बुधवार, २६ जून, २०१३

वोह ईक भोलिसी लडकी है... -जानी बाबूले गई दिल मेरा मंचली... खलिबलि खलिबलि खलिबली....

या कव्वालिनी मागच्या दशकात धुमाकूळ घातला होता. प्रत्येक कार्यक्रमात, लग्नात, गणपतीत किंवा आजून कुठे असो. ही कव्वाली वाजली नाही असं झालचं नाही. तरुणाना भुरळ घालणारी ही कव्वाली होती जानी बाबू यांची. पण या कव्वालीच्या फार आधी याच गायकाची आजून एक कव्वाली प्रचंड गाजली होती. ती म्हणजे “वो ईक भोलिसी लडकी है जिसे मै प्यार करता हूं” मुळातच जानी बाबूचा आवाज म्हणजे प्रचंड गोड, पहाडी, दर्दी सोबतच टिपीकल कव्वाल वाला तर आहेच पण त्या आवाजाला आजून बरेच पैलू आहेत. हे सगळे पैलू जानी बाबूची कव्वाली ऐकताना त्या त्या प्रसंगातून जाणवत असतात. जानी बाबूच्या गाण्याची ओळखही पांडेनीच करुन दिली. त्याच्याकडे जानीबाबूचे कित्येक कॅसेट्स होते. सगळयाच कव्वाल्या आवडायच्या पण वो एक भोलिसी लडकी... मात्र अजोड कलाकृती होती. सुरुवातच प्रचंड भारी. आता काल पांडेची आठवण निघाली म्हणून हा जुना आठवणींचा साठाही निघत आहे.
ना हुरों की तमन्ना है, ना मै परीयोंपे मरता हूं!
वो ईक भोलिसी लडकी है, जिसे मै प्यार करत हू!
कव्वालिची सुरुवात अशी होते. जानी बाबूच्या आवाजात ही सरुवातच ईतकी भाव खाऊन जाते की माणूस झक मारत पुढच्या ओळी ऐकत बसतो. येणारी प्रत्येक पुढची ओळ जाणा-या ओळीपेक्षा प्रचंड आवडत जाते. आपल्याला कळायच्या आतच आपण जानी बाबूचे फॅन बनून जातो. जानी बाबूच्या ईतर कव्वाल्या ऐकायची गरजच उरत नाही. फॅन बनवून टाकण्यासाठी ही एक कव्वालीच पुरे आहे. पुढच्या ओळी आहेत.

कहूं क्यूं चांद उसको,चांद मुझसे दूर रहता है.
कहूं क्यू फूल मुरझानेपे जो मजबूर रहता है.
कहूं क्यू हूर जिसका, दूसरी दूनिया मे डेरा है.
परी मै क्यूं कहूं जिसका, परस्तां मे बसेरा है.
शराब क्यूं कहूं, क्यूं होश जो सबके ऊडाती है.
बहार क्यूं कहूं, क्यूं जो खिजा भी साथ लाती है.
....
आशी ही धमाकेदार पकड आहे. आता कव्वाली म्हटल्यावर कोरस आलाच. कव्वालीतल्या कोरसनी “वो लडकी कौन है, वो लडकी कोन है” हे ईतकं सुंदर गायलं आहे की पहिला कडवा संपेपर्यंत प्रचंड कुतूहल निर्माण होतं. कशाचं? ती कव्वालितली वो लडकी जाणून घेण्याचं. जानी बाबू तर भारी आहेच पण कोरसनी त्यात भर घालून वो लडकीचं संस्पेन्स तयार केलं. म्हणजे... पहिलं कडवं संपेपर्यंत ही कव्वाली प्रेमगीत ते सस्पेन्सगीत असा प्रवास करते. मग तर काय सांगायची सोय नाही. उरलेले सगळे कळवे प्रचंड सस्पेन्स तयार करत ती लडकी सांगाच आता कोण आहे ते. अशा स्थीतीत ऐकणा-याला नेऊन ठेवतात. अन खरच या कव्वालित सस्पेन्स आहे सुद्धा. कव्वाली संपताना सगळ्यात शेवटी मोठ्य़ा खूबीने जानी बाबू तो सस्पेन्स तोडतात अन उठून जानी बाबूला सलाम करावसं वाटतं. थोडक्यात ही कव्वाली एक दर्जेदार काव्य तर आहेच पण गायकाला सलाम करायला लावणारं सस्पेन्सही आहे.
सस्पेन्स जाणून घ्यायचय? खालील धाग्यावर क्लिक करा.


***

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा