मंगळवार, २० ऑगस्ट, २०१३

महाराष्ट्र पोलिसांचा निषेध!नमस्कार महाराष्ट्र पोलिस,
दि. २० ऑगष्ट २०१३ रोजी सकाळी डॉ. नरेंद्र दाभोळकरांची पुण्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आली असून अजून पोलिसानी आरोपीना पकडले नाही. पुरोगामी महाराष्ट्राला लाज वाटावी अशी ही घटना असून कोणीतरी येतो अन कोणाचा तरी खुन पाडून जातो याला महाराष्ट्र पोलिस नक्कीच जबाबदार आहेत. कारण पिस्तोल मधून गोळ्या झाडण्यात आल्या व पिस्तोल काही कांदा-बाटाट्याच्या बाजार मिळत नाही. त्याच्या विक्रीमागे विशिष्ट टोळी बहाद्दर यंत्रणा काम करत असते. कित्येक वेळा पोलिसांचा अशा यंत्रणेला वरदहस्त असतो. अशा टोळ्य़ाना/यंत्रणेला शोधून काढणे हे पोलिसांच्या व्यतिरिक्त इतर कोणाचेच काम नाही. पुण्यातील गुंडाकडे येणा-या पिस्तोलचा पुरवठा ठप्प करणे हे तुमचे काम असून आजच्या खुनासाठी वापरण्यात आलेल्या पिस्तोलसाठी फक्त अन फक्त पोलिसच जबाबदार आहेत.

मी महाराष्ट्र पोलिसांचा निषेध करतो.

---------------------
मी खालील ईमेलवर आपला निषेध नोंदविला आहे. 
आपणही एक निषेधाचे इमेल पाठवुन पोलिस यंत्रणेला विरोध कळवा.

dgpms.mumbai@mahapolice.gov.in डि आय जी महारष्ट्र राज्य पोलिस
cp.pune@mahapolice.gov.in पोलिस कमिशनर पुणे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा