शनिवार, २८ सप्टेंबर, २०१३

मुस्लिमानी केली गणपतीची पुजा, हिंदू कधी धरणार रमजानचा रोझा?

सध्या फेसबुकवर हा फोटो सर्वत्र फिरविला जात असून गणपतीची आरती करणा-या मुस्लिमांचे समस्त हिंदू बांधवांकडून तोंड भरुन गुणगाण सुरु आहे. या फोटोला लाखो लोकानी लाईक केले, पन्नास हजाराच्या जवळपास शेअर करण्यात आले व साडेतीन हजारच्या वर लोकानी कमेंट लिहली आहे. समस्त नेटकर हिंदूनी मुस्लिमांची तोंडभरुन स्तूती करताना अनेक शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.  या फोटोला इतकं डोक्यावर उचलुन धरण्यामागचं कारण काय? तर मुस्लिम कुटुंब गणपतीची आरती करतोय... मी मागच्या कित्येक दिवसा पासून या फोटोवरील हालचाली पाहतो आहे पण फारसा विचार केला नव्हता. पण आज जरा विचार केल्यावर लक्षात आले की ही तर अत्यंत महत्वाची घटना असून आजवर कट्टरपंथी म्हणून कायम हिणविला गेलेला व दुखविला गेलेला मुस्लिम समाज जुने बंध झुगारुन नवा संदेश देत आहे. सामाजिक सलोखा व सौख्य लाभावा यासाठी त्यानी चक्क पहिले पाऊल टाकले आहे.

या फोटोतून काय संदेश जातो आहे?
फोटोकडे नीट बघा व क्षणभर विचार करा. या फोटोतूण एकंदरीत काय संदेश जातो ते तपासून बघा. एक अत्यंत महत्वाचा संदेश जातो आहे एवढं नक्की. फक्त गरज आहे आपण तो महत्वाचाच...च...च... संदेश उचलण्याची. मुस्लिम बांधव गणपतीची आरती करत आहेत. जातीयवादी हिंदुना हे पाहुन उकळ्य़ा फुटले असतील... का? तर आमच्या देवाची पुजा बांडॆ करत आहेत. ते असेच झुकले पाहिजेत... त्यानी असच केलं पाहिजे... वगैरे वगैरे विचार करणारा एक गट आहे. तर दुसरा गट.... वा वा किती छान. मुस्लिम असून सुद्धा गणपतीची पुजा.... वा व्वा... मस्त. वगैरे म्हणणारा दुसरा गट. अन तिसरा गट... तो म्हणजे या व अशा घटनांचं राजकीय भांडवल बनविणारा व मत मिळविण्यासाठी ते वापरणारा...  पण आपल्याला या सर्वांच्या पलिकडे जाऊन सामाजिक सौख्याचा संदेश घ्यायचा आहे. 
वरील फोटोतून मुस्लीम समाज हा अत्यंत उदार असून हिंदू सारख्या जातीयवादी लोकांच्या देवाची चक्क  पुजाही करु शकतो हे जाहीर आहे.  ही पुजा देवभोळेपणातून नाही तर सामाजीक जाणीवेतून करत आहेत हे आपण सगळ्यानी मनावर/मेंदूवर (अजुन जिथेकुठे शक्य आहे तिथे) कोरून घेतले पाहिजे. का बरं? कारण त्याना या देशात धर्मा-धर्मात उभी असलेली भिंत अमान्य असुन दोन धर्मात एकोपा असावा असे वाटते नि याच भावनेतून ही पुजा केली जात आहे. याचाच अर्थ असा की मुस्लीम समाज खराखुरा सर्वधर्म समभाव मानतो. किंवा समाजिक सलोख्यासाठी स्वधर्माच्या कक्षा ओलांडून तो हे सगळं करतो. त्यामुळे आपण सगळ्यानी या मुस्लिम बांधवांची स्तुती केली पाहिजे, त्यांचे आभार मानले पाहिजे.  कारण मुस्लिमांचे हे कृत्य हिंदूना मैत्रीचा संदेश देणारे आहे. 
आता लगेच दुसरा प्रश्न आपल्याला पडायलाच पाहिजे... तो म्हणजे मुस्लिमानी गणपतीची पुजा केली म्हणून त्यांचं कौतुक ठीक आहे.  पण आता याची अशीच परतफेड नको का? माझ्यामते समस्त गणपतीच्या लेकरांवर ही नैतिक जबाबदारी येऊन पडते की त्यानिही इतकेच उदार होत किमान वर्षातून एकदा तरी मुस्लीमाना असाच सरप्राईज गिफ्ट दयायला हवा. म्हणजे नेमकं काय? तर समस्त गणपतीच्या लेकरानी रमजानचा रोजा ठेवावा नि गोमास भक्षण करुन अल्लाचे आभार मानत महिनाभर नमाज पढावा. मुस्लिमानी बेझिजकपणे गणपती बसवून धार्मिक कट्टरतेला बगल देत जशी आपली राष्ट्रीय व सामाजीक जबाबदारी सिद्ध केली अगदी तशीच हिंदूनीही ती सिद्ध करावी. मुस्लिमांच्या प्रति मनात वितुष्टी नाही हे सिद्ध करावे. मुस्लिमाना कट्टरपंथी म्हणून कायम  हिणविणा-या हिंदूनी तर सर्वात आधी ते करावे. किंबहुना त्यांची ती नैतिक जबाबदारीच आहे. 
जर तसं केलं नाही तर मुस्लिमानी बसविलेला गणपती, केलेल्या आरत्या व पुजा हे सगळं  फुकट गेलं असच म्हणावं लागेल. कारण सामाजिक सलोखा राबविण्यासाठी दोन्ही कडुन पाऊल पडायला हवे. मुस्लिमानी ते टाकले. आता हिंदूनी रमझानचे रोजे धरत आपल्या बाजुने पाऊल टाकायला हवे आहे.  पुढच्या रमझानच्या वेळी मी याच ब्लॉगवर समस्त हिंदूना याची आठवण करुन देईन. वरील फोटोला प्रतिउत्तर देणारा एकजरी हिंदूचा फोटो मिळाला तरी मी भरुन पावेन. 
वरील पुजेचा फोटो हा सामाजिक समतेचा व एकात्मतेचा प्रतिक असेल तर अगदी असेच कृत्य हिंदूनी करुन ती समता व सलोखा अधिक घट्ट करण्याची नैतिक जबाबदारी पार पाडावी.  जर हिंदू तसे करत नसतील तर त्याचा अर्थ असा होतो की मुस्लिमानीच काय ते बदलावं... आम्ही अजिबात बदलणार नाही.. 
मुस्लिमांकडुन आलेल्या या सलोख्याच्या हाकेला हिंदू रमजानचा रोझा धरुन प्रतिसाद  देतील अशी अशा बाळगतो. शेवटी एवढ्च म्हणेन...  
मुस्लिमानी केली गणपतीची पुजा, हिंदू कधी धरणार रमजानचा रोझा?

जयभीम.
***
फेसबुकवरील मुळ लेख खालील धाग्यावर वाचा.

३ टिप्पण्या:

 1. देवाला माननं वा न माननं प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे.
  मुस्लीम व्यक्तीच्या घरी गणपती बसवणे ही बाब दुर्मिळ आहे.
  यामुळे अशा गोष्टींना प्रसिद्धी मिळते. फक्त एका कुटुंबाने गणपती बसवला म्हणजे बाकीच्या हिंदुनी गोमांस भक्षण करावे हि गोष्ट अव्यवहार्य आहे. श्रध्दा ही मनापासुन केली जाते ! देखावा करायला काय सर्वच हिंदु समाज राजकारणी नाही. जर देखावे बघायचे असतील तर रमजानच्या महिन्यात अनेक हिंदु सेक्युलर ( स्वयंघोषित ) राजकारण्यांचे ईफ्तार पार्टिचे जाळिदार टोप्या घालुन देखावे बघायला मिळतील. समता आणि सलोखा राखायचा असेल तर प्रत्येक मुस्लीम नेत्याने हिंदु धर्मातील ऊत्सव कपाळावर टिळा लावुन हिंदु देवांच्या मुर्तिसमोर नतमस्तक होऊन साजरे करावे पण ही गोष्ट अशक्य आणि गैरईस्लामी आहे !
  जय हिंद !! जय भिम !! जय महाराष्ट्र !!

  प्रत्युत्तर द्याहटवा
 2. Mr. Ramteke, i understand your point. Its about creating harmony among people of different religions. But i can see what you are trying to do. I personally dont have any problem in praising God of any religion. And i have studied Kuran to some extent also. And thats why i am asking you about why you wrote that Hindus have to eat beaf to show that they believe in Allah? Kuran never says eat beaf. It is not banned for Muslims thats all. But it is not part of their daily religious diet. I know many muslims who dont eat beaf in India just because they understand the sentiments of Hindus. Your intention of insulting Hindus by asking them to eat beaf is clear. Buddhist principles ask for SHANTI which also defines that dont hate anyone. Never answer hatred by hatred. What you do is hate others perhaps. But nothing more is expected from you.

  प्रत्युत्तर द्याहटवा
 3. महोदय,

  'मुस्लिम घरात गणपती ची पूजा' ही घटना सलोख्याच्या दृष्टीने फारच छान आहे. भारतातील मुस्लिम वर्ग तसा चांगला शिक्षित व सुधारणा वाद मानणारा आहे. तसेच इथल्या समाज मनावर विभिन्न वर्गातील संतांच्या समता,बंधुभाव,आदी शिकवणुकी चा जसा प्रभाव आहे, तसाच तो काही प्रमाणात का होईना मुस्लिम मनावर देखील आहे. म्हणून अशी चित्रे अधून मधून दिसतात केव्हा-केव्हा. पण म्हणून त्याने एवढ प्रभावित वगैरे होण्याचे, किंवा हुरळून जाण्याचे कारण नाहि! भारतातील लाखो मुस्लिम कुटुंबांपैकी कुठेतरी एका कुटुंबात गणपती-पूजा होते, त्या उलट भारतात असणारया शेकडो पीर,मजार,दर्गा,चरार या ठिकाणी बराच हिंदु वर्ग गेल्या कैक शे वर्षांपासून जातो आहे, श्रद्धेने माथा टेकत आहे.(उदा. हाजी अली-मुंबई, ख्वाजा मोईनुद्दीन चिस्ति-अजमेर) आणी याला हिंदु उच्चशिक्षित व धनिक वर्ग, किंवा सुप्रसिद्ध हिंदु व्यक्ती सुद्धा अपवाद नाहि. असे असता केवळ एखाद-दुसरया मुस्लिम कुटुंबाने घरात पूजा केली तर त्यात नवल असे नाहि.उलट त्यांच्याच(इस्लामी) भाषेत सांगायचे झाल्यास त्यांच्या श्रद्धास्थानांवर इतकी वर्ष हिंदु दाखवत असलेल्या श्रद्धेपोटी अशी सहिष्णुता दाखवण्यात कुचराई केलेल्या मुस्लिम समाजाने एक प्रकारे "कुफारा"च अदा केला आहे. मुस्लिम वर्गातील या सहिष्णुते बद्दल त्यांचे अभिनंदन, अन धन्यवाद.

  प्रत्युत्तर द्याहटवा