गुरुवार, ८ ऑगस्ट, २०१३

शरद जोशींनी स्वत: बलुतेदारी करावी. माझ्या शुभेच्छा!डॉ. आंबेडकरांनी 'शिका, संघटित व्हा आणि लढा करा' असा कार्यक्रम आपल्या अनुयायांना दिला. शिक्षणक्षेत्रातील आजचा भ्रष्टाचार हा मोठय़ा प्रमाणावर डॉ. आंबेडकर यांच्या लढय़ाच्या आदेशातील त्रुटींमुळे तयार झाला नसेल ना, ही शक्यता तपासून पाहावी लागेल. त्यामुळे, शिकले म्हणजे नोकरी आणि नोकरी म्हणजे पसा ही सर्व समीकरणे समाजवादाबरोबरच उद्ध्वस्त झाली. डॉ. आंबेडकरांनी पुस्तकी शिक्षणापेक्षा बलुतेदारांच्या व्यावसायिक शिक्षणावर भर दिला असता तर जाती नष्ट करण्याचे त्यांचे उद्दिष्टही साधले गेले असते आणि देशाचेही भले झाले असते. 
वरील लाल अक्षरातील पॅरा लोकसत्तात  दि. ७ ऑगस्ट २०१३ रोजी शरद जोशीनी लिहलेल्या लेखातून घेतला आहे. तो लेख ईथे टिचकी मारुन वाचता येईल
*********************************************************
जोशींचे दोन युक्तीवाद आहेत.  
१) बौद्धानी शिक्षण घेण्य़ापेक्षा बलुतेदारी केली असती तर जातीयवाद मिटला असता. 
२) बौद्ध समाज बलुतेदारी करत राहील असता तर या देशाचे भले झाले असते.

जोशी हे पेशाने अर्थतज्ञ असून जागतीक पातळीवर काम करण्याचा त्याना मोठा अनुभव आहे. अशा व्यक्तीने इतके बेजबाबदार व्यक्तव्य करणे अजिबात अपेक्षीत नव्हते अन जागतीक पातळीवर काम केलेल्या माणसाला ते शोभतही नाही. पण त्यानी ते केले. बिचारे ब्राह्मणी व्यवस्थेचे व संस्काराचे बळी आहेत. आजुन काय!
त्यांचा पहिला मुद्दा म्हणजे बौद्धानी बलुतेदारी केल्यास जातीयवाद मिटला असता. काय संशोधन आहे बघा. किती सोपा उपाय सुचवलाय जोशीनी. बाबासाहेबाना हा उपाय सुचला असता तर किती बरं झालं असतं नै. कसा काय नाही सुचला हा उपाय बाबासाहेबाना. जोशीबुवा त्या काळात असते तर किती बरं झालं असतं ना! कसलाही लढा बिढा न देता बलुतेदारीतून समाज परिवतन घढले असते. जरातरी तारतम्य बाळगायचं असतं हो जोशीबुवा. अक्कल गहाण टाकून लेख पाडलात की बुरसटलेल्या ब्राह्मणी विचारानी शेवटी उसडी घेतली ते सांगा आधी. तुमच्या बुद्धिची कीव करावी की हा लेख छापणा-या लोकसत्ताची हेच कळत नाहीये. भटा बामणांची एवढी जळफळाट होण्याचे एकच कारण ते म्हणजे त्यांचा जातीयवादी धर्म फाट्यावर मारुन आम्ही नव्या वाटा चोखाळल्या व समतेचा नवा पर्याय उभा केला. हीच गोष्ट ब्राह्मणी समाजाला अस्वस्थ करुन सोडत आहे. 
जोशी म्हणतात... बलुतेदारीमुळे जाती नष्ट करण्याचे उद्दिष्ट साधले असते. अरे व्वा, हा तर अगदी ताजा तवाना शोध आहे. आम्ही धर्मांतर केल्यामुळे बिचारे ब्राह्मण जातीयवाद करत आहेत की त्यांच्या जातीयवादाला कंटाळून आम्ही धर्मांतर केले? जोशींचा नेमका काय घोळ झालाय कळत नाही. कोणाचा बुद्धिभेद करण्याचा डाव आहे? जातीयवादाचे जनक बौद्ध की ब्राह्मण? वर्णव्यवस्थेचे समर्थक बौद्ध की ब्राह्मण? या देशातील लोकाना ६५०० जातीत वाटण्याचे पापक बौद्धांचे की ब्राह्मणांचे? मागच्या दोन अडीच हजार वर्षापासून जातीयवादाने जो इथे हौदोस घातला ते कोणामुळे? वर्णव्यवस्था टिकून रहावी म्हणून आजही झटणारे कोण आहेत जरा चौफेर नजर टाकली तुम्हाला कळले असते. पण तुम्ही ठरलात भटुरडे, अन चौकश नजर ठेवून परिस्थीतीचा अंदाज घेणे हे तुम्हाला कधी जमले का? अन्यथा या देशातीळ समाज इतक्या जातीत विभागल्या गेलाच नसता. सर्व लोकाना समान धाग्यात बांधुन ठेवण्याची सुबुद्धी कधीतरी ब्राह्मणाना सुचली असती. पण कायम लोकांचं शोषण करणे हाच ज्यांचा स्थायीभाव आहे त्या ब्राह्मण समाजाच्या हातून अशी एकसंधी समाजाची कल्पनाच मांडली गेली नाही. उलट नवनवीन जातींची निर्मीती करुन समाजाची विभागणी चालू ठेवली. एवढा पाताळयंत्री व नतद्रष्ट समाज आहे तुमचा ब्राह्मण समाज. त्याचा परिपाक म्हणून इथला दलित समाज कित्येक वर्ष दारिद्र्यात खितपत पडला होता. बाबासाहेब आंबेडकरांच्या धार्मिक क्रांतीमुळे किमान तो उठून उभा तरी झाला व जगण्याच्या नव्या वाटा शोधल्या. त्यातून एक अभूतपुर्व कार्य घडले ते म्हणजे धार्मिक विषमतेतून होणारी पिळवणूक कमी होत गेली व एक पिचलेला समाज स्वाभिमानाने उभा झाला. मुख्य प्रवाहातून बाहेर फेकलेला हा समाज काही प्रमाणात का होईना आता मुख्य प्रवाहात सामील होत आहे. स्वत:ची नवी ओळख निर्माण करीत आहे. एवढेच नाही तर या देशाच्या जडण घडणीत जमेल तेवढा वाटा उचलत आहे. पण हे सगळं बलुतेदारी केल्याने कसं काय साध्य झालं असतं हे माझ्यासाठी मात्र अनाकलनिय आहे.
एखाद्या देशातील बहुसंख्य समाज मुख्य प्रवाहा पासून बाहेर राहणे कधिही धोक्याचे. बाबासाहेबानी हा धोका ओळखून दलिताना मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य हाती घेतले. पण जातीयवाद अडसर ठरू लागला हे दिसताच बाबासाहेबानी धर्मांतर करुन रंजल्या-गांजल्याना अंधारातून खेचून काढत मुख्य प्रवाहात आणून उभं केलं. याचा फायदा दोघानाही झाला. दलिताना स्वत:चा विकास साधता आला व देशातील बहुसंख्य समाज विकसीत झाल्यामुळे देशावर गरिबीमुळे पडणारा ताण कमी होत गेला. समाज दारिद्र्यात असला की देशाच्या सर्व यंत्रणेवर त्याचा ताण येत असतो. तो ताण दूर करण्याचे काम बाबासाहेबानी धर्मांतराच्या माध्यमातून केले...वर वर पाहता हे तुम्हाला पटणार नाही पण धर्माच्या नावाखाली अस्पृश्य म्हणून गावाबाहेर निष्क्रीय पडून राहणारा अनुत्पादकीय समाज धम्मांतरामुळे स्वतंत्र समाज म्हणून उदयास आला व आज उत्पादनाचा सक्रीय घटक बनला आहे. म्हणजे धर्मांतराची प्रक्रीया वरवर पाहता हिंदूत्व झुगारण्याची आहे असे दिसले तरी ख-या अर्थाने सामाजिक स्थीत्यांतरातून एक अनुत्पादकीय घटक उत्पादकीय समाज बणण्याची ती प्रक्रीया आहे.  त्याची सुरुवात झाली बलुतेदारी झुगारण्या पासून. बलुतेदारी करता करता ज्यांच्या पिढी खपल्या त्या लोकांना साधं माणूस म्हणून जगण्याची सोय नव्हती. पण शिक्षण घेऊन बलुतेदारी व जातीयवाद दोघांशीही लढता आले. त्यातून समाजाचे सबलिकरण झाले. त्याचा देशाला व इथल्या समाजाला फायदाच झाला. त्याच बरोबर धर्मांतरामुळे आजुन एक फायदा झाला तो म्हणजे समतोल गमावलेल्या समाजात संतूलन निर्माण करण्याचे महान कार्य घडले. हिंदू धर्मात ज्याचे शोषण होत होते तो बाहेर पडल्यामूळे त्याचा विकास झाला व सामाजिक संतूलन निर्माण झाले. नाहीतर आज कोटीच्या कोटी लोकं अस्पृश्य म्हणून गावाबाहेर बसून असते... हिंदू उच्चवर्णीय मजेत जगत असते तर शुद्रांचे खायचे लाले असते. हे सामाजिक असंतुलन या देशाला कुठे घेऊन गेले असते जरा याचा विचार करा. धर्मांतरामुळे सामाजिक संतूलन निर्माण झाले हा सगळ्यात मोठा फायदा आहे.
जर धर्मांतरामुळे कुणाचे नुकसान झालेच असेल तर ते ब्राह्मणांचे... ज्यानी कायम समाजाला जातीत वाटून सामाजिक संतूलन बिघडविण्याचे काम केले त्यांचं नुकसान झालं. कारण ब्राह्मणांची चाकरी करणारा गुलाम वर्ग आता जातीव्यवस्था झुगारुन कायमचा निघून गेला. अन बाबासाहेबांच्या कार्यामुळे बहुजनांत नवचैतन्य निर्माण होऊन स्वाभिमानी जिवनाचे नवे पर्व सुरु झाले. आजवर ब्राह्मणांची गुलामगिरी करणारे आता स्वतंत्र तत्वज्ञानाची, तर्काची व समतेची भाषा बोलू लागले. हा सगळा बदल घडून आला तो शिक्षणामुळे. अन जोशी म्हणतात... बौद्धानी शिक्षण घेण्याची गरज नव्हती. त्यानी बलुतेदारी केली असती तर देश पुढे गेला असता... केवढा हा विनोद! बौद्धानी शिक्षण घेऊ नये हा विचारच कसा येऊ शकतो एखाद्या माणसाच्या डोक्यात? अर्थतज्ञ असणारा माणूस एखाद्या समाजानी शिक्षणच घ्यायला नको होते असं म्हणणे म्हणजे केवढा मुर्खपणा हा? जोशी साहेब, तुमची अर्थशास्त्राची पदवी सरेंडर करा. अन माझा सल्ला आहे की जाऊन तुमचा पारंपारीक भिक्षूकीचा धंधा करा.... अन आम्हाला आमच्यावर सोडून द्या.
त्यांचा दुसरा मुद्दा असा की बौद्धानी बलुतेदारी सुरु ठेवली असती तर देशाचे भले झाले असते. अरे तुमच्या सारखे शेंडीवाले जोवर ईथे आहेत तोवर देशाचं वाट्टॊळ ठरलेलं आहे. देवाधर्माच्या नावाने आणि मंदीर/ट्रस्ट प्रकरणांतून शेंडीवाल्यानी जी लुटमार चालविली आहे, त्यातून देशाचे खरे नुकसान होत आहे. पदमनाभ मंदीरात सोन्याचा हत्ती सापडतो, तिरूपतीच्या मंदीरात क्विंटलनी सोनं मोजलं जातं. शिर्डीचे मंदीर तर कार्पोरेट कंपनीच झाले आहे. ही सगळी लूटमार कोण करत आहे? या सगळ्या माध्यमांतून देशाला उध्वस्त करण्याची यंत्रणा ब्राह्मणी समाज राबवित आहे यावर ब्र शब्द का नाही उच्चरत कोणी. अन जोशी म्हणतात काय तर बलुतेदारीतून देशाचं भलं झालं असतं. व्वा रे शेंडीवाल्यानो, बरं झालं जोशी तुम्ही स्वत:च्या बुद्धीची दिवाळखोरी जाहीर केली. जर तुम्हाला या तत्वज्ञानावर(बलुतेदारीतून देशाचं भलं वाल्या) एवढाच विश्वास असेल तर तुम्ही स्वत: आधी बलुतेदारी करायला सुरुवात करा. त्या नंतर तुमच्या कुटुंबाला बलुतेदारीच्या कामाला लावावे. अन त्यातून देशाचे भले करावे. आम्हाला आनंद होईल. बलुतेदारीचं काम काही वर्षे केल्यावर तुम्हाच्या गाठीशी जो अनुभव येईल तो पुढच्या पिढ्यांसाठी शब्दात उतरवून ठेवा. बलुतेदारीमुळे देशाचे कसे भले करता येऊ शकते यावर तुम्ही एक पुस्तक लिहा. त्या पुस्तकाचा तुमच्या ज्ञाति बांधवांत प्रचार व प्रसार करुन समस्त ब्राम्हणांची बलुतेदारीची चळवळ उभी करावी. वीस-पंचवीस वर्षात सर्व ब्राह्मणानी स्वत:ला बलुतेदारीसाठी झोकून द्यावे. अन त्यातून देशाचं भलं करावं. जोशीला व त्याच्या ज्ञातिबांधवाना मी अडव्हान्स मध्ये शुभेच्छा देतो.

