शुक्रवार, १२ जुलै, २०१३

...तर वारक-यानी त्यांच्या बायका पोरी बटिक म्हणुन विकाव्याआजचा लोकमत हातात घेतला अन वारक-यांची मागणी वाचून हादरुन गेलो. वारकरी सांप्रदाय हा कायम जातियवादी राहिला व आहे हे सर्वज्ञात आहे. यांचे संत व विठ्ठल भक्ते ते आजच्या हरी भक्तां पर्यंत एकानेही सामाजीक समतेचा लढा दिला नसून यांचा लढा हा कायम आध्यात्मिक समतेचा होता, ज्याचा समाजाला काहीएक उपयोग नाही. देवाच्या दारात आपण सगळे समान म्हणा वा तू मोठा भक्त की मी मोठा भक्त याचा दावा करणारा ला लढा होता. सामाजिक समता व वारकरी याचं कधीच व काहीच संबंध नव्हता.  उलट हे वारकरी जातीयवादी होते व समाजातील तळा गळातल्या लोकांची पिळवणूक करणारेच होते. बाबासाहेबानी सामाजिक क्रांती करत जातीयवाद मिटविण्याचा प्रयत्न केला अन आता कुठे तो मिटण्याचा मार्गावर असल्याची चिन्हे दिसत आहेत. पण जातीयवादी वाकर-याना तर जातीयवादच हवा आहे. त्याना सामाजिक समता व परस्परांमध्ये बंधूत्व नकोच आहे. म्हणुन तर काल त्यानी चक्क जातीयवादाची मागणी करणारा ठराव पास करुन टाकला.
लोकमतची बातमी काय आहे ते पहा...
“आज (गुरुवारी) मालक बाळासाहेब आरफळकर यांच्या अध्यक्षतेखाली दिंडी समाजाची बैठक झाली. बैठकीला सोहळाप्रमुख डॉ. प्रशांत सुरू, दिंडी संघटनेचे अध्यक्ष भानुदास महाराज ढवळीकर, श्री समस्त वारकरी, फडकरी, दिंडी समाज संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्‍वर माऊली जळगावकर, नीलेश बाबा कबीर, राणू महाराज वासकर, बाबूराव चोपदार, राजाभाऊ चोपदार आदींसह दिंडीकरी बहुसंख्येने उपस्थित होते...
वारकर्‍यांची वाढती संख्या लक्षात घेता पालखी तळ अपुरे पडू लागले आहे. त्यासाठी प्रत्येक मुक्कामाच्या जागी किमान ५0 एकर जागा आरक्षित करण्यात यावी, संत वाड्मयातच जातीचा उल्लेख असल्याने, जातीचा उल्लेख केला म्हणून वारकर्‍यांवर अँट्रॉसिटी कायद्याखाली कारवाई केली जाते....
आम्ही ज्या मागण्या करीत आहोत, त्या केवळ आमच्याशी निगडित नसून त्यांचा जनतेलाही फायदाच होणार आहे. गोवंश हत्याबंदी, वारकर्‍यांवर अँट्रॉसिटी, अंधश्रद्धा निर्मूलन विधेयक या बाबी मात्र वारक-यांच्या भावनांशी खेळण्याचे काम शासन करत आहे...” तर ही आहे लोकमतची बातमी.....
वारक-यांच्या वरील इतर मागण्यां बद्दल मला काही बोलायचे नाही. पण त्यानी हळूच जातीयवादाची मागणी केली आहे हे ध्यानात घेण्यासारखे आहे. मालक नावाचे कोण आरफळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत जातींची मागणी करण्या आधी त्यानी एक हास्यस्पद युक्तिवाद केला. ते म्हणतात “संत वाड्मयातच जातीचा उल्लेख असल्याने, जातीचा उल्लेख केला म्हणून वारकर्‍यांवर अँट्रॉसिटी कायद्याखाली कारवाई केली जाते.” या वाक्याचा अर्थ काय होतो? संत वांगमयांत जातीचा उल्लेख असल्यामुळे वारक-याना तो करण्याची मुभा असावी. म्हणजे वारकरी गुंडाना परत एकदा जातीयवाद राबवायचा आहे. याच वाक्यात वारकरी गुंड हे नेहमी जातीचा उल्लेख करत असतात अन वेळोवेळी त्यांच्यावर अट्रोसिटीच्या अंतर्गत गुन्हे दाखल होतात हे सिद्ध करणारे शब्द आहेत ते असे... “जातीचा उल्लेख केला म्हणून वारकर्‍यांवर अँट्रॉसिटी कायद्याखाली कारवाई केली जाते.”  हे वाक्य म्हणजे वारक-यांच्या जातीयवादी कृत्यांची थेट कबुलीच आहे. वरील वाक्य हेच सांगते की वारकरी हे जातीयावदी असून हा जातीयवाद राबविताना कायद्याचा बडगा आडकाठी ठरत आहे. म्हणुन आता तो बडगाच दूर करुन आम्हाला मोकाटपणे जातीयवाद करु द्यावा. अन युक्तिवादासाठी कारण काय पुढे केले तर... जातीयवादाचा उल्लेख संत वांगमयात आहे. म्हणजे जुन्या काळात आमच्या पुर्वजानी शेण खाला अन ते खाल्याचे घे घ्या पुरावे.... आता आम्हाला पण त्या आधारे शेण खाउ द्या... व्वा रे वारकरी!
जर बाळासाहेब आरफाळकर नावाचा कोणी मालक व त्याचा कंपू हा युक्तीवाद करत असेल तर मी आरफाळकर व टोळीसमोर असाच एक युक्तिवाद ठेवतो तो असा...
भारताच्या इतिहासाची पानं चाळली असता असे दिसते की मुस्लीम शासनाच्या काळात इथल्या लोकांच्या बायका व मुली बटिक म्हणून विकल्या जात असत. अन ह्या बटिकीनींचा शरीर संभोग पासून तर गुलाम पर्यंतचे अनेक उपयोग केले जात. या घटनाही तेवढ्याच सत्य आहेत जेवढे वांगमयात सापडणारे जातीयवादी उल्लेख. मग माझा युक्तिवाद असा आहे की माननिय सदस्य आरफाळकर व त्यांचा कंपू ही लोकं त्यांच्या बायका व पोरी बटिक म्हणून खुशाल विकाव्या, पैसे कमवावे अन जुन्या संदर्भाचे कौतूक व गुणगाण करावे. (आया बहिणीनी मला क्षमा करावी. हा संदर्भ तुमचा अपमान करण्यासाठी नसून फक्त युक्तीवादाचा भाग म्हणून आला आहे). कारण इतिहासातील पानांत इथल्या बायकां बद्दल बटिक म्हणून जो संदर्भ येतो त्या मोजपट्टीने मोजल्यास वरील कृत्य करायचा अधिकार मिळतो. किवा वारक-यांचे निकष लावल्यास यांच्या बायका व पोरीना बटीक ते वेश्या बनविण्याचा अधिकारही मिळतो. म्हणुन मी त्याना विनंती करतो की या सगळ्या वारकर-यानी त्यांच्या बायका व पोरी बटिक म्हणून विकाव्या.
गेली की नाय तळ पायाची आग मस्तकात ... गेली ना? अगदी माझंही असच झालं. ज्या जातींनी आम्हाला कुत्र्या-मांजरापेक्षाही खालचा दर्जा दिला, अस्पृश्य म्हणुन गावाबाहेर ठेवले त्या जाती संत वांगमयात आहेत एवढ्या कारणास्तव परत आणाव्यात वा पाळू दिल्या जाव्यात. आहे की नाही हरामखोरी या वाकर-यांची? जर माझा वरील युक्तीवाद अतर्क्य वाटत असेल वा बाद ठरत असेल तर हे वारकरी नावाचे हरामखोर व जातीयवादी गुंड जी मागणी करत आहेत की संत वांगमयात जातीचा उल्लेख आढळतो म्हणून आम्ही जातीभेद पाळल्यास आमच्यावर अट्रोसीटी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल होऊ नये.... तर ही मागणीही अतर्क्य व बादच ठरते.
जातीयवादाची मागणी करताना संत साहित्याचे संदर्भ देणारे हे नालायक कसे विसरतात की त्या जाती म्हणजे माणूस म्हणुन आमचा अपमान करणा-या होत्या. आमच्या स्वांत्रत्यावर बलात्कार करणा-या होत्या. एवढेच नव्हे तर वर्षानुवर्षे आमचे शोषण करण्यास व अंधकारात ढकलणा-या त्या जाती कारणीभूत होत्या. आम्हाला गुरा ढोरांपकेक्षा कमी लेखणा-या जाती संत वांगमयाच्या नावाखाली परत आमच्यावर लादण्याचा हा वारक-यांचा डाव म्हणजे परत एकदा इथल्या आंबेडकरी समाजाला गुलाम करण्याचं षडयंत्रच होय. वारकरी नावाचे गुंड फार माजत चालले  आहेत हे मागच्या काही वर्षात आपण पाहातच आहोत. पण आज मात्र वारक-यांच्या टोळीतून जी जातीयवादाची मागणी झाली व जो युक्तीवाद केल्या गेला ते पाहता मी एवढच म्हणेन.
जर संत वांगमयातील जातीय संदर्भ देत तुम्ही जातीयवादाची मागणी करत असाल तर इतिहासातील संदर्भ देत मी हे म्हणतो की सर्व वारक-यानी आपल्या बायका व पोरी बटीक म्हणून विकण्यास काढाव्या.
-----------------------
लोकमतची बातमी खालील धाग्यावर वाचा. (लोकमत दि. १२ जुलै २०१३ पान नं. ४, पुणे आवृत्ती)
http://epaper.lokmat.com/epapermain.aspx?queryed=12


टीप: ज्या वारक-यानी काल झालेल्या ह्या ठरावाचा विरोध केला त्याना वरील लेख गैरलागू आहे. 

जयभीम
***

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा