मंगळवार, २ जुलै, २०१३

फ्री-वेचं बारसं!


मुंबईतील      फ्री-वे (पुर्व मुक्त मार्ग) नुकतच १४ जुन २०१३ रोजी सुरु झालं. या मार्गाची एकुन लांबी १६.८ कि.मी. असून या उड्डानपुलामुळे(?)मुंबईच्या ट्रॅफिकमधून थोडी का असेना सुटका झाली म्हणायची. तसं मुंबईला कारनी जाणं म्हटलं की माझं तर डोक सुन्न होतं, पण हा फ्री-वे झाल्याचे ऐकल्या पासून थोडासा दिलासा मिळालाय. असो. या लेखाचा विषय मी मुंबईत कशानी जावं हा नसून हा जो नवीन फ्री-वे झाला आहे त्याचं बारसं करणे हा आहे. बाळ जन्मास आल्यावर बारसं करुन नाव ठेवतो तसं आता या रस्त्याचं बारसं होणार आहे. पण या नव्या बाळाचं नाव काय ठेवायचं यावरुन राजकारण्यांत जुंपली दिसते. त्यात रा्ष्ट्रवादीनी सगळ्याना घायाळ केल्याची बातमी आहे. असो. आता थेट विषयाकडे वळतो. 
या नवीन मार्गाचे नामकरण करायचे आहे. नामकरण व नामांतर या गोष्टी मराठी माणसासाठी आता नव्या राहिल्या नाहीत. मराठवाडा विद्यापिठाच्या नामविस्तारापासून तर अगदी व्ही.टी. चे शिवाजी करण पर्यंतच्या अनेक घटना मराठी माणसाने पाहिल्या. काहिनी स्विकारल्या अन काहिनी नाईलाजाने त्या घटना पचवल्या व स्विकारल्याचं सोंग केलं. त्याला कारण म्हणजे ईथला जातीयवाद. जेंव्हा व्ही.टी. चे छत्रपती टर्मिनस झाले तेंव्हा उभ्या महाराष्ट्रानी दोन्ही हात पुढे करुन हे नामांतर स्विकारले. चांगली गोष्ट आहे. पण या मातीत प्रत्येक नामांतराचा इतिहास इतका चांगला नाहिये. त्याला नेहमीच जातीच्या कोनातून पाहिले गेले. जेंव्हा नामांतराचा संबंध आंबेडकरी जनतेशी वा दलितांशी आला तेंव्हा याच महाराष्ट्राने मोठा दंगा केला. मराठवाड्यातील नामांतराच्यावेळी शीव-सेनेने व बाळ ठाकरेनी जी घोषणा दिली ती अशी...
खायला नाही घरात पीठ

 कशाला पाहिजे विद्यापीठ?

