गुरुवार, १२ सप्टेंबर, २०१३

अनिस: माझी ती श्रद्धा तुझी ती अंधश्रद्धा!

दाभोळकरांच्या खुनानंतर उभ्या महाराष्ट्रात अंधश्रद्धा विरोधकांची लाट उसळली. सर्वत्र दाभोळकर समर्थकांच्या सुरात सुर मिसळून परिवर्तनाचा राग आवळणारे अनेक नवे चेहरे दिसू लागले. अगदी खेड्यागावातील काना कोप-यातुन थेट मुंबईतील विधानभवनापर्यंत या परिवर्तनाच्या लाटेन उभा महाराष्ट्र गदागदा हलवून सोडला असं वाटून गेलं. व्वा... दाभोळकरांच्या मुत्यू नंतरच का होईना पण मराठी माणूस परिवर्तनाच्या लढ्यात उतरला असे वाटून मला मनातून हायसे वाटले. पण लवकरच माझा अपेक्षाभंग झाला. माझी घोर निराशा झाली.
कारण दाभोळकरांच्या मृत्यू नंतर काही दिवसांतच गणेश उत्सव आला. गल्ली बोळातून ओरडत हिंडणारे सगळे परिवर्तनाच्या लढाईतील नवे शिपाई चक्क बाप्पाच्या स्वागताच्या तयारी लागले. रस्तो रस्ती डांबरी रस्ते खोदून काढल्या गेले. जिथे सिमेंटचे रस्त होते तिथे ड्रिल करुन रोडला भोकं पाडण्यात आली. महाराष्ट्राच्या कानाकोप-यात सर्वत्र नवे पेंडाल उभे झाले. हा हा म्हणता बाप्पा येऊन पेंडालात विराजमान झाले. सगळीकडॆ रात्रंदिव भोंगे लावुन भक्तीगितं वाजविली जाऊ लागली. आमच्या पुण्यातल्या सुशिक्षीत बायका तर पहाटेच आंघोळी आटपुन सकाळी ४ वाजता पासून दगडूशेठच्या दर्शनासाठी तासोन तास ताटकळू लागल्या. नवशिपायांचा परिवर्तनवादी जोश आता दिशा बदलून उंदराच्या पाठीवर बाप्पाची स्वारी करविण्यात तल्लीन झाला. रात्रीचे बारा झाले की त्याच बाप्पाच्या पाठीमागे बसून पत्ते खेळणे, दारु पिणे असे प्राचिन काळापासून जोपासलेले धर्मकार्यातील पुरक उद्योग सुरु झाले. अधुन मधुन सरकारी जबाबदारी म्हणून मंत्री लोकं पोलिसांवर तोंडसुख घेत “बघा.... आम्हाला आजुन दाभोळकरांचा विसर पडला नाही बरं का!” हे दाखवुन देत आहेत. एकंदरीत काय तर महिना उलटायच्या आता दाभोळकरांची व त्यांच्या परिवर्तनवादी चळवळीची हवा फुस्स झाली.
आता काही विचारवंत समाजाला शिव्या शाप देण्याचा नवा उद्योग पुढचे काही महिने अखंड चालवतील. इथले तथाकथीत दाभोळकर समर्थक परत एकदा अंधश्रद्धा वाल्यांच्या नावाने बोटं मोडणे सुरु करतील. त्यांचा सौम्य लढा परत सुरु होईल. अन परत एकदा महाराष्ट्र पुरोगामीत्वाचा नवा आव आणत कोणतातरी नवा विचार व नवी संघटना घेऊन आपल्या दारी येईल. हे सगळं व्हायचंच.
पण मला दाभोळकर व त्यांच्या अनिस बद्दल दोन शब्द बोलायचे आहेत.
दाभोळकरांची चळवळ ही महाराष्ट्रातील परिवर्तनाची चळवळ होती का? असा प्रश्न उठावा अशी एकुन परिस्थीती लगेच अनुभवास आली ती गणपतीमुळे. थोडसं खोलात जाऊन विचार केल्यास व जरा चिकित्सक व तर्कदृष्टीने अनिसला काही कसोट्यांत तपासल्यास असे दिसेल की अनिसची चळवळच मुळात बनावट चळवळ आहे. अनिसवाल्यांचे सिद्धांतच मुळात लबाड्या असून परिवर्तन म्हणावं असं काहीच या चळवळीत सापडत नाही. अनिसच्या चळवळीचा कणा काय तर जादूटोणा, अंधश्रद्धा यांचे निर्मूलन करणे होय. अगदी श्याम मानव व दाभोळकरानी त्यासाठी आयुष्य झोकुन दिले. पण  माझं मत विचाराल तर हा श्याम मानव स्वत: एक भोंदू असून दाभोळकर सुद्धा भोंदू बाबाच ठरतात. मी आजवर याना परिवर्तनाचे सच्चे शिपाई असं म्हणत असे पण आता जरा खोलात शिरल्यावर ती माझी चुक होती हेच सिद्ध झाले. फार फार तर मी त्याना अर्धपरिवर्तनवादी म्हनू शकेन. कारण काय तर हे दोघेही अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ चालवायचे खरे पण अंधश्रद्धेच्या मुळाशी असलेला देव व धर्म मात्र नाकारत नाही. जिथून जगातल्या सगळ्या अंधश्रंद्धांचा जन्म होतो तो म्हणजे देव. देवाच्या विरोधात ब्र शब्द नाही.  अंधश्रद्धेतून देव आला की देवामुळे अंधश्रद्धा रुजत गेली असा साधा प्रश्न कधी या अनिसवाल्यानी उचलून धरला नाही. अनिसचे कार्यकर्ते म्हणून मिरविणारे सगळे स्वत: मात्र अगदी जल्लोषात घरात बाप्पाचं स्वागत करतात. हे कसं काय? गणपतीची कथा काय ते जरा बघा....

“... अमुक एक गावी एक शिव-पार्वती नावाचे जोडपे राहात होते. एकदिवस पार्वती आंघोळीला जाताना दारात पोराला उभं करते. मग शिव येतो व पोराचं मुंडकं उडवतो. बायकोचा ओरडा नको म्हणून मग हत्तीचं मुंडकं लावतो. मग हे हत्तीचं मुंडकं लावलेलं पोरगं उंदरावर बसून पृथ्वीला प्रदक्षिणा घालतो....” वगैरे वगैरे ती कथा. शेंबळं पोरगही सांगेल की वरील कथा एक शुद्धा थाप आहे. उंदरावर बसून प्रवास करणा-या पोराची ही कथा आज महाराष्ट्रभर धूमधडाक्यात उत्सवाच्या रुपात साजरी केली जाते. या मुषकप्रवासी बाप्पाची भक्त्ती अनिसचे सभासदही मोठ्या भक्तीभावाने करतात. दाभोळकर व श्याम मानवानी कधी गणपतीला विरोध दर्शविलेलं माझ्यातरी वाचनात नाही. मग मला प्रश्न असा पडतो की या दोघांची ही असली कसली अनिस...? मुषक प्रवासी बाप्पाच्या रुपातील अंधश्रद्धा याना चालते व इतर नाही. हा दुटप्पीपणा का म्हणून?

आता कोणी म्हणेल गणपती बसविणे ही श्रद्धा आहे. जादुटोणा करणे ही अंधश्रद्धा आहे. तुम्हाला श्रद्धा व अंधश्रद्धा यातील फरक कळला नाही... वगैरे.
यावर मी आधीच उत्तर देऊन ठेवणे सोयीचं मानतो. मुळात श्रद्धा व अंधश्रद्धा अशा दोन वेगवेगळ्या गोष्टी नाहीच. ही एकाच संकल्पनेची फोड आहे. लोकाना लुबाडण्यासाठी शब्दाचा खेळखंडोबा केला गेला एवढेच.  या तत्वज्ञानाला जर एका वाक्यात सांगायचं झालं तर ते असं...  “माझी ती श्रद्धा, तुझी ती अंधश्रद्धा” अनिसवाले हेच करत आहेत व लोकांची फसवणूक करत आहेत. अनिसवाल्यांची बाप्पाभक्ती ही श्रद्धा तर इतरांचे विधी अंधश्रध्दा. खरोखर लबाड जर कोणी असतील तर ते अनिसवाले व श्याम मानव सारखे त्यांचे म्होरके.  आपल्याला जर कोणापासून सावध राहायचं असेल तर ते दुटप्पी धोरण राबविणा-या अनिसवाल्यांपासूनच. कारण अनिसवालेच लबाड लांडगे आहेत. 

पुन्हा सांगतो, सर्व अंधश्रद्धांच्या मुळाशी देव आहे. अनिसवाले  मुळावरच वार घालायला तयार नसतात.

बघा पटतं का!

८ टिप्पण्या:

 1. I understand your feeling. What Mr Manav and Mr Dabholakar is doing may not be enough. At least they tried something honestly. And whole social situation is so bad, they have to start with something. They have their own financial and organizational limitation. At least they did not done any bad.
  Anyway I liked the article as whole. I was expecting something on Asaram. And waiting on the remaining series on communist movement.

  उत्तर द्याहटवा
 2. म्हणजे "फुले शाहू आंबेडकर" सोडून बाकी सर्व सुधारक ढोंगी????
  तुमच्या माहितीसाठी सांगतो. डॉ. दाभोलकर कट्टर नास्तिक होते हे त्यांनी काही टीवी च्यानल वर स्पष्ट केले होते. "चला चोर्‍या करायला, चला शिंगणापुरला" हि मोहीम त्यांचीच होती. आक्षेप घेण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. मिरवणुका, ढोल-ताशे, लाउड- स्पीकर इ. विकृतींचा वापर या देशातल्या सर्व धर्मियांकडून होतो हे तुम्हालाही मान्य करावे लागेल. या सर्वांशी त्यांनी वैर का पत्करले नाही याचं स्पष्टीकरण नरके सरांच्या ब्लॉग वर मिळेल.
  आणि नास्तीक्तेची भूमिका ब्लॉगवर मांडणे सोपे आहे पण ज्यांना समाज कार्य करायचे आहे त्यांना लोकांच्या भावना दुखुवून चालत नाही हेही लक्षात घ्यावे.

  http://harinarke.blogspot.in/2013/08/blog-post_20.html

  उत्तर द्याहटवा
 3. जय भीम....

  कोणतेही श्रद्धा हि शेवटी अंधश्रद्धाच ठरते....
  खरे पाहता आज या अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या लोकांना आपण कितीही शिव्या द्या येथील बहुजन वर्ग शांतच राहील फार फार तर आपल्याला मौखिक विरोध करेन पण जेंव्हा तुम्ही अंधश्रधेचे मूळ देव या कल्पनेवर घाव घालाल तेंव्हा येथील अज्ञान बहुजन समाज तुमच्यावरच जीवघेणे घाव घालील हि एक वास्तविकता आहे.... यासाठी नरेंद्र दाभोलकर यांनी या अंधश्रद्ध वृक्षाला हळूहळू पोखरण्याचा कार्यक्रम आखला होता...तुमच्या भाषेत फार तर त्यांनी पाने तोडण्याचा कार्यक्रम हाती घेतला होता...पण काही न करण्यापेक्षा काहीतरी केले याचे समाधान आहेच ना....


  उत्तर द्याहटवा
 4. अंधश्रद्धा विरोधी कायद्याचा देवाधर्माला विरोघ नाही असे दाभोलकर आणि मानव म्हणतात । आपल्या घटनेच्या चौकटीत कायदा करायचा तर तसे म्हणणे भाग आहे । बाकी ते दोघेही नास्तिकच ! आपली काहीतरी गल्लत होते आहे

  उत्तर द्याहटवा
 5. त्यांनी जे काम हातात घेतले होते ते केवळ गप्पा मारणाऱ्या लोकांना अपुरे वाटू शकेल . पण या कामाला झालेला विरोध बघता एवढे करणेही किती अवघड होते हे कळेल . नरेंद्र दाभोलकरांनी सर्व धर्मीय अंध श्रध्दा दूर करण्यासाठी प्रयत्न केले . त्यामुळेही फक्त हिंदूंना टार्गेट करणाऱ्या लोकांना हे कार्य आवडत नाही . एरवी न्यायाच्या गप्पा मारणारे लोक इतर धर्मियांसाठी कायद्याने केलेल्या खास तरतुदी बद्दल मात्र काहीच करताना दिसत नाहीत .

  उत्तर द्याहटवा
 6. sir tumi bolala te thik ahe pan dhabolkar v ani shayma manav yana je bolta te chukich ahe apli layki bagavi sir

  उत्तर द्याहटवा
 7. प्रत्येक श्रद्धा ही अंधश्रद्धाच असते. http://aisiakshare.com/node/2068

  उत्तर द्याहटवा