शनिवार, १४ सप्टेंबर, २०१३

स्वामी विवेकानंद : भाग-२ विडया ओढणारा सन्यासीस्वामी विवेकानंदाचा फुगा कोणी व कसा फुगविला हे सांगायला सुरुवात केल्यापासून मला अनेक फोन आलेत. प्रत्येकानीच विवेकानंदाची बाजू उचलुन धरण्याचा प्रयत्न केला खरा पण त्यांच्याच मठानी प्रकाशीत केलेल्या पुस्तकातील संदर्भ पुढे केल्यावर ही सगळी लबाड लोकं तोंडघशी पडली. तरी सुद्धा गिरे तो भी टांग उपरच्या उक्ती प्रमाणे विवेकानंद भक्तानी स्वामीभक्तीचं तुणतुणं वाजविणे सुरुच ठेवलं. आज पर्यंत स्वामी विवेकानंदांवर कोणीचे एवढे कठोर आरोप केले नव्हते म्हणून मी ही ते करु नये असा एकंदरीत भक्तांचा सूर जाणवला. पण माझं म्हणणं अगदी साधं व सोपं आहे. मी स्वामी विवेकानंदांवर एकही आरोप करत नाहीये. मी फक्त रामकृष्ण मठानी प्रकाशीत केलेल्या पुस्तकातील संदर्भ माझ्या ब्लॉगवर अधोरेखीत करत आहे. त्यातून जर स्वामी विवेकानंदांची खरी प्रतिमा पुढे येत असेल तर हा दोष नसून चांगली गोष्ट आहे. खरा विवेकानंद लोकाना कळणे हे नित्य स्वागतार्हच असायला हवे. त्यात कोणाला अडचण वाटायला नको होती. काहींचं म्हणण आहे की मी शिंतोळे उडवतोय. पण तसं अजिबात नाहीये. हे मी उडविलेले शिंतोळे नसून भक्तानी लिहून ठेवलेले संदर्भ आहेत. माझ्या मनानं काहीच सांगत नाहीये, सगळं भक्तानीच लिहलेलं आहे.  विवेकानंदाच्या एकुण प्रतिमेशी विसंगत असे अनेक संदर्भ या पुस्तकात येतात यात माझा दोष काय? अन असे सगळे संदर्भ तपासल्यावर हे सिद्ध होते की स्वामी विवेकानंद जे आम्हाला सांगितल्या गेले किंवा सांगतले जाते ते सोयीचे विवेकानंद असून गैरसोयीचे विवेकानंद पुस्तकात असुन सुद्धा जाणीवपुर्वक दडपले गेले आहे. अशीच दडपलेली अजुन एक घटना...
सन १९८८ मध्ये स्वामी विवेकानंद  रामजन्मभूमी अयोध्या नगरीत देवदर्शनासाठी येतात. त्या नंतर फिरत फिरत तिकडचे सगळेच तिर्थस्थळाना भेट देत पुढे आग्राला येऊन पोहचतात. मुस्लिम शासकानी बांधलेले राजे रजवाडे पाहून स्वामी विवेकानंद चक्रावुन जातात. त्याही पुढे जेंव्हा ते ताजमहल पाहतात तेंव्हा मुस्लीम शासकांच्या कलेची व भव्यदिव्यतेची कुवत नि अफाटता पाहुन थक्क होतात. हे सगळ पाहुन झाल्यावर स्वामी विवेकानंद वृंदावन पाहण्यासाठी निघतात. वृंदावनला जात असताना रस्त्याच्या कडेला एक माणूस बसलेला दिसतो. हा माणूस तंबाखू ओढत असतो. स्वामी विवेकानंदाना तंबाखू ओढण्याची हुक्की येते. ते लगेच त्या माणसाकडॆ धावतात व तंबाखू ऒढायचं आहे असं सांगतात. पुढचा माणूस सन्यासी, वरुन इतका गोरा गोमटा व चेह-यावर एक तेज... हे सगळं पाहून बिचारा हुक्केबाज उडालाच. कारण हा तंबाखू ओढणारा माणूस जातीने भंगी होता, त्यामुळे तो घाबरला. कारण जर या सन्यास्याला तंबाखू दिला व नंतर त्याला कळले की देणारा भंगी आहे तर फुकटचा मारा खावा लागणार हे पक्क माहित होतं. वरुन गावातलेही बदडून काढतील आमच्या बुवाला बाटवलास म्हणून.... हा तंबाखूवाला माणूस लगेच मागे सरकतो व म्हणतो... “नाही महाराज. आपण सन्यासी आहात व मी खालच्या जातीचा भंगी आहे. त्यामुळे मी आपल्याला माझा तंबाखू देऊ शकत नाही” पुढचा माणूस भंगी आहे हे कळतात स्वामी विवेकानंद दोन पावलं मागे सरकतात. खालच्या जातीच्याकडनं तंबाखू घेणे हे स्वामी विवेकानंदालाही अमान्य होते. ते सरळ निघून जातात.
पण थोडया दूर गेल्यावर त्यांच्या लक्षात येते की काही झाले तरी आपल्याला नशा करायचीच आहे. कारण आपला नशेवर अजिबात नियंत्रण नाही. जगाला जरी आपण संयमी व निर्धारी म्हणून सांगतो तरी नशेच्या बाबतीत आपला निरुपाय आहे हे ते जाणत होते. इंद्रीयांवर पराकोटीचे नियंत्रण असलेला सन्याशी अशी ज्याची ख्याती आहे तो स्वामी विवेकानंद खरच किती संयमी होता याचा भांडाफोड करणारी घटना इथे घडते. स्वामी लगेच परत फिरतात व ज्यानी कधीच अस्पृश्याच्या हातचं खाल्लं नव्हतं त्याच्या हातुन तंबाखू घेतात. आजवर पाळलेली अस्पृश्यता सोडतात .... कशासाठी? तर नशेसाठी! आणि मनाची शांती मिटेस्तोवर तंबाखू ओढतात. अशी आहे एकुण घटना.
वरील घटना वाचल्यावर तुम्हाला खरच वाटते का, की स्वामी विवेकानंद संयमी वगैरे होते? बघा ज्या माणसाला तंबाखू ओढायचा मोह आवरत नाही त्याचं खरच इंद्रीयांवर वगैरे नियंत्रण असेल का? कोणीही सांगेल... अजिबात नाही. मग आजवर आम्हाला ह्या घटना जशाच्या तशा का सांगितल्या गेल्या नाही? संयमी व इंद्रीयांवर नियंत्रण असलेला स्वामी विवेकानंद रंगविताना नेमकी विसंगती का म्हणून दडपण्यात आली. अन कहर काय तर काही स्वामी विवेकानंदाच्या भक्तानी हीच घटना चक्क त्यांच्या सोयीची बनेल अशी बदलवुन सांगितली ती अशी...
...एकदा स्वामी विवेकानंद एक घनदाड अरण्यातून जात असतात. त्याना प्रचंड भूक लागलेली असते. मग झाडाखाली एक गरीब माणूस अन्न घेऊन बसलेला दिसला. स्वामीनी त्याच्याकडे पाहिल्यावर त्यानी अन्न दिले. पण लगेच त्यानी आपण अस्पृश्य असल्याचे सांगितले. मग स्वामी लगेच मागे सरकतात. थोडं दूर निघून जातात. पण नंतर त्यांच्या लक्षात येते की अरे आपण तर सन्याशी आहोत. सन्याश्याला कसली आली जात पात... ते परत फिरतात व अस्पृश्याच्या हातचं जेवण घेतात. अन अशा प्रकारे स्वामी विवेकानंदानी जाती पाती नकारली.......वगैरे वगैरे....
...केवढी ही लबाडी बघा.  तुम्ही सुद्धा ही बनावट कथा ऐकलीच असेल. हे भक्त लोकं किती भ्याड व लबाड असतात हे मला चांगलच माहीत आहे. स्वामी विवेकानंद ओढतात तंबाखू पण त्याची लाज वाटल्यामुळे अन्न खालं म्हणून सांगतात. यांच्या अधिकृत पुस्तकात जे रामकृष्ण मठानी प्रकाशीत केलं तिथे लिहलं आहे की अस्पृश्याकडून घेतलं ते तंबाखू होतं पण ही लोकं व्याख्यानांमधून सांगतात काय तर ते अन्न होतं. आहे की नाही लबाडी. आता कोणी म्हणेल अहो त्या दोन वेगवेगळ्या घटना आहेत. एकदा अन्नही घेतलं होतं.... तर मग माझा प्रश्न असा असेल की, जर पहिल्यावेळी अस्पृश्याचा तंबाखू/अन्न घेताना आत्मचिंतन करुन जाती पाती नसतात हे मान्य केलं तर मग परत एकदा अन्न/तंबाखू घेताना नेमकी जुनीच वृत्ती का रिपीट होते? जर एकच चूक स्वामी विवेकानंद दोनदा करत असतील तर मग मागच्यावेळीचा अस्पृश्यता न माणन्याचा निर्धार हा बनाव होता. ते तंबाखू खाण्यापुरतं तसा  दिखावा करातात असं सिद्ध होतं. जर हे मान्य नसेल तर मग या दोन वेगवेगळ्या घटना नसून एकच आहे... फक्त ती तंबाखूची घटना होती हे सांगायची लाज वाटते म्हणून स्वामी विवेकानंदाच्या भक्तानी थोडीसी बदलुन सांगायला सुरुवात केली.
थोडक्यात काय तर मित्रानो स्वामी विवेकानंदाच्या संयमा बद्द्ल व निर्धारा बद्दल जे काही सांगितलं जातं ते सगळं खोटं असून स्वामी विवेकानंद हे विड्या ओढणा-या अनेक साधू-संता प्रमाणे स्वत:ही विड्या ओढणारे संन्यासी होते. 
---
----
संदर्भग्रंथ: स्वामी विवेकानंद यांचे चरित्र
प्रकाशक:-रामकृष्ण मठ, नागपूर
वरील संदर्भ:- पृष्ठ क्रमांक ९३-९४ मध्ये सापडतो.
लेखक:- स्त्येंद्रनाथ मुजुमदार (मूळ बंगाली लेखक)
अनुवादक:- स्वामी शिवतत्वानंद 

४ टिप्पण्या:

  1. बहुत सुन्दर प्रस्तुति.. आपको सूचित करते हुए हर्ष हो रहा है कि आपकी पोस्ट हिंदी ब्लॉगर्स चौपाल में शामिल की गयी और आप की इस प्रविष्टि की चर्चा {रविवार} 15/09/2013 को ज़िन्दगी एक संघर्ष ..... - हिंदी ब्लॉगर्स चौपाल - अंकः005 पर लिंक की गयी है , ताकि अधिक से अधिक लोग आपकी रचना पढ़ सकें। कृपया आप भी पधारें, आपके विचार मेरे लिए "अमोल" होंगें | सादर ....ललित चाहार

    प्रत्युत्तर द्याहटवा
  2. सर लेखाच्या सुरुवातीला 1988 चा उल्लेख आलाय तो चुकीचा आहे का ?

    प्रत्युत्तर द्याहटवा