शनिवार, १० ऑगस्ट, २०१३

संजय सोनवणीना शुभेच्छा


८७ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन सासवडला भरणार असून माझे मित्र संजय सोनवणी यानी संमेलनाध्यक्षाच्या निवडणूकीसाठी काल अर्ज दाखल केला आहे. दर वर्षी कसला ना कसला वाद ओढवुन घेण्या-या या साहित्य संमेलनाने या वर्ष बिनविरोध अध्यक्ष निवडूण आणण्याचा प्रचार चालविला होता. संजय साहेबानी स्वत:चा अर्ज दाखल करत टोळीबाज साहित्यिकांच्या दादागिरीला आव्हान उभे केले आहे. लोकशाही मार्गाने चालणा-या निवडणूक कार्यात भाऊगिरी करुन बिनविरोधाचा आव आणणा-या या निवड्णूकेचे बिंग फोडण्याचे कार्य बजावल्या बद्दल सर्वप्रथम मी सोनवणींचे अभिनंदन करतो. साहित्य संमेलनाच्या निवडणूकीचे पडद्या मागिल सुत्रधार हे कोण असतात आपल्या सर्वाना माहीतच आहे. राजकरणी लोकं आपल्या मर्जीतील होयबाना निवडूण आणतात व ख-या विचारवंताना डोळे वटारुन दूर बसतात. त्यामुळे कित्येक साहित्यक या निवडणूकीच्या वाटॆलाच जात नाहीत. अशा परिस्थीतीत संजय सोनवणींच्या उमेदवारीचे काय व्हायचे ते आम्हाला आधीच माहीत आहे पण किमान अशा लोकाना कोणीतरी आव्हान देतो याचं तेवढच समाधान.
संजय सोनवणी यानी आजवर एकुन ८० च्या वर पुस्तकं लिहली असून अगदी इतिहासा पासून तत्वज्ञाना पर्यंत ते कवितांपासून विज्ञान संशोधना पर्यंत अशी चौफेर साहित्यिक मुशाफिरी करणारा हा लेखक आजवर कायम दुर्लक्षीतच... का बरं? आजुन त्याना साधं मतदानाचा अधिकार नाही, पण दोन चार पुस्तक लिहून होयबा बनलेले मात्र नुसतं मतदारच नाही तर चक्क अध्यक्षही बनले आहेत. हे सगळं कुठेतरी थांबल पाहिजे. राजकीय नेत्यांची साहित्य क्षेत्रातील गुंडगिरी साहित्याचा दर्जा तर खालवण्यास कारणीभूत ठरतच आहे पण त्याच बरोबर ख-या साहित्यिकांच नुकसान करत आहे. नवसाहित्यिकांमध्ये पराकोटीची उदासीनता पाहायला मिळण्याचे कारण सुद्धा हा अतिरेकी राजकीय वावरच होय. हा राजकीय हौदोस थांबविण्यासाठी कुणीच पुढे येत नव्हते. पुढा-यानी सुचविलेल्या नावावर गपगुमान मोहर लावणे एवढेच काय आजवर चालू होते. या व्यवस्थे विरुद्ध दंड थोपटणारा कुणीतरी हवा होता अन याची सुरुवात संजय सोनवणीनी केली त्या बद्दल त्यांचं अभिनंदन.

जयभीम
***

५ टिप्पण्या:

 1. Kharech Sanjay Sonawani yanni atyant mahatwache ani dhadshi paul uchalalyabaddal tyanche Hardik Abhinandan ani pudhil watchalisathi shubhechha. Ramteke sir apla lekh apratim ahe tyabaddal aple kautuk karave titke kamich.Shatsha abhar___Vikram Adhave

  उत्तर द्याहटवा
 2. निवडणूक जिंकल्या बद्दल नव्हे तर निवडणुकीला उभे राहण्याचे धाडस केले म्हणून. हेही नसे थोडके.

  उत्तर द्याहटवा
 3. ह्या ब्लॉगच्या सर्व वाचकांना ६७ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त खूप-खूप शुभेच्छा !!!!!!!!!!!!!!!!
  HAPPY INDEPENDENCE DAY !!!!!!!!!!

  उत्तर द्याहटवा
 4. jay bhim sir......i am very confuse regarding to all historial writer ...please help me to recognise the true historian writers(Prof. hari narke, sanjay sonawani, mahaveer sanglikar, indrajit sawant, shrimant kokate, waman meshram, dr. jaysingrao pawar, dr. a.h.salunke, m m deshmukh) ....
  Rajratna Shinde-9960965007

  उत्तर द्याहटवा