रंगवू लागला. कबीर कला मंच हे कम्युनिस्टांचं पिल्लू आहे. विचारपुर्वक ते आंबेडकरी जनतेला पुढे करत आहेत. कबीर कला मंचाची पोरं निळी पट्टी बांधून हिंडतात खरी पण त्यांची विचारधारा ही संविधान विरोधी असून ते क्रांतीच्या बाता करतात. म्हणून कबीर कला मंच ही माझ्यामते तरी एक घातक संघटना असून सर्व आंबेडकरी बांधवानी अशा संघट्नेपासून दोन हात दूर रहावे. 
ते जयभीम म्हणतात खरे पण त्यांचा नारा हा लाल सलाम आहे. म्हणून ते आंबेडकरी नसून निळ्या पट्टीतली लाल(कम्युनिस्ट) लोकं आहेत.


जयभीम.

८ टिप्पण्या:

 1. खूप बरं वाटलं हे वाचून रामटेके साहेब. नक्कीच ह्या विषयाची माहिती सर्व आंबेडकरी बांधवांच्या पर्यंत पोहोचवणं आणि त्यांना "जयभीम" चा अपमान कॉम्रेड लावून न करू देणं हे एक येत्या काळात मोठं आव्हान आपल्या सर्वांसमोर आहे.

  वरूण जाधव
  ८१४९७६१२७७

  प्रत्युत्तर द्याहटवा
 2. नमस्कार आपले पोस्ट वाचले. भारत मातेला त्रास देण्यासाठी कबीर कला मंच सारखे असे अनेक बाजारबुणगे उभे राहत असतात. भारत हा असा देश आहे कि तो ह्या सारख्या चिरकुट विचारांना कधीच खतपाणी घालणार नाही . भारतातील नागरिकांना एकात्मतेचे संस्कार घरा घरातूनच मिळतात. त्यामुळे संत कबिरांचे नाव घेऊन आपली कला सदर करण्याची हवस असलेले फालतू लोक भारताला कधीच हानी पोहचवू शकणार नहित. आपल्या पैकी काही नेतेच अशा चिरकुट लोकांची पाठराखण का करतात असा प्रश्न मला पडतो आणि कधी कधी वाटत कि हे सर्व नेते कदाचित यांचे जावाई असावेत म्हणूनच पाठराखण करीत असतील त्यांच्या साल्यांची. असो मी तर ठरवलं आहे अश्या देशद्रोही तथाकथित पुरोगामीत्वाचे जुलाब होणाऱ्या लोकांना जशास तसे उत्तर द्यायचे. आणि माझी प्रतिक्रिया वाचून कोणाला जर समाजवादाचे उमाळे फुटले असतील तर त्याने प्रत्यक्ष भेटावे. भारत मत कि जय. वन्दे मातरम. भवतु सब्ब मंगलम. यदुनाथ

