शुक्रवार, १० मे, २०१३

प्रकाश आंबेडकर : वाढ दिवसाच्या शुभेच्छा

प्रकाश आंबेड्कर हे आंबेड्करी चळवळीतील एक तरुण नेतृत्व म्हणून तर प्रसिद्ध आहेतच पण त्याच बरोबर अत्यंत अभ्यासू, दूरदर्शी व धोरणी, मुत्सद्दी नि परिवर्तनवादी म्हणूनही त्यांची ख्याती आहे. बाबासाहेब आंबेड्करांचे नातू म्हणून त्यांचा समाजात आदर आहे तो आहेच. पण त्या पलिकडे जाऊन एक स्वतंत्र व्यक्तीमत्व म्हणून त्यानी स्वत:ची ओळख निर्माण करत राजकारणात व समाजकारणात मोठी मजल मारली. खरं तर बाबासाहेबांच्या घरात जन्माला आल्यावर नावाचा जो फायदा मिळतो तो मिळालाच पण त्याच बरोबर मोठ्या माणसाच्या घरात जन्मास येण्याचे तोटेही असतात. प्रकाश आंबेडकर हे बाबासाहेबांचे नातू असल्यामुळे उगीच लोकांच्या अपेक्षाही उंचावल्या अन त्यात काही वावगं ही नाही. त्यातून तुलना, कामाचं कौशल्य व समाजाबद्दलचा कळवळा वगैरे गोष्टीना जुन्या साच्यात घालणे व तपासणे हे सगळे प्रकार झाले अन होत राहणार. यातून सुटका नाही.  मोठ्या माणसाच्या घरात जन्माला येण्याचा सगळ्यात मोठा तोटा हा असतो की तो माणूस तुलनेच्या ओझ्याखाली दबून जाण्याची प्रचंड शक्यता असते. सहाजीकच प्रकाश आंबेडकरांवरही हे तुलनेचं ओझं पडलच... मात्र त्यातून सावरत त्यानी स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण करत अकोल्यात वेगळा राजकीय आदर्श घालून दिला.
आज प्रकाश आंबेडकरांचा वाढदिवस आहे. त्यांचा जन्म १० मे १९५४ चा. धनंजय कीरच्या पुस्तकात प्रकाश आंबेड्करांच्या जन्माचा संदर्भ येतो. बाबासाहेब त्या काळात आजारी असत तरी सुद्धा ते नातू प्रकाश आंबेडकर यांचे फार लाड करत. बाबासाहेबानी या नातवाला मांडीवर घेऊन काय स्वप्ने पाहिलित माहीत नाही पण त्यानी आज जे काही उभं केलं ते पाहता प्रकाश आंबेडकरांच्या अचिव्हमेंटसच्या प्रमाणावर वाद होऊ शकेल पण ते ज्या मार्गानी जात आहेत ते मात्र नक्कीच बाबासाहेबांच्या कसोट्यात उतरणारं व या समाजाला नव्या दिशा दाखविणारं असल्यामुळे मार्गाच्या व उद्देशाच्या दिशा नि दशा निर्विवाद आहेत. यातील ताजं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर...
तर...
आज महाराष्ट्राला मागासलेपणाचे डोहाळे लागले असताना अन जो तो उठून आम्ही मागास जातीचे आहोत असे म्हणत असताना अन त्यातल्या त्यात मराठा समाज जो सदैव ईथला शासन कर्ता होतो आज चक्क तो स्वत:ला मागास म्हणवून घ्या व तशी आमची नोंद करा म्हणताना... प्रकाश आंबेडकर म्हणतात “आता बास झालं. जाती काही जाता जात नाहीत. अन त्या गेल्या पाहिजे हे माझं ध्येय असून त्याची सुरुवात आपण करु या. शालेय दाखल्यावरुन जात हद्द्पार करु या...” हे असं असतं आंबेडकरवाद. खरोखरच परिवर्तनाची कास धरणारा हा माणूस आहे. निस्वार्थबुद्दिने झपाटलेली माणसं ध्येयाच्या दिशेनी मार्गक्रमण करताना रेषेपासून तसूभरही ढळत नसतात. अन ते तिकडे आमचे दास... कधी रामाचे दास.... कधी शिवाचे दास... तर कधी आजून कोणाचे दास... 
परत एकदा आंबेडकरांच्या घरातून एक अत्यंत क्रांतीकारी विचार जन्मास आला आहे. आता वेळ आली आहे आपण सर्वानी त्या हाकेला “ओ” देऊन धावण्याची व शालेय दाखल्यावरुन जाती हद्दपार करण्याची. उभ्या महाराष्ट्राला मागासपणाचे डोहाळे लागले असताना जातीनिर्मूलनाचा इतका प्रभावी नि क्रांतीकारी विचार यावा तो आंबेडकरांच्या घरूनच. तो आला... मै तो खुष हुवा.... अब आपकी बारी है.

अशा या महान नेत्याचा आज वाढदिवस. मी व माझ्या कुटूंबातर्फे त्याना वाढ दिवसाच्या अनेक शुभेच्छा.

टीप:- पुढच्या लेखात कबीर कला मंचाच्या कलाकारान आंबेडकरानी दिलेले समर्थन कसे चुकीचे आहे ते वाचा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा