मंगळवार, २५ जून, २०१३

बीफ बिर्यानी:- आईना रेस्टॉरेंट, नानापेठ, पुणे.मला बडेकी बिर्यानी प्रचंड आवडते हे तर मागे मी लिहलेच होते. त्यावर काही लोकानी प्रचंड ओरडा करणा-या प्रतिक्रीया दिल्या, ज्या मी उडवून टाकल्या. काहिनी फोन करुन "हे एका बौद्धाला शोभते का?" वगैरे विचारले. त्यावर मी उत्तरलो "तुम्ही जाऊन आधी बुद्धिजम वाचून या" गेले ते गेलेच. आजून परत आलेच नाही. अन काहिनी मात्र फोन करुन पुण्यात कुठे कुठे चांगली बडेकी बिर्यानी मिळते याची चौकशी केली. मी सुखावलो. काही मित्रानी सांगितले की बडेकी बिर्यानी खातो ही गोष्ट ती लोकं बाहेर सांगत नाहीत. कारण गायीचं मटन खातो हे सांगितल्यास लोकं त्यांच्याकडे तुच्छतेने बघतात म्हणे. खुद्द आंबेडकरवादी सुद्धा गायीचे मटन खाणे वर्ज्य मानतात म्हणे. हे वर्ज्यचं कारण पानाती पाता वेरमणी... असेल तर ठीक आहे. पण मग तसं असेल तर हे पानाती पाता... फक्त गायीसाठीच का? सगळ्याच प्राणिमात्रासाठी हवं. जावई आला की कापतात कोंबळी. रविवार आला की आणतात मटन. कोकणात गेले की हाणतात मासे. मग तेंव्हा कुठे जाते पानाती पाता...? मी त्या मित्राना समजावून सांगितलं की गायीचे मटन काय नी बोकडाचे काय. आपल्यासाठी मटन हे मटन आहे. मॅटर संपलं. पण कुणी गाय पवित्र आहे वगैरेचे कारण सांगत असतील तर त्यांच्यासाठी माझं ठेवणीतलं उत्तर देण्याचा सल्ला दिला. ते उत्तर म्हणजे.
“गाय ही हिंदूसाठी पवित्र आहे म्हणूनच मी खातो. बौद्ध धम्मात मासं/मटन वर्ज्य नाही. खुद्द भगवान बुद्ध मटन खात असत. किंबहूना निर्वाणाच्या दिवशी ते डुक्कराची मटन खाऊन निर्वाणास गेले” हा युक्तिवाद करावा.  खाण्यापिण्यावरुन माणसाचं स्टेटस हिंदू धर्मात ठरत आपल्यात नाही. जे आवडत ते ते खावं. अगदी चीन मध्ये गेलात तर कुत्रं व सापही खातात हे तुमच्या लक्षात येईल.  मग काय चीनी माणूस तुच्छा आहे का? अजिबात नाही. म्हणजेच खाण्यावरुन माणसाचं स्टेटसं ठरत नाही. त्याच्या वर्तनावरुन ठरतं. अन खाद्यपदार्थ कुठले खावे हा ज्याच्या त्याचा वयक्तीक विषय आहे. वयक्तीक गोष्टीत ढवळाढवळ करण्याची ही खोड हिंदूची आहे. त्याची लागण काही बौद्धानाही झालेली दिसते. अशा बौद्धांवर ’ते आजून हिंदू असल्याची’ शंका येते.  कोणी काय खावं नि काय नाही खावं हे ज्याचं त्यानी ठरवावं. या देशातील संविधान व कायदा जर मोडत नसेल तर ते सगळ खाण्याचा तुम्हाला अधिकार आहे.
तसं गायीचे मटन खाणे ही बौद्ध असण्याची/बनण्याची अट मुळीच नाही. पण गाय पवित्र आहे म्हणून न खाणे म्हणजे आजूनही हिंदूच असल्याचा पुरावा मात्र नक्कीच ठरतो. असो.

माझ्या पुरता बोलायचं म्हटल्यास मला गायीचं मटन प्रचंड आवडतं. पुण्यातील काही खास होटेलं आहेत जिथे बीफ(गाय) बिर्याणी अत्यंत चवदार मिळते. त्यातलं पहिलं नाव म्हणजे आईना रेस्टॉरेंट.

हा आईना रेस्टॉरेंट नानापेठेत येतो. पुणे स्टॆशन ते स्वारगेटच्या रस्त्यावर स्टेशनकडून स्वारगेटला जाताना उजव्या हातावर पडतो. स्टॆशन सोडलात की स्वारगेटच्या दिशेनी जाताना मासेवाली कोळीनचा पुतळा येईस्तोवर बिनधास्त जा. पण एकदा हा कोळीनबाईचा पुतळा पार केलात की मग अर्धा किमीच्या आतच उजव्या हातावर हा आईना रेस्टॉरंट लागतो. नुसतं बिर्याणीच नाही तर बीफ अफगाणी, बीफ कबाब असे एकसे एक अफलातून डीशेस मिळतात.

आईना म्हणजे माझी आवडीची जागा. 
अन हो... एक महत्वाचं. ईथे गायीचं मटन खाणारे ५०% ग्राहक हिंदुच दिसतील तेंव्हा अवाक होऊ नका. 

आपला वार ठरला आहे... शुक्करवार!!!!!!!!!! 
***
***

1 टिप्पणी: