गुरुवार, ११ जुलै, २०१३

बाबरी प्रकरणानंतर आली बुरख्यांची लाट...१९९० पर्यंत आमच्या भामरागडात अर्धी वस्ती मुसलमानांची होती व अर्धी गोंडांची उरलेली थोडी वस्ती मात्र माडीया समाजाची. आजही जवळपास ते प्रमाण तसच आहे. पण तो जुना मुसलमान आता राहैला नसून तो कट्टरपंथी बनल्याचं दिसतं आहे. माझं सातवीच शिक्षण भामरागडातील समूह निवासी शाळेत झालं. सुरुवातीला काही दिवस मी कारमपल्लीवरुन ये जा करायचो पण प्रचंड पाऊस व रानातील वाट असल्यामूळे भामरागडातच राहायचं ठरलं. सय्यच नावाचा एक मुसलमान आमच्या ओळखितलं होतं. तसं भामरागडचे १००% मुसलमान आमच्या ओळखितलेच, पण हे सय्यद चाचा जरा जवळचे. किती जवळचे तर माझ्या अजोबा पासून त्यांचे-आमचे घरोब्याचे संबंध होते. जेंव्हा आईनी माझ्या येण्या जाण्याची अडचण त्याना सांगितली तेंव्हा सय्यद चाचा म्हणाले “रख दो इसे मेरे घर. मेरे तीन बच्चे है, उनके साथ ये चौथा भी रहेगा और पढेगा” अन माझं शिक्षण सुरु झालं. असा हा जिव्हाळा त्या काळात होता. त्यांच्या बायका पोरांत मी मिसळून जायचा एवढं ते माणूसकीचं नातं होतं. आज मात्र ते हरवत चाललं आहे. 
त्या काळात म्हणजे १९९० च्या दरम्यानची गोष्ट भामरागडात दोनच मुख्य दुकानं होती. एक रहेमतुल्लाचं अन दुसरं बब्बू शेठचं. दादू नावाचा फोटोग्राफर होता अन त्याचा स्टुडीओ होता. जवळपास सगळ्याच घरात पोरी होत्या व त्यातल्या काही पोरी आमच्या सोबत शिकायलाही होत्या. मुसलमानांच्या बायका कपडॆ धुण्यासाठी पर्लाकोटा नदीवर जात असत. त्या काळात एकही मुसलमानाची पोरगी वा बाई बुरखा घालत नसे. नुसतं भामरागडच नाही तर पुढे मी अहेरीत शिकायलो गेलो तेंव्हा तिथेही मुसलमानांची संख्या उल्लेखनीय होती व आजही आहे पण तिथेही कधी बुरखा घालून रस्त्यातून चालणारी बाई बघितली नाही. ईशरत शेख नावाचे अहेरीचे एक इसम आमच्या कुडकेल्लीत शिक्षक म्हणून होते. त्यांच्याशी आमचे चांगले संबंध असल्यामूळे अहेरीत असताना मी बरेचवेळा त्यांच्या घरी जायचो. त्यांच्याही घरात मी कधी बुरखा घातलेली बाई पाहिली नाही. अहेरी गावात तर सोडाच पण अगदी मुसलमानाच्या लग्न कार्यातही कधी बुरखा घातलेली बाई आठवत नाहीय. अगदी हेच वातावरण आलापल्लीतही होतं. आलापल्लीतही खूप मुसलमान आहेत. पठाण नावाच्या कुटुंबाशी तर आमचा घरोबा होता. पण तिकडेही कधी बुरखा हा प्रकार पाहिला नव्हता. थोडक्यात नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात आमच्या भामरागड प्रांतातील कुठल्याच मुसलमान स्त्रीला मी बुरखा घातलेलं पाहिलं नाही. पण आता मात्र अगदी अहेरी ते भामरागड पर्यंत सर्वत्र बुरखाधारी बायका दिसू लागल्या. हे अचानक आमच्या रानातल्या मुसलमानाना काय झाले कोण जाणे? आजवर यांच्या बयका बुरखा न घालता राहायच्या पण आज मात्र त्याना ते चालत नाही. अचानक नवा नियम निघाला व तिकडे काळ्या वेषातल्या बायका दिसू लागल्या . माझ्यासाठी ही धक्कादायक बाब होती.
मागच्या रविवारी मी संजय साहेबांशी यावर चर्चा केली. त्यांचं म्हणनं असं पडलं की बाबरी मशीद पाडल्या पासून मुस्लिमांत जी असुरक्षीततेची भावना जागृत झाली हा त्याचा परिणाम आहे. त्यांचं म्हणणं पटलं. कारण हा बदल मी स्वत: पाहिला आहे. वीस वर्षा पुर्वी मुस्लीमाना इथे तेवढं असुरक्षीत वाटत नसेल जेवढं बाबरी प्रकरणा नंतर वाटू लागलं. अन यात आजून एक प्रकार असा आहे की बाबरी प्रकरणाआधी इथे हिंदू-मुस्लीम दंगे होत पण आतंकवादी हल्ले होत नव्हते. मशीद पाडल्या नंतर मात्र देशभर आतंकवादी हल्ले सुरु झाले. आज आम्ही जरी मुस्लिमाना आतंकवादी म्हणतो तरी त्यांना आतंकवादी बनविण्यात बाबरी प्रकरणाने हातभार लावला हे मात्र नाकारता येणार नाही. दिवसेंदिवस इथला मुसलमान असुरक्षीत होत गेला अन त्यातून त्यांची एकी तर वाढत गेलीच पण त्यामूळे आतंकवादाला पाय रोवता आले. तरी माझं वयक्तीक म्हणणं असं काही की बाबरी पाडल्यामुळे त्याना असुरक्शीत वाटणे जरी स्वाभावीक असले तरी त्या कारणामूळे आतंकवादी बणणे हा काही त्यावरील उपाय नव्हता. इथे इतर समाजावरही अत्याचार होत असतात. अगदी बौद्धांवर अनेक हल्ले होत असतात. मग काय बौद्धानी आतंकवादी बनायचं का? अजिबात नाही. बौद्ध समाज अत्यंत सांमंजस्यानी व संविधानीक मार्गानी विरोध करतो. मुस्लीमानाही हा मार्ग मोकळा असताना ते आतंकवादी बनू लागले ही गोष्ट चुकच. थोडक्यात हा समाज भरकटत चालला आहे हेच खरे.
बाबरी मशीद पाडण्याचा दूरागामी परिणाम जर काही झाला असेल तर मुस्लीमांना असुरक्षीत वाटून ते आजून कट्ट्रर बनत गेले. अन आमच्या राना वनात राहणा-या मुस्लीम बायकांच्या अंगावर अचानक बुरखा आला. कारणं काहीही असो, पण त्यांचा हा कट्टरवाद अगदी रानातही ओसंडून वाहात आहे ही गोष्ट दुर्दैवीच. २० वर्षा आधी जिथे बुरखा माहितही नव्हता तिथे आलेली बुरख्यांची लाट पाहता हा समाज कुठल्या दिशेनी चालला आहे ते स्पष्ट दिसत आहे. कोणीतरी याना आवरलं पाहिजे. बुरखा ते बॉंम्ब हा प्रवास घडायला जास्त वेळ लागणार नाही. आजून तरी हे आतंकवादी आमच्या भामरागडात पोहचायचे आहेत. पण तिथला बुरखा प्रवास पाहता ते दिवस दूर नाही जेंव्हा भामरागडातून आतंकवादी पकडले जाउ लागतील.

थोडक्यात आता मुसलमान हा भारतीय समाजासाठी घातकी समाज बनत चालला आहे. असुरक्षिततेच्या नावाखाली त्याला आतंकवादाची सूट देता येणार नाही. त्याच बरोबर राजकीय समिकरणांतून या भस्मासुराला वरदानही मिळता कामा नये. आज कायद्याचा फास आवळत मुसलमानांना शिस्त लावली नाही तर हा कट्टरपंथी समूह एक दिवस आपल्याला फस्त करुन टाकेल.

जयभीम
***

१५ टिप्पण्या:

 1. दलाई लामांच्या वाढदिवस सोहळ्यावर गोळीबारबीजिंग : चीनच्या शिचुआन प्रांतातील डौफू शहरात सर्वोच्च बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी एकत्र जमलेल्या भिक्खू आणि अनुयायांवर चिनी पोलिसांनी अंदाधुंद गोळीबार केल्याचे समोर आले आहे. या घटनेत दोन भिक्खूंसह अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. चीनची तिबेटविषयीची भावना अजूनही कट्टरवादी असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. दलाई लामांचा वाढदिवस मोठय़ा हर्षोल्हासात साजरा करण्यासाठी जमलेल्या तिबेटीयन नागरिकांवर चीनच्या पोलिसांनी बेछूट गोळीबार केला. ६ जुलै रोजी लामा यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिबेटीयन लोक एकत्र जमले होते. यावेळी दलाई लामा यांच्यासाठी प्रार्थना करीत असतानाच पोलिसांनी बळाचा वापर केला. सुरुवातीला अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, त्यानंतर बेछूट गोळीबार केला. या घटनेत अनेक जण जखमी झाले आहेत. या गोळीबाराच्या घटनेची माहिती नसल्याची प्रतिक्रिया चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. आंतरराष्ट्रीय पत्रकारांना घटनास्थळी जाण्यास मज्जाव करण्यात आला होता. त्यामुळे या घटनेविषयी अधिक माहिती माध्यमांना तात्काळ मिळविता येऊ शकली नाही. दलाई लामा यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी डौफा येथे मोठय़ा प्रमाणावर बौद्ध भिक्खू जमले होते. त्यामुळे या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटाही तैनात करण्यात आला होता. एकत्र जमण्यासाठी पोलिसांनीही प्रतिबंध लादले होते, अशी माहिती समोर आली आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता पोलिसांनी अंदाधुंद गोळीबार केल्याचे काही भिक्खूंनी सांगितले आहे.

  उत्तर द्याहटवा
 2. sir je kahi bihar madhe ghadla te nindayi mi tyacha nished karto pan ya hallya madhe rajkaran pan asu shakte yala pan nakarta yet nahi Myanmar madhe je kahi ghadat hota tyacha parinam tyach widi bharta jhala asta ase kahi ghadla nahi manuwadi loka muslim any Ambedkar wadi lokann madhe phot padnya cha shadiyantr tar kela nsaw .

  उत्तर द्याहटवा
 3. उस्ताद जैद,
  मला कोणावरही व्यक्तीगत राग नाही. पण बौद्ध गये सारख्या ठिकाणी हल्ला होणे म्हणजे मी हे सहनच करु शकत नाही यार........
  डोकं काम करणं थांबलं आहे.

  उत्तर द्याहटवा
 4. Madhukar sir
  Mi tumche sarva lekh shantpane vachale ahet pan boudh gayevaril halla ha mazya gharavaril halla vatto mhnun mi ragane tumhala tyabaddal pratikriya dyayla sangitli hoti. Mi ajparyant kadhich tumhala pratikriya vicharli navti. Pan tya ghatnene mi ajahi asvastha ahe.
  Ata rahila prashna musalmanacha trr mala vatat ek don bhartatlya muslim sanghatnani nishedh karun kay honar ahe? Sampurna bhartatlya musalmanani yacha nishedh kela pahije. Nahitrr lakshat theva ha baudha samaj kadhihi tumchi sath dharnar nahi. Amchi ektari ghatna athva ki amhi tumchya pavitra goshitinvar kadhi halle kelet ka te?
  Ata sanyam sampla ahe. Ustad zaid jar nishedh sampurna muslim community ne nondavla nahi trr yapude amchyakade pahanach sodun dya.
  Ani ya nishedhachi mi jasta vatsudha baghnar nahi.

  JAIBHIM

  उत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. माझं पण डोकं काम करत नाहीये.
   मुस्लीमांची ईथवर मजल जातेच कशी?
   साला सकारला लाज वाटली पाहिजे.

   हटवा
 5. Aplyamadhe phut padayla Ustad zaid apan ek kute ahot?
  Tumhi kadhi amhala javal kela? Ustad zaid itihas(agadi ambedkaranchya kalatala tari) vachala tari lakshat yeil ki musalman he amhala parke ani jatibhed mannarech ahet.
  Mazya mate sarva bhartiya musalmanane boudhgayevar zalelya ghatnecha tivra nished nondvava. Teva tari vatel ki musalman amchya sobat ahet pan musalmanachi amhala garaj nahi. Karan asha hinsak ani krur samajasobat rahane mhnje sarva vinasshhach.

  उत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. बुद्धगया स्फोट प्रकरणी श्रीलंकन महिलेला अटकhttp://shar.es/ABch2

   हटवा
  2. मला वाटते आपण आता थांबू या अन तपास होईस्तोवर वाट पाहू या.

   हटवा
  3. tech yogye rahil any majha charcha karnya cha hitu tya antang wadi lokanna bathishi ghalnya sathi nahi ahe .

   हटवा
 6. टाइम्स न्यूज नेटवर्क । नवी दिल्ली

  संसद आणि मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यांमागे सरकारचाच हात होता, असा दावा इशरत जहाँ एन्काउंटरप्रकरणी चौकशी करणाऱ्या सीबीआय-एसआयटी टिममधील एका अधिकाऱ्याने केला होता, अशी खळबळजनक माहिती आधी गृहमंत्रालयात अवर सचिव असलेल्या व आता नगरविकास मंत्रालयात उपअधिकारी असलेल्या आर. व्ही. एस. मणी यांनी चव्हाट्यावर आणली आहे.

  १३ डिसेंबर २००१ रोजी संसदेवर झालेला दहशतवादी हल्ला पोटा कायद्याला (दहशतवादविरोधी कायदा) बळकटी देण्यासाठी घडवून आणण्यात आला, तर २६/११ ला मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागेही सरकारचे षढयंत्र होते. बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्यात (यूएपीए) महत्वाचे बदल करण्यासाठी हा हल्ला झाला, असे गुजरात केडरचे आयपीएस ऑफिसर सतीश वर्मा यांनी आपल्याला सांगितले होते, असे मणी यांनी स्पष्ट केले. संसदेवरील हल्ल्यानंतर देशात पोटा कायदा लागू करण्यात आला, तर मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतरच बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्यात सुधारणा झाल्याचा दावा करत वर्मा यांनी आपले म्हणणे कसे योग्य आहे, हे सांगण्याचा प्रयत्न केला होता, असेही मणी यांनी सांगितले आहे.

  विशेष म्हणजे मणी हे केंद्रीय प्रशासनातील एक जबाबदार आणि वरिष्ठ अधिकारी आहेत.

  उत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. झैद साहेब,
   बातमीत दम वाटत नाहीये. अन हे जर सत्य असेल तर मग या एवढं दुर्दैव नाही.

   हटवा
  2. http://www.searchmobileonline.com/?sourceid=6&app=FjVzy6lNtPXXdLiZf5LJmDfkasifzP%2Fbl%2BtfJABpE0l4uqt5ME1MTnuDqFpVARjAI%2FLlB0gQuKKHpSR1SOJYKAt4nkPhdf0A

   हटवा
 7. मशिदीवरील हल्ल्यानंतर कोलंबोत संचारबंदीकोलंबो : बौद्ध धर्मियांच्या राष्ट्रीय समूहाकडून कथितरीत्या एका मशिदीची तोडफोड केल्यानंतर धार्मिक दंगल उसळू नये म्हणून श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये पोलिसांनी शनिवारी संचारबंदी लागू केली होती. मशिदीवरील हल्ल्यात जवळपास ७ प्रार्थनाकर्ते जखमी झाल्याचे वृत्त आहे. जखमींपैकी चौघांना उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आल्याचे कोलंबोतील मशिदीचे विश्‍वस्त हामीद यांनी सांगितले. बौद्ध धर्मीय आणि मुस्लिम युवक यांच्यातील संघर्ष रोखण्याचा प्रय▪करीत असताना दोन पोलीस जखमी झाले आहेत. मशिदीच्या संरक्षणासाठी काही मुस्लिम युवक एकत्र जमले होते. यावेळी बौद्ध आणि मुस्लिम यांच्यात संघर्ष उडाल्याचे सूत्रांनी सांगितले. २0 दशलक्ष लोकसंख्या असलेल्या श्रीलंकेमध्ये ९ टक्के मुस्लिम समुदाय आहेत. बौद्धांच्या राष्ट्रीय समुदायाने चालविलेल्या मुस्लिमविरोधी चळवळीचा भाग म्हणून मशिदीवर कथितरीत्या हल्ला झाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर मुस्लिम समुदायाने सुरक्षा देण्याची मागणी केली आहे. आमच्या संयमाला र्मयादा आहे, परंतु संयम सुटेल असे कोणीही वागू नये, असे मुस्लिम कार्यकर्ते मोहम्मद मिफलाल यांनी म्हटले आहे. मुस्लिमांची वाढती लोकसंख्या आणि बाजारपेठांवरील वर्चस्व यामुळे देशावर कब्जा होण्याची शक्यता असल्याचा आरोप बौद्धांनी केला आहे. गेल्या सप्टेंबर महिन्यात मुस्लिम व्यापार्‍यांवर ३0 हल्ले झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.     

  उत्तर द्याहटवा