शुक्रवार, १९ जुलै, २०१३

शापीत संस्कृती व लबाड संत!आज पंढरीत वारक-यांचा महापूर ओसंडत आहे. सकाळीच शासकीय पुजा उरकण्यात आली. संतांच्या नावाचा जयघोष करत वारक-यानी  वारीची सांगता केली. वारकरी लोकाना वारी पुर्ण केल्यामुळे धन्य झाल्याचे वाटत असेल. संतांचे मोठे उपकार आहेत वगैरे वारकरी समाज मानतो. वारी व संत परंपरा याला वरदान मानणारा एक वर्ग आहे. पण माझ्या मते या देशाला जर कुणाचा शाप असेल तर तो संतांचा. हो आपल्या भुमिला संतांचा शापच आहे.  कारण संतांचा लढा समाजात समता आणण्यासाठी नव्हताच. तर देवाच्या दारी तू मोठा भक्त की मी मोठा भक्त हे सिद्ध करण्याचा होता. मला विचाराल तर देवभक्त म्हणजे मुर्ख, म्हणजेच तू मोठा मुर्ख की मी मोठा मुर्ख याची ती स्पर्धा होती. यात मग आमचा अस्पृश्य समाजही मागे नव्हता. चोखोबानी सुद्धा या लढ्यात उडी टाकली अन मी सुद्धा देवाच्या दारी तुमच्या बरोबरीचाच म्हणत दंड थोपटले. आज आंबेडकरी समाजाना त्या चोखोबाला पार हद्दपार केले. ही बाबासाहेबांची कृपा. पण ज्यांच्यावर ती कृपा झाली नाही तो समाज मात्र आजही त्यांच्या त्यांच्या चोखोबाचं गुणगाण गाण्यात गाफिल आहे.  संत ज्ञानेश्वर ते संत तुकारामाच्या भक्तांची मोठी फडी आहे. हा जनसमुदाय आज संतांचं गुणगाण करताना व त्यांची मह्ती सांगताना थकता थकत नाही. मला विचारला तर हे सगळे संत लबाड होते व लोकांची फसवणूक करुन दिशाहीन भरकटायला भाग पाडते होते. ते ब्राह्मणाच्या खांद्याला खांदा लावून समाजद्रोह करत होते. संत मंडळी म्हणजे जगण्याचं तत्वज्ञान सांगणारे गुरु नव्हते तर इथल्या समाजाचं खच्चिकरण करणारी व साध्या भोळ्या माणसाला देवाच्या नादी लावणारी समाजघातकी दैववादी मंडळी होती. देवाचा नि दैवाच्या तत्वज्ञानाचा प्रचार व प्रसार करणारी आत्मघातकी परंपारा जर कोणी चालविली असेल तर ती संतानी. संतांच्या नादी लागुन इथला बहुजन समाज देवभोळा बनत गेला. खरंतर चौदावं-पंधरावं शतक म्हणजे परिवर्तनाचं शतक. ख-या अर्थाने मानवी जिवनात अमुलाग्र बदल घडवुण आणणारं शतक. या काळात तिकडे युरुपात माणूस देवभोळेपणा टाकून चर्चाच्या सिद्धांताना आव्हान देत उभा ठाकला होता. पोपच्या व चर्चाच्या नियमाना झुगारुन टाकत मानवी मुल्याची मागणी लावून धरत होता. नव नवीन संशोधन सुरु झाले होते. पृथ्वी सपाट नसून गोल असल्याचा सिद्धांत कोपर्निकसनी मांडला व गॅलिलिओनी पुढे ते सिद्धही केले. जुलूमी चर्चच्या विरोधात युरोपात मोठं वादळ उठलं. प्रोटेस्ट करणारा समाज वस्तूनिष्ठ परिक्षण व विज्ञानाच्या कसोट्यात धर्माची तत्वे तपासून पाहू लागला. बुद्धिवंतानी संशोधनातून वास्तववादाचा आग्रह धरणारे व देव नाकारणारे अनेक सिद्धांत मांडणे सुरु केले. यातुन चर्च अन सामान्य माणुस यांच्यात संघर्ष पेटत गेला व विज्ञानाच्या कसोट्यात चर्चची हार होऊ लागली. त्यातून युरोपाची प्रगती होत गेली व हा हा म्हणता अवघ्या पृथ्वीवर त्यांचं अधिराज्य आलं. अगदी याच काळात आमचं मात्र उलटं होतं. इकडे संतांच्या व वारक-यांचा दैववादी सिद्धांताला ऊत येत होतं. तत्वज्ञानाचं ’त’ ही ज्याना कळत नव्हतं ते देवाच्या नावाने कविता लिहू लागले. ज्या काळात युरोपातली लोकं थेसीस लिहत होते व वैचारीक नि आधुनिक समाजाची पायाभरणी करत होते तेंव्हा इकडे आमचे संत मात्र कविता, भजन, व अभंग लिहुन  इथला सामाजीक पाया खिळखिळा करत होते. युरोपात देवाची परिक्षा घेऊन देवाला नापास करण्याचे काम चालू होते तेंव्हा हे लबाड संत मात्र इकडे नव नव्या देवाचे बारसे साजरे करत होते. देवाला मान्यता मिळवुन देण्यास झपाटून लढत होते.  