शनिवार, २५ मे, २०१३

कम्युनिजम एक अभिशाप: भाग-४ (लेनीन-I)२२ एप्रिल १८७० रोजी रशीयातील व्होल्गा नदीच्या किनारी असलेल्या सिंबर्स्क या गावी लेनीनचा जन्म झाला.  अनुवांशिक दृष्ट्या पाहिले तर लेनीनच्या रक्तात जर्मन, ग्रेट रशीयन व तार्तार असे तिहेरी मिश्रण वाहत होते. त्याच्या वडलाचे गाव अस्त्राखान व आईचे माहेर कझान प्रांतातील कुकुशकिनो हे गाव. लेनीनचे जन्म नाव व्लादिमीर इल्या उल्यानोव्ह. आईचे नाव मारिया अलेक्झांड्रोव्हना. सन १८६९ साली जेंव्हा व्होल्गाच्या तीरावरील सिंबर्स्क या गावी उल्यानोव्ह कुटुंब राहायला आलं तेंव्हा लेनीनचा जन्म व्हायचा होता. इल्या व मारिया या दांपत्याला अलेक्झांडर नावाचा मुलगा व ऍना नावाची मुलगी होती. ईथे आल्यानंतर वर्षभरानी त्याना लेनीन झाला. इल्याची घरची परिस्थीती बरी होती.  उल्यानोव्ह कुटूंबाची समारा शहरा लगत शेतजमीन होते. त्यामुळे लेनीनचे वडील अधून मधून शेतीचे काम पाहायला समाराला जात असत. लेनीनची आई तर श्रीमंत घराण्यातलीच होती. लेनीनचे वडील शिकलेले असल्यामूळे ते शिक्षकी पेशात उतरले होते. अशा प्रकारे उल्योनोव्ह कुटुंब व्होल्गा तिरावर सूखसमाधानानी राहात होता.
याच दरम्यान रशीयातील जनता झार राज्याच्या विरोधात हूंकारत होती. उल्यानोव्ह मात्र शिक्षणाच्या प्रसारासाठी झोकून काम करु लागला. खेडोपाडी जाऊन शिक्षणाचा प्रसार व प्रचार करताना पदरचे पैसे खर्च करुन शैक्षणीक चळवळीस हातभार लावायचा. शाळा तपासणीसची नोकरी करणारा हा उल्यानोव्ह शिक्षणाचा ईतका आग्रही व धडपड्या होता की शेवटी सरकारनी १८७४ साली याची तळमळ व निस्वार्थ शिक्षण सेवा पाहून Actual State Councilor” या किताबानी नवाजले.  पुढे लेनीन मात्र अगदी आपल्या बापाच्या विरोधी मताचा निघाला. शिका.... हे ब्रिद वाक्य उभ्या आयुष्यात त्यानी उदगारले नाही. केवळ क्रांती क्रांती नि क्रांतीची भाषा केली व रक्तपात करुन सत्ता मिळवली.
मधल्या काळात रशीयन लोकाना झारच्या विरोधात चळवळ तिव्र केली होती. त्याच दरम्यान लेनीनचा मोठा भाऊ जो महाविद्यालयीन शिक्षण घेत होता तो या चळवळीत उतरला. त्याने बॉम्ब बनविणा-या गटात क्रांतीकारी म्हणून काम करायला सुरुवात केली. एक दिवस याना रंगेहात पकडण्यात आले व अलेक्झांडरला फाशी देण्यात आली. दरम्यान वडीलही वारले होते. मारियाने सिंबर्स्क सोडण्याचा विचार केला व एक दिवस ती मुलांसकट कझानला राहायला गेली.
१८८७ मध्ये लेनीनने शालेय शिक्षण पुर्ण करुन कझान  विद्यापिठात प्रवेश घेतला. तिथेच तो क्रांतीकारी चळवळीकडे ओढला गेला. रात्र-रात्र विद्यार्थ्यांच्या सभा घेणे, पोस्टर चिकटवणे असे काम करण्यात लेनीनला मजा येऊ लागली. एकदा असचं मध्यरात्री पोस्टरबाजी करुन येताना पोलिसानी लेनीनच्या गटाला धरले. जेंव्हा पोलिसानी विचारलं की “पोरानो तुम्ही निट शिका, कशाला उगीच चळवळीच्या नावानी डोकं भिंतीवर आपटताय?” यावर लेनीन उत्तरला “तुम्ही म्हणता ती भींत आता कुजली आहे. थोडासा धक्का दिला की कोसळणार” असा तो मुळातच लढवय्या होता.
१८८९ मध्ये समारा येथे राहताना लेनीनने मार्क्सवादी गटाची स्थापना केली. घराच्या जवळच कुठेतरी एक लहानशी खोली भाड्याने घेऊन तिथे तो वर्गमित्र व ईतर तरुणांच्या मिटींग घेऊ लागला.  स्वत: प्रचंड अभ्यासू असल्यामुळे तो मार्क्सचे तत्वज्ञान व ईतर कम्युनिस्ट पुस्तकं वाचून काढी व या मित्रांना आपले मार्क्सवादी विचार पटवून देई. त्याच्या आईला सारखे वाटे की आपला मुलगा वकील व्हावा.  मारियाने लेनीनकडॆ तसे बोलून दाखविले. त्या नंतर लेनीन वकिलीच्या शिक्षणासाठी पिटर्सबर्ग येथे दाखल झाला. आता त्याचा कायद्याचा अभ्यास सुरु झाला. सन १८९१ मध्ये लेनीनने कायद्याचा अभ्यास पुर्ण करुन वकील झाला.
सन १८९१ इतिहासात अजरामर झाले:
सन १८९१ हे साल इतिहासाच्या अत्यंत महत्वाची नोंदी ठेवतो. लाल क्रांतीचा जनक लेनीन १८९१ मध्ये वकील झाला. अगदी याच वर्षी ईकडे भारतातील एक बनीया मुलगा लंडनमध्ये बॅरिस्टर झाला. नंतर तो महान नेता व भारताचा राष्ट्रपिता म्हणून नावा रुपास आला. म्हणजे गांधी व लेनीन या दोघानी एकाच वर्षी कायद्याची पदवी घेतली. पण पुढील दोघाची वाटचाल मात्र दोन टोकाची राहिली. गांधीनी देशासाठी लढा उभारला व तिकडे लेनीननेही... पण दोन लढ्याचा पायाच मुळी भिन्न तत्वावर उभा होता. एक रक्ताची होळी खेळण्याच्या तत्वावर उभा होता तर दुसरा मात्र... सत्याग्रहाच्या तत्वावर.  आज लेनीन विस्मरणात गेला व गांधीची सर्वत्र स्तूती होते ते ह्यामुळेच. कारण तात्कालीन परिस्थीती तपसल्यास आजू-बाजूच्या राष्ट्रातील लाल क्रांतीचे घोंगावणारे वारे क्षणात भारतभर उसळले असते असं वातावरण होतं. पण त्या लाल लाटाना दूर सारत गांधीनी जो पाया ईथे रुजविला तो बिनतोड होता. म्हणून गांधी ग्रेटच... बाकी काही असो पण या बाबतीत तरी गांधीची थोरवी नाकारता येणारच नाही.

या पलिकडे तिसरी एक अत्यंत महत्वाची नोंद या सालात इतिहासात कोरली गेली. ती म्हणजे हजारो वर्षापासून दारिद्र्यात खितपड पडलेल्या भारतीय दलितांचा उद्धारकर्ता महू गावी जन्मला ते वर्ष होते १८९१.  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म हा १८९१चा. हेच ते वर्ष जेंव्हाअ लेनीन व गांधी या दोन नेत्यानी नुकतच शिक्षण पुर्ण करुन व एक क्रांतिच्या वाटेवर निघून गेला तर दुसरा सत्याग्रहाच्या.  बरोबर त्याच वर्षी ईकडे बाबासाहेबांचा जन्म झाला होता. असे हे १८९१ साल इतिहासात अजरामर वर्ष म्हणून नोंदले गेलेले आहे.
सोशल डेमोक्रॅटिक पक्ष
१८९२ मध्ये समारा प्रांतात दुष्काळ पडला. लेनीन शिक्षणानी वकिल असल्यामूळे शहरातच त्याच्या करीअरला स्कोप होता. गावाकडच्या दुष्काळामुळे समारा ईथे फारशी कमाई होत नसे. शेवटी १८९३ ला लेनीननी समारा सोडले व सेंट पिटर्सबर्गला निघून गेला. तेंव्हा रशीयातील औद्योगिक क्रांतीला प्रचंड वेग आला होता. जिकडे तिकडे नवे कारखाने उभे राहू लागले होते. कामगाराना नोक-या मिळू लागल्या होत्या. खेड्या पाड्यातून कामगार वर्ग शहरात उतरु लागला होता. अन यातूनच कामगार व मालक यांच्यात खटके उडू लागले.  तिकडे झारच्या विरोधातही जनमत पेटत होते. या सगळ्या घडामोडीतून एक पक्ष भक्कम होत गेला तो म्हणजे Social Democratic Party. मालकानी जुलूम केला की लगेच कुठलीतरी संघटना उदयास येते. किंबहूना कामगारांची ती गरच बनते. अशीच ही संघटना सेंट पिटर्सबर्ग मध्ये त्या काळात काम करत असे. पण झारशाहिची करडी नजर चुकवून अगदी गुप्तपणे ही संघटना आपले कार्य करीत असे. अगदी याच काळात लेनीन पिटर्सबर्गला येऊन थडकला होता. पेशाने वकील असल्यामूळे लवकरच तो संघटनेशी जोडला गेला व मोक्याची जागाही पटकावली. या पक्षाला मुळ नावाने न ओळखता “एल्डर्स” या कोड नावाने ओळखले जात असे. आता लेनीन एल्डर्ससाठी काम करु लागला. अन ईथेच सुरु झाला “कम्युनिस्ट जाहिरनाम्याचा” अभ्यास.
लेनीन बुद्धीने तल्लख व मुळातच चळवळ्या होता. एल्डरसचे काम ज्या गतीने चालले होते ते काही त्याला पटेना. त्यानी कामाचा सपाटाच लावला. हा हा म्हणता दोन वर्षात ही संघट्ना प्रचंड रुप धारण करुन रशीयातील सर्व मुख्य शहरात व कामगारा पर्यंत पोहचली. यातूनच लेनीनच नेतृत्वगुण अधोरेखीत झाले. दोन वर्षाच्या कारकिर्दीत लेनीनने चळवळीतील ईतर सर्वाना बाजूला सारत ही सगळी चळवळ आपल्या हातात घेतली. १८९५ मध्ये तो एल्डर्सचा मुख्य नेता म्हणून उदयास आला. याच वर्षी त्याने पहिले जाहीर आवाहन लिहून काढले. अन सुरु झाला मार्क्सवादाचा प्रचार. याच काळात रशीयात “जनतेच्छा” नावाची दहशतवादी संघटना काम करीत असे. जागो जागी खून पाडणे हेच काय ते एकमेव काम ते करत असत. या संघटनेनी पोलिसांच्या नाकी नऊ आणले होते. कामगारवर्ग वेळप्रसंगी या संघटनेकडे झुकू लागला होता. अन याच दरम्यान लेनीनच्या नेतृत्वात एल्डर हातपाय पसरु लागली. पोलिसाना याचा सुगावा लागला पण त्या दहशतवाद्यांपेक्षा ही एल्डर बरी असा पोलिसानी पवित्रा घेतला. दुसरा डाव असा होता की जे कामगार दहशतवादी बनुन डोक्याचा ताप वाढवित आहेत ते जर एल्डर कडे गेले तर तेवढाच ताप कमी होईल. म्हणून एल्डरला थोडी मोकळीक देण्यात आली. पण त्याना हे माहीत नव्हते की एल्डरवाले कार्ल मार्क्सचा लाल जाहिरनामा वाचत आहेत व क्रांतीची बीज रोवली जात आहेत. अन ईथेच चूक झाली.
जर्मनीला रवाना:
सोशल डेमोक्रॅटिक पक्षाच्या कामात लेनीननी स्वत:ला झोकून दिले. दिवस रात्रीचे भान विसरुन तो पक्षवाढीच्या कामाला लागला. हा हा म्हणता लेनिनचा सर्वत्र दबदबा बसला. १८९४ मध्ये पिटर्सबर्गच्या एका उपनगरात या पक्षाची बैठक झाली तेंव्हा लेनीनने प्रसिद्ध विचारवंत प्लेखानोव्ह यांचे दोन क्रांतीकारी ग्रंथावरील निबंध वाचले. त्या दोन्ही ग्रंथांचा सार असा होता की वर्गयुद्ध अटळ असून आज ना उद्या आपल्याला क्रांती करायची आहे. लेनीनने पहिला जाहीर क्रांतीचा सिद्धांत ईथे मांडला. (पुढे जेंव्हा लेनीन परागंदा व निर्वासीत झाला तेंव्हा याच प्लेखानोव्हशी खटके उडाले व या पक्षाचे बोल्शेव्हीक व मेन्शेव्हिक असे दोन गट पडले. बोल्शेव्हिक म्हणजे बहुसंख्य व मेन्शेव्हिक म्हणजे अल्पसंख्यांक. लेनीन हा बोल्शेव्हिक गटाचा नेता बनला) मागच्या तीन वर्षाच्या अविश्रांत कष्टानी लेनीन पार थकून गेला होता. १८९५ च्या सुरुवातीला त्याला निमोनिया झाला. त्यामुळे पक्षकार्यातून थोडा उसंत मिळाला व उपचारासाठी म्हणून लेनीन जर्मनीला निघून गेला.  काही काळ उपचार घेऊन लेनीन बरा झाला. त्या काळात मार्क्सवादाचे उदगाते म्हणून जर्मनीतून चळवळ चालविणारे दोन नेते प्लेखानोव्ह व एक्सेलरॉड यांची ख्याती होती. लेनीनने जर्मनीत असताना या दोघांची भेट घेऊन आपल्या कार्याचा पाढा वाचला.  त्या नंतर लेनीन फ्रांसला जाऊन थेट कार्ल मार्क्स याचा जावई पॉल लॅफॉर्ग याची भेट घेतली. या जावईबुवानी रशीयन व लेनीनची टर उडवली. तो म्हणतो "कार्ल मार्क्स आजून आम्हालाच नीट नाही कळला. तो तुम्हा रशीयनाना काय कळेल?"
प्लेखानोव्ह कडून घेतले धडे:
त्या नंतर काही दिवस तेथे राहून लेनीन जिनिव्हाला निघून गेला. नेमकं त्यावेळी प्रसिद्ध लेखक व लाक विचारवंत प्लेखानोव्ह जिनिव्हातच होता. परत एकदा प्लेखानोव्हची भेट घेऊन लेनीनने रशीयन चळवळी बद्दल प्रदिर्घ चर्चा केली. लेनीनला रशीयात जाण्याआधी प्रचंड तय्यारी करायची होती. आता चक्क प्लेखानोव्हच धडे द्यायला तयार झाल्यामुळे लेनीन पार भारावून गेला. आल्प्समधल्या ओर्मोनी या खेडेगावात जाऊन ही जोडी काही दिवर राहिली. या वास्तव्यात प्लेखानोव्हने लेनीनला समाजवादाचे धडे दिले. त्याच बरोबर रशीयातील चळवळ व परिस्थीती समजावून घेतली. त्या नुसार पुढचे पाऊल काय असावे याचेही डावपेच आखले गेले. अशा रितीने लेनीन-प्लेखानोव्ह ही जोडी रशीयातील लाल क्रांतीच्या दिशेनी पायाभरणी करु लागली.  पण याच दरम्यान एक विसंगतिही अधोरेखीत झाली. प्लेखानोव्ह जरी समाजवादी असला तरी जुन्या परंपरेला धरुन जगणारा व त्यावर प्रेम करणारा होता. तर लेनीन मात्र अत्यंत  आक्रमक तर होताच पण जुने सर्व मिटवून टाकायचे व जे काही उभारायचे ते संपुर्णत: नवीन मुलतत्वार उभारायचे अशा मताचा होता.  म्हणजे ही गुरु शिष्याची जोडी फार काळ टिकणार नव्हती हे दोघानेही ओळखले होते. (लेनीनचा विजय होऊन लाल सत्ता आली तेंव्हा हा प्लेखानोव्ह मरणासन्नावस्थेत होता. लेनीन जिंकला होता... गुरु हारला होता. पण त्या विजयाच्या मागे रक्ताचा लाल इतिहास दडला होता)
ईथे मार्क्सवादाचे धडे गिरवून झाल्यावर लेनीन अक्सेलरॉड्ला भेटला. आपले हस्तलिखीत देऊन बाहेर पडला. काही दिवसानी जेंव्हा लेनीन परत अक्सेलरॉड्ला भेटला तेंव्हा अक्सेलरॉड्ला नावाचा विद्वान लेनीनच्या लिखानानी प्रचंड भारावून गेलेच्या दिसले. अक्सेलरॉड्ला म्हणला “तुझे सगळे लेख वाचले. पण मला एक सांग हा के. तुलीन कोण आहे?”
तेंव्हा लेनीन उत्तरला “ते माझेच टोपण नाव आहे.” हे एकल्यावर अक्सेलरॉड्ला प्रचंड खुष झाला अन गट्टी जमली.
तेंव्हाचे त्याचे वाक्य असे आहे “रशीयातल्या मार्क्सवादी आंदोलनाला आज पर्यंत योग्य नेता लाभला नव्हता. परंतु लेनीनच्या रुपात असा नेता मिळाला आहे. आता क्रांती अटळ आहे” काय वय होतं हो लेनीनचं तेंव्हा? २५ वर्ष... फक्त वय वर्ष २५ वर्ष... ही घटना आहे १८९५ ची.  
प्लेखानोव्ह व अक्सेलरॉड्ला या दोन महान(?) मार्क्सवादी विचारवंताकडून समाजवादाचे धडे घेऊन  सप्टेंबर १८९५ मध्ये लेनीन रशीयाला परतला. येताना लेनीनने प्रचंड प्रमाणात मार्क्सवादी साहित्य आणले होते. रशीयात या साहित्यावर बंदी होती. बेकायदेशीरपणे आणलेले हे साहित्य त्यानी मार्तोव्हा या आपल्या सहका-याकडे स्वाधिन केले.
जर्मनी मधून आणलेल्या मार्क्सवादी साहित्याचे वाचन, चिंतन व मनन सुरु झाले. त्यातून नवे विचार जन्मास आले. आता मात्र या विचाराचा प्रचार करायचे होते. त्यासाठी थेट वृत्तपत्र काढण्याचा निर्णय झाला. पक्षाकडे पैसा होताच. काम सुरु झाले. आपल्या संकल्पित वृत्तपत्राच्या पहिल्या अंकाचे मुद्रिते वाचत असताना पोलिसाना धाड घालून लेनीन व मातोव्हा याना रंगेहात पकडले. २० डिसेंबर १८९५ रोजी या दोघांची पिटर्सबर्गच्या तुरुंगात रवानगी झाली. या तुरुंगात असताना लेनीनने “दि डेव्हलपमेंट ऑफ कॅपिटलिजम इन रशीया” हा ग्रंथ लिहून काढला.  १४ महिने तुरुंगवास भोगल्यावर त्याना सोडण्यात आले खरे पण तीन वर्षाचा हद्दपारीचा हुकूम काढण्यात आला. मे १८९७ ला लेनीनला रशीयन पोलिसानी सैबेरीयात नेऊन सोडले. पुढील तीन वर्ष या विरान प्रदेशातील शुशेनस्कोए नावाच्या खेड्यात राहावे लागणार होते.

अन सुरु होणार होती.. रशीयातील लाल क्रांती. 
लेनीनचा लाडका सिद्धांत "व्यावसायिक क्रांतिकारी" ईथेच जन्मास आला.

1 टिप्पणी: