मंगळवार, २० ऑगस्ट, २०१३

रेल्वे दुर्घटना, झुंडशाहीपुढे लोटांगण!


आज दि. २० ऑगस्ट २०१३ रोजी सकाळ मधली ही बातमी. काल बिहार मध्ये कावडीवाले भक्त रेल्वेच्या रुळावर उभे होते अन भरधाव आलेली रेल्वे त्यांच्या अंगावरुन गेली त्यात ३७ देवभक्त मेले अन जवळपास तेवढेच भक्त जखमिही झाले. घटना दुदैवीच. पण् संपुर्ण बातमी वाचल्यावर मात्र चीड आली. अन या बातमीचा समाचार घेण्याचा मोह आवरला नाही. लाल अक्षरात टाकली ती मुळ बातमी असून निळ्या अक्षरातील माझी प्रतिक्रीया आहे. तर आजच्या दैनिक सकाळ मधील बातमी अशी... 

लोहमार्गावर उभे असलेले प्रवासी भरधाव राज्यराणी एक्स्प्रेस गाडीखाली सापडून बिहारमध्ये आज झालेल्या दुर्घटनेत 37 जण ठार, तर 24 जण जखमी झाले. खगडिया जिल्ह्यातील धमारा घाट स्थानकात घडलेल्या या घटनेनंतर संतप्त प्रवाशांनी दोन गाड्यांच्या डब्यांना आग लावली, तसेच चालकाला बेदम मारहाण करून रेल्वेच्या तीन कर्मचाऱ्यांना डांबून ठेवले. सहरसा-मानसी मार्गावर सकाळी साडेसात वाजता ही दुर्घटना घडली. मृतांत शिवतीर्थावर जल वाहण्यासाठी आलेल्या कावडीवाल्यांचा समावेश असल्याचे समजते. दरम्यान, समस्तीपूर येथील विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी या दुर्घटनेत 15 नागरिक ठार झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.
१५ माणसं मेली, वाईटच, पण रेल्वे त्यांच्यावर आली की ते रेल्वेच्या वाटेत? हा प्रश्न मात्र कोणीच विचारत नाही. स्वत: रेल्वेच्या रुळावर जाऊन उभं राहयचं, अन रेल्वे आंगावरुन गेली म्हणून रेल्वेच्या कर्मचा-याना मारहाण करायची. अन वरुन सरकार त्यांना मदत जाहीर करते. अरे दोष कोणाचा ते ही बघणार नाही का? अन ज्या भक्तानी त्या रेल्वेच्या चालकाना बेदम मारले त्या भक्त्तांवर कायदेशीर कारवाई करणार की नाही? बातमी पुढे म्ह्णते...

समस्तीपूर-सहारसा पॅसेजरमधून उतरलेले "कनवारी' (कावडिये, शंकराचे भक्त) धमारा घाट स्थानकातील लोहमार्गावर उभे असताना ताशी ऐंशी किलोमीटरच्या वेगाने आलेल्या सहारसा-पाटणा राज्यराणी एक्‍स्प्रेसने त्यांना उडविले. या दुर्घटनेत 37 प्रवासी ठार झाले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. अतिरिक्त पोलिस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) एस. के. भारद्वाज यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांची संख्या 35 आहे. पाटणा-समस्तीपूर राज्यराणी एक्‍स्प्रेसला धमारा घाट स्थानकात थांबा नव्हता आणि पुढे जाण्यासाठी "क्‍लिअरन्स'ही देण्यात आला होता. मात्र, ही गाडी स्थानकात थांबेल, या कल्पनेने "कनवारी' लोहमार्गावर उभे होते, असे रेल्वे मंडळाचे अध्यक्ष अरुणेंद्र कुमार यांनी सांगितले.
 गाडी थांबेल? असा विचार ते कसं काय करु शकतात? मग चिरडून मेले यात रेल्वेचा काय दोष. अन बिचा-या त्या कर्मचा-यां तरी काय दोष. कोणी म्हणेल कर्मचा-यानी लोकाना रेल्वे रुळावर जाउ द्यायला नको होते. पण मी म्हणतो या भक्ताना कळत नाही का? रेल्वे रुळ काय आराम करायची जागा आहे की काय? येणारी गाडी थांबेल असे वाटले... ठीक आहे. एखाद्याला काहीही वाटू शकते. पण म्हणून काय रेल्वे रुळावर जाऊन आराम करायचा असतो का? रुळ आराम करण्यासाठी असतो की रेल्वेला धावण्यासाठी? बातमी पुढे काय म्ह्णते पहा...

धमारा घाटातील अप आणि डाउन ट्रॅकवर अगोदरच दोन पॅसेंजर गाड्या उभ्या होत्या. सहरसा रेल्वे स्थानकाहून निघालेल्या राज्यराणी एक्‍स्प्रेसला लूप लाइनवरून मार्गस्थ केले जात होते. "राज्यराणी'ला या ठिकाणी थांबा नसताना काही नागरिकांनी गाडीला थांबविण्याचा प्रयत्न केल्याचे समजते. प्रवाशांना वाचविण्यासाठी "राज्यराणी'च्या चालकाने आपत्कालीन ब्रेक वापरले; पण तोपर्यंत उशीर झाला होता, असे सांगून या घटनेच्या अंतर्गत चौकशीचा आदेश देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. खगडिया जिल्ह्यातील धमारा घाट रेल्वे स्थानकानजीक कात्यायनी शक्तिपीठाचे शिवतीर्थ असून, येथील मंदिरात आज यात्रा होती. शिवतीर्थावर जल वाहण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करीत असतात.
 जल वाहायचं ना,  रेल्वेच्या मार्गात का म्हणून आले. वरुन काय तर ट्रेनला हात दाखवून थांबवायचा प्रताप. अरे बिहार मध्ये रेल्वेला बस समजतात की काय? हात दाखवुन थांबविण्याचा प्रयत्न? केवढा विनोद आहे हा. अन वरुन काय तर म्हणे चौकशीचे आदेश. कशाची डोमल्याची चौकशी करणार आता? त्या गाडीला थांबा नव्हता म्हणून ती भरधाव धावली. यातच सगळं संपलं. अन चौकशीच करायची असल्यास त्या देवभक्तांची चौकशी करा. कोणाच्या बळावर ते थांबा नसलेल्या गाडीला थांबविण्याचा प्रयत्न करत होते ते विचारा. हा सगळा झूंडशाहीचा प्रकार आहे. देवभक्त एकत्र जमले की लगेच त्यांच्या आंगात येते. झुंडीने काहीही साधता येतं हा समज(गैरसमज?) हळू हळू भारतीय माणसात रुजत चालला आहे. म्हणून तो झुंडीने एकत्र आला की काहीही करायचं धाडस करतो. यातलाच एक प्रकार म्हणजे थांबा नसलेली गाडी झुंडीच्या बळावर थांबविता येईल हा ओव्हर कॉन्फिडन्स होय. अन पुढे बघा बातमी काय म्हणते.
या दुर्घटनेनंतर संतप्त नागरिकांनी पॅसेंजरच्या चालकाला मारहाण केली, तसेच समस्तीपूर-सहारसा पॅसेंजरचे इंजिन आणि "राज्यराणी'चा एक वातानूकुलित डबा पेटवून दिल्याचे पोलिस अधीक्षक एस. के. झा यांनी दूरध्वनीवरून दिली. दुर्घटनेनंतर "राज्यराणी'च्या इंजिनाचे चालक राजाराम पासवान आणि सुशीलकुमार सुमन बेपत्ता झाले असून, त्यांचे मोबाईल फोन स्वीच ऑफ असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. मात्र, चालक सुखरूप असल्याचे अरुणेंद्र कुमार यांनी नमूद केले. भाविक बेकायदा लोहमार्ग ओलांडत होते, असा दावा त्यांनी केला.
 बेकायदा लोहमार्ग ओलांडून स्वत: चूक करायची अन वरुन मुजोरी बघा. का म्हणून डबा पेटवुन दिला? भक्ताना चिरडले म्हणून? अरे पण या भक्ताना हे माहीत नव्हते का, की धावत्या गाडीच्या पुढे यायचं नसतं म्हणून. मी म्हणतो यांना सगळं माहीत होतं. पण झुंडशाहीनी काहिही करता येईल हा आत्मविश्वास भोवला, बास, अजुन काय! या घटनेतून जर कोणाला काशी बोध घ्यायचा असेल तर तो प्रशासनाला. कारण ही घटाना जरी दुर्दैवी घट्ना वाटली तरी झुंडीच्या मस्तवालपणाची व मुजोरीची एक अवस्था दाखविणारी आहे. आजच आपण झुंडशाहीला आवर घातले पाहिजे हे प्रशासनानी शिकायचे आहे. बातमी पुढे म्हणते...
दुर्घटना घडली तेव्हा "राज्यराणी'चा वेग ताशी ऐंशी किलोमीटर होता. दुर्घटनाग्रस्तांना मदतीसाठी सहारसा आणि बरौनी येथून वैद्यकीय पथके रवाना करण्यात आल्याचे रेल्वे राज्यमंत्री अधीररंजन चौधरी यांनी सांगितले. मृतांच्या कुटुंबीयांना भरपाई देण्याची मागणी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी केली असली, तरी ठार झालेले भाविक बेकायदा लोहमार्ग ओलांडत असल्याचे सांगत रेल्वे त्यांना भरपाई देण्यात तयार नसल्याचे सूत्रांनी नमूद केले. दुर्घटनेत ठार झालेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दहा लाख रुपये नुकसानभरपाईची मागणी खगडियाचे खासदार दिनेशचंद्र यादव यांनी केली आहे, तर जवळपास रुग्णालय नसल्यामुळे जखमींवर उपपचारांत हायगय झाल्याचा आरोप लोक जनशक्ती पक्षाचे नेते रामविलास पासवान यांनी केला.
रामलविलास तर रामदास बनला आहे. त्यानी आता राजकीय सन्यास घ्यावा. रेल्वे प्रशासनाचं मात्र अभिनंदन. बेकायदेशीर रुळ ओलांडण्याचे कारण दाखवत नाकारलेली मदत समर्थनीय असून रेल्वेनी शेंबळेपणा न  करता धीटाईने निर्णय घेतल्या बद्दल अभिनंदन. नितीशकुमारचं स्टंट काय ते कळलं नाहीये. बेकायदा रुळ ओलांड्णारे दोषी की आपल्या ठरलेल्या रुळावरुन धावणारी रेल्वे? अन रेल्वेचा वेग काय होता तर ८०... म्हणजे या भक्ताना वाचविणे अशक्यप्रायच होते. तरी बिचा-यानी इमर्जन्सी ब्रेक लावून जमेल तेवढा प्रयत्न केलाच. पण त्याचे आभार मानण्या ऐवजी भगव्या गुंडाना त्यालाच बेदम मारले. या कारणासाठी तर भगव्या गुंडाना दवाखाण्यातून उचलुन तुरुंगात डांबलं पाहिजे. बातमी पुढे म्हणते...
अपघातानंतर प्रचंड गोंधळ निर्माण झाला. या ठिकाणी परिस्थिती तणावपूर्ण असून, आसपासच्या नागरिकांनी एकत्रित येऊन सरकारविरोधात घोषणाबाजी केली. धमारा घाटापर्यंत जाण्यासाठी रस्त्याची सोय नसून, बचाव पथकाला दुर्घटनास्थळी पोचण्यासाठी तीन किलोमीटरहून अधिक पायी चालावे लागणार आहे.
सरकार विरोधी घोषणा, करे कशासाठी? यात सरकारचा काय दोष? जर कुणाचा दोष असेल तर त्या कावडीवाल्या भगव्या भक्तांचा. जर कुणाच्या विरोधात घोषणा व्हायलाच हव्या होत्या तर त्या म्हणजे भगव्या भक्तांच्या विरोधात व्हायला हव्या होत्या. गुन्हा कोणाच्या हातून घडला हे पाहायचे की नाही? आपल्या ठरलेल्या मार्गानी धावणा-या रेल्वेचा की त्या रुळावर जाऊन बसणा-या भगव्या भक्तांचा? पुढे बघा काय लिहलय... 
लोकांच्या प्रचंड नाराजीमुळे घटनास्थळी रेल्वे अधिकारी जाण्यास कचरत आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी दुर्घटनेबाबत रेल्वे मंडळाच्या अध्यक्षांशी चर्चा केली. खगडियाचे विभागीय अधिकारी व पोलिस अधीक्षक यांच्याकडून तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतला.
नितीशकुमार लबाडी करत आहेत. रेल्वेला दमात घेऊन लोकाना पैसे वाटण्याचा डाव दिसतोय. अन त्यातून स्वत:ची राजकीय पोळी भाजण्याचा प्रकार होणार हे नक्की. कायद्याचे उल्लंघन करणा-या कावडी-भक्ताना कोठडीत पाठविण्याचे सोडून त्याना मदत करण्याचा हा प्रकार म्हणजे झुंडशाहीच्यापुढे लोटांगण घालणे होय. जर सरकार झुंडीच्या पुढे कायदा व नियमाना बगल देणार असेल तर मग या देशातून एकदाचे कायदे बाद केलेले बरे नाही का? संविधान बाद करा, न्यायालयाना कुलूपे ठोका अन पोलिसाना घरी बसवा. झुंडी सांगतील तो कायदा राबवा. मग कधी हिंदूची झुंड, कधी मुस्लिमांची तर मग कधी आंबेडकरवाद्यांची.....
सगळ्या झुंडीना एकदाचे रान मोकळे करुन द्या. अन खुशाल त्यांच्यापुढे लोटांगण घाला! 

बातमी इथे वाचा 

जयभीम
*** 

३ टिप्पण्या:

 1. निषेध!
  निषेध!
  निषेध!
  डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा निर्घुण खून करणाऱ्या भ्याड गोडसेवादी, सनातनवादी प्रवृत्तीचा जाहीर निषेध!

  प्रत्युत्तर द्याहटवा
 2. Mr.Ramteke i agree with your comments that it is mistake of people but consider following facts: There is no foot over bridge at this station. One clear wrong information given by Sakal newspaper which contradicts with fact is that the Rajyarani express was passing on loopline. No it was passing on main line (which is in the middle). So people who have alighted from passenger train were crossing the tracks. Also there was no point in trying to halt Rajyarani express as they were not going to board the rajyarani express. So i dont agree with news reporting that they were trying to stop the train. It is not illegal to cross the tracks at stations where there is no footover bridge. No news item says that it was announced at the station that THROUGH TRAIN was approaching. It is quite possible that unaware passengers (Who were legaly crossing the tracks) were crushed by THROUGH train. And in that case it is 100% fault of Railway that such crossing was not announced to make sure that people dont cross tracks at that time. So my request to you is get the full facts first and then write/comment on others.

  प्रत्युत्तर द्याहटवा
 3. ज्या सर्वशक्तिमान देवाला ते जलाभिषेक करायला गेले किंवा जात होते त्याने तरी ह्या भक्तांना वाचवायला हवे होते किंवा ती रेल्वे उचलून दूर ठेवायला पाहिजे होती,आणि नुकसान भरपाई रेल्वे ला मागीत्ल्यापेक्षा ज्याच्या दर्शनाला गेले होते त्याला मागा ,रेल्वेने काही आवतन दिलं नव्हत ……

  प्रत्युत्तर द्याहटवा