आम्ही रंजले गांजले व गरीब होतो म्हणून आमचा अपमान करत बाळ ठाकरे म्हणाला “दलिताना विद्यापिठाची काय गरज आहे? त्यांच्याकडे खायला घरात पीठ नाही तेंव्हा विद्यापिठाचं हे काय करणार?”  बाळ ठाकरे नावाचा माणूस आमची टिंगल टवाळी करत होता. शिक्षणाच्या बाबतीत आमचा घॊर अपमान करत होता. उभ्या महाराष्ट्रानी हा अपमान बघितला आहे. अगदी हाच निकष लावला तर मग शिवाजी महाराजानी ना कधी ट्रेन बघितली ना कधी रेल्वे स्टेशन पाहिला, मग त्यांचे नाव स्टेशनला का म्हणून द्यावे? असा प्रश्न उभा राहतो. मग यावर उत्तर काय येणार... शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक असल्या कारणास्तव आम्हाला त्यांचा अभिमान आहे. म्हणून त्यांचे नाव देण्यात आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. म्हणजे नामांतराचा संबंध तुमचं अभिमान अधोरेखीत करत हे खरं कारण आहे. मग ज्या कोट्यावधी लोकाना बाबासाहेबांचा अभिमान वाटतो त्यांचं नाव देताना हे निकष का बदलले गेले? बाळ ठाकरे नावाच्या हिंदू दंगेखोराने का म्हणून  एवढा आरडा-ओरडा केला. का म्हणून सेने करवी दलितांचे हाल हाल करुन मराठवाड्यात हाहाकार उडविल्या गेला. का म्हणून अनेक दलितांचे घरदार पेटवून देण्यात आले. अन का म्हणून पोच्या कांबळे सारख्या दलिताचे हात पाय कापून ठार करण्यात आले? हे सगळं घडवून आणणारे कोण होत? हिंदू जातीयवादी व दंगेखोर बाळ ठाकरे होते. हा झाला भुतकाळ.
आता आजचं काय ते पाहू या. उपरोक्त  फ्री-वे तयार झाले व आता त्या फ्री-वेला नाव देण्याची वेळ येऊन ठेपली. आंबेडकरी समाजाच्या कुठल्याही नामांतराला कडाडून विरोध करणा-या मनसेनी हळूच बाळ ठाकरेचे नाव फ्री-वे ला द्यावे म्हणून आपली मागणी पुढे केली. मला या मागणी बद्दल आक्षेप नाही, माझा आक्षेप आहे यांच्या विकृत मनोवृत्तीला व त्या नावाला. बाळ ठाकरे हे जातीयवादी नाव आहे. अशा माणसाचं नाव कसं देता येईल? जेंव्हा अशीच एखादी मागणी आंबेडकरी समाजातून केली जाते तेंव्हा याच मनसे-शिवसेनेच्या आंगावर पाल धावते. अन स्वत:च्या आवडीचे नाव मात्र खुद्द सुचवतात. हा काय प्रकार आहे? इंदू मीलमध्ये बाबासाहेबांचे स्मारक हवे म्हटले तेंव्हा मनसेनी ओरडा केला  की कशाला हवे स्मारक? अन काही दिवसातच स्वत: बाळ ठाकरेच्या स्मारकाची मागणी लावून धरली. अन आता फ्री-वे ला बाळ ठाकरेचे नाव द्या म्हणत आहेत.  आंबेडकरी समाजाचा प्रश्न आला की यांच्या पुटात दुखतं. आमच्या मागण्यांचा विरोध केला जातो, टर उडविल्या जाते. स्वत:साठी मात्र तीच मागणी न्याय व भुषणावह असते. ही या मनसे व सेनेची लबाडी आहे. तसं मला काळजी करायची गरज नाही. मराठी माणूस या लबाड लांडग्याना चांगलाच ओळखून आहे.
बरं हे झालं सेना-मनसेचं. आता आमचे नेतेही काही कमी नाहीत. तिकडे मनसेनी काय बाळ राग आवळला रे आवळला ईकडे आमच्या दासानी सुद्धा रामदासी-राग आवळला. ईतर वेळी झोपा काढणारा रामदास अचानक खळबळून उठला व “बाबासाहेबांचं नाव द्या” म्हणून किंचाळला. रामदास आजकाल वेड्यासारखा वागतो हे आंबेडकरी जनतेला नवीन नाही. तसही चेंबूर ते भायखळ्या पर्यंत आंबेडकर मार्ग ऑलरेडी आहेच. त्यामूळे आंबेडकरी नेते आपण काय भूमिका घ्यावी या संभ्रमात आहेत. या सगळ्या प्रकरणात जर कोणी जबरदस्त फासा फेकला असेल तर तो राष्ट्रवादीने. राष्ट्रवादीने या मार्गाला “डॉ. बाबासाहेबांचे” नाव देण्याचा आग्रह धरला आहे. यातून अनेक पक्षी मारले जाणार आहेत. पहिलं म्हणजे निळ्या झेंड्याशी युती करुन बसलेल्या शिव-सेनेला आता उघड विरोध करता येणार नाही. अन केलाच तर २०१४ची निवडणूक बोंबलीच समजा. भाजपा सुद्धा निळ्या मैत्रीला जागत तोंडावर बोट ठेवून शsss शिवाय काहीच करु शकणार नाही. कॉंगेस तर निरुपाय होऊन राष्ट्रवादीच्या रांगेत उभं राहण्याशिवाय हल्ली काहिच करत नाही. राहतो प्रश्न तो मनसेचा. आता मनसेनी विरोध केलाच... तर “हे बघा मनसे कशी आंबेडकर विरोधी आहे...” म्हणत रेल्वे इंजीनला आयतं खिंडीत गाठल्या जाणार. मनसेच्या विरोधात रान पेटवता येईल, थोडक्यात राज ठाकरेचा बॅंड वाजणार. म्हणजे राष्ट्रवादीने एका दगडात अनेकांवर नेम साधला. २०१४च्या प्रचारात आंबेडकरी जनतेपुढे जाताना राष्ट्रवादिकडे ही मोठी गुंतवणूक असेल. ईतर पक्षही काही दूधखुळे नाहीत. त्यानाही ही गुंतवणूक हवीच आहे. म्हणून आता सगळे मिळून एका सुरात आंबेडकरी राग आवळल्यास नवल वाटून घेऊ नका. थोडक्यात हे बारसं प्रचंड रंगणार दिसते. असो.
काय होईल ते होईल पण मला उद्धव काय भूमिका घेतो ते पहायचं आहे. जानी दुश्मन राजला धडा शिकवण्यासाठी स्वत:च्या  बापाच्या नावाला विरोध करतो की पितृप्रेमापोटी बाबासाहेबाच्या नावाला!

या बारस्याच्या घुग-या मोठ्या चवदार असणार!
***

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा