गुरुवार, २७ जून, २०१३

आर. एस. एस. देते १०५ % मदत.


मी आर. एस. एस. चा कट्टर विरोधक. किती कट्टर? तर आजवर मी त्या खाकी पॅंटला कधीच पॅंट म्हटलं नाही तर चड्डीच म्हणतो. इतका...
$img_titleउत्तराखंडला दुर्घटना घडली आणि काही तासांच्या आत खाकी चड्डी सेवेसाठी हजर. या आर.एस.एस. चं बाकी काही असो पण यांची सेवा आघाडी व त्यांचं मॅनेजमेंट मात्र अजोड आहे. कुठेही दुर्घटना घडली की खाकी चड्डी सगळ्यात आधी मदतीला धावते. अगदी लातूरचा भूकंप असो, गुजरातचा भूकंप असो वा त्सुनामीचा तडाखा असो. प्रत्येक ठिकाणी खाकी चड्डी प्रचंड वेगाने मदत कार्य घेऊन पोहचली. अगदी भारतीय सैन्याच्या खांद्याला खांदा लावून मदत करताना वरील सगळ्याच घटनांत ती दिसली.  हे सगळं कसं जमतं यांना? उत्तर सोपं आहे. संघाचे जाळे देशभर पसरले आहे. असा तालुका नसेल जिथे संघाचं कार्यालय नाही. पण त्याही पेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे हे संघवाले मदतीला धावण्यासाठी मनातून तयार असतात. घटना घडली की जमेल तेवढ्या लवकर संघाची टीम घटनास्थळी उतरते. यांच्यातील हिंदुत्ववादाबद्दल कितीही राग असला तरी या निस्वार्थ सेवा गुणाचं मात्र कौतूकच आहे.  
आता उत्तराखंडच्याच घटनेचं पहा. भारतातील अत्यंत दुर्गम अशा या पहाडी भागात सैन्याच्या जोडीने काम करणारे स्वयंसेवक दिसतात. खरं तर देशातील इतरही अनेक संघटनांचे स्वयंसेवक तिथे मदत कार्यासाठी पोहचले. पण संघ मात्र सगळ्यात आधी हजर झाला असे एकंदरीत वृत्तपत्रांतील बातम्या चाळल्यास कळते. कारण संघाच्या स्थानिक स्वयंसेवकांनी लगेच आघाडी उघडून मदतकार्य सुरु केले. बाहेरुन येणारे स्वयंसेवक मागून पोहचले पण तोवर ते थांबले नाहीत. स्थानिक कार्यकत्यांद्वारे मदतकार्य त्वरित सुरु झाले. संघ व इतर संघटनांच्या बाबतीत हा मुख्य फरक असतो. इतरांची सेवा पोहचे पर्यंत बराच वेळ निघून गेलेला असतो. तौलनिक दृष्ट्या संघाची सेवा लवकर उपलब्ध होते हे सत्य नाकारता येत नाही. त्यासाठी संघाचं कौतूकच. 
आर्थिक मदत १००% पेक्षा जास्त केली जाते:
साधारणपणे कुठेही एखादी मोठी दुर्घटना घडली की समाजातील दानशूर लोकं सरकारला, स्वयंसेवी संस्थाना पैशाची मदत करत असतात. पण मदत म्हणून दिलेल्या पैशातील किती टक्के पैसा पिडीतांपर्यंत पोहचला या बद्दल नेहमीच दान करणारे साशंक असतात. सरकारी अनुभव असा आहे की त्यातले निम्मे पैसे हे राजकारणीच हडप करतात. तसेच इतर स्वयंसेवी संस्थाही मदत म्हणून मिळालेल्या पैशावर डल्ला मारतात. पण आर. एस. एस. या संघटनेत मात्र चित्र अगदी उलटं आहे. जर तुम्ही १०० रुपयाची मदत केलीत तर त्या पैशातून १००+ ५ अशी १०५ रुपये किंवा त्यापेक्षा जास्त किंमतीची मदत गरजू पर्यंत पोहोचते. हा अनुभव मी स्वत: घेतला आहे.
१९८८ किंवा ८९ ची घटना आहे. मी समूहनिवासी वसतीगृह, एटापल्ली येथे शिकत होतो. हे वसतीगृह फक्त ७ वी पर्यंतच होते. मग पुढचं शिक्षण घ्यायचं म्हणजे जायचं कुठे? हा प्रश्न होताच. अगदी याच वेळी एटापल्लीत (माझ्या मते १९८८ साली) आर. एस. एस. चे वनवासी आश्रम सुरु झाले. या आश्रमात अशी ७ वगैरे अट नव्हती. तुम्हाला जेवढं शिकायचं आहे तेवढं शिका असं त्यांच म्हणणं होतं. मग काय. समुहनिवासीची माझ्या बरोबरची कित्येक मुलं तिकडे पळाली. मग मी अधे मध्ये त्याना भेटायला वनवासी आश्रमात जायचो. तिथल्या कार्यकर्त्यांशी माझी ओळख झाली. त्यातील एक नाव बंडू बोर्डे. एटापल्लीच्या या वनवासी आश्रमाचे अधीक्षक बंडू बोर्डे हे मूळ अकोल्याचे.  ते घरदार सोडून आमच्या दंडकारण्यात संघाचा प्रचार करायला आले होते. बंडू बोर्डे नेहमी माझ्या घरी(कुडकेल्लीत) मला भेटायला येत. मी संघात यावे असा त्यांचा प्रयत्न होता. मी संघात गेलो नाही पण बंडू बोर्डे या माणसाच्या व्यक्तिमत्वाने मात्र भारावून गेलो होतो. मग एटापल्लीला गेलो की त्या आश्रमात थांबायचो. नंतर जेंव्हा अहेरीत  शिकायला गेलो तेंव्हा बंडू बोर्डेनी मी अहेरीतील संघाच्या आश्रमात प्रवेश घ्यावा यासाठी प्रचंड धडपड केली पण मी ती मदत नाकारुन भगवंतराव मध्ये दाखल झालो. असो.
तर घटना एटापल्लीची...
...या आश्रमाना सरकारी ग्रांट नसायची(आजचं माहित नाही). लोकांच्याकडून वर्गणी स्वरुपात मिळालेल्या मदतीतून आमच्या रानात ही दोन वसतीगृहं त्या काळात उभी होती. आम्हा रानातल्या पोराना शिक्षणाची सोय पुरवत होती. इथे मला कळले की १०० रुपयाच्या मदतीत १०५ रुपयाची मदत उभी होते. ती संघाच्या स्वतंत्र तंत्रातून. तर ते तंत्र असं होतं...
...सघाला जर तुम्ही १०० रु. मदत/वर्गणी दिलीत तर संघ त्या पैशातून आवश्यक वस्तू घेताना संघाचे सदस्य असलेल्या दुकानांतून/पुरवठादाराकडून घेतात. आमच्या एटापल्लीत गादेवार व मद्दीवार नावाचे दोन संघ सदस्य व्यापारी होते/आहेत. मग यांच्याकडून वसतीगृहासाठीची खरेदी केली जाई. मधल्या काळात स्कॉलरशिपच्या परिक्षेसाठी मला एटापल्लीत काही महिने राहायचे होते. मग बंडू बोर्डेनी मला वनवासी वसतीगृहात राहण्याच्या आग्रह केला. मी स्वत: अनेक वेळा बंडू बोर्डें सोबत गादेवारकडे खरेदीसाठी जायचो. मग हे संघाचे सदस्य असलेले दुकानदार न-नफा न-तोटा (किंवा अत्यल्प नफा) या तत्वावर आश्रमासाठी वस्तू देत(सगळीकडे देतात की नाही माहीत नाही, पण ब-यापैकी हे तंत्र वापरले जाते). म्हणजे समजा १० किलो. तांदूळ १० रुपये किलो प्रमाणे असेल व त्यात दोन रुपये प्रति किलो नफा असेल. अशा वेळी नफा न कमवता हा तांदूळ ८ रु. किलोने दिला जाई.  म्हणजे मदत करणा-यांनी दिलेल्या शंभर रुपयात बाजार भावाप्रमाणे १० किलो तांदूळ आले असते. तेंव्हा त्या मदतीला १००% मदत असे म्हणता आले असते. पण इथे मात्र १२+ किलो तांदूळ मिळायचे. या मिळालेल्या १२ किलो तांदळाचे बाजारभावानुसार मूल्यांकन केल्यास प्रत्यक्ष मदत ही १२० रुपयाची ठरते. म्हणजे कोणीतरी दानशूर देतो १००रु. पण प्रत्यक्ष मदत पोहचते १२० रुपयाची. हा चमत्कार फक्त आणि फक्त आर. एस. एस. मध्येच घडतो. अगदी भाजीपाला घेताना सुद्धा हेच तंत्र वापरले जायचे. हा माझा स्वत:चा अनुभव असून मी वर दुकानदारांची नावं मुद्दामच दिली. कारण त्या दुकानदारांच्या हातून येणारी मदत रानातला विद्यार्थी घडवत होती. त्या दुकानदारांचे आभार मानावे तेवढे कमीच. माझे अनेक मित्र व आमच्या रानातील  कित्येक पोरं  आजही अहेरी व एटापल्लीतील या संघातील वसतीगृहातून शिकत आहेत.
आमच्या अहेरीत तर सगळा कोमटी समाज, म्हणजेच पद्मशाली समाज. चंद्रपुरातही सगळे धनाढ्य लोकं हे पद्मशालीच आहेत. या कोमटी समाजावर संघाचा प्रचंड प्रभाव. गावाकडचे  माझे अर्धे मित्र याच समाजातील आहेत. अहेरी व चंद्रपुरच्या मित्राना फोन करुन चौकशी केली तेंव्हा कळले की कित्येक संघवाले मित्र उतराखंडला धावलेत म्हणे. संघातील अनेक व्यापारी याच(ना-नफा-तोटा, अत्यल्प नफा) तंत्रानी मदत करतात हे आज परत एकदा कळले.  वरुन संघाची शिस्त वाखाणण्या सारखी असतेच.  मग १०० च १०५ % व्हायला अडचण असतेच कुठे? 
असो! संघाची भरपूर स्तुती झाली दिसते. पण काय करु झोडपायचे तिथे झोडपतोच पण जे चांगलं आहे ते चांगलंच. त्या बद्दल त्यांचं कौतुक केलच पाहिजे.
थोडक्यात सांगायचे म्हणजे इतरत्र मदत दिलीत तर किती टक्के पोहोचेल माहीत नाही. पण संघाकडे दिलीत तर १०५% नक्कीच पोहोचेल याची खात्री बाळगा.
सध्या त्या उत्तरेच्या देवाच्या तावडीत सापडलेल्या लोकांसाठी अनेक जण मदत करताना दिसत आहेत. पण दिलेल्या मदतीतील नक्की किती %  पोहोचणार या बद्दल साशंक आहेत. त्याना एकच सांगणे. मदत द्यायची असेल तर संघाकडे द्या. त्यातून पोहचणारी मदत १००+ असेल याची खात्री बाळगा.

संघाच्या पॅंटला मी नेहमी खाकी चड्डी म्हणून हिणवतो... पण आज मात्र चड्डी नाही तर चक्क पॅंट म्हणावसं वाटतंय.  

तरी मी कट्टर संघ विरोधीच.

टीप:- भक्त मरत आहेत ही गोष्ट हृदयद्रावकच. पण त्यांच्याबद्दल मला सहानुभूती नाही हे ही तेवढेच खरे.

जयभीम.
***

 माझा RSS ला विरोध का? हा लेख खालील धाग्यावर वाचा.

http://mdramteke.blogspot.in/2013/06/blog-post_29.html

***

७७ टिप्पण्या:

 1. आपल्या ब्लॉगवर प्रथमच भगवान बुद्धाचे चित्र आहे. त्याखाली जे लिहिले आहे : भवतु सब्ब मंगलम्‌ ह्याचा अर्थ सगळ्यांचेच मंगल होवो असा जर धरला तर तुम्ही भगवान बुद्धाचेही ऐकत नाही म्हणायचे. आपण बुद्ध असल्याने जरूर त्या बद्दल अभिंमान बाळगावा. पण मरणार्‍या हिंदूंबद्दल सहानुभूती नाही असे त्या बुद्धाने ऐकले तर त्याला बरे वाटेल काय ?

  उत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. मला स्वत:ला कित्येकानी पिण्याचे पाणी वरुन ओंजळीत सोडले. ती वेळ तुमच्यावर आली नाही. तुम्ही नशीबवान आहात.

   हटवा
  2. jar tumala pinaycha pani nahi bhetal tar..........tume pan konala pani nahi denar ka?

   हटवा
  3. चार धाम यात्रेला काही फक्त ब्राम्हण लोक जात नाहीत सर्व जातीधर्माचे लोक जातात. काहीजण देवासाठी म्हणून जातात तर काहीजण बर्फाळ प्रदेशाच्या अनुभवासाठी जातात काहीजण निव्वळ ट्रेकिंग च्या अनुभवासाठी जातात......हि झाली बाहेरून जाणार्या लोकांची गोष्ट........तिथे राहणारे लोक पण सर्व जाती धर्माचे आहेत....जेव्हा आपत्ती येते तेव्हा ती जात पात बघत नाही सर्वाना घेऊन जाते.....

   बाबासाहेबांनी बुद्ध धर्मात जाणार्यांना सांगितले आहे कि हिंदू धर्म पूर्णपणे विसरा, त्यांचे देव विसरा आणि बुद्ध धर्म पूर्ण आत्मसात करा.......मग बुद्ध धर्म तुम्हाला अजून समजला नाही का ?

   तुमची हि पोस्ट चांगली आहे तसेच रा स्व संघ ला का विरोध आहे ती पोस्ट पण बऱ्याच अंशी बरोबर आहे. पण हि खालची टीप खटकणारी आहे......

   हटवा
 2. Apan kelela vivechan baghun anand jhala Ramteke ji. Dhanyavad.
  Aaple bekiche lekh sudha vachale. aapli oghavati bhasa shaili dekhil uttam ahae. Aaapnas ani aaplya karyas hardik shubechyaa...!!!

  उत्तर द्याहटवा
 3. द्वेष हे बौद्ध धर्मीय असल्याचे प्रतिक नाही हा आंबेडकरवादी आज काळ दुसर्याचा द्वेष करणारच असतो

  उत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. मनोज,
   द्वेष मलाही आवडत नाही. पण कठोर टीका करावी लागते.
   या दोहीतील फरक जाणावा.
   धन्यवाद.

   हटवा
  2. रामटेके साहेब,

   तुम्हाला जे भोगायला लागले आहे त्याचे समर्थन होऊच शकत नाही, पण इतका विचारी माणूस गेलेल्या माणसांबद्दल इतका कडवट पणा दाखवतो हे मनाला पटले नाही गेलेल्या माणसाबद्दल अशी भावना हा द्वेष नह्वे का?

   हटवा
 4. रामटेके साहेब. वाचून आनंद वाटला. जे चांगले आहे ते चांगले म्हणण्याचा तुमचा प्रामाणिकपणा सार्वजनिक वातावरणात दुर्मिळ झाला आहे. मी स्वतः संघाचा कार्यकर्ता आहे. थोडे कठोरपणाने संघाच्या न पटणाऱ्या गोष्टींच्या बद्दलही अवश्य लिहावे. लाखो माणसांचा समावेश असणारी कुठलीच रचना परिपूर्ण असल्याचा दावा कुणीच करणार नाही. एखाद्या corner वरून येणारे सडेतोड पण प्रामाणिक मूल्यमापन मी स्वत: स्वागतार्ह मानतो. तुम्हाला मनापासून धन्यवाद. त्या निमित्ताने तुमचा हा ब्लॉग कळला. सविस्तरपणे वाचतो.

  उत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. शरदमनी साहेब,
   माझ्या ब्लोगवर आपलं स्वागत आहे.
   संघ नोंदणी घेत नाही हे मुख्य कारण असून लोकशाही नाकारणे हे न पटणारे आहे. त्यावर आज लेख टाकला आहे.

   हटवा
 5. RSS great ch ahe...kahi shanka ch nahi.
  tumhala kona baddal sahanubhuti aso wa naso.. tyachyane aamhala kahi farak padnar nahi...

  ani kaavalyachya shaapane gaay marat nahi ... aamchya ithe RSS madhe anek 'jay bhim' mhananare yuvak ahet.
  RSS kadhihi bhedbhav karat nahi.

  vande mataram

  उत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. ईशाजी,
   आपलं स्वागत आहे.
   हो आमच्या अहेरीतही वानवासी आश्रमात जयभीमवाले आहेत. संघाची ही वसतीगॄहवाली सोय लोकांचं कल्याणच करते आहे. म्हणून तर आमच्या अहेरी व एटापल्लीती त्या दोन वसतीगृहांचा उल्लेख केला आहे.

   हटवा
  2. mhanje aaplyala jo fayda pahuchwanar tyachich tarif karanar ka ?

   हटवा
 6. संघाबद्दल इतके चांगले लिहिणारा आणि त्यांच्या आश्रमात राहिलेला लेखक शेवटी संघविरोधक कां हा प्रश्न अनुत्तरितच रहातो. कीं हा सर्वसामान्य ब्राह्मणविरोधातून उद्भवलेला विरोध आहे? लेखकमहोदय यावर कांहीं प्रकाश पाडतील काय? लेखकमहोदयांनी त्यांच्या शुद्धलेखनातील चुकाही आगामी लिखाणात दुरुस्त कराव्यात.

  उत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. सुधीर काळे साहेब,
   मी तटस्थपणे लिहतो.
   एवढच सांगतो.
   असो,
   ब्लोगवर आपलं स्वागत आहे.

   हटवा
 7. BHAGWANTACHE JAYA LABHALE CHIRVIJAYI VARDANA

  SANGHAWACHUN KON SWIKAREL KAGACHE AWWHAN

  उत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. जोशी साहेब,
   तुमचं स्वागत आहे.
   वरील वाक्याचा अर्थ कळला नाही.

   हटवा
  2. रामटेके साहेब,
   आपल्या वरील टिपणी वरून इतकेच दिसुन येते की आपला शब्द संग्रह बराच कमी आहे.
   थोड्या अभ्यासाची गरज आहे. म्हणजे आपोआपच शुद्धलेखन, विचार आणि अभिप्राय बदलतील.

   हटवा
  3. रामटेके जी , जोशीजीं ना म्हणायचे आहे कि
   "भगवंताचे जया लाभले चीर विजयी वरदान
   संघावाचून कोण स्वीकारेल काळाचे आव्हान "

   हटवा
 8. प्रामाणिक टिप्पणी बदद्ल जाहीर आभार

  जय भीम

  उत्तर द्याहटवा
 9. प्रत्युत्तरे
  1. प्रशांतजी,
   ती दिवस फार दूर नाहीत.

   हटवा
  2. Ramteke saheb
   "Sarvepi sukhina santu" ya askhalit Sanskrit madhil oli aapnas samajlya. Pan Shri. Arun Joshinni Lihilelya Marathi Bhashetil oli tumhi samjlya nahit ase mhanta.(?) Thodasa Ghol hotoy nahi ka?

   हटवा
 10. श्री॰एम॰डी॰रामटेके याना धन्यवाद॰

  उत्तर द्याहटवा
 11. SHREE Ramteke ji
  Sadar Pranam.
  Sanghacha Swayamseva asalela mi aaj hi jatibhed palat nahi. Mazya mulanchya dakhalya var jat nahi. Ek cha jat Hindu ase majhi dharana aahe. Mazya ghari puja karanyasathi janmane bramhan nasnara (tathakathit Mahar, Mang) pujari hava aahe. Mi punyat rahato hindu paddhatine puja sangnara hindu pujari asel tar. Krupaya Kalavave.
  Vishwa Hindu Parishadene Jati Virahit Purohit Prashikshan Varg ghetala hota parantu Punyache konihi purohit tyat nhvate tyamule mala asa purohit milala nahi.
  Krupaya mala ya babatit madat kara.

  उत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. नमस्कार जोशी साहेब,
   नाही, तुम्हाला तसा पुरोहीत मिळणार नाही. किंबहुना महार/माग या समाजातून तर नक्कीच नाही. कारण हिंदू देव, देवता व अंधश्रध्दा झिडकारुन हा समाज नव्या वाटेवर निघाला आहे. या वाटेवर निघण्या आधी कित्येकांचा पायापोटी पळून पाहिले पण तेंव्हा सगळ्यानी लाथा घातल्या. आता तुम्ही बदललात ही चांगली गोष्ट आहे पण त्याला उशीर झाला. हा पिचलेला व गांजलेला समाज दुस-याच एका वाटॆवर बराच पुढे निघून गेला आहे. आता तो परत फिरणार नाही. तुम्ही हाक दिली खरे पण वेळ निघून गेल्यावर. याद दोष तुमचा नाही, पण निघून गेलेल्यांचाही नाही.

   हटवा
 12. maf kara ramteke saheb pan tumhi manat asalela boudh dharma ani china japan tibet madhye madhye asalela boudh dharma wegala asava,
  china japan hi 98% boudhist rashtre pudhe ka ani bhartiy budhha samaj mage ka?
  yala karan eka tharavik jatibaddal asanari dwesh bhavana asave ,ani dusaryana pragatila jalane he asave

  उत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. ओमकार साहेब,
   त्यावर कधीतरी स्वतंत्र लेख टाकेन.
   कुठलिही गोष्टी बघा, तिचा प्रादेशिक वर्जन तयार होत असतो.
   त्याला पर्याय नाही.

   हटवा
 13. Absolutely fantastic ! I just loved this blog, not because you praised RSS, but because of your honesty in writing what you admire and what you don't !

  And I hope you publish this post :) -

  उत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. मुळात तुम्ही फेक नावाचे सदस्य असल्यामूळे माझ्या आचार संहिते प्रमाणे बाद ठरता. ही प्रतिक्रीया वाचून ख-या आयडीने याल अशी आशा. अन्यथा तीन दिवसा नंतर ही प्रतिक्रीया तर उडविली जाईलच पण यापुढे वरील नावाचे आलेली कुठलिही प्रतिक्रीया प्रकाशित केली जाणार नाही.

   हटवा
 14. Lekh changla ahe. pratyek goshtikade jatiyvadi vichar saranitun pahane sodlyas dr. ambedkar ani dr. hedgewar yanche swpn purn hoil.

  उत्तर द्याहटवा
 15. Respected Shri Ramteke Saheb,
  Sadar pranam.
  Aapan sangitalya pramane magil shatkat ganjlelya samajachi changli unnati hot aahe. Sant tukaramanchya
  mhanipramande "je ka ranjale ganjale ... "
  Aaplya Sangnyapramane Dr. Babasahebani hya samajala ek navi disha milvun dili . Kharech aahe .
  Tathapi hyachi suruvat kahi Santani pan keli hoti . Udaharnarth Sant Eknath
  Hya santanchi devavar shradhha hotich
  Pan mala fact ek sanga , Hindu dev , devatabaddal tumhala ka dwesh vatato

  Regards
  Kedar


  उत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. केदार साहेब,
   त्यासाठी आपण बाबासाहेबांचे धनंजय कीर लिखीत चरित्र नक्की वाचा.
   व बाबासाहेबांची "जातींचे निर्मूलन" ही नक्की वाचा.

   हटवा
 16. He varche sagle comments vachlya nantar ashe vate ki..main muddha sidela rahila ani jai bhim chi stuti suru zhali aahe.. ..Ramteke saheeb aaj jari tumhi dusrya vatene chala aahet tari tumche vichar patich aahet.... vichar badla jag badlel..ek vel hoti lokani tumhala bajula kelele.. ani aaj tumhi swatalach bajula karat aahe. Similarity aaj hi nahi.. ani ek je mele te mele tyana kunachya sahanbhutuchi garaz nahi... sahabhuti nahi he lihun tunhi kay sidha karu darshat aahe nahi samjat.. pan je tumhi sangha badhal lihilay te vachun changla vatle..