देवाच्या दारात कोण जास्त वजनदार याची स्पर्धा लागली होती. बायबलच्या अनेक सिद्धांताना तिकडे चॅलेंज केल्या जात असताना आम्ही मात्र संतांच्या त्या टुक्कारा कविता ज्याना पुढे भजन-अभंग संबोधल्या गेले त्याना समाज मान्यता देण्यात गर्ग होतो. त्या ही पुढे जाऊन या अभंगात आता  जिवनाचं तत्वज्ञान शोधणे सुरु झाले. मग या अभंगात दडलेलं ते जिवनाचं तत्वज्ञान शोधण्यात अनेक बुद्धिवंतानी आयुष्य वाहून दिलं. सरते शेवटी जेंव्हा या अभ्यासकांच्या लक्षात आलं की इथे तसं काही सापडत नाही तेंव्हा ते मान्य करण्या ऐवजी या अभ्यासकानी आजून घोळ घातला. यातलं तत्वज्ञान बुद्धीच्या पलिकडचं असल्याचे दावे करत जे कचरा म्हणुन उक्किरड्यावर फेकल्या जायला हवं होतं त्याला नवी प्रतिष्ठा बहाल केली. मग बुद्धिवंतानाही न पेलणारं तत्वज्ञान अभंगात असल्याचं खुद्द विद्वानानी मान्य केल्यावर ते नाकरण्याची काय मजाल? मग हे संत वांगमय थेट विद्यापिठात अभ्यासाला आले. त्यावर कित्येकानी पी.एच. डी. करत नोक-या मिळविल्या, नाव कमावलं अन सुंदर बायकोही मिळवली. तिकडे बायबलचा प्रभाव झुगारण्याची चळवळ बळकट होत गेली तर इथे आम्ही नवी बायबल रचन्यात व स्वत:वार लादुन घेण्यात मग्न होतो. आमचं नशीब(?) चांगलं म्हणून त्या मायबाप इंग्रजांची सत्ता इथे आली. शिक्षणाचा प्रसार झाला व युरोपात ज्या विज्ञानाची व संशोधनाची लाट चौदाव्या-पंधराव्या  शतकात आली ती उशीराने का होईना पण शेवटी इथेही उसळली. पण संतानी इथल्या समाजाला देवाच्या नादी लावून तब्बल तीन शतकं मागे ढकललं ते नुकसान कधीच भरुन निघणार नाही. युरोपीयनांची प्रगती होत असताना आम्हाला देवाच्या नादी लावणारे संत समाजद्रोहीच. देवाच्या दारात धार्मिक समतेची मागणी करणारे संत सामाजिक समतेबद्दल मात्र चकार शब्द उच्चारत नाही. हा काय प्रकार होता? आम्हाला काळायला हवं, तो समाजद्रोहच होता! वरचा वर्ग खालच्या वर्गाचं अतोनात छळ करत असताना त्या विरुद्ध बंड न करणारे संत हे श्रेष्ठ कसे? दलितांचं जिवन कुत्र्या मांजरापेक्षा वाईट आहे हे रोज डोळ्यानी पाहुन सुद्धा त्या विरोधात दंड न थोपटणारे संत कोणाच्या गटातले? संत हे सामान्य व बहुजनांचे असा प्रचार आज केला जातो पण एकही संताने धर्माच्या विरोधात बंड पुकारले नाही वा सामाजिक समतेचा कुठे आग्रह धरला नाही... म्हणजे हे संत नेमके कोणाचे एजंट होते. अन कोणत्या व्यवस्थेचे समर्थक होते? वरील सगळ्या प्रश्नांतून एकच उत्तर मिळते...  आज आपण कितीही आव आणला तरी सर्व संत मंडळी सामाजिक समतेचे कट्टर शुत्र राहिले आहेत. इथल्या विषमते बद्दल बोलताना कायम ब्राह्मणांकडे बोट दाखविले जाते. पण सामाजिक विषमता टिकविण्यात संतांचाही तेवढाच वाटा आहे हे विसरुन चालणार नाही. सामाजिक विषमतेचा सिद्धांत ब्राह्मणानी मांडला व त्याला मूक संमती देत तो संतानी चालविला. दुर्दैव म्हणजे त्या संतांचं आज गुणगाण गायलं जातं. वारकरी प्रंथा ज्यानी जातीयवादा विरुद्ध कधी चकार शब्द उच्चारला नाही वा कधी आवाज उठविला नाही त्याला इथली संस्कृती म्हटले जाते, केवढं हे दुर्दैव.मी या वारकरी संस्कृतीचा व लबाड संतांचा निषेध करतो!जयभीम*** 

४ टिप्पण्या:

 1. Malahi ya varkaryanchya babtit thoda prashna padto to ha ki varshanuvarshe hi varkari mandali garibach distat. Varkaryancha melava pahila ki asa vatata ki ha ahe devala mananara,daridryane khitpat padlela bhartacha(kinva aharashtracha) khara chehara ki kay? Yana daridryat thevala ki yana apli pragatich karaychi nahi ha vegla prashna?
  Karan mi geli daha varsha chaityabhumila jato mazya kharya pityala bhetayla. Mazyasarkhi lakho lekare aplya bapala ashrupurna dolyni bhetatat ani jad antkarnane nighun jatat.
  Ti lakhonchi gardi mi khupach javlun pahto ani bharpur nirikshan sudha karto tyat mala pratek varshi khalil goshti adhalya
  1)daha varshapurvi thode kapde tyanche kharabach hote pan ata ha samaj saphed vasranach pasanti deto ani tehi padhatshirpane.
  2)tyaveli hya samajat shisticha abhav hota ani ata kamalicha shant rahun pudhe sarakto(adbhut)
  3)tyaveli hya samajachi arthik stithi changli navti ani ata prabhadeviparyant ucchabhru boudha lokanchya gadya laglya jatat.(tya park karun parivarasobat rangela pradhanya detat.)
  4)eke kali trainne phukat yenara ha samaj swatacha vansh-gotaavala gheun ata luxuryne mumbait dakhal hoto.
  Mag Madhukar sir tumhich sanga evde sant janmala yeun yanchya vittalane yanchi pragati keli ki mazya vittalane jo vitevar ubha nahi trr amchya hrudayavar virajman ahe?

  JAIBHIM

  उत्तर द्याहटवा
 2. Thanks for putting light on this subject. I am off course not expert of history, but never happen to thought about this subject. I will appreciate if you provide couple of example where these saints written in favor of caste system. I do believe you but just curious to know what exactly the text is.

  उत्तर द्याहटवा
 3. Ram tekya ,

  Murkha, saint dnyaneshwar wrote "Dyaneshwari" when he was only 16 years old, he did not go to any university or foreign university to learn, all the knowledge was within through his devotion even bufallo chanted ved mantra, this proves that he fought against cruelty of braminism and ovearll inequality , he said "vishwachi majhe ghar"

  उत्तर द्याहटवा