सोमवार, ८ जुलै, २०१३

शाहरुख खान: एक बेजबाबदार नागरिकशाहरुख खानच्या तिस-या अपत्याच्या निमित्तानी मिडीयानी मनसोक्त शिमगा खेळला. हे सगळे जेंव्हा इथे शिमगा खेळत होते तेंव्हा किंग खान विदेशात होता. जेंव्हा तो परत आला तेंव्हा त्यानी चेन्नई एक्सप्रेसचे निमित्त साधून सगळ्या मिडीयाला पार्टीत बोलावलं. खाऊन पिऊन तर्र झालेला मिडीया हळूच त्याला तिस-या अपत्या बद्दल विचारल्यावर किंगा खान म्हणाला की ती माझी वयक्तीक बाब आहे......... अन मिडीयावाले शेपूट हालवत बाहेर पडले. उभा राष्ट्र दोन अपत्याचा कार्यक्रम राबवीत असताना व लोकसंखेशी लढत असताना यानी तिसरं अपत्य ठेवण ही वयक्तीक बाब कशी काय? मला नाही कळत. लोकशाहीमुळे सक्तीची बंदी नसली तरी दोन मुलांवर थांबण्याचा सरकार आग्रह करत असून त्यासाठी अनेक कार्यक्रम राबविले जात आहेत. दोन नाही तर दहा पोरं पोषण्याची धमक असलेले कित्येक नागरीक वाढती लोकसंख्या व त्यामुळे निर्माण होणा-या अडचणी पाहून आपली नैतिक जबाबदारी म्हणून दोन वर थांबत असताना खानचं तिसरं बाळ ही वयक्तीक बाब कशी?
मुसलमान समाज आधीच लोकसंखेत प्रचंड भर घालत आहे. मग कधी कुणी तो मुद्दा काढला की  लगेच मुस्लीमांच्या  अशिक्षीतपणाचा मुद्दा पुढे करुन वेळ मारुन नेली जाते. पण हा खान तर चांगला शिकला सवरला आहे मग ह्याला कशाला हवं होतं तिसरं बाळ? याची बायकोही शिकली आहे मग तिला तरी कसं कळत नाही? देशाची लोकसंख्या व त्याचे दुष्परीणाम हे मुस्लीमाना भोगावे लागणार नाही की कसे? ती आटोक्यात आणणे हा विषय मुसलमानाना गैरलागू आहे की काय?  या देशातील इतर धर्मीयानी इथल्या व्यवस्थेला व लोकसंखेला एक शिस्त लावण्यासाठी  जी नैतिक जबाबदारी स्विकारली ती मुस्लीमानी झिटकारली... यातून आम्ही काय समझायचे? मिस्लीमेत्तर समाज लोकसंखेविरुद्ध  झटत असताना मुस्लीम समाजातील खान सारखा प्रसिद्ध माणूस तिसरं बाळ जन्मास घालून काय संदेश देतोय... “मला नाही या देशाची काळजी” या पेक्षा वेगळा काही संदेश जातो का बघा. भारतीय समाजातील बहुसंख्य लोकांच्या नैतिक व्रताच्या विरुद्ध कृती करुन शाहरुख खाननी काणती घोषणा केली? राष्ट्रविरोधी व देशद्रोही अशी नसली तरी त्या पेक्षा वेगळीही नाही हे जाहीर आहे. अन त्याच बरोबर शासन सध्या दोन वर थांबण्याची जी मोहमी राबवीत आहे त्या मोहीमेची टर उडविली असं कोणत्याच पत्रकाराला का बरं वाटलं नाही. 
 याचा अजून एक अर्थ असाही काढता येऊ शकतो “या सरकारचं व भारतीयांचं काय धरुन बसलात, वाट्टेल तेवढे पोरं जन्मास घाला... हे बघा मी तिसरं जन्मास घालतो आहे” खान हा संदेश आपल्या जातीबांधवाना देत आहे असे कुणालाच का वाटत नाही. कितीही नाकारलात तरी देशभरातील मुस्लीमाना हाच संदेश गेला आहे. 
शाहरुख खान स्टार म्हणून असेलही मोठा पण तो भारतीय नागरीक म्हणून एक बेजबाबदार नागरीक असल्याचे सिद्ध झाले आहे. उभा देश तिसरं अपत्य नको म्हणताना ठेवलेलं तिसरं अपत्य वयक्तीक बाब असूच शकत नाही. कारण बाळ पोषण्याची कुवत हे एकमेव निकष नसून देशातील लोकसंख्या, त्यामुळे उद्वभवणा-या अडचणी व ती आटोक्यात आणण्यासाठी आपल्यावर असलेली नैतिक जबाबदारी हे निकषही प्रत्येकाला लागू पडतात. अन या निक्षावर खान एक बेजबाबदार नागरिकच ठरतो.


८ टिप्पण्या:

 1. असाच वाचता वाचता आपल्या ब्लॉग वर आलो आणि हि पोस्ट वाचून थोडा अचंबित झालो. माझे स्वतःचे काही वेगळे विचार आहेत. मी मुळात शाहरुख खान सपोर्टर नाही
  पण जेव्हा देश राष्ट्र हि संकल्पना अपत्यप्राप्तीशी संबंधित असते तेव्हा मला वाटतं या दोन्ही बाबी आपल्या पोस्ट मध्ये एकांगी विचारसरणीने बघितल्या जात आहेत.
  माझ्या बघण्यात २ जवळची कुटुंबं आहेत ज्यांनी मुलाच्या आशेने (प्रत्येकी) ४ मुलीना जन्म दिला आणि ५ वा मुलगा झाल्यावर ते थांबले. या दोघांच्या मिळून आठ मुली आज वेगवेगळ्या भारतीय आणि विदेशी कंपन्यांमध्ये चांगल्या हुद्द्यावर कार्यरत आहेत काही वर्ष इतर देशांमध्ये राहून आल्या आहेत आणि भारताच्या प्रगतीला योगदान देत आहेत. तीच गोष्ट २ मुलांचीही . दोघेही सुस्थापित आयुष्य जगत आहेत. तेही कवडीचीही सरकारी मदत न घेता!
  त्यांच्या आई वडिलांनी मुलां मुलींच्या भविष्याची वेळीच आणि योग्य तजवीज करून ठेवली आणि देशाला दहा कर्तबगार तरुण तरुणी बहाल केले. हीच गोष्ट शाहरुख खान किंवा इतर कोणीही व्यक्तीने जो आपल्या मुलांची योग्य ती काळजी घेण्यास सक्षम आहे त्याने केली तर मुळात त्याला आक्षेप का असावा?

  उद्याची चिंता करत हातावर पोट घेऊन जगणा-या कुटुंबाने सरकार सांगते म्हणून "हम दो हमारे दो" चे तंतोतंत पालन केले तर वरचे कुटुंब आणि हे कुटुंब यापैकी नेमके कोणते कुटुंब भारताच्या इन्फ्रास्ट्रक्चर वर लोड टाकत आहे?

  हिंदू मुसलमान ब्राह्मण मराठा बहुजन हे विषय बाजूला ठेऊन जेव्हा आपण भारत आणि नागरिक असा विचार करतो तेव्हा मला असं वाटतं कि मुलांच्या संख्येपेक्षा क्वालिटी ला महत्व असावं. आणि हि बाब वैयक्तिकच असावी. जर आपल्या मुलांना समर्थ नागरिक बनवता येईल तर नुसती सरकारी सुविधा मिळतात म्हणून दोन-दोन पोरं पैदा करण्यापेक्षा जितके जास्त समर्थ नागरिक बनवतात येतील तितकं चांगलं. हेच लोक पुढे जाऊन इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं करू शकतील.
  आपलं काय मत ?

  उत्तर द्याहटवा
 2. प्रश्न तिस-या बाळाच्या दर्जेचा नाहीच मुळी. जगातील अत्यंत हूशार व ख्यातनाम विद्वानांची यादी काढळ्यास जवळपास सगळेच तीन नंतर अपत्य आढ्ळतात. अगदी बाबासाहेब आंबेड्करांच घ्या की माहात्वा गांधीचं घ्या. दर्जाचं अन जन्माला येण्याच्या क्रमांकाचं काही संबंध नाही. अन माझा विषयही तो नाहीच.
  प्रश्न आहे ईथल्या वाढत्या लोकसंखेचा. ती आटोक्यात आणणे जी प्रत्येकाची जबाबदारी नाही का?

  उत्तर द्याहटवा
 3. Apan ek gruhit dharu ti mula videshat rahun te deshachi mhnje bhartachi pragati karat ahet. Pan prashna samajatlya pratishtit vyaktinchya vagnyabaddalcha ahe. Karan samaj yancha anukaran karto. Ani khaskarun muslim samudayacha. Karan pratishtit musalman kinva garib sadharan musalman he doghehi deshachya hitachya nirnayala sarvasadharanpane bagal detat. Tyamule ha chintecha vishay banto. Jar muslim samaj ha pratek veli desh hitachya nirnayapasun dur hot gela trr ha samaj etar samajachya pravahat yenar nahi, yacha bhan shahrukh ani amir khan sarkhya abhinetyani thevavayas have. Ani mulancha sangopan ani desh-hit yachi gallat karu naye. M. D. Sir yanchya matashi mi sahamat ahe. Lekh kharach lokana samajala vichar karayla lavnyasarkha ahe.

  JAIBHIM

  उत्तर द्याहटवा
 4. अखीलदीप तुम्ही जे श्रीमंतांची मुले आणि गरिबांची मुले याचे जे स्पष्टीकरण दिले आहे ते न पटणारे आहे. समजा एका श्रीमंताची १० मुले आहेत आणि गरीबाची २ मुले आहेत.......तो गरीब मोलमजुरी करून आपले पोट भरतो आणि संसार सांभाळतो......त्याची मुले १ वेळ जेवतात. घरात TV नाही. गाडी नाही....चालत शाळेला जातात. तेही सरकारी.

  याउलट श्रीमंताची मुले २ वेळा जेवतात. दिवसभर काहीनाकाही चरत असतात. प्रत्येकाला श्रीमंताने कार घेऊन दिलेली आहे........प्रत्येकजण स्वताच्या कारने फिरतो.....हि श्रीमंतांची मुले भारतात निर्माण होणारे धान्य (जे export होऊ शकत होते) ते फस्त करत आहेत. यांच्या कारमध्ये जे पेट्रोल खर्च होत आहे त्याला सरकार सबसिडी देत आहे.....म्हणजेच सरकारच्या पैशाने हि श्रीमंत मुले मजा मारत आहेत...यांच्या घरात दिवसरात्र विजेचा विनाकारण वापर होत असतो....ती वीज सरकारने घरगुती ग्राहक म्हणून कमी दराने दिलेली आहे. हे लोक पिण्याच्या पाण्याचा अपव्यय करत आहेत....सरकार गरिबांना आणि श्रीमंतांना एकदम स्वस्तात पाणीपुरवठा करते.......श्रीमंतांची मुले देशाच्या विकासात योगदान देतील याची खात्री नाही.....उलट नालायक होण्याची शक्यताच ज्यास्त असते....गरिबांची मुले एकतर गरीब राहतील किंवा अवघड परिस्थितीमध्ये शिकून देशाच्या विकासात सहभागी होतील.

  उत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. अरीअन,
   तुमचे मुदी आवडले व पटले

   हटवा
  2. माझे कोणते मुद्दे पटणारे नाहीत? श्रीमंतांची मुले गरिबांची मुले हा भेद नाहीच मुळी. मुलं सांभाळण्याची जबाबदारी समजणारा आणि न समजणारा हा भेद आहे. एखाद्याला स्वतःला मुल असणे, त्याचा सांभाळ करणे, त्यांचं भविष्य यात काडीमात्र इंटरेस्ट नसेल तर त्याने कशासाठी मुलं जन्माला घालावीत? माणूस म्हणजे कोणी कुत्रा मांजर किंवा इतर पशु आहे का? बरं एखाद्याला वाटतच असेल कि मी भीक मागत असताना मुलांचा आनंद घ्यावा म्हणून तर आपण त्याचं समर्थन करावं का? याउलट मी दिलेल्या उदाहरणापैकी एक मध्यमवर्गीय नोकरदार कुटुंब आहे तर एक सुस्थापित कुटुंब आहे. दोन्ही कुटुंबांनी आपल्या मुलांच्या भवितव्याची योग्य तजवीज केली हा माझा मुद्दा आहे.

