बुधवार, २ ऑक्टोबर, २०१३

गांधी : त्रीवार अभिवादन!

आज गांधी जयंती. गांधी म्हटलं की स्वातंत्र्य चळवळ नि अहिंसा... या दोन गोष्टी आल्याच. पण या पलिकडेही अनेक गांधी आहेत. त्यातला एक जो मला आवडतो तो म्हणजे सोपा-तत्वज्ञानी. मला गांधी मधील हा सोपा-तत्वज्ञानी प्रचंड आवडतो. तत्वज्ञान म्हटलं की आधी डोक्याला मुंग्या येतात. का तर, तत्वज्ञानाची भाषा व विषयाची मांडाणी प्रचंड अवघड असते. सर्वसाधारण माणसाला न उमगणे म्हणजे तत्वज्ञानी जास्त भारदस्त अशा समजूतीतून आजवर तत्वज्ञान मांडलं गेलं असावं असं वाटतं. सोप्यात सोपी गोष्ट समजायला अत्यंत कठीण करुन ठेवलेली अनेक पुस्तकं मी स्वत: चाळले व दूर सारले. अनेकदा लेखकांच्या नावाने लाखोल्या वाहून परत कधी अशा पुस्तकांचा नाद करायचा नाही अशी शपथ घेतली. पण गांधीचं मात्र नेमकं उलट होतं. कठीणात कठीन गोष्ट अत्यंत सरळ व सोप्या भाषेत सांगण्यात गांधीचा हतखंडा होता. त्याच बरोबर अजुन एक द्रुर्मिळ अशी गोष्ट गांधींच्या ठायी होती ती म्हणजे सत्य... सत्य बोलण्याचा व त्याला फेस करण्याचा कळस म्हणजे गांधी. अन हे जर अनुभवायचं असेल तर गांधीचं आत्मचरित्र नक्की वाचा. माझ्या मते सत्याचे प्रयोग हे जगातील एकमेव आत्मचरित्र असेल जे जस आहे तसं मांड्ण्यात आलं. गांधीचं आत्मचरित्र वाचताना अनेक ठिकाणी बोलुन जातो "...खरच हिंमत लागते असं लिहायला.."
आंबेडकरी समाजात गांधी बद्दल प्रचंड संताप असून पुणे करारात गांधीनी मारलेली  टांग हे त्यामागचे मुख्य कारण आहे. तसं पुणे करार व एकुण बाबासाहेबांच्या विरोधातील गांधी मलाही आवडत नाही. पण त्यापलिकडॆही जाऊन गांधी अभ्यासावा एवढे मोठे ते नक्कीच आहेत. पुणे कराराचा प्रचंड संताप उरात बाळगुणही गांधीची महती त्याच उरात जागा मिळवते... हे खरच गांधीचं माहात्म्य आहे. जगातील प्रत्येक काना कोप-यात गांधी ओळखला जातो तो अहिंसेचा पुजारी म्हणून. गांधीनी इंग्रजाना अहिंसेच्या मार्गाने चारोमुंड्या चीत तर केलेच पण अमेरीका सारखा माजखोर देशही कोणे एकेकाळी गांधीवाद्यांच्या नावाने थरथरला होता.  मार्टिन ल्युथर किंग(जुनियर) हा गांधीवादी होता. मिलीयन मार्च नावाची त्याची सभा प्रचंड गाजली होती. ब्लॅक पॅंथर सारख्या लढवय्यांच्या देशात मिल्लीयन मार्च काढली गेली ती गांधीवादी तत्वानुसार. नेलसन मंडेलानी तर जगाला नवा धडा शिकविला. चीन सारख कट्टर साम्यवादी देश आता थेट त्यांच्या शालेय अभ्यासक्रमातून गांधी शिकवायला लागला आहे. गांधीचा विरोध करणारा जसा प्रचंड जनसमुदाय आहे तसाच त्यांचा चाहताही. 
आज उभ्या जगाला दहशतवादानी हादरवून सोडले आहे. ईट का जबाब पत्थरसे परिस्थीती निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत.  त्यातल्या त्यात युद्धखोर अमेरीका तर मिसाईल ताणूनच उभा असतो. मग अचानक उ. कोरीया सारख्या लहानशा देशातून अनुआक्रमणाची डरकाळीही येते... एकुण परिस्थीती प्रचंड स्फोटक व खदखदणारी आहे. या सगळ्याना जर कशाची गरज असेल तर गांधीच्या विचाराची. गांधीचं एक वाक्य मला प्रचंड आवडतं. ते म्हणायचे... इन जेंटल वे, यु कॅन शेक द वर्ल्ड या सगळ्या युद्धखोराना व आतंकवाद्याना गांधी समजावून सांगण्याची खरी गरज आहे.  कसं समजावून सांगायचं? ते मला नाही माहीत, पण याना गांधीची गरज आहे एवढं मात्र नक्की. बुद्धाच्या अहिंसा या तत्वज्ञानाचा आजवरचा सगळ्यात मोठा प्रयोग जर कुणी कृतीत उतरविला असेल तर तो गांधीनी.  अशा महान पुरुषाचा आज जन्मदीन. आज २ आक्टोबर... गांधी जयंती.
मा. गांधी याना त्रीवार अभिवादन.


जयभीम.
***

1 टिप्पणी:

  1. Looks like I will have to read his biography.
    But what about he said that he believes in "Varna system" and he wanted to preserve traditional profession of peoples and keep villages as they are from 5000 years. I think he is directly responsible for 1 million people died after partition.
    If he takes credit for freedom, he must be responsible for partition and disaster happened after it.

    उत्तर द्याहटवा