शुक्रवार, १० मे, २०१३

बीफ बिर्यानी (गायीच्या मटनाची बिर्यानी)

आज दिवस शुक्रवार... माझ्यासाठी मोठा दिवस... कारण आजच्या दिवशी माझी मज्जा असते. आज माझ बीफ बिर्यानी खायचा दिवस असतो. तसं पुण्यात बीफ बिर्यानी रोजच मिळते खरी पण शुक्रवारी बीफ बिर्यानी खाण्याची मजा औरच असते. मटन ताजं असतं. गाय कींवा बैल आजच्या दिवशी मात्र हमखास कापला जातो. ईतर दिवशी मटण शिळं असण्याची शक्यता असते. पण शुक्करवार बोले तो... नवीन गाय कापणेका दिन भाय... म्हणून माझी शुक्करवारवर पाळत असते. मी पक्का खादाळ माणूस आहे. मला मासे फार आवडतात. त्यातल्या त्यात झिंगे आवडतात. चिकन हा प्रकार फारसा आवडत नाही पण गावठी असली की आवडते. मटन मात्र बोकडाचं आवड्तं... पण या सगळ्य़ांच्या वर नंबर एकवर जर काही आवडत असेल तर ते म्हणज गायीचं मटन...
माझ असं मत आहे की... मटनात मटन गायीचं मटन. बाकी मटन नुसतच मटन असतं. आता हा लेख वाचून काही लोक मला नावं ठेवतील पण अशा लोकांची परवा करणार मी माणूस नाही. त्याना एवढच म्हणेन पाश्चात देशात जाऊन पहा....बास. मला बीफ मटन खायला आवडते, मला ती चव अप्रतीम वाटते अन बीफ खाणा-या कोणत्याही माणसाला विचारा... बिफच्या समोर बाकी सगळं मटन फिक्कं असतं. आता ज्यानी ते खाल्लच नाही त्याना काय कळणार की गायीच्या मटनाची चव काय असते ती. असो.
मी चाललो कॅंम्पात... बीफ बिर्यानी खायला.... तो वर तुम्ही हा फोटू पहा. मी खाऊन येतो.

५ टिप्पण्या:

 1. saheb...bhagavan budhanche aahar vishyat kahi vichar aapan prastut karal kai
  rajesh tolbande
  09423066622

  उत्तर द्याहटवा
 2. Aho Ramteke saheb,
  Aapan tar Bhagwan buddhance anuyaayi aahat ani saglyana mahit aahech ki Baudhdha Dharma Ahinsa sangto...
  Tumhi asle kuthle baudhha ki jyana aaplya dharmatali amhinsach mahit nahi...
  Maza tumchya khanya pinyavar akshep nahi pan tumhi Bhagawan Buddhanchi tatwe sangat aslyache dhol pitatat ani asle post takatat tyawar aahe...

  Buddhanche Tatwa aahe "Ahinsa parmo dharm" yacha angikar kara ani bakichyana pan sanga..

  Yawar 1 khumasdar lekh yevu dya... Amhi pratikshet asu...

  ................. Jai Bharat

  उत्तर द्याहटवा