शुक्रवार, १९ जुलै, २०१३

वारी म्हणजे पावसाळी सहल!माझा जन्म विदर्भातला अन वरुन मी शेतकरी. त्यामुळे पाऊस, शेती व शेतातली कामं याचा दांडगा अनुभव. मी मुळात गडचिरोली जिल्ह्यातला असल्यामुळे आधी मला वारी बद्दल फारसं माहित नव्हतं. पण पुण्यात आल्यावर एक गोष्ट लक्षात आली की वारीत मोठ्या प्रमाणात सहभागी होतो तो शेतकरीच. बाकी पांढरपेशी पुणे ते सासवड पर्यंत पालखी सोबत चालतात अन पुढचे कित्येक दिवस ’कसा वारीला गेलो” वगैरे चकाट्या पिटतात. खरी वारी जर कोणी करत असेल तर तो शेतकरी व गावातला अन खेड्यातला माणूसच. नोकरदार वर्गाला दोन-तीन आठवड्याची सुट्टी वारीवर खर्चायची छाती होत नाही म्हणून तो सासवड पर्यंतचाच पर्याय निवडतो. कित्येकाना तर ते ही जमत नाही. पण संस्कृतीच्या नावाने बढाई मारताना  मात्र हा वर्ग सगळ्यात पुढे असतो. जिवनात एकही वारी न करताही वारी म्हणजे आपली संस्कृती वगैरे छातिठोकपणे सांगत सुटतो. असो.
तर मला नेहमी प्रश्न हा पडतो की देहू-आळंदी ते पंढरीचा प्रवास करणारा बहुतांश वर्ग हा खेड्यातला नि व्यवसायानी शेतकरी असलेला कष्टकरी वर्ग असतो. गंमत अशी की ही वारी दर वर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीलाच असते. जुन-जुलै म्हणजे शेतकर-यासाठी शेतात राबण्याचा मुख्य मोसम. मी स्वत: शेतकरी असल्यामुळे या दोन महिन्यात काम करणे किती महत्वाचे आहे हे मला चांगलच ठाऊक आहे.  इथला शेतकरी सगळ्यात जास्त जर कधी राबत असेल तर तो याच दोन महिन्यात. एकदा जुन-जुलै संपला की मग शेतातली कामंही कमी होतात.
पण वारीला जाणरे सगळे शेतकरी. अन जातात कधी तर नेमकं कामाच्या दिवसांत. वारकरी- शेतकरी हे समिकरण मात्र मला प्रचंड गोंधळात टाकतं. वारकरी प्रथा ज्ञानेश्वराच्या काळापासूनची आहे याची नोंद मिळते. म्हणजे त्या काळात तर फक्त शेतकरी वर्गच होता. नोकरादर व व्यापारी वर्ग असेल संख्येने अत्यल्प. अन असला तरी तो आजच्या नोकरदारा सारखाच घरातून दंडवत घालून वारीचं गुणगाण गाण्यापलिकडे फारसं काही करत असेल असं वाटत नाही. म्हणजे हजारो वर्षापासून ज्यानी वारी जपली तो शेतकरीच. मग प्रश्न हा पडतो की नक्की शेतक-यातला नेमका कोणता वर्ग/गट वारीला जात असे? कारण जुन-जुलै तर शेतक-यासाठी कामाचे दिवस. म्हणजे घरातील काम करणारा शेतकरी अशा वेळी तीन आठवडॆ वारीवर गेल्यास पुढच्या काळात त्याचं कुटुंब वा-यावर जाण्याची शक्यता. म्हणजे राबता शेतकरी काही वारीला जायचा नाही हे पक्क. मग जायचा कोण? तर एकतर लहान पोरं वा घरातली म्हातारी माणसं. लहान पोरांचं म्हणाल तर त्यांची शक्यता वाटत नाही. म्हणजे शेवटी हाच निष्कर्ष निघतो की हे वारीला जाणारे बहुतेक घरातील वयस्क व म्हातारी माणसचं असत.
पण जरा तात्कालीन प्ररिस्थीतीचा विचार केला तर हा सिद्धांत फोल ठरतो. कारण तेंव्हाचे रस्ते, प्रवासातील अडचण अन वरुन कोसळणारा पाऊस याचा विचार केल्यास वारीला जाणारे हे थकलेले म्हातारे असूच शकत नव्ह्ते. वारी करायची म्हणजे तब्येतीनी धडधाकटच असावे लागायचे. म्हणजे वारी हे काही थकलेल्या म्हाता-यांचंही काम नव्हतं, अन आजही नाही. थोडक्यात वारी कष्टकरी शेतकर-याचं काम नव्हतं, लहान मुलांचही नव्हतं व थकलेल्या म्हाता-यांचही ते काम नव्हतं. मग कोणाचं होत?  कारण अंगातून घाम गाडून जगणारा शेतकरी ऐन मोक्याच्या वेळी शेतं सोडून वारीला जात असेल हे मलातरी पटत नाही.
थोडं खोलात जाउन विचार केल्यावर मला याचं उत्तर सापडतं. गांधी हत्तेनंतर गावो गावी उसळलेल्या दंगलीत ब्राह्मण समाजानी शहकराकडॆ धाव घेतली. पण त्या आधी प्रत्येक खेड्यात ब्राह्मण समाज राहात होता. काही नुसतं भिक्षुकी करुन जगायचे तर काहिंकडे मंदिरांचे व जमिनीचे ताबे होते. या जमिनी पैसे देऊन वा गावकरी लोकानी कसुन देण्याची पद्धत होती. थोडक्यात पाऊस पडल्यावर शेतकरी बिझी होत असे व ब्राह्मण मोकळा... म्हणजे ऐन पावसात ब्राह्मणांचे सगळे ग्राहक ज्यांच्याकडे  पुजा पाठ करुन ब्राह्मण समाज पोट भरायचा तो समाज शेतात असायचा. याचाच अर्थ या काळात ब्राह्मण समाजाचा  व पुरोहीतगिरीचा स्लॅक पिरीअड चालू व्हायचा. पावसाळ्यात धंध्याला मंदी यायची. मग अशा वेळी नुसतं घरी बसून कंटाळलेल्या खेड्या पाडयातल्या ब्राह्मणानी नवी शक्कल लढवत पावसाळी सहल शोधून काढली. ती सहल म्हणजे वारी.
पहिला पाऊस आला रे आला की शेतकरी धोतर खोचून शेतात उतरायचा. अन खेड्या पाड्यातला ब्राह्मण मात्र गाठोळं बांधून पंढरीला निघायचा. त्या निमत्ताने पंढरीचे देवदर्शनही व्हायचे व ज्ञाती बांधवांची भेटही व्हायची. तिथे बसून समाजाला लुटण्याची नवी ध्येय-धोरणही आखायला पुरेसा वेळही मिळायचा. एखाद्या नव्या पुजेचा व नव्या देवाचा शोक लावयला बरं पडायचं. वरुन त्या काळात दळणवळणाची साधनं नसल्यामुळे महाराष्ट्रातल्या काना कोप-यातून येणा-या ब्राह्मणाची ही वारी व पावसाळा दोन्ही एकाच वेळी संपायच्या. हा ब्राह्मण घरी परतेस्तोवर शेतकरीही मोकळा झालेला असायचा. आपली सहल सुखकर व्हावी व आपलं संरक्षण व सामानाचं ओझं इतरानी वाहावं या हेतूने ब्रह्मदेवाचा वास्ता देत या ब्राह्मण समाजानी बहुजनाना सोबत घेण्याचे सुरु केले असावे. अन इथेच घात झाला. कारण बहुजन समाज हुशार. त्यानी या प्रवासात ब्राह्मणाना निट ओळखलं. ब्राह्मणांच्या संगतीत राहुन बहुजन अभंग ऐकू लागला. मग तो स्वत: काही ओव्या रचू लागला. अन हा हा म्हणता बहुजन समाज चक्क अभंग रचून मोकळा झाला. अन हा हा म्हणता या पावसाळी सहलिला लोकोत्सवाचे रुप मिळाले.
याचं अजून बारकाईने निरिक्षण केल्यास तुमच्या लक्षात येईल की वारीत सामिल होणार बहुजन समाज कोण होता? संत पदाला पोहचणारे बहुजन कोण होते. ते सगळे बहुजन, शेतात राबायला नको असलेले कामचुकार नि आळशी होते असे दिसते. किंबहुना त्यांच्याच लिखानातून ते सप्रमाण सिद्ध होतं. याचा अर्थ ब्राह्मणांच्या पावसाळी सहलित सामिल होणारे कामचुकार बहुजन म्हणजे वारकरी... ही होती वारक-यांची व वारीची प्राथमिक अवस्था.

आता मात्र बोलायचे कारणच नाही...! आजचे वारकरी म्हणजे गाव गुंडाची झुंडशाही!

जयभीम
***

1 टिप्पणी:

  1. जय भीम :
    तुमचे खालील वाक्य खरे मानायला गेले तर भगवान गौतम बुद्धांचे अनुयायी - भिक्कू देखील तसेच होते असे म्हणता येईल का ? "संत पदाला पोहचणारे बहुजन कोण होते. ते सगळे बहुजन, शेतात राबायला नको असलेले कामचुकार नि आळशी होते असे दिसते. "

    उत्तर द्याहटवा