शनिवार, २९ जून, २०१३

आर.एस.एस. ला विरोध का?

परवा संघाचं कौतूक करणारं लेख लिहल्यावर दोन प्रकारच्या प्रतिक्रीया आल्या. एक म्हणजे ते आपले नेहमीचे तथाकथीत आंबेडकरवादी ज्याना नुसतं विरोध करणं तेवढच काय माहीत आहे. किंबहूना विरोध हा एककलमी कार्यक्रम राबविणे म्हणजेच आंबेडकरवाद असा ज्यांचा ठाम विश्वास आहे ते. काही मात्र सौम्य आंबेडकरवादी ज्यानी फोन करुन “नका करत जाऊ हो संघाची स्तूती. काय आहे ते आपल्या आंबेडकरवाद्याना नाही सोबत” वगैरे मैत्रीच्या सुरात सांगितलं. दोघांच्याही भावना सच्च्या होत्या. एका गटाला वाटतं “सालं काही झालं तरी संघवाल्यांची स्तूती करायलाच नको” दुस-या गटाला वाटतं “ठीक आहे. असतील त्यांचे गूण... पण ते आपण गाऊ नये” असे हे दोन विचारधारा असलेले. माझी दोघांबद्दलही तक्रार नाही, हे नेहमीचचं आहे. मी आपलं मत मांडणार. बास!
पण या वेळी मात्र तिस-या प्रकाराच्याही प्रतिक्रीया आल्या. त्या म्हणजे चक्क संघ समर्थकांच्या. त्यानी प्रश्न केला की जर तुम्हाला संघाचे हे गूण माहीत आहेत तर मग संघाचा विरोध का करता? विरोधाची कारणं सांगा.  त्याना हा प्रश्न पडणे अगदी सहाजिक आहे. कारण मी संघविरोधी आहे हे सांगताना, संघविरोधी का आहे हे सांगितलं नव्हतं. आज मात्र  तसा प्रश्न विचारल्यावर ते सांगण्यासाठी म्हणून हा लेख लिहावा लागला.

तर मी संघविरोधी असण्याची कारणे येणेप्रमाणे.
१)     संघ नोंदणीकृत संटना नाही: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संस्था/संघटना नोंदणीकृत संघटना नाही. कुठलिही संघटना ही नोंदणीकृत असायला हवी. कारण त्यामुळे त्या संघटनेला एक वैधानिक रुप प्राप्त होतं. त्याच बरोबर त्या संघटनेचा उद्देश, कार्यप्रणाली व वाटचालीचा पडतळा तपासता येतो. संघटनेवर अनेक कायदेशीर बंधणे येतात. संघटनेच्या कामावर नजर ठेवायला सोपं जातं. ईथे मात्र संघ चक्क नोंदणीच नाकारतो. याचे कारण काय? ते संघवालेच जाणो. नोंदणी नाकारणे म्हणजे संविधान नाकारणे, म्हणजेच संघ भारतीय संविधान नाकारतो आहे. खरं तर संघानी स्वेच्छेनी नोंदणी घ्यायला हवी होती. लोकशाही पद्दतीने संघटना चालवायला हवी होती. त्यातून पारदर्शकता निर्माण झाली असती व लोकांचा संघाप्रती विश्वास वाढला असता. पण संघ नोंदणी नाकारुन गुढता वाढवत गेला आहे ही एक बाजू तर दुसरी बाजू ही की संघ संविधान झुगारतो आहे. याचाच अर्थ संघ मुळातच संविधान विरोधी संघटना आहे हे सिद्ध होते. हेतू असेलही चांगला पण संघानी नोंदणी घेण्याचे नाकारून भारतीय संविधान झुगारला आहे त्याचं काय करायचं? अन मी आंबेडकरवादी म्हणून संविधानाचा पुरस्कर्ता व संविधानप्रिय माणूस म्हणून संविधान झुगारणा-यांचा कायमच विरोधक असणार.
२)     संघाची घटना नाही: कुठलिही संघटना असली की त्या संघटनेची घटना असावी लागते. म्हणजे त्या संघटनेचे प्रमुख कोण, प्रमुखांची निवड कशी होणार, कार्यकर्ते कोण? कार्यकर्त्यांची निवड, त्याची प्रक्रीया, कालावधी, आचारसंहिता, आर्थिक व्यवहार, संघटनेचा उद्देश व ईतर कार्य. या सगळ्या गोष्टींचा घटनेच उल्लेख असावा लागतो. पण संघची घटना नाहीच. म्हणजे वाटेल तो घोळ घाला, सगळी मोकळीक. गांधी हत्तेनंतर संघ बराच गोत्यात आला होता. घटनेवरुनही संघाला धारेवर धरण्यात आले होते. तेंव्हा संघानी घाईघाईत एक घटना तयार करुन “ही घ्या आमची घटना” म्हणून वेळ मारुन नेली. त्या नंतर ती घटना कुठे गाडल्या गेली ते संघच जाणे. किंवा वेळ प्रसंगी दाखवायला म्हणून ती ठेवलिही असेल कुठेतरी जपून. पण त्या घटनेच्या आधारे ना कधी संघाचे काम चालले न कधी चालणार. म्हणून मी संघाचा विरोध करतो. स्वत:ची घटना न बाळगता संघटन चालविणे हे असंविधानिकच, अन संघ असंविधानिक पद्धतीने संघटना चालवते. त्यामुळे संघाला माझा विरोध आहे.
३)     संघाला लोकशाही अमान्य: संघाच्या कार्यकर्त्यांची, अधिका-यांची निवड कशी होते? जे कार्यकर्ते संघात काम करतात त्याना चांगल्या प्रकारे माहीत आहे, मी सांगायची गरज नाही. संघात कुठल्याही कार्यकर्त्याची वा अधिका-याची निवड लोकशाही पद्धतीने होते नाह तर थेट नेमणूक होते. अगदी सरसंघचालकासारख्या सर्वोच्चपदासाठी सुद्धा संघात निवडणूक होत नाही तर थेट नेमणूक होते. कुणी म्हणेल ही आमची अंतर्गत बाब आहे, तुम्हाला काय त्याच्याशी? पण ही अंतर्गत बाबच संघाला लोकशाहीचा कसा तिटकारा आहे हे अधोरेखीत करुन जाते. संघाला कार्यकर्त्यांद्वारे निवडून आणलेला सरसंघचालक नको असतो, तर नेमलेला एका विशिष्ट गटातला माणूस हवा असतो. का? सोप्प...लोकशाही विरोधी मनोवृत्ती. थोडक्यात संघाचा लोकशाहीला तीव्र विरोध असून संघ ही हुकूमशाही मनोवृत्तीची संघटना आहे. अन्यथा त्यानी लोकशाही पद्धतीने सरसंघचालक निवडला असता.
४)     निधी मिळविण्यासाठी अनेक नोंदणीकृत संघटना: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नावाची संघटना व तीचे कार्य जगभरात माहीत आहे. सर्वत्र याच नावानी ही संघटना काम करते. संघटनेला काम करण्यासाठी निधी लागतोच, मग निधी मिळवायचे म्हणजे संघटना नोंदणीकृत असावी लागते. मग पैसा मिळविण्यासाठी संघानी अनेक पिल्लं जन्मास घातली. या पिल्लावळांद्वारे पैसा गोळा केला जातो. पिल्लावळ संघटनांची कायदेशीर नोंदणी करुन घेण्यात आली. अशा संघटनांतर्फे पैसे मिळवायचे अन ते खर्च करताना मात्र नाव वापरायचे मुख्य संघटनेचे, म्हणजेच राष्ट्रिय स्वयंसेवक संघाचे. पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मात्र ठेवायचे अनोंदणीकृत. गरजेसाठी पिल्लावळ निर्माण करुन त्यांची नोंदणी व मुख्य संघटना बेलगाम ठेवण्याचा हा गेम काय आहे ते संघच जाणे. 
५)     हिंदूत्ववाद: संघानी कितीही आव आणला तरी त्यांचा हिंदूत्ववाद व जातीयवाद लपलेला नाही. सरसंघचालक नेहमी वरच्या जातीचेच का असतात? याचे उत्तर संघ कधीच देत नाही. संघटनेच्या सर्वोच्चपदी कायम संवर्ण व्यक्तीची नेमणूक करणारा संघ पराकोटीचा जातीयवादी आहे हे वेगळे सांगायची अजिबात गरज नाही. मग जो जातीयवादी आहे व हिंदूत्ववादी आहे त्याचा विरोध होणारच.
तर ज्यानी ज्यानी मला मागच्या लेखानंतर विचारले की संघाचा विरोध करण्याचे कारण काय? मला वाटते माझ्या वरील लेखातून त्यांच्या शंकेचे समाधान झाले असावे. झाले नसल्यास फोन करुन थेट बोलू शकता.
जयभीम.
***

१३ टिप्पण्या:

 1. रामटेके साहेब जयभिम ,संघाची स्तुती करणारा कोणता लेख तुम्ही लिहिला तो कृपया मेल करा ,किवा कुठे प्रकाशित झाला ते सांगा जेणेकरून वाचता येईल तेव्हाच प्रतिक्रिया मला देता येईल ....surendratembhurne@gmail.com MO.NO.9226590967

  उत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. जयभीम,
   तो लेख खालील लिंकवर वाचा.
   http://mdramteke.blogspot.in/2013/06/blog-post_27.html

   हटवा
  2. रामटेके साहेब ,जयभिम
   मी तुमचा संघाची स्तुतीकरणारा लेख वाचला त्यानुसार आपण संघाच्या ओझ्याखाली कीती दबलेले आहात हे लक्षात येते .माझ्या मते हा स्तुती लेख नसून उपकाराची परतफेड करणारा लेख आहे , मी एक छोटासा कार्यकर्ता आहे माझ्या मते सेवाधर्म व राष्ट्रधर्म यात फरक आहे .ज्याप्रमाणे एखादा गुटखा उत्पादक /विक्रेता कर्क रोग दवाखाना उघडत असेल तर त्याची कोणती गोष्ट हितकारक व कोणती अहितकारक ठरवता येते त्या प्रमाणे संघा बद्दल ठरविणे सोपे आहे .माझ्या मते या पेक्षा सोप्या व सौम्य भाषेत याचे उत्तर असेल अशे वाटत नाही ,समझनेवाले को इशारा काफी ,

   हटवा
  3. I am fully agree with Shri Surendra Tembhurne.

   हटवा
 2. Thanks. I come to your blog to get info which was kept hidden from us. Always wanted to know opinion of other side. I do feel enlightened after reading you.

  उत्तर द्याहटवा
 3. Respected M. D. Ramteke,

  I read your both articles about RSS. I am quite happy to know that you are a person who can think and observe things in both ways positively as well as negatively. I am a RSS swayamsevak for last 11 years, but I still feel proud to be a swayamsevak. I am not from higher caste and my parents are from two different castes of Hinduism.
  What I personally feel is a person like you should not criticize any organisation or culture based upon some experiences, I am really interested in meeting you personally. Hope you will give me an opportunity.

  Regards,
  Aniket Mirajkar
  mirajkar_aniket@yahoo.com

  उत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. You said.... "I am not from higher caste and my parents..." Well, Mr. Aniket Mirajkar, please don't use the words like "higher caste" or "lower caste". All castes are equal, every human is equal.

   हटवा
 4. नमस्कार अनिकेत साहेब,
  संघ नोंदणीकृत नाही यावर माझा मुख्य आक्षेप आहे व राहील. नोंदणी केल्यानी येणारी संविधानिक बंधन नाकरण्यासाठी संघ अनोंदणीकृत आहे हा आक्शेप कायम असेल.

  उत्तर द्याहटवा
 5. अतिशय छान पोस्त. मी कुंपणावर नाही, कोणाच्याही बाजूचा नाही. म्हणजे RSS संघवादी नाही आणि संघविरोधी नाही. संघ चांगले काम करत असेल तर त्यांचे स्वागत आणि कौतुक केले पाहिजे. आणि ते चुकीचे काम करत असतील तर त्यांना विरोध केलाच पाहिजे, त्यांचे समर्थन करता कामा नये....... आणि RSS घटनेनुसार नोंदणीकृत संघटना नसेल तर ते चूकच आहे.

  उत्तर द्याहटवा
 6. there are pros and cons of democracy. democracy is beneficial for illiterate mature homogenous societies and countries. by nominating RSS chief by the rift between person is avoided. so take RSS as something different style of democracy

  उत्तर द्याहटवा
 7. Namaskar,
  Sir, Rashtriya Swayamsevak Sangh hi sanghatana nondanikrut nahi ha tumcha mukhya aakshep aahe. Why is this??? I shall try to answer this based on what I know about RSS and What the founders of RSS had thought about its aim. The founders of RSS Dr. Hedgewaar rightfully worked out that WE THE INDIANS fell to slavery of every kind, be it polictical, military or social BECAUSE WE WERE and ARE NOT UNITED. SO naturally the only solution is to be united without referring to caste, creed, race or colour. So, the aim of SANGHA is not to create one distinct organization but TO ORGANIZE AND UNITE COMPLETE SOCIETY,AND THIS CAN BE DONE BY LOVE, AFFECTION and NON-DISCRIMINATION SO THAT EVERY INDIVIDUAL SHOULD FEEL THE BROTHERHOOD THAT WE ALL PLEDGE FOR RIGHT FROM OUR SCHOOL.(ALL Indians are my brothers and sisters). So, the sangha believes that every person of INDIA is a svayamsevak. Some were in past, some are in present and some will be in future. Hence you would never see swayamsevak being shy or vary of any community or cast because we think WHOLE SOCIETY IS PART OF RSS. Mag nondani karaychi tari konachi ani kuthe???? RSS madhe yayla konta form bharava lagat nahi ki konte nondani shulka dyave lagat nahi. Pratyek bhartiya by default RSS chya karyakstrat aahe. Mag kona konachi nondani ani kuthe. Now lets talk about Government... Well in the preamble of our constitution, WE declare that INDIA is sovereign state and that we consider all people equal and that we don't discriminate on basis of caste creed religion and sex. Then can you please answer why on every government form we have columns of these. What administrative posts have to do with our religions and faiths? Why every politician or neta tries to segregate people based on caste, creed, religion or a man? IF WE ARE TO BE TRULY UNITED, THE ONLY COMMON LINK IS OUR NATIONALITY. And I am sure that that is what our fathers including Dr. Ambedkar had in their mind while drafting the Constitution. So all in all I believe that RSS is much more near to our constitution in belief and IN WORK.
  I tried to solve your doubts as far as my intellect would take me.
  FOR A DETAILED ANSWER please visit this blog.
  http://rajas2l.blogspot.in/

  उत्तर द्याहटवा
 8. रामटेके साहेब, तुम्हाला संघात कधी जातीपातीवरून भेदभाव झाल्याचे अनुभवास आले आहे का?

  उत्तर द्याहटवा