या विषयावर ज्याना जोशींशी थेट चर्चा करायची आहे त्यानी मला संपर्क करावा. मी जोशींचा नंबर देईन.

जयभीम.
***

११ टिप्पण्या:

 1. I read the original article. Mr. Ramteke, I think what Mr. Joshi meant by his comment was different than what you have interpreted. He never supported so called Balutedari. What he is refering to is vocational education. And there is merit in what he is saying. Just learning to read and write and passing some useless college degrees is not helping at all. What our youth requires is vocational training. He might have refered to Buddhist people as that was the section of society who was much more skilled in vocational aspects. If they have continued in getting professional and more technical skills in their respective vocations then they could have prospered much more. And our country could have also got real skilled people and not just useless college graduates. And getting financial independence through vocational education is definitely better than just getting college degrees. Please think before commenting on Brahmins just like that.

  उत्तर द्याहटवा
 2. To add to previous comment, I know many Brahmin boys who have taken vocational education like scooter mechanics, plumbers, electricians etc. And they are in much better financial condition than even MA MCom people from reserved catagories as jobs are very scares. And thats what Mr Joshi is refering to as Balutedari. he is not refering to any caste system. Please think.

  उत्तर द्याहटवा
 3. "डॉ. आंबेडकरांनी 'शिका, संघटित व्हा आणि लढा करा' असा कार्यक्रम आपल्या अनुयायांना दिला. शिक्षणक्षेत्रातील आजचा भ्रष्टाचार हा मोठय़ा प्रमाणावर डॉ. आंबेडकर यांच्या लढय़ाच्या आदेशातील त्रुटींमुळे तयार झाला नसेल ना, ही शक्यता तपासून पाहावी लागेल. "

  -- शिक्षणक्षेत्रातील आजचा भ्रष्टाचार आणि डॉ. आंबेडकर यांचा संबंध नक्किच शरद जोशींची मानसीक भुमिका स्पष्ट करतात.

  "त्यामुळे, शिकले म्हणजे नोकरी आणि नोकरी म्हणजे पसा ही सर्व समीकरणे समाजवादाबरोबरच उद्ध्वस्त झाली.

  डॉ. आंबेडकरांनी पुस्तकी शिक्षणापेक्षा बलुतेदारांच्या व्यावसायिक शिक्षणावर भर दिला असता तर जाती नष्ट करण्याचे त्यांचे उद्दिष्टही साधले गेले असते आणि देशाचेही भले झाले असते."

  -- शरद जोशी यांचे वरील वक्तव्य नक्किच vocational education बद्दल नाही. परंतु जाती नष्ट करण्याचा व देशाचे भले करण्याचा इतका सहज साधा उपाय आंबेडकरांना सुचला नाही हे मात्र खरे.

  उत्तर द्याहटवा
 4. आयुष्यमान महोदय
  मैंने शरद जोशी का लेख आपकी लिंक पर जाकर पढ़ा है. जैसा जातीयवादी रंग आपने अपने लेख में दिया है वहाँ वैसा कुछ भी नहीं है. उन्होंने जाति आधारित बलुतेदारी का नहीं बल्कि बलुतेदारी की व्यावसायिक शिक्षा की वकालत की है. आज के बेरोजगार युवक किताबी ज्ञान के कारण ही बर्बाद हुए है. वे नौकरी निर्मित नहीं कर रहे बल्कि नौकरी मांग रहे है. जबकि ओद्योगिक क्रांति और तंत्र ज्ञान ने बलुतेदारो का काम ज्यादा आसान कर दिया है. कमाई भी उनकी आज ज्यादा है.
  बलुतेदारी कभी भी बंद नहीं होगी क्योंकि वही सम्पति का निर्माण करती है. अपना बाजार मूल्य वह स्वयं तय करती है. जबकि आज की सरकारी नौकरी में हमारे वेतन और भत्ते आयोग या कानून से तय होते है, बाजार द्वारा नहीं. हम कोई काम नहीं करते हुए भी वेतन लेना अपना अधिकार समझते है. कोई देश दो-तिन प्रतिशत ऐसे लोगों का बोझ तो ढो सकता है पर ज्यादा संख्या में ऐसे लोगों को विकास कि इस योजना में शामिल नहीं कर सकता है.
  आज यदि डॉ. अम्बेडकर जिन्दा होते तो वे शरद जोशी की बात का समर्थन ही करते और शायद दोनों किसी बात पर लड़-झगडकर एक हो जाते. उनके नाम की जय जयकार करके बकवास करने से बेहतर है आज वो होते तो क्या सोचते इस बात पर गौर करना. डॉ अम्बेडकर वक्त के हिसाब से नहीं बदलते, ऐसा सोचना, उनपर अन्याय करने जैसा है. आप लोग किसी भी व्यक्ति को उसके जन्म के आधार पर इतना लताड़ते हो की लोग आपसे बहस करने से बचने लगते है. मै समझता हूँ कि इससे नए विचार और प्रवाह केवल कुंठित होते है.
  रही बात आपके लेख की बाकी बातों पर, तो मै इतना ही कहूँगा कि व्यावसायिक समाज ही सभ्यता और संस्कृति का निर्माण करते है, भाषा का विकास करते है, खानपान को दूसरे देशों तक प्रसारित करते है, नौकरीपेशा लोग नहीं. वे तो कुछ दिनों के लिए समाज पर रुबाब जरुर गांठ ले किंतु अंतिम जीत तो व्यावसायिक समाजों की ही होती है.
  नौकरी पेशा समाज तो सदा डरा हुआ असुरक्षा में जीता है और अपनी औलादों को भी वही बीमारी विरासत में देकर जाता है. ये लोग अपनी सुविधा के लिए अपनी जाति, धर्म, परिवार और राष्ट्र से भी दूरियाँ बना कर चलते है. खुद डॉ. आम्बेडकर अपने ही समाज के पढ़े लिखे मतलबी लोगों से दुखी थे और अपनी अंतिम सांस तक उनको कोसते रहे. क्या उनको कुछ उम्र ज्यादा मिलती तो वे उनको अपने स्वार्थो के साथ जीने की यही छूट देते? या उनके विरुद्ध एक नया एल्गार पुकारते? आप अभ्यासु है, थोडा प्रयास करेंगे तो इसका उत्तर आपको मिल ही जायेगा.