  उत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. प्रशांत साहेब,
   स्वत:ला बाजूला करत आहोत हे जरी खरे असले तरी आता आम्ही संघटीत होत आहोत वा मागच्या पन्नास वर्षात त्या संघटीत पणातून बरचं काही मिळविलो आहोत हे ही तेवढच खरं.
   लोकांच्या गर्दीत आयडेंटीटी हरवून बसण्यापेक्षा बाहेर पडून स्वत:ची आयडेंटिटी निर्माण करणे कधिही बर.
   आम्ही ते केले आहे.

   हटवा
 17. रामटेकेसाहेब, स्वागत केल्याबद्दल धन्यवाद. पण माझ्या "संघाबद्दल इतके चांगले लिहिणारा आणि त्यांच्या आश्रमात राहिलेला लेखक शेवटी संघविरोधक कां?" या प्रश्नाचे उत्तर आपण दिले नाहींत! ते दिलेत तर आभारी राहीन. कारण संघाची, त्याच्या दानशूरतेची आणि पैसे न खाण्याच्या गुणांची इतकी प्रशंसा केल्यानंतर शेवटी स्वत:ला "तरी मी कट्टर संघ विरोधीच" असे म्हणणे सयुक्तिक वाटत नाहीं व ते केवळ पूर्वग्रहावरच (prejudice) आधारित असावे असाच माझा तरी ग्रह झाला! या मुद्द्यावर आपण प्रकाश पाडावात अशी माझी आपल्याला आग्रहाची विनंती अहे! धन्यवाद!! काळे

  उत्तर द्याहटवा
 18. काळे साहेब नमस्कार,
  संघाला विरोध असण्याचे मुख्य दोन कारण. एक तर संघ हे संविधानविरोधी आहे. RSS ही संघटना अनोंदणीकृत संघटना आहे. कुठलिही संघटना ही नोंदणीकृत असावी ही संविधानाची अट नसली तरी आग्रह आहे. कारण तसे असणे म्हणजे स्वत:ला संविधानास बांधील असल्याचे मान्य करणे तर आहेच पण कित्येक गोष्टीना कायदेशीर उत्तरदायी असण्याचीही ती प्रक्रीया आहे. संघटना अनोंदनीकृत ठेवणे म्हणजेच संविधान झुगारने होय. संघ संविधान झुगारतो हे सिद्ध होते.
  दुसरी गोस्ठ म्हणजे संघात लोकशाहिचा अभाव आहे. ईथे अधिकारी वा वरिष्ठ कार्यकर्त्यांची लोकशाही पद्धतीने निवड होत नसून नेमणूक होते. अगदी सरसंघचालका सारखे पद नेमले जाते. हे मला अजिबात पटत नाही. मी संघावर दोन आरोप ठेवतो... १) संविधान विरोधी २) लोकशाही विरोधी. या व्यतिरिक्त सरसंघचालक पदावर फक्त ब्राह्मणच का? हा ही प्रश्न तेवढाच महत्वाचा? पण वरील पहिल्या दोन गोष्टीच ईतक्या टोकाच्या आहेत ही तिसरा प्रश्न चर्चेस घेण्याची गरजच पडत नाही....

  उत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. Ghataneche palan mhanaje tyat namud tatvanche palan. Ekata, Samata, bandhuta ani 100 takke pramanikta hich tar ghatanechi shikvan. RSS ch pratyaksh achanarat anato. Balbharati pustakatil pratidnyeche palan RSS shivay koni kele ka yachahi vichar kara. Kagdi ghode nachvile mhanaje ghataneche palan ka ho.

   हटवा
  2. sarvapratham, hardik abhinandan! kahi goshti many karnya sathi khup motha man lagta, te tumchya pashi ahe!

   sarasanghchalakanchi nivadnuk hot nahi, nivadnuk tithe hote jithe ekhadyala ekhada pad, khurchi ghyaychi ichha, apeksha aste, ani ekapeksha adhik lokanchi te pad ghaychi ichha aste! ithe nemnuk ahe, tihi swatahun keleli nahi, itarani keleli ahe he lakshat ghyava! agdi atta attachi gosht Ma. Sudarshanji he sarvach Kshetra sangh chalakanshi charcha karat hote ki ata mi he dayitva sambhalu shakat nahi! tyanantar kahi varishth swayamewakanchi samiti gathit keli geli, tyat charcha houn mag nutan sarsanghchalak niyukt zale! ek gosht ji mahit nasel ti sangto, Param pujaniya sarasanghachalakanch vijayadashmi utsavatil bhashan te swata: tharawat nahit, tyasathi ek samiti aste, ti sadyasthiti war chacha karun mag bhashanache mudde tharavat aste he apnas mahit ahe ka?
   baki aple mudde ahet te dur karnyacha prayatn nahi karat.. waril likhanacha apnas RSS vishayi kahi navin mahiti hoil ha uddesh!
   Dhanyawad!!

   हटवा
  3. रामटेके साहेब प्रथम मन:पूर्वक धन्यवाद अत्यंत प्रांजळपणे वास्तवदर्शी लेख लिहिल्याबद्दल.. परंतु संघाबद्दल असलेल्या आपल्या आक्षेपांबद्दल काही सांगू इच्छितो..
   १) संघ संविधान विरोधी आहे...: संघ हा संविधानविरोधी मुळीच नाही...उलट संविधानात सांगितलेल्या समता,बंधुता,जातीभेद न मानणे यासारख्या गोष्टी संघाने सर्वात चांगल्या पद्धतीने अमलात आणल्या...तुम्हाला माहिती आहे कि नाही माहित नाही,,पण पू.बाबासाहेब आंबेडकरांनी १९५२ साली संघशिक्षा वर्गाला भेट दिली होती..त्यांनी दिलेली प्रतिक्रिया आणि आणि त्यांचे संघाबाद्दलचे मत जरूर वाचावे..
   २)संघ लोकशाही विरोधी आहे.. हा पण आरोप निराधार आहे...संघात नेमणुका होतात हे खरे आहे कारण संघ हि एक लष्करी धरती वर तयार झालेली संघटना आहे..परंतु संघामध्ये होणारी प्रत्येक 'नेमणूक' हि लोकशाही मार्गानेच होते..अगदी सरसंघचालकांपासून ते शाखा पातळीवरील छोट्या नेमणुकापर्यंत..नेमणूक होण्या आधी सर्व स्वयंसेवकांची बैठक घेतली जाते..सगळ्यांची मते विचारात घेतली जातात..आणि सर्वानुमते नेमणूक केली जाते...
   आपल्या सारख्या प्रांजळ लेखकाने 'दि आर एस एस स्टोरी' हे पुस्तक जरूर वाचावे...आपल्या सर्व शंकांची उत्तरे त्यात आपल्याला मिळतील.. लेखक आर.के. मलकानी..
   प्रतिक्रिया मिळाली तर आवडेल...धन्यवाद...!!!

   हटवा
  4. रामटेके साहेब प्रथम मन:पूर्वक धन्यवाद अत्यंत प्रांजळपणे वास्तवदर्शी लेख लिहिल्याबद्दल.. परंतु संघाबद्दल असलेल्या आपल्या आक्षेपांबद्दल काही सांगू इच्छितो..
   १) संघ संविधान विरोधी आहे...: संघ हा संविधानविरोधी मुळीच नाही...उलट संविधानात सांगितलेल्या समता,बंधुता,जातीभेद न मानणे यासारख्या गोष्टी संघाने सर्वात चांगल्या पद्धतीने अमलात आणल्या...तुम्हाला माहिती आहे कि नाही माहित नाही,,पण पू.बाबासाहेब आंबेडकरांनी १९५२ साली संघशिक्षा वर्गाला भेट दिली होती..त्यांनी दिलेली प्रतिक्रिया आणि आणि त्यांचे संघाबाद्दलचे मत जरूर वाचावे..
   २)संघ लोकशाही विरोधी आहे.. हा पण आरोप निराधार आहे...संघात नेमणुका होतात हे खरे आहे कारण संघ हि एक लष्करी धरती वर तयार झालेली संघटना आहे..परंतु संघामध्ये होणारी प्रत्येक 'नेमणूक' हि लोकशाही मार्गानेच होते..अगदी सरसंघचालकांपासून ते शाखा पातळीवरील छोट्या नेमणुकापर्यंत..नेमणूक होण्या आधी सर्व स्वयंसेवकांची बैठक घेतली जाते..सगळ्यांची मते विचारात घेतली जातात..आणि सर्वानुमते नेमणूक केली जाते...
   आपल्या सारख्या प्रांजळ लेखकाने 'दि आर एस एस स्टोरी' हे पुस्तक जरूर वाचावे...आपल्या सर्व शंकांची उत्तरे त्यात आपल्याला मिळतील.. लेखक आर.के. मलकानी..
   प्रतिक्रिया मिळाली तर आवडेल...धन्यवाद...!!!

   हटवा
 19. काळे साहेब,
  खालील लेख वाचा.

  http://mdramteke.blogspot.in/2013/06/blog-post_29.html

  उत्तर द्याहटवा
 20. Sir, aapan Sanghacha virodh karat asun dekhil tyach Sanghyachya akhadya changlya goshtibaddal avdha changla vichar karta hi gosht kharach khup changli ahe. Aplya ya tathasth vichar karnyamule apan intellectual ahat he disunach yet.

  Pan sir, tithle Hindu bhakt martahet yachi Sahanubhuti nahi asach apan mhnalat. Khali comments madhe tyabaddal aslel karan pan me vachl. Pan sir mala te patl nahi.. Aaplyasbat je kuni tase vagle te vegle hote, tyanchi prarutti ti hoti ani tyamule tumhi 1 dharm ha aadhar gheun saglyannach tya pravruttiche samajn chukich ahe. Apan yavar jarur vichar karava.

  Sachin Gaikwad
  07588424300
  sach7793@gmail.com

  उत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. आमच्याकडे जातीयवाद आजुनही आहे.
   गावाला गेल्यावर आजही मला तिथले तथाकथीत उच्चवर्णीय "तू डोन्या महाराचा पोरगा न रे?" असं विचारतात.
   ईथे शहरात बसून हे सगळं कळायचं नाही.

   हटवा
  2. new generation from metro is changing this but still it might take few generations to wipe this out. god knows how much it will take wipe it out from our country.

   हटवा
 21. Namaskar..
  apla lekh vachun chan vatle...
  kahi comments mdhe tumhi sangitlele anubhav nkkich vait hote...
  ex. Pani onjalit varun dyayche...
  to kalch tasa hota ani tya kalat lokanchi manasthiti tashi hoti..
  tumchi manasthiti tya kalat nkkich jara vegli asnar tya lokanpeksh...
  tyapramanech aaj lok asha goshtinna kuthetri duyyam sthan detayt he nakarta yenar nahi...
  badal haway pn to eka ratrit nahich ghadu shaknar..
  tyala ek tharavik kal jau dyava lagel..
  RSS chi bhumika hich ahe...
  Hindutwawadi sanghatna asa ullekh apan kela ahat pn sanghachi hindutwachi sankalpna apnas nit mahit nahi ase vatate..
  apnas sangnya etka mi tri motha nahiye...
  fkt maze mat aplyasamor vyakt kele..

  उत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. तुमचं म्हणनं खरही असेल. प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतातच.

   हटवा
 22. मला १०० टक्के माहिती नाहीं, पण मूळचे आंध्रप्रदेशचे कै. बाळासाहेब देवरस आणि कै. राजेंद्र सिंह (राजू भैय्या) हे बहुदा ब्राह्मण नसावेत, कारण विकिपीडियावरील त्यांच्या चरित्रात कुठेच "ब्राह्मण" हा शब्द आढळत नाहीं. "सिंह" आडनाव असलेले राजेंद्र सिंह ब्राह्मण असण्याची शक्यताही कमीच आहे. तरी हे खरे असल्यास "सरसंघचालक पदावर फक्त ब्राह्मणच का?" हा आरोप लागू होणार नाहीं. आपल्याला जास्त माहिती असल्यास माहीत करून घ्यायला आवडेल. शिवाय ब्राह्मणेतर व्यक्ती जर रा. स्व. संघात प्रवेशच घेत नसतील तर अशा जातींचे सरसंघचालक कसे निर्माण होणार?

  उत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. रामटेकेसाहेब, मोकळं मन ठेवून माझं म्हणणं पटल्याचं सांगितल्यावर तुमच्याबद्दलचा माझा आदर द्विगुणित झाला. माझं म्हणणं खरोखर पटलं असेल तर आपल्या यापुढील लिखाणात त्याची प्रचीती मला दिसेल अशी आशा ठेवतो. "ब्राह्मणेतर व्यक्ती जर रा. स्व. संघात प्रवेशच घेत नसतील तर अशा जातींचे सरसंघचालक कसे निर्माण होणार?" हे वाक्य लक्षात घेऊन ब्राह्मणेतरांनी रा.स्व.सं. मध्ये जरूर प्रवेश करावा असेही मला वाटते कारण ती एक प्रखर "देभक्त" संघटना आहे यात शंका नाहीं. आणि कुठल्याही आपत्तीकाळात या संघाचे स्वयंसेवक सर्व प्रथम पोचतात व "मर-मर मरून" सेवा करतात हे मी पाहिले/वाचले आहे. १९६५च्या युद्धात सैन्याच्या पाठोपाठ सघाचे स्वयंसेवक आपल्या सैन्याला रसद पोचविणे यासारखी मदत करत होते असे आघाडीवर लढलेल्या माझ्या एका लष्करातील मित्रानेच मला सांगितले होते. त्यांची प्रतिमा चांगली आहे व आपल्या लेखाने ती आपण अजून उजळ केलीत याबद्दल धन्यवाद. माझे ’ई-सकाळ’वरील पैलतीर या सदरात प्रकाशित झालेले लेख वाचले नसतील तर जरूर वाचावेत. खूप लोकांना आवडत असावेत असे प्रतिसादांवरून वाटते. (Pl go to www.esakal.com, then select पैलतीर tab, then scroll down to my articles. The latest is "एका धूर्त आणि दुटप्पी हुकुमशहाचे पुनरागमन! on Musharraf's return to Pakistan. But there are many!)

   हटवा
  2. माझा वरील लेख http://tinyurl.com/mgdyt4r या दुव्यावर वाचता येईल.
   सुधीर काळे

   हटवा
 23. ब्राह्मण कुळात जन्मलो असलो तरी त्याला एक "योगायोग" समजून मी स्वत: जात-पात मानत नाहीं. म्हणूनच मला नरेंद्र मोदी यांची "India First" ही निधर्मीपणाची (सर्वधर्मसमभावाची) व्याख्या मनापासून आवडते. आपण सर्वांनीच जात-पात विसरायला हवी व भारतमातेचे हित समोर ठेवून वागले पाहिजे या मताचा मी आहे.

  उत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. मोदींबद्दल मी प्रचंड संभ्रमात आहे.
   आजून काही दिवस तरी काही कमेंट करता येणार नाही.

   हटवा
  2. kaa? Shri Modi yani keleli kame ka changli vatat nahit ? phakt 10 years back wali dangal athavate pan vikas ka nahi ?

   हटवा
 24. इस लेखमे श्री बंडू बोर्डे करके जो उल्लेख आया हुआ है, वो महनीय श्री दीपक बोर्डेजी है, जो आजकल अरुणाचल में जनजाति में संघटन कार्य करते है . वो चंद्रपुर जिल्हा प्रचारक हुआ करते है. एतापल्ली समान चलनेवाले निवासी आश्रम शालाओंका संचालन विदर्भ प्रदेश वनवासी कल्याण आश्रम करता है , वह हम सबके अनुदान और दान के ऊपर चलता है, सरकारी दानोके ऊपर नहीं.. ! महामानव अम्बेडकरजीके जातिमे में जन्म लेना याने वह व्यक्ति अम्बेडकरवादी हो गया, यह सोचना आज के युग में संकुचित होगा, बल्कि महामानव अम्बेडकरजीकी जातिप्रथा निर्मूलन की बात समाज में कृतिपर धारणासे रखनेवाला संघ स्वयंसेवक सच्चा अम्बेडकरवादी है.

  उत्तर द्याहटवा
 25. नमस्कार विवेकजी,
  आपने सही कहा,उनका नाम दिपक बोर्डेही है. लेकीन हमार जंगल मे तो सब लोग उन्हे बंडूभाऊ के नामसेही जानते है.
  उनसे संपर्क करना हो तो कैसे करे? आपके पास नंबर हो तो प्लीज दिजीये.
  पुरे २३ साल हुए है उनसे बीना बात किये.

  उत्तर द्याहटवा
 26. priy shri ramteke saheb. namaskar.Mi mul purvichya avibhakt chandrapur jilhyatla rahivasi aahe. saddhya kamanimitty hyderabadla asto. maze 3-4 mitra mahar samajatil asun aamchya ghari aamhi kadhihi (mhanaje mazya aathvanipramane magil 45 varshanpasun)jatibhed vagire palala nahi. Manat sarkha raag dharun thevnare saglyach dharmat aahet va rahatilach.Buddhviharat mihi jato, dharmanirpeksha mhanun mirvayla navhe tar mazya ant:preranene. Kahi thikani buddhviharat chalalele chale ashobhniy astat. Sanghala zodple mhanje aaple purogamitva siddh hote asa bhram ya deshat anekanna aahe. Aaplya sarkhya samtol, samyak vichari purushachi yat bhar padu naye ase vatate. Krupaya hyderabadla jaroor mazyakade yene. Jata jata evdhech lihito ki nmi maharhi nahi aani bramhanahi nahi parantu Shri Rajendra Meshram hi mahar samajatil vyakti mala aaplya mothya bhavapeksha jasti maan dete. Chala aapaplya parine payatna karuya.

  उत्तर द्याहटवा
 27. रामटेक सर नमस्कार,
  लेख चांगला आहे. पण शेवटची टीप खटकते..
  तुमच्याबरोबर जे काही झाले ते चुकीचेच, पण सर रागाचे उत्तर हे रागातच नसते, आणि त्यावेळी अन्याय झाला, अजून पण होतोच आहे अनेक कोपर्‍यात ..
  पण जे लोक गेले, ते सगळेच अन्याय करणारे नव्हते, त्यात अनेक लहान मुले होती..त्यांना असा काही धर्म भेद असतो हे माहीत पण नसेल..
  मी खरे तर खूप लहान आहे हे सांगायला, पण आपण फक्त माणसे आहोत.
  बाकी लेख उत्तम, आपला पहिलाच लेख वाचला. पण प्लीज आपल्या मनातला राग थोडा तरी कमी करावा... :)

  उत्तर द्याहटवा
 28. Mr. MD Ramteke, i am not RRS supporter nor supporter of Dr. Ambedkar. I have one question for you. You said you dont follow RSS because they dont believe in constitution etc. But when i read your blogs there is one blog where you have suggested unconsitutional punishment to women who have filed rape cases against Mane. Is this your behavior as per Constitution of this country?

  उत्तर द्याहटवा
 29. अमित साहेब,
  त्या बायका माझ्या समाजाच्या आहेत. त्या बायका बाबासाहेबांचा वारसा सांगणा-या बायका आहेत. अन बाबासाहेबानी स्वत:च्या समाजाला नैतिकतेच पालन करण्याचे कडक आदेश देऊन ठेवले असुन ज्यानी ज्यानी ते नाकारले त्याना बाबासाहेब स्वत:च वेळो वेळी कडक शब्दात फटकारत असत. ईतर बायकांपेक्षा आंबेडकरी बायकांवर नैतिकतेची जास्त जबाबदारी आहे. तेंव्हा मी त्यासंबंधीत केलेली कमेंट आंबेडकरी तत्वाला धरुनच आहे.

  उत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. I am surprised when you say that your comment regarding unconstitutional punishment to women is justified as per Dr. Ambedkar's philosophy. I have already accepted that i am not supporter of any one but still i seriously believe that Dr. Ambedkar would not have used such language. Just think. And when you say that it is really the responsibility of women to maintain morality, there is no responsibility on men? Is this what Dr. Ambedkar taught you? I seriously doubt. Please recheck your comments.

   हटवा
  2. Mr. Ramteke, it seems that you are not interested in replying on my comment above where I have asked you about morality for men and your argument that such unconstitutional punishment is as per philosophy of Dr. Ambedkar.

   हटवा
  3. YOU , YOUR SELF IS advocating "maza samaz" "tumcha samaj" idea .. then how can you come out of so called varna?

   हटवा
 30. आज जिथे सगळे एकमेकांवर फक्त टीका करतात तिथे द्वेष दिसतो पण तुमचा लेख वाचून दिसलं कि आपली टीका द्वेषातून झालेली नाही
  तुम्ही संघाच्या संपर्कात आलात म्हणून तुम्हाला थोडीफार संघाबद्दल माहिती झाली तुम्ही संघात नाही आलात म्हणजे संघ कार्यकर्ते कुठेतरी कमी पडले असतील असो ...

  पण एक आहे मेलेल्या लोकांबद्दल सहानभूती नाही हे आपण म्हणालात हे काही मला खर वाटत नाही तुमच्यासारखा माणसाला असू वाटू शकत अस मला नाही वाटत

  उत्तर द्याहटवा
 31. नमस्कार अमित साहेब,
  मेलेल्या माणसांबद्दल सहानूभुती न वाटण्याचे अनेक कारणं आहेत. त्यातली काही कारणं मी वर दिलीच आहेत. मी स्वत: या दैववादी लोकांच्या जातीयवादाचा बळी आहे. देवाची पुजा करणारा प्रत्येक माणूस भोंदू व आंधळा असतो असा माझा ठाम समज असून तो अनेक अनुभवांतून आकारास आलेला आहे. त्यामुळे मी दैववादयांचा विरोधात एवढा कठोर बनलो.
  "जिथे देव तिथे माणसाची फसवणूक"
  हे माझं घोषंवाक्य आहे. त्यावरुन आपल्याला अंदाज आलाच असेल की मी या आस्तिकांचा किती कडाडून विरोध करतो ते...

  उत्तर द्याहटवा
 32. I admire your trust on RSS, it is an organisation which cannot be understood without entering actively into it

  उत्तर द्याहटवा
 33. नमस्कार रामटेके जी,
  संघाने दलित हि संकल्पनाच हद्दपार केलीय. स्वतःला माणूस म्हणवून घ्या, म्हणजे इतरही तसेच वागवतील. संघ बौद्धांचा द्वेष करत नाही हे तुम्हालाही ठाऊक आहे. असोत.

  उत्तर द्याहटवा
 34. क्या आप इसका हिंदी अनुवाद भी बना सकते हैं :) मेरी मराठी कमजोर है ..

  उत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. namaste ji mai aapako facebook par janta hu . Facebook par aate hi mai aapako chating ke waqt dene ki koshish karunga .

   हटवा
 35. रामटेके सर , आपला लेख वाचला . संघाच्या सामाजिक कार्या बद्दल अजून जाणून घ्यायची इच्छा आहे. अडचणीच्या काळात संघ धावून जातो हे वाचून आनंद झाला. परंतु माझ्या मते संघ मदत करताना पक्षपातीपणा करतो. याची काही उदाहरण मी देतो. 1) गुजरात दंगली मध्ये पीडितांना मदत करण्यासाठी संघ कुठे होता ? 2) दादारी हत्याकांडात संघाने पीडितांना काय मदत केली ? 3) शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी , त्यांना मानसिक पाठबळ देण्यासाठी संघ काम का नाही करत ?

  असो ,

  हेमंत पाटील
  पुणे

  उत्तर द्याहटवा