  प्रत्युत्तर द्याहटवा
 3. .
  ABVP तुमचा नक्की विरोध कशाला आहे ?
  ABVP या संघटनेने जे केले ते चुकच होते. फिल्म मधे फक्त वस्तुस्थीती मांडण्यात आलेली आहे,
  आणी फिल्म हे एक माध्यम आहे.
  .
  फिल्म मधे ईतरही गोष्टी आहेत, कशाप्रकारे शिवसेना-भाजप सरकारने रमाबाई-आंबेडकर नगर मधे दलितांवर गोळीबार केलेला होता. कसे आता ते सर्व विसरुन शिवशक्ती-भिमशक्तीचे नारे दिले जात आहेत,
  श्रीक्रुष्ण कमीशनच्या रीपोर्ट नुसार जानेवारी 1993 ची दंगल भाजप-शिवसेनेने घडवुन आणली होती, अजुनही अनेक गोष्टी चित्रीत आहेत त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करायचे...
  .
  हिंसा करणार्‍या नक्षलवाद्यांचा मि निषेधच करतो, परंतु अत्यंत अपुर्‍या,तोडक्या माहितीच्या आधारे बोलणार्‍या, स्वातंत्र्याची गळचेपी करणार्‍या ABVP सारख्या संघटनांचा मी तिव्र निषेध करतो.
  .
  हजारो लोक मारुन पुरावे नाहित म्हणुन सुटलेले मोदी हे यांचे हिरो,
  आणी फक्त गाणी गाणारे, समाजप्रबोधन करणारे, फिल्म काढणारे यांचे शत्रु ...
  आज समस्त आंबेडकरी बांधवांनी ही घातक चाल ओळखुन भाजप सारख्या जातियवादी पक्षांपासुन 4 हात दुर रहायची जास्त गरज आहे.
  .
  याचा अर्थ असा अजिबात नाही , की तुम्ही "जयभीम कॉम्रेड" या फिल्म ला पाठींबा द्या...पण 1दा ही फिल्म सर्वांनी नक्की बघा, व यानंतर जे वाटेल त्यावर आपली मते बनवा, डोक्याने विचार करुन आपले कोण व परके कोण हे ओळखा, गोष्टी पाहुन मते बनवा...
  आज धर्मांच्या नावावर विष पसरवणारे, उद्या जातींवरुनही विष पसरवायला कमी करणार नाहीत.
  आणी या करता ते संघाच्या नावाचा फेटा घालतिल. (जाणीवपुर्वक फेटा म्हणले आहे)
  .
  ABVP चा खरा विरोध हा फिल्मलाच आहे कारण त्यांच्या क्रुत्यांचे चित्रीकरण झाले आहे व ते खोटे आहे हेही त्यांना म्हणता येत नाही, म्हणुन "कबिर कला मंच" चे नाव पुढे करून याला विरोध करणे सुरु आहे. कबिर कला मंच चा एकुण फिल्म मधे किती भाग आहे ??? (25% पेक्षा कमी)
  अगदी स्पष्ट आहे कि विचारांना विचारांनी यांना उत्तर देता येत नाही, कारण मुद्दलातच त्याकरता एका किमान वैचारीक पातळीची गरज असते, जी यांच्याकडे नाहीये...
  .
  लोक या गोष्टींचा आपल्या डोक्याने , सारासार विवेक बुध्दीने विचार करतील अशी मला खात्री आहे.

  प्रत्युत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. मी अहमद शेख , कट्टर मुस्लिम असूनही अभाविप चा कार्यकर्ता आहे, गेली ६५ वर्ष अभाविप राष्ट्र पुनरुथ्थान चे काम करीत आहे ते कुण्या पक्षाच्या नावाखाली नाही, तर स्वतंत्र विचार आणि सशक्त कार्यपद्धती च्या जोरावर …
   जिथे तुमच्या सारख्या बाजारबूनग्यांना तसेच तुमच्या राष्ट्रद्रोही विचारांना आणि कारवायांना चोख उत्तर देण्याची हिम्मत असते…।
   आंबेडकरांच्या नावाखाली नक्षलवादी निर्माण करण्याच्या कारस्थानांना, समस्त आंबेडकरी जनता तसेच हि भारत माता कधीच माफ करणार नाही लक्षात ठेवा ….
   भारत माता कि जय
   वन्दे मातरम !

   हटवा
  2. Koni jar ambedkaranche nav gheun yukana naxalism kade valaunyacha kat rachel tar mag gath amha Rashtrawadi yuvakanshi ahe lakshat theva....
   VANDE MATRAM ..!!

   हटवा
 4. कोणी जयभिम म्हणाला म्हणुन आंबेडकरी होत नाही किंवा वंदे मातरम म्हणुन राष्ट्रभक्त होत नाही सगळेच राजकारणी हरामखोर

  प्रत्युत्तर द्याहटवा
 5. मी गोपाळ वाघमारे
  गेली 4 वर्षापासून अ भा वि प चा कार्यकर्ता आहे
  आणी मला वाटत आहे डॉ बाबासाहेब यांचे नावाचे पांघरूण घेऊन काम करत असणारी संघटना ही दलित आन् भिम्सैनिक यांसाठी घातक आहे तरी लोकांनी याला बळी पडू नये

  प्रत्युत्तर द्याहटवा
 6. कबीर कला मंच ही डॉ बाबासाहेब च्या नावाचे पांघरूण घेऊन काम करणारी दहशतवादी संघटना आहे ह्या संघटना मधे दलित बहुजननानि बळी पडू नये

  प्रत्युत्तर द्याहटवा