सोमवार, १३ मे, २०१३

गंदे मातरम... गंदे मातरम...!

मागच्या आठवड्यात वंदे मातरम वरुन लोकसभेद वादळ उठलं. एका खासदाराला जवाब विचारण्यात आला की त्यानी मध्येच उठून बाहेर जाण्याचे कारण काय? वंदेमातरम हे गीत सुरु असताना त्यानी  सभागृ सोडल्यामुळे हिंदू सदस्य प्रचंड संतापले होते. प्रकरण एवढं वाढलं की थेट सभागृह अध्यक्षानी त्या खासदारास खुलासा करायला सांगितलं. तेंव्हा खासदारानी दिलेलं उत्तर खास त्याच्या पोतळ्यातलं होतं.  पण मला गंमत वाट्ते ते या बिचा-या हिंदूंची. अरे तुम्ही स्वत: तुमच्या धर्मग्रंथातून आजही स्त्रीला तुच्छा व गंदी समजता... तीला आजही हिंदू धर्मात समान वागनूक नाही अन वर लबाडी काय तर त्याच स्त्रीला ईतरानी पुजावं हा अट्टाहास. कसं चालणार? तुम्ही स्वत: पुजने तर दूर पण तीचा तुच्छ म्हणून उल्लेख करायचा अन ईतरानी मात्र तुम्ही बोट दाखवाल त्या स्त्रीला पुजावं ही अपेक्षा. आहे की नाही लबाडी!
हिंदू कोड बीलावरुन बाबासाहेबानी कायदे मंत्री पदाचा राजिनामा दिला तेंव्हाची घटना आठवा जरा. याच सभागृहातले सन्माननिय सदस्य हिंदू बायकाना अधिकार मिळायला नको म्हणून तुफान लढले होते. कारण त्यांच्या लेखी बायका म्हणजे हिंदू धर्मातील गंदगी, अस्पृश्य व तुच्छ जीव. हो कारण चार दिवस पाळीच्या काळात आजही बाजूला बसविण्याची प्रथा जातीवंत हिंदू पाळतात. कारण काय तरी स्त्री ही शुद्र... अन त्या चार दिवसात कुत्र्या मांजरापेक्शाही शुद्र. तर अशी ही शुद्र स्त्री याच लोकसभेच्या सभागृहात हिंदू कोड बिलाच्या वेळीस प्रचंड अपमानीत करण्यात आली. बाबासाहेबानी स्त्रीयांसाठी समान अधिकार मागण्याचा जो प्रस्ताव ठेवला होता तेंव्हा स्त्रीला समान न मानणारे सन्माननीय लोकसभा सदस्य मोठ्या गर्जना करत उठले अन हिंदू कोड बिल हाणून पाडला. कारण एकच... स्त्री ही शूद्र अन तीला पुरुषाच्या बरोबरीन समान दर्जा नको. ही झाली पन्नास वर्षा पुर्वीची घटना... याच सभागृहातील.
आता अर्ध्या शतका नंतर परवा त्याच सभागृहात त्याच मनोवृत्तीच्या लोकानी नवीन ओरडा केला.  काय तर खासदारानी वंदे मातरम म्हणायला हवे. तसे न म्हणने म्हणजे म्हणे देश द्रोह वगैरे पर्यंत दावा करणारेही उगवले. कोडबिलच्या वेळी ईथे स्त्री शुद्र ठरते अन आज देवीचं सोंग नेसवून आणलेली स्त्री मात्र पुज्य असा हा हिंदूचा युक्तीवाद. काही लॉजीक बिजीक असतं की नाही. अरे हिंदूनो "हिंदू कोड बिलच्या" वेळी तुम्ही स्त्रीला गंदी म्हटलात, तीला समान अधिकार देण्यास नाकार देत मोठा लढा उभा केलात अन आज अचानक तुम्ही ईतराना म्हणता की स्त्रीला वंदन करा. मान्य आहे, करुया. पण तुम्ही मुळातून हा बदल स्विकारला आहे का? स्त्रीला तुम्ही मुळातून वंदनीय मानता का? हे आधी सिद्ध करा. मग बघू.  नुसतं तुमची कोणी देवी बीवी आहे म्हणून ईतरांवर हा दबाव आणत असाल तर याला तर धार्मिक दबाव म्हणून तुम्हालाच तुरुंगात डांबायला पाहिजे. स्त्रीला केवळ स्त्री म्हणून मान देण्याची गोष्ट असेल तर स्वागतच आहे. पण देवा धर्माच्या रुपात स्त्री आमच्या बोकांडी बसवत असाल तर त्याचा कडाडून विरोध होणार हे याद राखा. 
आता हिंदूच्याच कसोट्या लावू या. हिंदू कोडबिलातली स्त्री जर  शुद्र असेल तर भारत माता नावाचीही स्त्री शुद्रच की. मनुस्मृतीतली स्त्री जर शुद्र व गंदी असेल तर भारत माताही शूद्र व गंदीच की. धर्मपिठात व शंकराचार्य पदास स्त्री जर शूद्र म्हणून अयोग्य तर भारत माता म्हणूनही ती अयोग्यच की. मग का म्हणून शुद्र स्त्रीला वंदन करण्याची कुणावर बळजबरी करता.
मी तर म्हणतो हिंदूचे स्त्री बद्दलचे निकष लावले तर ही भारत माता वंदे मातरम ठरत नसून ती ठरते गंदे मातरम किंवा शूद्र मातरम... अन अशा गंदे मातेला वा शुद्र मातेला वंदन करा म्हणून अरेरावी करायची... आहे की नाही कमाल. अरे तुम्हाला जर खरच वाटत असेल की स्त्रीला सर्वानी वंदन करावं तर आधी तुमच्या धार्मिक ग्रंथाना आग लावा. स्त्रीला सन्मान देणारे नवे ग्रंथ लिहा. शंकराचार्य पदावर स्त्रीला बसवा. अन नंतर बोला.

तुमच्या धर्मग्रंथातून स्त्रीला शुद्र नि गंदी म्हणायचे अन वर मात्र खोटा आव आणत तीला वंदन करा म्हणायचे... ही लबाडी थांबली पाहिजे.
हिंदूचे धर्मग्रंथ तपासून पाहिले तर ते आजही स्त्रीचा तेजोभंग करत आहेत. त्यांच्या धर्मग्रथातून एकच आवाज येतो आहे....
गंदे मातरम... गंदे मातरम.... गंदे मातरम. (गंदी माता, गंदी माता, गंदी मता)
आधी हे धर्मग्रंथ जाळून टाका, मनुसृतीवर बंदी घाला, अन मग बोला. कारण आजच्या घडीला तुमच्या धर्मग्रंथाच्या निकषावर भारत माता ही वंदे तर ठरत नाहीच पण ईथली प्रत्येक माता गंदे मातरमच ठरते आहे. 

टीप: ज्याना शंका आहे व पुरावे हवे आहेत त्यानी मनुस्मृती वाचावी. 

४ टिप्पण्या:

 1. काल नागपुर जं. रेल्वे स्थानकावर गाडी पार्क करायला गेलो होतो. बाजुला शनी मंदिरासमोरील पाटी वाचुन धक्काच बसला, आजच्या आधुनिक व स्वतंत्र भारतात सुद्धा "स्रियांना मंदीरात प्रवेश नाही." RSS, VHP, BJP किंवा स्रीयांच्या धर्मातील स्थानावरुन बोंबा मारणारे याची दखल का घेत नाही?

  उत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. कसे घेतील कारण आज ज्या महिला शिकल्या त्या सुध्या ह्या प्रथा पाळतात. आता राहिले महिलांना मंदिर प्रवेश यासाठी जर कोणी आवाज उठवलाच तर याचा पहिला विरोध महिलाच करतील(विशेषता शिकलेल्या महिला).

   हटवा
 2. पियूश,
  तुझ्या या प्रतिक्रियेवरुन ईथे विरोधकांचा पाऊस पडला. पण एकानेही आपल्या ख-या नावानी प्रतिक्रिया दिली नाही... म्हणून मी त्या प्रकाशित केल्या नाही. कित्येकानी "आमच्या प्रतिक्रिया का छापत नाही?" म्हणून सवाल केला. पण हे सवाल करतानाही आपली ओळख पलवून ठेवतात. आहे की नाही गंमत. साले भ्याड अन डरपोक कुठलेका!!!

  उत्तर द्याहटवा
 3. RAMTEKE SAHEB AAPAN AGDI BAROBAR LIHITAAHAT STRIYANA HINTECHA DARJA DENARYA HYAA MANUCHYA GULAMANNA STRYANNA AADAR SANMANANE VAGVAVE HI BHAVNA THEU NAYE KARAN SAMPURN STRI JATILA NICH MANNARI SANSKRUTI JYA SAMAJAT RUJLELI AAHE TYA SAMAJATIL LOKANNA TICHI STUTI KARNE SHOBHAT NAHI JILA PAYDALI TUDVILE TILA DOIVAR GHEUN TICHA UDO UDO KASHYA PAI TICHYA BABTIT AADAR SATKAR HA TYANNACH YOUGYA VATEL JYA SAMAJANE JYA DHARMANE TICHA SURVATE PASUN AADAR KELA ASEL MAZYA MATE TO FAKTA BAUDHHA DHARMACH ASU SAKTO JAYANE SAMAST STRIYANNA MANANE SAMMANANE VAGVILE AANI NUST VARVAR NAHI TAR PRATYEKSHA THRO MAHATHERO YA SAMAJACHYA SARVOUCHHYA THIKANI BASNYACHA MAN DILA MI TYA BUDDALA AANI TYANCHYA THOR VICHARALA TRIVAR ABHIVADAN KARTO ------JAIBHIM JAI BUDDHA JAI BHARAT

  उत्तर द्याहटवा