बुधवार, ४ सप्टेंबर, २०१३

Only White People!

मागच्या महिन्यातच अमेरीची धनाढ्य व जगप्रसिद्ध निवेदीका ओप्राबाईनी वर्णद्वेषाचा बुरखा फाडत आजही काळ्या लोकाना गो-यांकडून कशी द्वेषपुर्ण वागणूक दिली जाते हे जगाला परत एकदा ओरडून सांगितले होते. त्यावेळी अमेरीकेत वादळ उठवून देणारी ओप्रा म्हणाली की माझ्या सारख्या अनेक काळ्यांवर रोज अन्याय होत असतो पण त्याचा प्रतिध्वनी गुंजत नाही. काळयांवर प्रचंड अन्याय करणारे अमेरीकन सुधारले खरे तरीपण हा जातीयवाद काही जाता जाईना. नुकत्याच झालेल्या मिलियन मार्चच्या ५०व्या आठवणीच्या निमित्ताने तमाम अमेरीकन काळे व खुद्द ओबामा यानी प्रचंड सभा घेऊन मार्टीन लुथर किंग (जुनियर) यांचे आभार माणून त्यांचे जगप्रसिद्ध भाषण "आय हॅव अ ड्रीम" ची आठवण करुन दिली.
ओप्रा प्रकरण ताजे असताना व आय हॅव अ ड्रीमची पन्नाशी साजरी करत असताना अमेरीकेत परत एक वर्णद्वेषी प्रकरण पुढे आले आहे. फ्रिडम हाऊस नावाच्या चर्चने विकेंडच्या पुजेसाठी येणा-या भक्तांचे स्वागत करण्यासाठी फक्त गो-यानीच गेटसामोर उभे राहावे असे मेल गो-या मेंबर्सना पाठविले आहे. यात गंमग अशी आहे की चर्चचे मुख्य अधिकारी गोरे आहेत पण वेळ प्रसंगी हा वर्णवाद अंगलट आलाच तर सेफर साईड म्हणून काळया बाईच्या हाताने हे पापक करवुन घेतले. ट्रॉय मॅक्सवेल व पेन्नी मॅक्सवेल हे दोघे या चर्चचे मुख्य कर्तेधर्ते असून ते दोघेही गोरे आहेत. मकेडा पेन्नीकूक या काळ्या बाईच्या हातून सभासदाना ही मेल पाठविण्याचा डाव या दोघानी आखला. जेंव्हा चर्चच्या सभासदाना मिळालेल्या मेलमध्ये   "only white people" stand at the front door to greet the congregation अशी लाईन दिसली तेंव्हा काही सभासदानी चर्चचा निषेध नोंदविला. लगेच हे ई-पत्र मिडीयाकडे देण्यात आले अन सर्वत्र एकच चर्चा उडाली. अमेरीकन काळ्यानी जोरदार निषेध नोंदविल्यावर नेहमीप्रमाणे परत एकदा गो-यानी क्षमा मागत प्रकरण मिटविले.  पण एकुन प्रकरणातून अमेरीकेतील वर्णद्वेष बुरख्याखाली का असेना पण अस्तित्वात आहे हे अधोरेखित झाले.
अत्यंत प्रगत नि व्यक्तिस्वातंत्र्याचे टोकाचे  समर्थक म्हणून ज्यांची ख्याती आहे अशा अमेरीकनांच्या एकुन प्रतिमेला तडा देणारे प्रकरण अधुन मधुन बाहेर पडत असतात. मागच्या महिन्यातील ओप्राचे प्रकरण असो वा आजचे फ्रिडम हाऊसचे असो. थोडक्यात वर्णवादाशी झगडताना अमेरीकेच्याही नाकी नऊ आले म्हणायचे!
---
 संबंधीत बातमी खालील धाग्यावर वाचा.
३) WBTV

जयभीम.

1 टिप्पणी:

  1. Sir,
    Ya lekh varun tumchi pratima ani tumche vichar sankuchit kinva vishishta vargapurte nahi ahet yachi janiv nakkich ithe yenaryana hoil. Khup dudaivi ghatna asel hi americesathi tarri……

    Jaibhim

    उत्तर द्याहटवा