सोमवार, १७ जून, २०१३

राष्ट्रमाता जिजाऊस विनम्र अभिवादन!

आज दि. १७ जून २०१३. अगदी आजच्या दिवशी म्हणजे १७ जून १६७४ रोजी जिजाऊ शहाजिराजे भोसले या वीर मातेचे निधन झाले. आज त्या घटनेला बरोबर ३३८ वर्षे झालित. मला जिजाऊ बद्दल अत्यंत आदर असून भारतीय इतिहासात एक सोनेरी पान कोरणारी ही वीर माता मला सदैव पुज्य नि वंदनीय राहिली आहे. आज त्यांचा स्मृतीदिन, त्या निमित्ताने मी या वीर मातेला विनम्र अभिवादन करतो. 
----------------
आता वरील आदरांजली वाचून काही लोकांच्या भुवया लगेच उंचावल्या असतील “हे क्वाय बुवा आता नवीनच. रामटेके अन जिजाऊ बद्दल आदर... कंपू बदलला क्की क्वाय ह्यानी...” अशा प्रकारचे अनेक प्रश्न उसळले असतील. 

...म्हणून जिजाऊ माझ्यानजरेतुन.

... या देशातील इतिहासात(इतिहास म्हटलं, पुराणं व भाकडकथात नाही) अजरामर झालेल्या काही मोजक्या स्त्रीया म्हणजे महामाया, गौतमी, खेमा, जिजाऊ, अहिल्यादेवी, सावित्रीमाई आणि रमाई. या सगळया अस्सल ऐतिहासिक स्त्रीया असून हे जग अस्तित्वात आहे तोवर या महान स्त्रीयांचा इतिहासही असेल. वरील सर्व स्त्रीयांबद्दल मला अत्यंत आदर असून  त्या सर्व माझ्यासाठी वंदनीय आहेत. पण जिजाऊ मात्र अगदी स्पेशल आहेत.

जिजाऊंचा वाडा महारवाड्यालगत आहे:
जिजाऊ बद्दल बोलायचं म्हटल्यास त्या मला अगदी माझ्या रक्ताच्या व नात्याच्या वाटतात. एवढच नाही तर मला त्या माझ्या पुर्वज वाटतात. त्यांच्यी नीती, धोरण, बाणेदारपणा नि चिकाटी पाहता तर त्या माझ्याच घरातल्या माता-बहिणीशी सुसंगत अशा पुर्वज आहेत असं वाटतं. अशा कित्येक घटना आहेत ज्यामुळे जिजाऊचं व माझं काहितरी रक्ताचं नातं आहे असं मला सारखं वाटायचं. अन जेंव्हा मी पहिल्यांदा सिंदखेडराजाला जिजाऊ जन्मोत्सवास गेलो तेंव्हा मात्र अवाक झालो. कारण जिजाऊंचा म्हणजेच जाधवांचा वाडा हा महारवाड्या जवळ आहे. महारवाडा हा गावाबाहेर असायचा व आजही असतो. मग मला पहिला प्रश्न पडला की जिजाऊंचा वाडा महारवाड्यालगत कसं काय असू शकतं? म्हणजेच जिजाऊंचा व महारांचं काहितरी नक्कीचं जवळचं नातं असावं. मधे तीन-साडॆतीनशे वर्षाचा काळ भुर्रकन उडून गेला. मधल्या काळात संशोधकानी व इतिहासकारानी अत्यंत संशयास्पद लिखान करुन त्याना हवा तसा इतिहास निर्माण करुन ठेवला आहे. त्यामुळे जिजाऊच्या वाड्याचे हे रहस्य कधी उलगड्णार की नाही माहित नाही. पण उभा असलेला वाडा मात्र एक मूक संदेश देतो आहे तो म्हणजे जिजाऊ ह्या बौधांच्या अत्यंत जवळच्या होत्या. ते नातं नेमकं कसं होतं हे मात्र उलगडत नाही. पण जवळचं होतं हे मात्र निर्विवाद सत्य आहे. 

सगळे जाधव बौद्ध आहेत:
या सिंदखेडराजाची आजून एक अत्यंत महत्वाची गोष्ट जी जिजाऊचा संबंध थेट माझ्याशी जोडून जाते, ती म्हणजे जिजाऊंचे माहेरचे आडनाव जाधव.  या गावात जाधवांचा प्रचंड भरणा आहे. ते कित्येक शतकांपासून या गावचे मूळ रहवासी आहेत. जिकडॆ तिकडे जाधवच जाधव. तुम्ही म्हणाला यात काय नवल. जिजाऊंच आडनाव जाधव होतं. लखुजी जाधवांचं हे गाव. मग ईथे जाधव नसणार तर काय पठाण असणार व्हय? अगदी, तुमचं मत पटलं. पण खरी गंमत पुढे आहे. सिंदखेडराजाचे जाधव हे मराठा नसून सगळेच्या सगळे जाधव बौद्ध (महार) आहेत, एक दोन अपवाद असतीलही.  म्हणजे कुठेतरी काहितरी मुरतय? ते नेमकं काय मुरतय हे मात्र सिद्ध करता येणे जरा अवघडच. बरच काही इतिहासाच्या पानांत गुदमरुन गेलं पण तरी हे दोन पुरावे उपलब्ध इतिहासाच्या विरुद्ध जाणारे आहेत. दडलेल्या इतिहासाला खोदण्यासाठी खुणावत आहेत.
जिजाऊंचा वाडा महारवाड्या लगत असणे हा निव्वड योगायोग असूच शकत नाही. अन शिंदखेडचे सगळेच्या सगळे जाधव बौद्ध असणे हा सुद्धा योगायोग नाही. उपलब्ध इतिहास काहिही सांगू द्या, माझा त्यावर विश्वास नाही. वरील दोन जिवंत पुरावे पाहता जिजाऊ माझ्या आहेत असे आतून वाटते. कोणी स्विकारो वा नास्विकारो... जिजाऊ ह्या माझ्या पुर्वज आहेत व त्यांच्या बद्दल मला नितांत आदर आहे.  या माझ्या मायेने शिवराय घडवला. भारतीयाना ताठ मानेने जगणे शिकविले. प्रत्येक माणसात स्वाभिमान जागविला. संशोधन होऊन आज ना उद्या दोन्ही गोष्टींचा उलगडा होईल तेंव्हा होईल. पण आजच्या घटकेला वरील दोन्ही गोष्टी मझी नाड जिजाऊशी जोडून जातात. 

शंका अशी आहे की एकतर हे दोन्ही समाज समान दर्जाचे असावेत किंवा एकच असावेत किंवा अस्पृश्यता आजून उग्ररूप धारण करायची होती. काय असेल ते असेल.

म्हणून मी माझ्या जिजाऊस आज विनम्र अभिवादन करतो.


जय जिजाऊ.

२ टिप्पण्या:

  1. Kay ho ramteke... Kadhi aala hotat amchya sindkhedat.. Amhi sindkhedche raje-Jadhao shuddh 96 kuli maratha aahot... Ugach sambhram pasaravu nakaa.. Amhala bauddha samajabaddal faar aapulaki aahe, Dr. Babasaheb Ambbedkaranna tar mi devach maanto.. Pan plz he likhaan agdi chukicha aani dishabhul karnaara aahe..,
    jay Bharat,,

    प्रत्युत्तर द्याहटवा