  एड दिनेश शर्मा  उत्तर द्याहटवा
 5. आज बाबासाहेबांचा हाच संदेश घेऊन आमचे बांधव फार मोठ्या संख्येने उच्च शिक्षणासाठी प्रेरित झाला आहे. शिकून ज्ञान व कौशल्ये प्राप्त करून मोक्याच्या जागा पटकावून आपल्या समाजाची प्रगती करण्यासाठी तो सज्ज झाला आहे. आज महाराष्ट्रात नव्हे तर देशाच्या अनेक भागात बाबासाहेबांचा समाज पोहचला आहे. केवळ बाबासाहेबांमुळे आम्हाला शिकून मोठे होण्याची प्रेरणा मिळाली आणि समाजातील शैक्षणिक व राजकीय मक्तेदारी संपवण्याची कामगिरी पार पडण्याची संधी मिळाली आहे. ज्या बाबासाहेबांवर लहान लेकरा पासून अबाल रुद्धाने भरभरून प्रेम दिले त्या बाबासाहेबांवर टीका करण्यापेक्षा ज्या शेतकऱ्यांचे पुढारी आपण म्हणून घेतो त्यातले किती शेतकरी आपल्याला ओळखता ते पहावे, पांचट भटगिरी करून वृतपत्र खपवणे बंद करा, अख्खी जिंदगी गाईचे गोमित्र पिण्यात गेलेल्यांनी आमच्या सोन्या सारख्या बापावर शिंतोडे उडवू नये....जय भीम.

  उत्तर द्याहटवा
 6. भावनिक न होता व्यावहारिक दृष्टीकोनातून विचार केला तरी जोशीबुवाचे म्हणणे न पटण्यासारखे आहे. पारंपारिक पद्धतीने बलुतेदारी करण्यापेक्षा आज ITI सारख्या व्यवसायाभिमुख शिक्षण संस्था आहेत(म्हणजे शिक्षण आलेच) त्याचा लाभ पोरांनी घेऊ नये का? जोशी च्या समाजातील नवीन पिढी उच्च शिक्षण घेऊन लाखो करोडो रुपये कमावत आहे, भिक्षुकी करून एवढे मिळाले असते का? ज्या शेतकऱ्यांचे हे पुढारी आहेत असा म्हणतात त्यांनी B.Sc/M.Sc Agriculture करून शेती केली तर त्यांना नुकसान होईल का फायदा?
  आणि ज्या बलुतेदारी मुळे जतिव्यवस्था निर्माण झाली तीच बलुतेदारी जातीयता नष्ट करू शकेल हे ऐकून तर "मनु" सुद्धा हसला असता.

  उत्तर द्याहटवा
 7. Joshi never supported Balutedari in his article. What he has clearly mentioned is vocational education. "Balutedaranchya vyavasayik shikhanavar bhar dila asata" are his exact words. Where is he supporting caste system here? I think most of the peopem commenting here are either not ready to read carefully and understand what he has written or are almost blind by hatred towards Brahmins. Today when i call a plumber in my Mumbai flat, i dont even think whether he is brahmin or Buddhist or Muslim. I just want a Plumber who knows how to do his job. And thats what Mr. Joshi is refering to. If you have skills no one asks your caste. You live finalcially independent life. And in fact the unorganized growth and corruption in most of the colleges is due to huge demand for bookish education. Most of the engineers are unemployable in the industry as they lack skills. They just have passed a degree which is not giving them any job. Then whats wrong in what Mr Joshi said? When i recruit in my company i never look for caste or religion of candidate. What i want is skills. In my department in one big MNC in Mumbai, i have 2 muslims, 3 brahmins, 1 Maratha and 1 buddhist. And all are selected on skills they have and not the degree they have.

  उत्तर द्याहटवा
 8. शिक्षण क्षेत्र भ्रष्ट आहे हे जोशी बुवांनी मान्य केलय आणि त्याचा दोष ते आंबेडकरांना देवू पाहतात ,परंतु ह्या शिक्षण क्षेत्रात बहुसंख्येने कोण आहेत हे सोयीस्कर विसरतात,फक्त आंबेडकरी समाजाला बदनाम करण्यासाठी काहीही बरळतात . आंबेडकरी समाजाला बदनाम करण्याचे कारण कि ब्राम्हणांच्या ढुंगनाला आग लावणारा हा एकमेव समाज आहे. ढुंग णाला आग लागली म्हणजे अशा बेताल वाफा बाहेर पडतात .

  उत्तर द्याहटवा
 9. Shikshan shetra bhrashta zala yacha DR. AMBEDKAR yanchya vidhanashi mel julvun joshibuvana kay bolaychay tari kay ahe?
  Jya DR. AMBEDKARANI sansademade je draft mandale tya draft na kerachi topli dakhavali ani nantar tyach draftna lok kalyanasathi javal kela. Mag Dr. AMBEDKARA yani dilela mulmantra kasa chukicha asel.
  shikshanshetra bhrashta muddamun kela gela ahe karan 80% dalit samaj shikala tarr kay gahajab majel yachi bramhanvadyana bhiti vatate.
  Kadhi government kinva semi-govt. school madhe ek tari bramhan vidyarthi disel ka? Kadhich nahi. Mhnun hya sarvani milun hya shikshanshetrache tintera vajavlet. Savara sarvani apaplya mulana tyanchya shikshanachi kalji ghya. Hi yanchi labadi ahe, tyana Dr. AMBEDKAR yancha sandesh ulta ani chukicha ahe he patavun sangavayacha ahe.

  JAIBHIM

  उत्तर द्याहटवा
 10. Bhalesh, the condition and quality of teachers in Govt and semi Govt schools has deteriorated so much in last 20 years due to Goct policies that any one who can pay some more money don't send their kids to these schools. I myself studied in Zilla Parishad schools till 7th STD in 1990s. But the same school now has teachers who dont even know basic maths and even Marathi grammer. Why will i send my kids to such school now? And why is this condition? Please think. Its about quality and skills and not about Caste.

  उत्तर द्याहटवा
 11. Mi swataha shikshanshetrashi sambadhit ahe. Suruvatila aplyasarkhi mule jat astil,sadhya
  ata mazyakade ek udaharan ahe eka bramhan mulacha
  1)ha dahavitla mulga baherun mhnjech 17 no. cha form bharun basla ahe(tumhi sangal hyat kay navin?)
  2)hya mulane purnapane ataparyant vaidikshastracha abhyas kelela ahe(ata ha abhyas kute shikavtat mala mahit nahi)
  3)ha mulga dar ravivari jyotish shastracha abhyas karayla jato(mag te lecture kinva exam asli tari ti budvato)
  4)hya mulachya ghari athavadyatun ekda tari pujapath asto tyamule lecturla dandi astech.(mhnje examla trr nasto ani sutya bharpur marto)
  5)mi coaching classes gheto ani ha pahilach bramhan mulga mazyakade admission ghetlela.
  6)tarihi ha mulga kamalicha hushar ahe.Maths madhe trr kon tyacha hat sudha pakdu shakat nahi. Sarva vishyat hushar(ani ho mi sarvapratham ek teacher ahe mhnun mi mulanchyabddal jatiy drushtikonatun kadhich baghat nahi. Mi maza nirikshan sangtoy)

  mala hya goshti khup ajab vatatat. He kasa kay asu shakta?
  AMIT sir mi manto atache govt schoo kinva tethil teachers brbr nahit pan tumchi kiti% mule pvt school la jatat ani sobat evdya lahan vayat dharrmandhpana kiti bhinavata tyanchya manat?
  Asa asunahi evda mulana tayar karun tumhala kay sadhya karaycha ahe?

  Mag shikshanshetrat changle teachers nahit he ahe khara uttar. JE TUMHICH MALA SANGITLA ANI HE JARA JOSHIBUVANASUDHA SANGA. KARAN TE SHIKSHANSHETRATIL BHRASHTACHA(TEACHERS BHARTI TYAT ALICH) cha sambadh DR AMBEDKAR yanchya vidhanashi jodtat je purnapane visangat ahe.
  Mala amchya samajala hach sandesh dyaycha ahe, ki DR. AMBEDKARANCHA sandesh yogya ahe to jasachya tasach vapra. Matra ek kam kara aplya mulana pvt school madhe taka jar jamat nasel trr swataha tyacha abhyas ghya ani jarr tumhi ajunahi ashikshit asal trr tumchi mule devdharmachya ahari 100% geli samja mag kasla VOCATIONAL EDUCATION denar tyana. Ek divas ha varcha bramhan mulga punha ekda aplya mulanchya mangutivar basel..............
  Please shikva aplya mulana
  (AMIT sir apan pratikriya pathavali trr marathit pathva karan ethe yenare bahusankhya vachakana soyicha jail)

  JAIBHIM

  उत्तर द्याहटवा