मंगळवार, २५ जून, २०१३

जिंदगी की रांहो मे - जाफर अली खान   जिंदगी की राहो मे.. जिंदगी की राहो मे, रंजो गमे के मेले है.


भीड है कयामत की, भीड है कयामत की, और हम अकेले है.

     कोणाचं आहे गाणं? अर्रेर्रे... सांगता नाही येणार.


कारण भारतात हे गाणं कोणं कोणं गाऊन गेलं याची गिनती नाही. अगदी नाकातून गाणा-या कुमार सानू पासून तर आमच्या चंद्रपुरात येणारा जॉनी कव्वाल पर्यंत सगळ्यानी त्यांचे स्वत:चे वर्जन्स तयार करुन गायले आहेत. कित्येकाना तर मूळ गाणं कुणाचं हे ही माहीत नाही. तसा मी गजल रसिक म्हणून एकदम दर्दी रसीक आहे. माझे आवडते गायक व गझंला सांगितल्यास कित्येकांच्या भूवया उंचावतील. एका बाईनी तर फेबूवर चक्क मला झोडपून काढलं. बाईसाहेब म्हणल्या ’तू खोटं बोलतोयेस. तु रसीक बिसीक मुळीच नाहीस. हिंदुना झोडपण्यातुन वेळ मिळतो तुला?” वगैरे सुनावलं. असो.
तर मी बोलत होतो वरील गाण्या बद्दल... गाणच बरं का. कारण भारतीय वर्जन्समध्ये वरील काव्यातील गजल कधीच मेली. उरलं ते गाणं. जे प्रत्येकानी आपापल्या पद्धतीने गायलं.
माझं सुदैव असं की वरील गजंल मी १९८४ मध्ये आमच्या गडचिरोलीच्या रानात एका पंचायत समितीच्या धिका-याकडे चक्क अस्सल गायकाच्या आवाजात ऐकली. म्हणजे उस्ताद जाफर अली खानच्या आवाजात ऐकली. तेंव्हा  पासून आजवर या गजलेचे ते सूर आजुनही तसेच मेंदूत साठवल्या सारखे ताजे तवाणे आहेत. त्या नंतर आलेल्या अनेक वर्जन्सना म्हणूनच मी नाकारत गेलो. जाफर अली खानच्या दर्दी आवाजात ही गजल ऐकणे म्हणजे एक अलौकीक अनूभूतीच.
ही गजल ज्याच्याकडे  ऐकली त्या अधिका-याचे नाव (माहित नाही) आडनावे पांडे. हा पांडे अहेरीच्या पंचायत समितीत नोकरीला होता. मुळचा हा उत्तर प्रदेशचा. अन वरुन काय तर खुद्द तबला वादक. एवढच नाही तर गायकही. अहेरीत यानी १९८८ मध्ये संगित विद्यालय उघडलं. त्याच्याकडे एकसे बढकर एक गजलांच्या कॅसेट्स होत्या. याच्याशी ओळखी झाली अन संगित क्षेत्रातील दिग्गजांचे गाणे ऐकायला मिळत गेले. अशा अनेक दिग्गजांच्या आठवणी साठवून ठेवल्या आहेत. पण पहिले दिग्गज म्हणजे जाफर अली खान व त्यांची उपरोक्त गजल.
मी पांडेकरवी जाफरअली खानची कॅसेट उत्तर प्रदेशातुन मागवून घेतली. हजारोवेळा ऐकली असेल. आजही ती कॅसेट माझ्या संग्रहात आहे (फक्त टेपरेकॉर्डर बिघडला एवढेच,) आज एकानी अहेरीवरुन फोन करुन पांडेची आठवण काढली व ही गजल आठवून गेली. गजल ऐकण्याची तीव्र ईच्छा झाल्यावर  लगेच युट्यूबवर सर्च करुन गजल ऐकली. पार भुतकाळात हरवून गेलो.
तुम्हाला ऐकायची आहे? खालील धाग्यावर जा.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा