गुरुवार, ४ जुलै, २०१३

दारू आणि श्रीमंतीच्या नावाने भुई धोपटणे थांबेल का?

भारतीय संस्कृतीत अनेक गोष्टिंचे चुकीचे मुल्यमापन केल्या गेले व त्यातून काढलेले निष्कर्ष आणि मुल्ये ईथल्या समाजावर मोठ्या शिताफिने रुजविण्यात आले. अन कमाल म्हणजे कित्येक शतकांपासून ती टाकाऊ म्युल्ये मोठ्या स्वाभिमानाने ईथला समाज जपत आला आहे. पुढे सामाजिक व शैक्षणीक क्रांती झाली, फुले शाहू आंबेडकरांचा वारसा सांगणारा नवा समाज जन्मास आला. अन भारत बदलू लागला. तरी काही जुनी मुल्ये मात्र आजुनही चिकटलीच आहेत. ईथला माणूस शिकला, सवरला, विदेशात गेला वा कित्तीही मोठा झाला तरी काही जुने मानसिक खरखटे मात्र धुतल्या गेलेच नाही. त्यातील ठळकपणे जाणवणारे खरखटे म्हणजे दारु व श्रीमंती.  
दारूरुपी सापाच्या नावाने भुई धोपटणे चालू आहे.
निकष काय वापरतात ते माहीत नाही पण दारू पिणे म्हणजे वाईट... हे आपलं ठरलेलं आहे. अगदी लहानपणापासून आपल्या बालमनावर हे बिंबविलं जातं की दारू पिणे म्हणजे अपराध. तो एक सामाजिक व सांस्कृतिक गुन्हाच आहे असं ठासून ठासून मनावर बिंबवताना नात्यातल्या थोरामोठ्यांपासून अगदी चिल्ले पिल्लेही थकत नाही. तुम्ही जर दारू पिलात तर घरातली मोठी मंडळी तुम्हावर डाफरतातच पण अगदी घरातली कोकरं सुद्धा तुच्छ कटाक्ष टाकत “आले आता हे पिऊन” असं म्हणतात. अगदीच शब्दानी बोलता आले नाही तरी त्यांची नजर यातलं सगळं बोलत असतात. का बरं आपल्याकडॆ दारूला एवढं वाईट मानलं जात? त्याला अनेक कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे देवभोळेपणा. दुसरं कारण अशिक्षीतपणा, तिसरं कारण म्हणजे ईथले धर्माचे ठेकेदार, जे नेहमी दारू ही कशी वाईट वगैरेच्या बाता आपल्या कथा/प्रवचनांतून रुजवत असतात. अन सगळ्यात प्रभावीपणे हा गैरसमज जर कुणी पसरवत असेल तर ईथले साहित्यिक व समाजसेवक. म्हणजे अनिल अवचटच्या पट्टितले लेखक व सामाजिक कार्यकर्ते. या सगळ्यानी दारुच्या नावानी खडे फोडताना मुख्य कारणाकडून समाजाचे लक्ष दुसरीकडे वळविण्यात महत्वाची कामगिरी बजावली आहे.
दारू पिणे वाईट आहे हे सांगताना ही सगळी लोकं ईथल्या पट्टीच्या बेवळ्यांकडे बोट दाखवतात. मग काय, त्या बेवळ्यांच्या मोजपट्टीने सगळ्या पिणा-यांचे मुल्यांकन सुरु होते. ईथेच खरी गल्लत होते. बरं ईथल्या सर्व पिणा-यांच्या प्रमाणात या बेवळ्यांचा आकडा % मध्ये काढला तर तो ०.००१ वगैरे निघेल. म्हणजे दारू पिणे हे वाईट आहे हा दावा धुडकावून लावण्यासाठी असलं स्टॅटिस्टीक मदतीला धावू शकते खरं पण तो उपलब्ध आहे का? ईथून सुरुवात...
तर माझं म्हणनं हेच आहे की ईथल्या दारू पिणा-याचं मुल्यमापन करताना थेट बेवड्याची मोजपट्टी वापरली जाते. मग काय प्रत्येक दारू पिणारा एक सेकंदात तुच्छ ठरतो. बर हे मुल्यमापन एवढ्यावरच थांबलं असतं तर हरकत नव्हती पण ते थांबत नाही. बेवड्याची मोजपट्टी वापरायची, प्रत्येक पिणा-याला बेवड्याच्या गटात नेऊन उभं करायचं. मग तो बाटली करतो म्हणजे बाईकडेही जात असेल, मग जुवाही खेळत असेल, मग घरचे पैसेही उधळत असेल असे नाना तर्क लढविले जातात. यातलं काहीच सापडलं नाही तर मग तो बायकोला त्रास तर देत असेल, घरी नीट वागत नसेल ईथ पर्यंतचे धाव घेतली जाते. यातले जास्तीत जास्त लेबल चिकटविण्याचा प्रयत्न केला जातो. मागे अमिर खाननी त्याच्या प्रसिद्ध मालिकेत दारुवरचा एपिसोड झाल्यावर “प्यायचं असेल तर रात्री झोपताना थोडसं प्यायला हरकत नाही” असं म्हटल्यावर अवचटकन्येनी त्यावर सडकून टीका करत "का म्हणून रात्री झोपताना तरी प्यावी? अजिबात पिऊ नये" म्हणत पिण्या-यांवर तुटून पडल्या. दारू पिल्याने माणूस बरबाद होतो व संसाराचं वाट्टोळं होतं हे तत्वज्ञान सगळेच पाजळत असतात. त्यामुळे संसाराचे तीन तेरा तर वाजतातच पण बेकारी व गरीबी वाढत जाऊन देशाचं नुकसान होतं. विकास कुंठत जातो... ईथ पर्यंतचं तत्वज्ञान ठोकून ठेवलं आहे. ही सगळी यंत्रणा दारु विरोधी प्रचारात झोकून देऊन काम करत असते.
मग मला त्याना प्रश्न विचारावासा वाटतो की ते फ्रेंच तर पट्टीचे दारु बहाद्दर. एकवेळचं अन्न नसलं तरी चालेल पण रोज प्यायला हवी. मग ते कसे काय एवढे प्रगत. अगदी रशीयनांचं सुद्धा असच आहे. तेवढचं कशाला जपानी लोकं सुद्धा रोज सायंकाळी ऑफीसातून बाहेर पडले की वाईन प्यायला जातात. या सगळ्यांच्या दारुत अल्कहोलाचे प्रमाण कमी जास्त असेलही पण शेवटी ते अल्कहोलच ना? या सगळ्य़ांची प्रगती पाहता एक गोष्ट छातिठोकपणे सांगता येईल ती म्हणजे दारुनी नुकसान होत नाही. एकदा हे मान्य केलं की आपल्याकडच्या दारुड्यांचा स्वतंत्र एंगलनी अभ्यास करायचा मार्ग मोकळा होतो. पण जोवर दारु हेच वाईट असं ठरवून टाकाल तो पर्यंत अभ्यासाची दारं बंद असणार.  जर जगातील ईतर देशात दारुनी माणसांचं नुकसान केलं नाही तर ईथेच कसं काय केलं? हा शोध सुरु होतो. म्हणजे दारू विरोधी मोहीमेत जे काही सांगितलं जातं ते असत्य आहे.
आपल्या देशात दारूनी नुकसान केलं असं जरी वरवरचं चित्र असलं तरी खरा घात अविद्येनी केलं हे दिसून येईल. त्याच बरोबर आर्थिक सुबत्तेच्या अभावानीसुद्धा आपला घात केला आहे. शिक्षणातून सजगता निर्माण होते व आर्थीक सुबत्ताही येते. एकदा समाज शिक्षीत झाला की मग दारू त्याच्यावर हावी होत नाही. काही अपवाद असतीलही पण यांची संख्या त्या अपवादाला नियम ठरवेल एवढी नक्कीच नाही. थोडक्यात दारूच्या नावानी लोकनी कितीही बोटं मोडले तरी खरा आजार दारू नसून अशिक्षीतपणा आहे. एकदा तुम्ही शिकलात की दारू शाप ठरत नाही. जगभरातल्या कुठल्याच देशात दारू शाप ठरलेली नाही, त्यामूळे ती ईथेही शाप ठरणार नाही. दारू म्हणजे वाईट असा प्रचार चालविणारे मुर्ख व कावेबाज आहेत. मूळ  प्रश्नापासून लोकांचं लक्ष विचलित करुन समाजाची दिशाभूल करणारे हे तथाकथीत लोकं देशाचं नुकसान करत आहेत. दारूच्या नावानी भुई धोपटणा-याना खरा साप अविद्या आहे हे पक्के माहित आहे. पण लोकाना एकदा खरा साप दिसला की त्या सापाला ठेचून समाज पुढे जाईल या भितीने हे भोंदू लोकं दारू नावाच्या काल्पनिक सापाच्या नावानी भूई धोपटत आहेत व स्वत:ला समाजसेवक म्हणवून घेत आहेत. आपण या बनावट समाज सेवकांपासून सावध राहिले पाहिजे. दारूच्या नावानी भुई धोपटणे सोडून खरा साप शोधला पाहिजे. खरं तर आपल्याला तो शोधायचीही गरजच नाही. ज्योतीबानी हा साप आम्हाला आधीच दाखवून दिला आहे. ज्याच्या कुणाच्या घरात हा अविद्येचा साप आहे, त्यानी आधी तो ठेचला पाहिजे. एकदा अविद्येचा साप ठेचला की मग अंधश्रद्धेचाही साप ठेचला जाईल. घरात विद्या आली की पैसाही येईल. जिवनमान उंचावले की दारू तुमचं केसही वाकडं करु शकणार नाही. किंबहुना दारूत ती ताकतच उरत नाही. जर्मन, फ्रेंच, रशीयन व अमेरीकनांकडे पहा. ते आपल्या तुलनेत प्रचंड अल्कहोल सेवन करतात, तरी त्यांच्याकडे दारिद्र्य नाही. याचे कारण विद्या आहे. दारु वाईट असती तर हे सगळे देश भिकेला लागले असते पण तस झालेलं नाहीये. म्हणजे आमचं काहीतरी चुकतं. दारू हा खरा आजार नाहीच मुळी. ईथल्या तथाकथीतानी दारु विरोधी विचार आमच्या डोक्यात भरवून ठेवले व ख-या आजाराला मोकाट सोडलं. आज पर्यंत दारु दारु म्हणून आपण सगळे भुई धोपटत आलो आहोत. हा दारु नावाचा साप ना विषारी आहे ना चावणारा आहे. त्यामूळे आता दारूच्या नावाने भुई धोपटणे सोडा व अविद्येचा व अंधश्रद्देचा साप शोधा. त्याही पुढे जाऊन मी असं म्हणेन देव व धर्म नावाचाही सापही ठेचा. 
दारूचे अतिरीक्त सेवन अन त्यातून उद्भवणा-या समस्यांकडे बोटत दाखवत असाल तर त्यावर दारुबंदी हा उपाय असूच शकत नाही. शिक्षणातून जसं ईतर सगळ्या गोष्टीना शिस्त लागते तसच दारु पिण्यालाही शिस्त लागतेच. अतिरिक्त दारुसेवना जर काही उपाय असेल तर तो दारु बंदीचा नसून शिस्तीचा. अन ही शिस्त फक्त शिक्षणातून येते. (सुशिक्षीत बेवड्यांकडे बोट दाखवताना तो आकडा अपवादात मोडतो हे ध्यानात असु द्या)
श्रीमंती म्हणजे वाईट:
जसं आपण दारूच्या नावानी भुई धोपटत आलॊ अगदी तसच श्रीमंतीच्या नावानीही भुई धोपटली जाते. श्रीमंत म्हणजे वाईट, श्रीमंत म्हणजे जुलूमी, श्रीमंत म्हणजे शोषणकर्ता, श्रीमंत म्हणजे उच्चभ्रू-चोर अन श्रीमंत म्हणजे गरीबांचा-शत्रू हे आपल्या समाजातील जवळपास सगळ्याच वर्गात लहानपणापासून बिंबविलं जातं. मग मोठं होताना श्रीमंत माणसाला शत्रूस्थानी ठेवूनच पोरं वाढतात. याचे दोन नुकसान, एक तर श्रीमंत बनण्याची ईच्छा लहानपणीच विरुन जाते. अन दुसरं म्हणजे आत्मविश्वास लुप्त होऊन धाडसी कामं करण्याचा गूण विकसीतच होत नाही. त्यामुळे पैशासाठी झटणे, सुखवस्तू जिवनाचा पाठलाग करणे अशा अनेक गोष्टी वर्ज्य ठरल जातात. म्हणूनच ईथे उद्योग व आर्थीक भरारीचा कायमच अभाव राहीला. दुसरं नुकसान म्हणजे आत्मविश्वास गमावलेल्या पिढ्या निर्माण होत गेल्या. कारण आत्मविश्वास हे बंद खोलित बसून निर्माण होत नसतं, तर स्पर्धेच्या सागरात उडी टाकल्यावर प्रवाहातल्या चार लाटांवर आदळून आपटून झाल्यावर प्रवाहाशी लढण्याचा स्वभाव विकसीत होत जातो अन त्यातून निर्माण होतो लढाऊ स्वभान नि आत्मविश्वास असणारा समाज. अन हाच समाज यश खेचून आणत असतो. आयुष्यात अनिश्चितता जेवढी जास्त लढाऊपणा व आत्मविश्वास तेवढाच जास्त. अनिश्चितता व खडतर जिवनच यशाच्या दिशेनी वेगवान प्रवास घडवून आणत असतो. अन श्रीमंतीच्या वाटेवर चालताना वरील सगळ्या गोष्टींचा सामना ढिगानी करावा लागतो. आपला समाज नेमका ईथेच कमी पडत गेला. कारण काय तर श्रीमंती म्हणजे वाईट्ट्च... हे आमच्या डोक्यात पक्क बसलं आहे.
हे श्रीमंत म्हणजे वाईट्ट्चचं खूळ हिंदी सिनेमावाल्यानी पेरलं.  श्रीमंत हा विलन अन विलनची पोरगी माजखोर हे समिकरण सर्वप्रथम हिंदी सिनेम्यानी मांडलं. अन अगदी याच्या उलट गरीबाचा मुलगा चांगला व त्याची गरीबिही चांगली असं चित्र जवळपास सगळ्याच सिनेमांतून रंगविण्यात आलं. मग हा गरीब नावाचा चांगला प्राणी श्रीमंत विलनची खोड  मोडताना त्याच्या पोरीशी प्रेम/लग्न करतो. मग मधल्या काळात प्रचंड झटापटीत प्रत्येक वेळी श्रीमंती आजून कलुषीत करुन दाखविली गेली व प्रत्येक घटनेतून गरीबीवर स्तूतीसुमनांचा वर्षा होत गेला. गरीब विरुद्ध श्रीमंतीच्या या काल्पनिक लढ्यात गरीबाची बाजू कायमच उचलुन धरताना प्रत्येकवेळी श्रीमंतीवर शिंतोळे उडविल्या गेले. या शिंतोळ्यांचा जेंव्हा महापूर वाहायला लागतो तेंव्हा नायिकेला जाग येते. मग ही नायिक भानावर येऊन हिरोची पट्टीत श्रीमंतीवर तोंडसुख घेत. अन शेवटी सगळं सोडून ती गरीबाची होते हा शेवटं. मोरल ऑफ द स्टोरी काय तर श्रीमंती वाईट व गरीबी चांगली. म्हणून तर श्रीमंत हिरोईन गरीब हिरोची होते(राजकारणाचही तसच. मी वर जे जे श्रीमंती बद्दल लिहलं अगदी ते सगळं राजकारणालाही लागू पडत. राजकारणही सिनेमावाल्यानी असच बदनाम करुन ठेवलं).
आता वरील प्रकरण ज्या देशातिल मुलांच्या बालमनावर अनेक वर्ष बिंबविल्या गेलं ते काय डोमल्याचं श्रीमंतीचे स्वप्न पाहणार. येणा-या पिढ्यातील पोरं कितीही हुशार असले तरी वरील प्रकरणाचे बळी ठरलेच. आपल्याकडॆ दरवर्षी दहावी, बारावीचे निकाल लागतात तेंव्हा टॉपर्सच्या मुलाखती छापून येतात. आजवर एकाही टॉपर्सनी मी श्रीमंत होईन असं म्हटलं असेल तर शप्पथ. का बरं श्रीमंतीचा एवढा तिटकारा? ही सगळी हिंदी सेनेम्यांची पापं आहेत.
जसं आपण दारूच्या नावानी भुई धोपटत आलो अगदी तसच श्रीमंतीच्या नावानेही भूई धोपटणे चालू आहे. मागच्या दशकात हे भुई धोपटणं किमान शहरी भागातूनतरी कमी होताना दिसत आहे पण खेड्यात मात्र भुई धोपटण्याचा कार्यक्रम आजूनही चालूच आहे. दारूही वाईट नाही अन श्रीमंतीही वाईट नाही. दोघांच्या नावाने आपण बरीच वर्षे भुई धोपटली. आता हे थांबलं पाहिजे. या दोहोनाही सोडून भागणारच नाही. दारू व श्रीमंतीला दूर सारने उपाय नसून याना पेलवण्याची क्षमता स्वत:मध्ये निर्माण करण्याची गरज आहे. बघा पटतं का!

२ टिप्पण्या:

 1. I agree with you. Our education system also never teaches us about money and finance. Typical Indian middle class may sometime talk about sex with kids but never discuss about money. May be they want to hide their own failure with making money by keeping the subject away. Like sour grape syndrome. Schools are systems to produce obedient employees and soldiers. Here are books talk about it.

  http://www.amazon.com/Rich-Dad-Poor-Teach-Middle/dp/1612680011/ref=sr_1_1?ie=UTF8&qid=1372965524&sr=8-1&keywords=rich+dad+poor+dad

  http://www.amazon.com/Think-Grow-Rich-Napoleon-Hill/dp/1612930298/ref=pd_sim_b_2

  उत्तर द्याहटवा
 2. Sumit bansode
  Darubadal tumch mat hi barobar vatate pan ........ Budhani panchshil sangitlay...... tat vesnanpasun dur rahnacha salla dila ahe
  Krupya margdarshan kra

  उत्तर द्याहटवा