सोमवार, २२ जुलै, २०१३

गुरुपौर्णिमा आणि धम्मचक्रप्रवर्तनसुत्त!

आज गुरुपौर्णीमा. बौद्ध धम्मात गुरुपौर्णिमेला अनन्यसाधारण महत्वं आहे. त्याच बरोबर हिंदू धर्मात सुद्धा गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. बाबासाहेब लिखीत बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथात येणारी कथा अशी. सिद्धार्थ गोतम गृहत्याग करुन सत्याच्या शोधात रानात निघून जातात. तपश्चर्या करत असताना रानात त्याना पाच तपस्वी/सन्यासी भेटतात. मग काही दिवस ते सिद्धार्था सोबत तपश्चर्या करतात.  काही दिवसानी भगवान बुद्ध अन हे पाच सोबती वेगवेगळ्या मार्गानी निघून जातात. नंतरच्या काळात भगवान बुद्धांची व त्या पाच सन्यास्यांची साधना आपापल्या मार्गानी चालू असते. अन एके दिवशी सिद्धार्थला बुद्धत्व प्राप्त होते. बुद्धत्व प्राप्त झाल्यावर पहिला प्रश्न असतो की हे प्राप्त झालेले ज्ञान कुणाला द्यावे. सुरुवातीला बुद्ध ठरवतात की सामान्य माणसाला कळेल असे हे ज्ञान नाही त्यामुळे कुणालाच दयायचे नाही. पण थोडा विचार केल्यावर बुद्धाच्या लक्षात येते की ध्यानसाधनेच्या सुरुवातीच्या काळात त्यांच्या सोबत जे पाच तपस्वी/सन्यासी होते त्याना धम्मज्ञान देता येईल. कारण ते पाच तपस्वी  ज्ञान ग्रहण करण्याच्या व समजण्याच्या योग्यतेचे होते.
मग भगवान बुद्धानी त्या पाच सन्यास्यांचा शोध सुर केला. काही दिवस रानावतानातून प्रवास करत भगवंतानी शेवटी त्याना शोधुन काढलं. मात्र सन्यासी बुद्धावर रागावलेले असतात. जेंव्हा तथागत भगवान बुद्ध त्या सन्यांसांजवळ पोहचतात तेंव्हा नाराज झालेले सन्यासी भगवंताचा धिक्कार करण्याचे ठरवून असतात. कुठल्याही परिस्थीतीत बुद्धाला स्विकारायचे नाही या मतावर ते ठाम असतात. पण साक्षात बुद्ध जेंव्हा त्यांच्या पुढे उभा राहतो तेंव्हा त्या सन्यास्यांच्या मनातील घृणा नष्ट पावते. नकळत ते बुद्धाची सेवा करु लागतात. एक सन्यासी अंथरुन हातरतो, दुसरा पाय चेपुन देतो... अशा प्रकारे सगळे आपला क्रोध विसरुन बुद्धाची सेवा करु लागतात. तथागत भगवान बुद्धाच्या करुणेचा हा प्रभाव असतो. अन बुद्ध धम्मातील पहिलं प्रवचन सुरु होतं. तथागतानी बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर दिलेलं हे पहिलं धम्म-प्रवचन... या प्रवचनाला धम्मचक्रप्रवर्तनसुत्त म्हणुनही ओळखले जाते. बुद्धानी दिलेलं हे पहिलं धम्म प्रवचन बरोबर आजच्या दिवशी म्हणजे आषाढ पौर्णिमेला झालं होतं. हे प्रवचन ऐकुन पाचही सन्यास्यांचे मतपरिवर्तन होते अन त्या पाचही जणानी बुद्धाला गुरु म्हणून स्विकारलं. धम्मातील मुख्य प्रचारकांच्या गुरुदिक्षेचा हा दिवस. त्या नंतर हे पाचही सन्यासी धम्म दिक्षा घेऊन बौद्ध धम्माच्या प्रचारासाठी आयुष्य झोकुन देतात. आज आपण जो बौद्ध धम्म पाहतो त्याची सुरुवात अशी झाली. संघ म्हणुन ज्याला आपण सरणं जातो त्या संघाची सुरुवातही आजचीच. म्हणजेच आषढ पौर्णिमेची. 
म्हणुन बौद्ध धम्मात आषाढ पौर्णिमेला अनन्यसाधारण महत्व असून आपण सगळे हा दिवस गुरुपौर्णिमा म्हणुन पाळतो.
सर्वाना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

जयभीम
***

शनिवार, २० जुलै, २०१३

विठ्ठलाची शासकीय पुजा, हा जातीवादच!विठ्ठल हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत असून महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे असं आपण नेहमी ऐकत असतो. ते खरच आहे हे सिद्ध करणारा पुरावा म्हणजे विठ्ठलाची शासकीय पुजा मुख्यमंत्र्याच्या हस्ते पार पडते. इतर कुठल्याही राज्यात राज्याचा मुख्यमंत्री धार्मिक विधीला शासनाची ड्यूटी बनवुन टाकल्याचे माझ्यातरी वाचणात नाही. पण महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांना मात्र विठ्ठलाची पुजा शासकीय कार्याच्या अखित्यारित आणून ठेवले आहे. थोडक्यात ती शासनाची ड्यूटीच बनली आहे. केवढा हा मुर्खपणा! आता कोणीतर उठून म्हणेल की त्यात काय एवढं? ते रमजानच्या इफ्तार पार्टिलाही जातात... पण ते नुसतं खायला जातात हे आपण विसरतो. बाकी नमाज गिमाज पढल्याचं मी तरी कधी वाचलं नाही. पण पंढरीची पुजा ज्या प्रकारे शासकीय जबाबदारी म्हणून केली जाते त्या पद्धतीने कोणताचा कार्यक्रम केल्या जात नाही. एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्याने अशी पुजा करावी हे भारतीय संविधानाला मान्य आहे की नाही हे सुद्धा तपासले जात नाही. किंबहुना संविधानाला फाट्यावर मारत हे केले जाते. अन तमाम पुरोगाम्यांच्या गटातून विरोधाचा एक सूर उमटत नाही, कवढं दुर्दैव!
बरं यामुळे वारी करणा-या वारकरी गुंडाना मोठं बळ मिळतं. वारकरी नावाची झुंडशाही दिवसेंदिवस मस्तवाल होत जाण्यामागे हे ही एक कारण आहेच. कारण इथे झुंडशाहीने बरच काही साधता येत. वरुन मुख्यमंत्री खुद्द या झुंडीत मिसळतात म्हटल्यावर त्याना चेव चढणारच. मग मोर्चे काय, नि संप काय नि रास्तारोको काय इथ पर्यंत या झुंडशाहीची मजल जाते. त्यात दोष कोणाचा? झुंडीला अप्रत्यक्षपणे अभय देणा-या मुख्यमंत्र्याचा दोष नाही का?
वर या जोडीला दुसरा प्रचार काय असतो तर ही भुमी म्हणे संतांची... हा तर पुरोगामी महाराष्ट्राचा घोर अपमान आहे. ज्या भुमिला शाहू, फुले व  आंबेडकरांच्या विचाराचा वारसा आहे. ज्या मातीत वैचारीक क्रांती घडवत उभ्या भारताचं, इथल्या रंजल्या गांजल्याचं व स्त्रीयांचं उद्धार करण्याचं अलौकीक कार्य झालं, मानवी मुल्याचा आग्रह धरत स्वातंत्र्य, समता व बंधूता राबविण्यात आली अन पुरोगामी राज्य म्हणून ज्याची सर्वत्र ख्याती आहे अशा राज्याला संतांची भुमी म्हणणे म्हणजे अपराध नाही का? ज्या संतानी समाजीक समतेसाठी कधी एक ओळ लिहली नाही, ज्या संतानी इथल्या माणसाला कायम देवाच्या नादी लावून अधू बनवत नेलं. ज्या संतानी देवाच प्रचार व अंधश्रद्धेचा शापित वारसा दिला अशा संतांचं नाव या भुमिला देणे म्हणजे इथल्या पुरोगामीत्वाच्या गालावर थापड मारणे नव्हे का?
बरं टेक्नीकली विचार केला तर इथे फक्त हिंदूच राह्तात का? अजिबात नाही. इथे हिंदू, मुस्लीम, बौद्ध, ख्रिश्चन व इतर समाजातीलही लोकं राहतात. याचा अर्थ ही भुमी या सर्वांचीच आहे. मग सगळ्यांच्या भुमिला संतांची भुमी म्हणणे म्हणजेच हिंदूंची भुमी म्हणणे याचा काय अर्थ होतो? हा प्रकार म्हणजे महाराष्ट्राचा सातबारा हिंदूच्या नावे करण्याचा डाव आहे की काय? या मागे काही दिर्घकालीन नियोजन असेल का? मलातरी वाटते नक्कीच तसं काहीतरी आहे. पुढचे शंभर दिडशे वर्ष सतात हा प्रचार करायचा की ही संतांची भुमी व विठ्ठल हे महाराष्ट्राचं आराध्यदैवत अन मग हळू हळू इतर समाजाला पिटाळून लावायचं. ते जमलं नाही तरी त्याना दुय्यमत्व देण्याचं काय तरी नक्कीच साध्य होईल. त्यातून गैर हिंदूना असुरक्षितता वाटू लागली व लोकं घाबरले की घाबरलेल्या समाजाला संपवायला फार कष्ट लागत नाही. म्हणजे आज जो प्रचार चालु आहे की महाराष्ट्र ही संतांची भुमी व विठ्ठल हे इथलं आराध्य दैवत आहे वगैरे... त्याचा दुरागामी परिणाम असा होऊ शकतो. अगदी याच्या उलटही परिणाम उमटू शकेल. हा प्रचार फार वाढायला लागला की हिंदुत्तर समाज असुरक्षिततेच्या भावनेतुन जाताना एकवटून जाईल व त्यातुन हिंदु विरुद्ध हिंदुत्तर असे दोन गट पडतील. मग हिंदू विरुद्ध इतर अशा दंगली उसळण्याचीही शक्यता आहेच. असो, ह्या सगळ्या झाल्या शक्यता.
पण माझं म्हणण असं आहे की, जो महाराष्ट्र सर्व लोकांचा आहे त्याच्या मानगुटीवर विठ्ठल नावाचा हिंदू देव माहाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणून बसविण्याचे कारणच काय? विठ्ठलाला न माणणारा समाज कोटीच्या कोटी संख्येनी असताना व विठ्ठलाचं अस्तित्वच नाकरणारा पुरोगामी समाज इथे शाबुत असताना विठ्ठल हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे म्हणणं म्हणजे कावा नव्हे का? त्याच बरोबर ज्या संतांना हिंदू समाजाच्या पलिकडे कोणी विचारतही नाही अशा संतांच्या नावाने या भुमिला संबोधने म्हणजे या भुमीचा व इथल्या हिंदुत्तरांचा अपमान नव्हे का? गैरहिंदूवर हिंदू लेबल चिटकविण्याचा हा प्रकार म्हणजे अन्यायकारक तर आहेच पण नेमकं आपण कुठल्या दिशेनी वाटचाल करतोय? परत एकदा इथे जातीयवाद रुजवायचा विचार आहे की कसं?
बर आपलं संविधान हे सेक्युलर आहे, म्हणजे निधर्मी आहे. संविधानाला कुठलाच धर्म मान्य नाही. भारतीय संविधान हे सर्व धर्म समभाव जपत नाही. तो धर्माला तुमची वयक्तीक बाब मानत असून ज्यानी त्यानी आपापल्या घरात तो पाळावा असं सांगतो. मग अशा देशात एका राज्याचा मुख्यमंत्री उठून हिंदू धर्माच्या देवाची शासकीय पुजा करतो हे गैरसंविधानिक कार्य नाही का? सगळ्यांच्या राज्याला विठ्ठलाचे नाव देणे इतर धर्मियांचा अपमान नव्हे का? याच बरोबर हिंदूच्या संताची भुमी म्हणून संबोधने म्हणजे इतर धर्मियांच्या बोकांडी हिंदू संत बसविणे नव्हे का? अन हा सगळा प्रकार संविधानाच्या चौकटीत बसत नसुनही ते करण्या मागचा हेतू काय?
ज्याना विठ्ठलाचा व संतांचा पुडका आहे त्यानी खुशाल कराव पण ते शासनाने करावं हा मात्र शुद्ध जातीयवाद आहे. आमच्याशी केलेली ही दगाबाजी आहे. 
सरकारनी संविधान तपासून पहावे. ही पुजा संविधानात बसते का? अन बसत नसेल तर मग कशी काय केली जाते? आज ना उद्या ही शासकीय पुजा बंद करावीच लागेल. कारण विठ्ठलाची शासकीय पुजा म्हणजे जातीयवादच!