सोमवार, १५ जुलै, २०१३

माधवी देसाईना भावपुर्ण श्रद्धांजली!तसं माधवी देसाई या लेखीकेंचं मी एकच पुस्तक वाचलं ते म्हणजे "नाच गं घुमा". पण लेखीका म्हणून प्रभाव टाकण्यासाठी हे एकच पुस्तक पुरेसं ठरलं. या पुस्तकानी व त्यांच्या व्यक्तिमत्वानी मी अक्षरशा भारावून गेलो. माधवी देसाई यांची आत्मकथा, त्यांचे अनुभव तर अंगावर काटा आणणारे होतेच, पण त्याही पेक्षा मला त्यांची लिखानाची शैली प्रचंड आवडली. त्यातल्या त्यात त्यानी हाताळलेला फ्लॅशबॅकचा प्रकार अप्रतिम होता. तसं फ्लॅशबॅक म्हटलं की मला प्रचंड तिटकारा. कारण वर्तमानातून सारखं सारखं भुतकाळात नेताना वाचण्याची लिंक तुटल्यामूळे गाडी अनेकदा रुळावरुन घसरुन पुस्तक निरस होऊन जातं. पण माधवी देसाईंची फ्लॅशबॅकची हातोटी मात्र निराळी. नाच गं घुमा मध्ये त्यानी भुतकाळात नेताना व तिकडून परत वर्तमानात आणताना ज्या सहजतेने शब्दांचा खेळ हाताळला त्या कलेला सलाम. संपुर्ण पुस्तक संपेपर्यंत एकदाही अन कुठेही असं वाटलं नाही की इथे लिंक तुटली. वरुन त्यांच्या त्या भुतकाळातल्या घटना वर्तमानातल्या घटनांमध्ये एक जिवंतपणा आणतात.  रणजित देसाई या माणसा बद्दल लेखक म्हणुन प्रचंड आदर होता. माधवी देसाईच्या या पुस्तकामुळे त्यातला काही आदर वाहून गेला. रणजित देसाईच्या हयातीतच हे पुस्तक निघाल्यामूळे व त्यानी स्वत: ते वाचून "आजून बरच काही लिहू शकली असतीस" असा शेरा दिल्यामुळे या आत्मचरित्राला एक अधिकृतपणाही लाभला आहे.  आज माधवी देसाई यांचे  देहावसन झाल्याची बातमी ऐकून मन हळहळलं. मी त्याना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करतो


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा