सोमवार, १५ जुलै, २०१३

रुपयाच्या गटांगळया!

मागच्या दोन दशकांपासून रुपया सतत पडतो आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाची रोज मानहानी होत असून ती थांबविण्यासाठी धोरनात्मक पाऊल उचलले जात नाहित वा त्यावर उपाय सापडत नाही. वरुन कळस काय तर जागतिक किर्तीचे अर्थतज्ञ हे या देशाचे मुख्य सुत्रधार असताना हे सगळं चालू आहे. कुठल्या अवस्थेत रुपया पडतो आहे? तर देशाचे पंतप्रधान मनमोहन सिंग  ज्याची जगभर अर्थतज्ञ म्हणून ख्याती आहे त्यांच्या कार्यकाळात रुपया गटांगळ्या खात आहे अन ते मात्र हताश आहेत. विश्वास बसत नाही या घटनेवर. काहीतर नक्कीच गोलमाल असावं. खरंतर ही लज्जास्पद गोष्ट आहे की एवढ्या कुवतीचा माणूस तिथे बसला असताना रुपया पडत आहे. एकीकडे बढाया मारायच्या की आम्ही अमूक करु न तमूक करु पण गटांगळ्या खाणा-या रुपयाला सावरण्यावर मात्र काहीच उपाय केला जात नाही.  मागच्या वर्षभरात ज्या झपाट्यानी रुपयानीमुल्य गमावलं ते  पाहता हे जर असच चालू राहिलं तर पुढच्या दोन वर्षात अवस्था अशी होईल की पेट्रोलवर गाड्या चालविणे तर सोडाच पण खायला गॅस विकत घेणेही परवडणार नाही. कॉंग्रेस सरकारशीवाय या देशाला दुसरा पर्याय नसणे वा हिंदूत्ववाद्यांच्या तिरस्कारातून कॉंग्रेसला मिळालेल्या मतांच्या मनोपलीमुळे म्हणा पण कॉंग्रेस सरकार अत्यंत बेफिकीरीने वागत आहे हे मात्र निश्चित. जातीयवाद्यांचा धसका घेत बहुजन समाज मतं आमच्याच पेटीत टाकणार ही भावना कॉंग्रेसला एक दिवस भोवणार. हा गाफिलपणा २०१४ भोवला जाऊ शकतो.
भारताच्या चालू खात्यावरील तूट दिवसेंदिवस वाढत जात असून त्याचा फटका रुपयाला बसत आहे. आंतराष्ट्रिय पातळीवर रुपयाचे मुल्यांकन करताना आपण केलीली निर्यात वजा केलेली आयात याचं गणित मांडलं जात. आमच्या चालू खात्याला कायमची तूट. आयाती पेक्षा निर्यात जास्त हे कधी आम्ही पाहिलच नाही. सतात भिकेला लागल्या सारखं आयात आयात करत बसतो. आम्ही १०० रुपयाची निर्यात केल्यास  त्या बदल्यात १३०+ रुपयाची ची आयात करतो. त्यामुळे कायमच डॉलरचा तुटवडा राहिला आहे. हा तुटवडा भरुन काढण्याचा आजून एक मार्ग म्हणजे विदेशी भांडवलदाराना देशात गुंतवणूक करायला भाग पाडणे. त्यातुन हा तुटवडा भरुन निघतो. पण ख-या अर्थाने हा उपाय नाहीच. कारण हे भांडवलदार कधीही आपली गुंतवणूक काढून घेऊ शकतात. खरा उपाय निर्यात वाढवून डॉलरचा साठा वाढविणे हाच आहे. कॉंग्रेस सरकारला मात्र हे निर्यात वाढविण्याचं आव्हान कधीच पेललं नाही. त्यामुळे कायम डॉलरचा तुडवडा राहिला व रुपया दिवसागणिक मुल्य गमावत गेला.
आता रुपया चक्क ६० च्या वर मुल्य गमावुन बसला आहे. एका अमेरीकन डॉलरच्या बदल्यात ६० रुपये...बापरे, काय ही अवस्था!
तरी म्हणे आम्ही एक दिवस महासत्ता बनणार. कसं बनणार? 

***

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा