गुरुवार, ४ जुलै, २०१३

कॉंग्रेसचे दोन कुत्रे:- दिग्गी-तिवारीतसं कॉंगेस हे माझं आवडतं पक्ष. का? तर सेना भाजपाचा जातीयवाद मला या पक्षाच्या जवळ घेऊन गेला. उपाय नव्हता. त्याच बरोबर नामांतरासाठी आमच्या बाजूनें भक्कमपणे उभे राहणारे पवार व त्यांचा रा.का. सुद्धा आवडीचाच. खरं तर कॉंगेस काही कमी नाही पण भाजपा-सेना सारख्या जातीयवादी पक्षामुळे आपसुकच कॉंगेसशी जवळीक वाढत गेली. भाजपा-सेना जितका भगवा बनत गेला तिकतकाच आंबेडकरी मतदार त्यांच्यापासून दुरावत गेला. मग नाईलाजास्तव म्हणा किंवा आजून काही म्हणा पण कॉंगेस-राष्ट्रवादी हे नेहमीच आंबेडकरी माणसाला जवळचे वाट्त गेले. कॉंगेस पक्षातील नेतेही तसे संयमी, प्रभावी नि विद्वान असायचे. अगदी शत्रूशी सुद्धा शक्य तितक्या आदाराने व संयमाने बोलण्याचा त्यांचा वारसा. जुने नेते गेले, नव्या पिढीचे नेतृत्व आले तरी  कॉंगेसमध्ये तो वारसा काही प्रमाणात का असेना पण आजही दिसतोच. मात्र अगदी याच्या उलट भाजप-सेनेतील चित्र होतं अन आहे. सगळ्यात मोठं उदाहरण होते खुद्द सेना प्रमुख. सेनाप्रमुख बाळ ठाकरे हे फाटक्या तोंडाचे म्हणून सर्वज्ञात होते. तिकडे तो वरुण गांधीही तुफान केकटत असतो. त्याची आईही तशीच. मग दुस-या फडितील राणे, पासून तर राज ठाकरे पर्यंत सगळेच केकटबाज नेते होते. त्यातून राणे व राज जरी बाहेर पडले तरी केकटण्याचा आजार मात्र तसाच आहे. बाजपेयी-महाजन हे दोन भूतकाळातील अपवाद सोडले तर भाजपा-सेनेत बेताल वक्तव्य करणा-यांचा प्रचंड भरणा होता व आहे. त्या मानाने कॉंगेसी नेते प्रचंड संयमी.
पण मागच्या एक दोन वर्षात चित्र पालटताना दिसत आहे. ज्या कॉंगेसी नेत्यांचं आजवर मला कौतूक वाटायचं तिथे दोन नग सेनेच्या धर्तीवर केकटताना दिसू लागले. वाट्टेल तिथे वाट्टेल तसे बेताल वक्तव्य करताना दिसू लागले. भक्कम पुरावा नि बिनतोड संदर्भ घेऊन बोलण्याचा कॉंगेसी वारसा पार उधळून लावत हे दोघे कुत्र्यासारखे केकटू लागले. त्यातील पहिले नाव म्हणजे दिग्वीजय सिंग व दुसरे नाव मनिष तिवारी. या दोघाना बोलताना पाहिले की स्वत:ची लाज वाटू लागते पण त्यानी मात्र लाज विकून बोलायची शप्पथ घेतली दिसते. त्यांच्या बोलण्याला ना कशाचा पुरावा असतो ना संदर्भ असतात. विरोधकांवर अत्यंत आक्रमकपणे तुटून पडायचं एवढच काय ते करत असतात. हे करताना संबंधीत विषयाची तय्यारी, आकडेवारी अपेक्षीत प्रश्न व त्यावरील उत्तरं यातलं काहीच केललं नसतं. नुसतं बेछूट बोलत सुटायचं एवढाच काय तो त्यांच्या कार्यक्रम असतो.
आजवर भगवा कार्यक्रम राबविणारे भाजपा-युती सध्या मोदीच्या मदतीने विकासाचा राग आवळताना कॉंगेसला धडकी भरत नसावी असं म्हणणं म्हणजे चूक ठरेल. किती नाकारलं तरी मोदी फॅक्टर भाजपाची हवा तयार करण्यात मोलाची कामगिरी बजावत आहे हे निर्विवाद सत्य आहे. मग अशा वेळी मोदी व भाजपाशी सामना करताना भक्कम कार्यक्रम उभारण्या ऐवजी शत्रूवर कुत्रे सोडावे तसं कॉंगेसनी दिग्गी-तिवारी सोडले. अन हे दोन कुत्रे वरिष्ठांच्या आदेशाने मनसोक्त भूंकत असतात. यातून काय साध्य होणार ते कॉंग्रेसच जाणे. माझं मत तर उलट आहे. यातून मोदीची बाजू ढासळणे तर दूर पण या बेताल वक्तव्यातून कॉंगेसची प्रतिमा डागाळत जाणार हे मात्र खरे. या सगळ्या प्रकरणातून कॉंग्रेसचंच नुकसान होईल ही गोष्ट कॉंगेसच्या लक्षात येऊ नये याचं नवल वाटतं. मोदीचा फुगा फुगो अथवा फुटो त्याच्याशी मला काही देणं घेणं नाही. पण कॉंग्रेस, ज्याकडे आम्ही नेहमीच आसेनी पाहात आलो आहोत, ज्यांचा बोलण्याचा व वागण्याचा एक तेजस्वी वारसा आहे, दलितांच्या व पिढीतांच्या बाजूनी उभं राहणारं पक्ष म्हणून ज्याची ओळख आहे, अशा पक्षात दोन कुत्र्यानी बेताल वक्तव्य करत भुंकत सुटावं अन कोणी त्यांच्या गळ्यात पट्टा बांधून आवरु नये याचं नवल वाटतं. मोदीला आवरण्यासाठी म्हणून जर हे दोन कुत्रे मोकाट सोडले असतील व हा एक डावपेचाचा भाग असेल, तरी तो पटणारा मात्र नक्कीच नाही. डावपेच खेळायचेच  तर काहीतरी मोठ्ठा डाव टाकावा जो कॉंग्रेस सारख्या पक्षाला शोभेल अन साजेल.  हे भुंकणारे कुत्रे सोडून काय होणार आहे? असो. 

कॉंग्रेसला लवकर सुबुद्धी सुचो अन या कुत्र्यांच्या भुंकण्यावर बंदी घातली जावो. बास!

1 टिप्पणी:

  1. Ramteke@ If you too percieve Diggi and Tiwari as dogs then whats the difference between you and the Internet sanghis???Instead of finding faults with both of them,try applying your mind to the factors which may have led these gents to resort to the tactic.Just go through, the statements of Modi over the years.I dont think,Diggi and Tiwari have ever stooped to that level(exception being the Anna Hazare episode of Tiwari).Modi knows very well that people are only interested in "breaking news" and not the clarifications which follow.So,the strategy to cause maximum damage to Congress by "Fekugiri".I think Diggi and Tiwari are paying him back in the same coin.Also,to call both these gents Dogs,especially Diggi is stretching the things a bit too much.Plz be informed that,it was Diggi who was the first CM in India,to introduce reservations in PWD contracts for SCs in MP ,when he was the CM.Mayaben just imitated him.He has been a symapthiser for the Dalit cause always.So,dont play into the hands of Sanghis.Also,dont overstretch your admiration for the RSS by criticising Diggi....I hope you will take things in the right spirit, a big up Jai bhim too!!!

    प्रत्युत्तर द्याहटवा