   दुसरी गोष्ट, श्रीमंतांची मुलं दोन वेळा चरतात , गाड्या उडवतात, लाईट वापरतात हे फारच उथळ आणि द्वेषाने भरलेलं विधान झालं !! समर्थनच करायचं झालं तर ते तसं करत असतीलही कारण त्यांचा बाप त्याच्या उत्पन्नाच्या ३० टक्के कर भरतो (अजूनही सुदैवाने कर चुकवेगिरी करणा-याचं प्रमाण कर भरणा-या लोकांपेक्षा फारच कमी आहे) ! ज्याच्यातून गरिबांना (मी बिलो पॉवर्टी लाईन रेफर करतो आहे ) कर न भरता (कारण त्यांचं उत्पन्न करपात्र नाही) रस्ते वापरता येत आहेत, पाणी वापरता येत आहे. जेव्हा आपण 'सरकार सबसिडी देतं' असं म्हणतो तेव्हा ते काय आपल्या खिशातून देतं का? तसंही आता सबसिडी बंद होतच आहे. झोपडपट्टीत बाईक्स नसतात, चोरीची वीज नसते, चोरीची पाण्याची पाईप लाईन नसते असं आपल्याला वाटत असेल तर मग प्रश्नच मिटला!! पुस्तकी सत्य आणि वास्तविकता यात फरक असतो. कर भरून सबसीडाईझ्ड पेट्रोल, कार वापरणा-या श्रीमंताचं समर्थन होऊ शकत नाही तसंच कर न भरता बाईक उडवणा-या गरिबांच्या मुलांचही! या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.

   हो. प्रसिद्ध लोक उदाहरण सेट करतात त्यामुळे त्यांनी विचारांती निर्णय घेतले पाहिजेत हे विधान मान्य पण म्हणून कोणालाही फक्त आपल्याला पटत नाही म्हणून आरोपीच्या पिंज-यात उभं करण्यात काय हशील? एक साधारण सरोगेट मदर मुल तिच्या पोटात वाढवण्यासाठी २ लाख रुपय्न्पासून पुढे रक्कम घेते. ती एखादी मोलकरीण असू शकते वा इतर कोणी. शाहरुख ने दत्तक न घेता सरोगेट मदर चा पर्याय निवडला तर एखा अर्थाने कोणा ना कोणा समाजघटकाचं भलं झालंच ना? कि त्याने आपण सांगतो तसं दत्तक मूलच घेतलं पाहिजे?

   निव्वळ लोकसंख्येचा इन्फ्रास्ट्रक्चर वर लोड पडत नसतो तर कुचकामी लोकसंख्येमुळे तो लोड पडतो. ह्युमन इज अ रिसोर्स इफ इट इज एफिशियंट अंड लोड इफ इट इज अनएफिशियंट. प्रत्येकाने स्वतः विचार करायचा आहे कि आपल्या पुढच्या पिढीला आपण सक्षम बनवू शकतो कि नाही. आधी म्हटल्याप्रमाणे फुटपाथवर राहून उद्याची चिंता करणा-या भिका-याचं (असं म्हणताना माझ्या मनात त्याच्याबद्दल कमीपणाचा भाव आहे असं मुळीच नाही) मुल जन्माला यावं म्हणून म्हणून कोणी सुस्थापिताने सरोगसी स्वीकारू नये कि नाही हे माझ्या मते ठामपणाने ज्याच त्याच वैयक्तिक मतच आहे.

   हटवा
 5. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे वयाच्या ४७व्या वर्षी या खान ला ३रा वारसदार पैदा करायची गरजच का पडली? जर पोर पोसण्याची एवढी क्षमता आहे तर २५-३० गरीब पोर दत्तक घ्यावीत ह्याने (ती त्याच्या धर्माची असतील तरी हरकत नाही, आम्ही कौतुक करू त्याच)

  उत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. सुनील साहेब,
   अगदी महत्वाचं बोललात. मुळ लेखात त्या अनुषंगाने थोडी माहिती जोडतो.
   धन्यवाद.

   हटवा