मंगळवार, २५ जून, २०१३

आय हेट गांधी, तरी सुद्धा...तो ग्रेटच!गांधी हा माणूस मला अजिबात आवडत नाही अन भविष्यातही आवडणे अशक्य आहे. त्याचे अनेक कारणं आहेत. गांधी बद्दल जेवढं वाचायला हवं तेवढं  माझ्यामते मी नक्कीच वाचलं आहे. त्यामुळे आजून असं काही असेल जे वाचल्यावर मला गांधीचा पुडका येईल वगैरे शक्यता अजिबात नाही. आज पर्यंतच्या वाचनातून मला कळलेला गांधी म्हणजे... गांधी हा माणूस जातियवादाचा पुरस्कर्ता होता अन त्याच बरोबर हिंदूत्ववादिही होता. मग कितीही मुस्लिम प्रेमाचा आव आणला तरी गांधीतला हिंदू काही लपला नाही व इतिहासाची पानं चाळताना आजही लपत नाही. रोज रात्री "वैष्णवजन ते...." म्हणणारा गांधी म्हणजे समतेचा बुरखा पांघरलेला लबाड हिंदू तर होताच पण त्याच बरोबर आंधळा धर्मनिष्ठ होता. कारण विष्णूनी व वैष्णवानी काय काय नाटकं केलीत हे माहित असूनही वैष्णवांचं व विष्णूचं गुणगाण गाणारा गांधी कुठल्याही परिस्थीतीत समतेचा पुरस्कर्ता ठरणे तर दूर पण साध्या नैतिकतेच्या कसोट्या लावल्या तरी गांधीचा टिकाव लागत नाही, म्हणुन गांधी मला वर्ज्यच. बायकांचं सोंग नेसून समुद्रमंथनातील अमृत पळविणार लबाड विष्णू असो की मग रामाच्या रुपात शंबुकाचं डोकं उडविणारा असो. सगळे विष्णू व त्याची रुपं हे लबाड व बहुजनद्वेषीच. अन त्या मोमपट्टीने मोजल्यास अशा विष्णूचं गुणगाण गाणारा गांधीही लबाडच...हे झाले गांधीचे दोष. पण या व्यतिरिक्त गांधीतील अशा काही गोष्टी आहेत ज्या निर्विवादपणे गांधीचं महत्व पटवून देताना तो जगातील एकमेवाद्वितीय असा युगपुरुष होता हे सिद्ध करतात. त्यातून गांधी आवडू लागतो. गांधीला वाईट म्हणताना जसा त्यातला हिंदू दिसतो तसच त्याच्यातला सत्यप्रिय माणूस व तत्वज्ञही डोळे झाकले तरी लख्ख प्रकाशाप्रमाणे उभा राहतो. गांधीतला हिंदू जेवढा वाईट त्याचा दहापट हा सत्यवादी गांधी बलाढ्य. गांधीतल्या हिंदूला तुम्ही दूर सारू शकालही पण त्यातला सत्यवादी माणूस नकळत तुमचा ताबा घेतो. कितीही नाकारलात तरी सत्याचा असा अद्वैतीय पुतळा जगाच्या पाठीवर आजुन कुठेच जन्मास आला न येणार.  सत्याच्या जोडीला असलेलं प्रामाणीकपणा व संयम यातून सापडाणारं गांधी नावाचं मिश्रण तर भुतलावर सापडणारा अजोड नमूना असून या नंतर आजुन गांधी होणे नाही हे नाकारणे अशक्यप्राय आहे. एवढं कमी की काय कोण जाणे म्हणून गांधीला आजुन एक वरदान लाभला होता तो म्हणजे तत्वज्ञानाचा. माझ्या मते गांधी हा जगातील नंबर एकचा तत्वज्ञानी होता. मग पहिला(हिंदू गांधी) नाही आवडत या कारणासाठी आवडणारे ईतर दोन गांधीही फाट्यावर मारणे गांधीवरील अन्याय ठरेल. जे नाही आवडत ते नाही...पण जे आवडते ते आवडते म्हणून सांगायलाच पाहिजे. मला वैष्णवजन ते... म्हणणारा हिंदू गांधी नाही आवडत पण उरलेले दोन गांधी आवडतात. आवडणा-या गांधीतली पहिली गोष्ट म्हणजे त्यांच आत्मचरित्र.  काय ते आत्मचरीत्र आहे. व्वा..व्वा. दंडवत त्या गांधीला. मी जर आंबेडकरी समाजातला नसतो तर त्याच्या आत्मचरित्राच्या वाचना नंतर चक्क गांधीवादी बनलो असतो... एवढं ते सच्चं आत्मचरित्र आहे. आज पर्यंत वाचलेल्या अनेक आत्मचरित्रापैकी हे नंबर एकचं आत्मचरित्र आहे. जिवनातील प्रत्येक घटना अगदी जसच्या तसं खरं खरं लिहण्याची हिंमत फक्त गांधीमध्येच! जगात आत्मचरित्रांच्या पुस्तकाचा हिमालय बनेल पण एकाही पुस्तकात इतका सच्चेपणा सापडणार नाही. इतर कुणातही असली हिंमत दिसत नाही. सत्य कथनात कसलाच आडपडदा न ठेवता लिहण्याच्या त्या हिंमतीला मी सलाम करतो. आत्मचरित्र लिहणं केवढं अवघड काम. कोण काय म्हणेल, मग विरोधक चिखलफेक करतील की काय? नातातले लोकं नाराज होतील वगैरे अनेक प्रश्न असतात. पण गांधीना यातल्या कशाचीच पर्व नाही. आत्मचरित्र म्हणजे शुद्ध आत्मचरित्र... जसं घडलं अगदी तसं लिहलय. ज्यानी वाचलं नसेल त्यानी सत्याचे प्रयोग नक्की वाचा.
अन तत्वज्ञ गांधी तर अप्रतीम आहे. कठीणात कठीण तत्वज्ञान सोप्यात सोप्या भाषेत सांगण्याची त्यांच्या हातोटीला तोड नाही. खरंतर सोप्पं करुन सांगणे अत्यंत अवघड काम... पण गांधीना मात्र यात महारथ हासील आहे. त्यासाठी तुम्हाला खुप खोलात जाउण गांधी वाचायची अजिबात गरज नाही. नुसतं त्यांच्या कोट्स वरुन नजर फिरविली तरी तुम्हाला त्याचा अंदाज येईल. ते पाहायचय... चला गांधीचे काही कोट्स पाहू या.... तुम्हीहि म्हणाल... क्या बात है!

In gentle way, you can shake the world!

Poverty is the worst form of violence!

Nobody can hurt me, without my permission!किती मोठ्ठाले विचार आहेत ते. गांधिनी अगदी एका लाईनत सांगून टाकले.  तुम्हाला आजून वाचायचे आहेत? मग खालील  धाग्यावर जा...!


म्हणून म्हणतो, आय हेट गांधी, तरी सुद्धा तो ग्रेटच! 
***
***

३ टिप्पण्या:

  1. konihi ithe comment dili nahi tumhala but you received many comments on RSS articles that too mostly by rss supporters . think why is so? try to be part of homogeneous society

    उत्तर द्याहटवा
  2. Jai bhim Sir I have same thoughts on Mohandas karam chand gandhi    Abhijeet Rajapure
    9822132539

    उत्तर द्याहटवा