शनिवार, १४ सप्टेंबर, २०१३

अनिसं:- श्याम मानवांचा विवेकानंद!श्याम मानव हे बहुजन समाजातील प्रसिद्ध विचारवंत आहेत. त्यांच्या प्रति मला कायम आदरच वाटला व भविष्यातही वाटत राहील. महाराष्ट्रात जेंव्हा बुवाबाजी फोफावत गेली व  अंधश्रद्धेचा पूर वाहू लागला तेंव्हा श्याम मानवानी या विरोधात अलौकीक कार्य उभे केले. फुले-शाहू-आंबेडकरानी सांगितलेला तर्कसुसंगत युक्तीवाद व त्या अनुषंगाने आयुष्य जगण्याचा आदर्श पार धुडीस मिळणार की काय अशी एकुण परिस्थीती निर्माण होऊ लागली होती. हा बुवा बाबांचा वाढणारा सुळसुळाट महाराष्ट्राला व ओघानेच या देशाला अंधाराच्या खाईत ढकलेल हे जाणून नागपूर वरुन याच्या विरोधात एक हुंकार आला.... तो हुंकार देणार तरुण म्हणजे श्याम मानव. त्यांची अंधश्रद्धा निर्मुलनाची चळवळ पुढे उभ्या भारतला गदागदा हलवून सोडली हे आपण सर्वानी पाहिलेच आहे. या सगळ्या पार्श्वभुमीवर मला श्याम मानव साहेबांबद्दल आदर वाटतो व तो वाट्णे अगदी नैसर्गिक आहे. परवा मी त्यांचं २००४ मधील पुण्यातील व्याख्यान यु-ट्यूबवर ऐकताना एक असा संदर्भ आला ज्यामुळे मी जरा खट्टू झालॊ अन हा लेख लिहावा लागला. तर ती घटना अशी...
२००४ मध्ये श्याम मानवांचं पुण्यात व्याख्यान होतं. त्यात ज्योतीष, खळे विकाणारे व साळगावकर अशा एकेकाचा समाचार घेत त्यांची गाडी अचानक स्वामी विवेकानंदावर आली. ते म्हणतात "मी स्वामी विवेकानंदाचा अभ्यासक असून तुम्हाला पुरोगामी विवेकानंद सांगतो..." मी अवाक! म्हटलं आता कुठला पुरोगामी विवेकानंद हे सांगणार? तर श्याम मानवांचा विवेकानंद येणेप्रमाणे....
...स्वामी विवेकानंद अत्यंत पुरोगामी विचाराचे होते  व त्यानी ज्योतिष्यांवर कडाडून टीका केली होती. स्वामी विवेकानंद आपल्या भाषणात नेहमी एक कथा सांगत.  अमुक एका गावी तमूक एक राजा होता. त्याच्याकडॆ एक अत्यंत हुशार असा प्रधानमंत्री होता. एकदा हा प्रधानमंत्री काही दिवसाच्या विदेश दौ-यावर जातो. मग राजानी एका गणितज्ञ व ज्योतीषाची तात्पुर्ती निवड करुन राज्यकारभार चालवायला सुरुवात केली. हा ज्योतिषी एके दिवशी राजाला भविष्य सांगतो व म्हणतो की तुमचं आयुष्य फक्त सहाच महिने आहे. राजा पार हादरुन जातो व त्याचं राज्यकारभारातुन मन उडतं. त्यामुळे प्रशासन अत्यंत ढिसाळ होत जातं अन शेजार पाजारचे शत्रूराष्ट्र जे आजवर दचकुन राहायचे ते आता कमकुवत झालेल्या या राज्यावर चढाई करण्याच्या तयारीला लागतात. हा हा म्हणता ही बातमी विदेशवारीवर असलेल्या प्रधानाला कळते. तो लगेच वारी थांबनुव स्वगृही परततो. थेट ज्योतीषाला गाठतात व त्यानी आपलं भविष्य बदलावं अशी विनंती करतात. पण ज्योतिष ऐकतो कुठे, त्याची अनेक मनधरणी करुनही तो आपण सांगितलेलं भविष्य बदलायला तयार होत नाही. मग दुस-या दिवशी त्याला राज दरबारात हजर होण्याचे आदेश सोडतात. दरबारात उभ्या ज्योतिषाला प्रधानमंत्री  विचारतो की आत्ता तुझी कुंडली काढ व तुझं आयुष्य किती ते मला सांग. ज्योतीष लगेच स्वत:ची कुंडली तपासतो व तो आजून बरेच वर्ष जगणार असल्याचं सांगतो. मग प्रधान मंत्री पुढे सरसावतो व आपल्या तलवारीने त्या ज्योतिषाचं मुंडकं उडवतो. राजाची क्षमा मागत प्रधानमंत्री म्हणतो की मी काल सायंकाळीच राजदरबारातील सर्व खात्यांच्या प्रमुख्यांसमोर हा आदेश काढला होता की उद्या ११ वाजता मी या ज्योतीषाचं मुंडकं उडवेन. आपल्या दरबारत बसलेल्या त्या सर्व अधिका-याना हे माहीत होतं की आज ११ वाजता ज्योतिष्याचा मुत्यू होणार होता. पण खुद्द ज्योतिषमहाराजाना मात्र त्यांच्या कुंडलीत तो दिसला नाही. महाराज ज्याला स्वत:चा मृत्यू कळला नाही त्याला तुमचा काय कळला असेल? या घटनेनी राजाचे डोळे उघडतात...

मोरल ऑफ द स्टोरी.... ज्योतीष शास्त्र खोटं आहे. मान्य!

पण ही कथा सांगणारा कोण? स्वामी विवेकानंद! श्याम मानवांची लबाडी काय तर त्यानी स्वामी विवेकानंद वाचला आहे. त्याना चांगलं माहीत आहे की स्वामी विवेकानंदानी स्वत: ज्योतिष्य़गिरी केली होती. खेतडीचा राजा अजितसिंगला पुत्र प्राप्त होणार असं भविष्य विवेकानंदानी सांगितलं होतं. अमेरीकेत जाताना या राजाकडून पैसे व महागडे कपडॆ घेतले होते. या राजाचे मुनशी जगमोहनलाल खुद्द मुंबईत येऊन स्वामी विवेकानंदाना महागडॆ कपडॆ घेऊन दिले होते.  तर हे सगळं माहीत असतानाही श्याम मानव सारख्या माणसानी विवेकानंदांची बाजू उचलुन धरण्याचे कारण काय ते कळले नाही. स्वामी विवेकानंदचे भक्त व श्याम मानव यांच्यात फरक राहीलेला नाही हे जाहीर झाले. विवेकानंदाचे भक्त आपल्या सोयीचा विवेकानंद सांगतात. विवेकानंद हा पुरोगामी होता हे सांगताना प्रतिगामी गोष्टी मुद्दाम गाळल्या जातात. अगदी श्याम मानवानी सुद्धा हेच केले. कारण ते विवेकानंदाचे चाहते... भक्त... की अभ्यासक काय ते असेल... ते आहेत. त्यानी खुशाल विवेकानंद भक्त असावं. पण एखादी गोष्ट सांगताना लबाडी करु नये एवढीच माझी किमान अपेक्षा आहे. विवेकानंद पुरोगामी आहे या हट्टाला पेटून प्रतिगामी विवेकानंद लपवावे हे मला अजिबात पटले नाही. तुम्हाला सांगायचाच असेल तर विवेकानंद जसा आहे तसा सांगा... पण सोयीचा सांगू नका. कारण श्याम मानव साहेब... तुमची प्रतीमा इतरांपेक्षा वेगळी आहे. बघा पटतं का?


शाम मानवांचा विवेकानंद इथे ऐका

-जयभीम

५ टिप्पण्या:

 1. "देव हि जगातील सर्वात मोठी अंधश्रद्धा आहे" हे जरी वास्तव असले तरी हे सत्य सांगून उपयोगाचे नाही कारण ज्यांचे अंधश्रद्धा निर्मुलन करावयाचे आहे ते लोक धार्मिक असल्याने अं.नि.स. पासून दूर जाण्याचीच शक्यता जास्त आहे.

  उत्तर द्याहटवा
 2. Yes, I have also listened that video. And got surprised too. May be Mr. Manav can not afford to go all out. He may be trying to appease Vivekanand follower hoping they are little enlightened. People following asaram and saibaba are totally hopeless cases. That is the only logical conclusion I could make.

  I have no doubt that Vivekananda was caste system supporter. He has tough time to explain about it in his books.

  उत्तर द्याहटवा
 3. Mr Ramteke! tumhala ekda pratyakshach bhetayala pahije! bouddha dharma nirishwarwadee aahe aani samata pradhan dharma aahe manya! pan punarjanma, jadu tona, ani karmakande bare bauddha dharmeey kartaat! keval bharatatach navhe sarvatra! tyabaddal aaplee bhumika kay?

  उत्तर द्याहटवा
 4. "विवेकानंदाचे भक्त आपल्या सोयीचा विवेकानंद सांगतात" असे तुम्ही म्हणता मग आंबेडकरांचे भक्त आपल्या सोयीचा आंबेडकर सांगत नाही काय.?

  उत्तर द्याहटवा