सोमवार, २४ जून, २०१३

उत्तराखंडच्या मृत्यूतांडवातूनतरी हिंदू धडा घेतील का?आठवडा झाला... कुठलेही वृत्तपत्र घ्या पहिल्या पानवर उत्तराखंडाच्याच बातम्या. लोकं कुत्र्या मांजरासारखी मेलीत, आजुनही मरत आहेत. देशाचं सैन्य अहोरात्र झटून याना वाचवत आहे. अशातच काही दीड शहाण्या वृत्तपत्रातून “बघा मंदीर कसं आजून शाबूत आहे” वगैरे बातम्या झडकल्या. काहिनीतर देवाचाच कोप, शंकराचा तिसरा डोळा वगैरे हाणून दिलं. काही विचारवंतानी नेहमी प्रमाणे सरकारवर ताशेरे ओढत “हा कसा मानवनिर्मीत प्रकोप होता” हे सिद्ध करण्यासाठी नाना प्राणायम करुन दाखविले. अन आज बातमी झडकली...
“अंत्यसंस्कारासाठी उत्तराखंड सरकार लाकूड व तूप गोळा करत आहे...” म्हणजे आजून एक मुर्खपणा. विद्यूतदाहिनीचा पर्याय असताना हा मुर्खपणा का?
खरं सांगायचं तर उत्तराखंड प्रकरणात मेलेल्या माणसांबद्दल मला अजिबात सहानुभूती वाटली नाही. कारण हे दर वर्षीचच नाटक झालं आहे. फक्त या वर्षी मृतांचा आकडा जरा वर गेला, एवढाच काय तो फरक. पण तो आकडा तेवढा सोडला तर देवदर्शनाला जाऊन मरण्याच्या घटना तशा  या देशात नवीन नाहीच. कुंभ मेळ्यातील चेंगराचेंगरी, काळूबाईच्या दर्शनातली चेंगराचेंगरी किंवा पंढरीची परतीवरची  दिंडी असो... हिंदूचे देवदर्शन म्हटले की रक्ताचे पाट वाहल्या शिवाय राहात नाही. अगदी मागच्या दहा वर्षातल्या घटना बघितल्या तरी दर वर्षी हजारोचा आकडा आहेच. का बरं एवढ्या मोठ्या प्रमाणात देवबाज हिंदू मरतात असा कुणालाच प्रश्न पडत नाही. हा प्रश्न पडत नाही म्हणून तो प्रश्न निकालिही निघत नाही.
या देशात हिंदू व्यतिरिक्त ईतर धर्मियही राहतात. मुस्लिम, शीख, बौद्ध व ख्रिश्चन समाजही काही थोडा थोडका नाही. बौद्धांचं तेवढं सोडलं तर मुस्लिम, शीख व ख्रीश्चनही दैववादीच आहेत. पण ते हिंदू सारखा मुर्खपण करताना दिसत नाही. यात्रेच्या नावाने जिव गेल्याची बातमी कधी या समाजातून आलेली दिसत नाही. देवाच्या भेटीला जाऊन कायमचं देवाला कवटाळण्याचा आजार हा फक्त हिंदूनाच आहे.
ईथून हजारो मुस्लिम दर वर्षी मक्केला व मदिनेला जातात. सगळा प्रवास व देवदर्शन करुन अगदी सुखात परत येतात. एकुणच त्यांच्या कार्यक्रमाला एक शिस्त असते.  तसच शिखांच व इसाईंचही आहे. त्यांच्या सगळ्या कार्यक्रमाना व उत्सवाना एक शिस्त असते. देव धर्म नसला तरी सगळा समाज एका ठिकाणी एकवटण्याची प्रथा बौद्ध बांधवांतही आहे. १४ एप्रिल व ६ दिसेंबरला लोकांचा महापूर असतो. पण त्या पुरालाही शिस्त असते.  थोडक्यात ईतर धर्मातील लोकांच्या वागणूकीला शिस्त असते. हिंदूना मात्र आजून शिस्त कशाशी खातात हेच कळायचे आहे.
आता कोणी उठून म्हणेल त्या उत्तराखंडच्या ढगफूटीवर कसली आली शिस्त? पण मी फक्त उत्तरांखंड पुरतच बोलत नाहीये. मी समस्त हिंदूच्या वेशिस्तीबद्दल बोलतोय. दर वर्षी देवदर्शनात मरणा-या हिंदूच्या घटानांवर बोलतोय. हाच समाज का बरं मरतो? हा विचार झाला पाहिजे. विचार झाला की हिंदूच्या या मृत्यूचे गुपितही कळेल. गेला देवाला भेटायला की झाला तिकडचाच. अरे किती दिवस हे चालायचं. परत नाही का यायचं? असे कसे हे हिंदूचे देव. भक्ताना पार मारून खातात. खरच हे देव मारतात का? सगळ्य़ाना माहित आहे देवबीव काही मारत नाही. हे भक्तजन आपल्याच चुकांमुळे मरत असतात. पराकोटिची अंधश्रद्धा, बेशिस्तपणा व बेफिकीरी यातून होत असते भक्तांची जिवीतहानी. जराशी शिस्त, निसर्गाचं भान व थोडसं तर्कसुसंगत वागलं की यातलं काहीच घडायचं नाही. पण सनातन्याना कोण सांगणार. उठले की चल्ले हिमालयात. म्हणे कशाला? तर देव तिकडे उत्तरेत राहतो. आहे की नाही मुर्खपणा. आता जिवावर आली तर धावपळ कोणाची? शासनाची व सैन्याची. या देशानी सैन्य काय याच कामासाठी पोसले का? काही मुर्ख उठून जाणार हिमालयात... अन ते तिकडे अडकले की... लावा सैन्याला कामाला.
खरं तर या घटनेकडे (उत्तराखंडची ढगफूटी)संपूर्ण हिदू समाजानी  चिक्तीत्सकपणे पहावे. देवाच्या दर्शनाला जाणा-या भक्तानी तर नक्कीच चिकित्सकपणे पहावे. ज्या ज्या हिंदूना वाटते की देवाच्या दर्शनाने पुण्य मिळते वगैरे... त्यानी या घटनेतून बोध घेत देव, पाप व पुण्य ही सगळी बनवेगीरी असून देवदर्शन हे शुद्ध थोतांड आहे हे आतातरी मान्य करावे. कारण खुद्द देवाच्या दारात निसर्गाने यांच्यावर झडप घातली तेंव्हा देव मदतीला धावला नव्हता. हजारोंच्या संखेनी भक्तांच्या मुडद्यांचा खच पडत गेला तेंव्हा देव नावाचा कोणी तिकडे फिरकलाही नाही. ज्या कोणा लोकांचे जिव वाचले ते देवामूळे नसून भारतीय सैन्य व मदतीला धावलेल्या स्वयंसेवकांमुळे वाचले ही गोष्ट या भक्त लोकानी मनावर कोरून घ्यावी. यापुढे देवाच्या नादी न लागता एखाद्या स्वयंसेवी संस्थेचे सदस्य बनून जमेल तशी मानव सेवा करुन या उपकाराची परतफेड करावी.
माझंतर स्पष्ट मत आहे. शासनानी ताबडतोब मदत थांबवावी. भक्तानी त्यांची काय ती सोय करुन घ्यावी. ज्या मंदिरात हे भक्तलोकं दान रुपात टॅक्स भरतात त्या मंदिराना मदतीसाठी बोलवावं. कोणी सांगितलं होतं या भक्ताना मुर्खपणा करायला. शासनाचा जो खर्च या भक्तांसाठी होत आहे तो खर्च विद्यार्थ्यांवर व ईतर समाजीक कार्यावर करावा. या देशाला अशा भक्तांची अजिबात गरज नाही. ईथल्या तरुणाना शिक्षणाची व रोजगाराची गरज आहे. म्हणून त्या भक्ताना तिथेच सोडून द्यावे नि त्याच पैशातून तळागळातल्यांसाठी वाढीव मदत उभारावी. त्यातून निर्माण होणारा समाज देशाचा विकास घडवेल.  पण अगदी या उलट तुम्ही ज्या भक्ताना वाचवत आहात ते परत आल्यावर पुन्हा देवाचा प्रचार सुरु करतील. देव व अंधश्रद्धा सर्वदूर रुजविण्यासाठी जिव तोडून झटतील. यातून निर्माण होणारा समाज म्हणजे आधुनिक आंधेळे. हे आंधळे पुन्हा कधीतरी उत्तराखंडला जाणार. पुन्हा पाऊस येणार. पुन्हा हे आंधळे भक्त मरणार. पुन्हा सरकार मदतीला धावणार. पुन्हा पैसे उधळणार. म्हणजे परत घोळच घोळ.  अरे सारखं सारखं काय हेच करत बसायचं का? सोडून द्या त्या भक्ताना तिथेच अन सगळा पैसा वळवा समाजातील तळागळातल्या लोकांच्या उत्कर्षाच्या कार्यक्रमांकडे...
सरकारचं सारखं रडगाणं सुरु असतं कै पैसे नाहीत. अमक्या तमक्या कार्यक्रमासाठी निधी नाही. मग अचानक या आंधळ्या भक्तांसाठी कुठून येतो निधी. सगळी लबाडी आहे. शासनानी लबाडी थांबवावी. सरकारनी पैसा का म्हणून उधळावा? हे जे भक्त तिथे अडकले आहेत त्या सगळ्य़ांचा डेटा सरकारजवळ आहेच. त्यातले कितीजण Income Tax भरतात याचा रिपोर्ट तयार करुन सरकारनी जाहीर करावे. नसतील भरत तर मग देवाच्या दारात ओतायला पैसा येतो कुठून त्याचाही जाब या भक्ताना विचारावा. करचुकवेगिरी करुन मंदिरात पैसा ओतणारे सरकारी मदतीस कसे काय पात्र याचाही विचार व्हावा. जे कर भरतात त्यांच्या उत्पन्नाची फेरतपासणी व्हावी.  
अन भक्तांसाठी जर कुणी खर्च करायचच असेल तर देशातील सगळ्या मंदिरानी करायला हवी. एकसे बढकर एक असे अरबोपती/खरबोपती देवस्थान ट्रस्ट ईथे आहेत. या सगळ्या गब्बरानी आपली तिजोरी खाली करावी नि भक्ताना वाचवावं. शिर्डी, बालाजी ते पुरी या सगळ्या दिग्गज संस्थांनांचे फायनान्सर म्हणजे हे अडकलेले भक्त. आपली नैतिक जबाबदारी म्हणून या सगळ्या मंदिरानी व ट्रस्टनी पुढाकारा घेऊन सगळा खर्च स्वत: उचलावा. कारण त्यांच्या उप्तन्नाचे स्रोत हे असे भक्त आहेत. या भक्तांच्या माध्यमातुनच हे सगळे देवस्थान/ट्रस्ट प्रचंड माया गोळा करुन बसले आहेत. आता देशातील सर्व देवस्थान व ट्रस्टनी पुढाकार घ्यावा. सरकारनी नाही. 

अन आतातरी हिंदूनी धडा घेऊन देवाचा नाद सोडावा. सोडतील का? 

३ टिप्पण्या:

  1. बुद्धाने प्राणीमात्रांवर करुणा करायला शिकविले होते म्हणतात. जे बुद्ध धर्माचे आहेत त्यांनी आपण हिंदूंपेक्षा कसे शिस्तप्रिय आहोत, ह्याचा जरूर अभिमान बाळगावा पण प्रसंग पाहिल्यावर थोडी करुणा यायला काय हरकत आहे ? जे मुसलमान झाले ते इथल्याच हिंदूतून, जे बौद्ध झाले तेही इथल्याच हिंदूतून तेव्हा जरी असले हिंदू लोक बेशिस्त तरी त्यांच्यावरही दया करण्याने बौद्ध धर्म बुडेल की काय ?

    उत्तर द्याहटवा
  2. तुम्हाला वाईट वाटण शक्यच नाही मारणारे बौद्ध क्रिस्ती अथवा मुस्लीम न्हवते ना तुम्हीच तुमच्या तीसाठी तिथे गाव पण आहेतव त्या लोकांवर पण हीच परिस्थिती आहे बाकी आमच्या देवताचे अस्तित्त्व तुमच्या मानण्यावर नाहीये साहेब व आम्हाला तुमच्या सहन्भूतीची गरज हि नाही

    उत्तर द्याहटवा