शनिवार, २६ ऑक्टोबर, २०१३

मी लक्ष्मी यंत्र नाकारला...!आज दुपारी २.२ मिनटानी माझा मोबाईल वाजला. ज्या नंबर वरुन फोन आला तो नंबर 918960001589 होता. मी एका कामात अत्यंत व्यस्त होतो. तरी मुर्खा सारखा फोन घेतला. तिकडून एका बाईचा गोड आवाजातला संवाद सुरु झाला. पहिल्या दोन वाक्यात दोन गोष्टी लक्षात आल्या एक तर फोन दिल्ली व तत्सम प्रांतातून होता. अन दुसरं म्हणजे हा पैसे लुबाडणा-या बुवाजिच्या टोळीतील एका लुटारु बाईचा फोन होता. अन योगायोग म्हणजे मागच्याच आठवड्यात लोकमत मध्ये अशा फोन संदर्भात एक मोठा लेख वाचला होता. त्यामुळे लगेच लक्षात आलं की पुढचा एकंदरीत संवाद कुठल्या दिशेनी  जाणार आहे. त्याच बरोबर काय काय मागण्या होणार हे सुद्धा आधिच कळलं होतं. त्यामुळे मी शांत होऊन संवाद ऐकत होतो.
"आपको हमारी आश्रम की तरफ से लक्ष्मी यंत्र दिया जा रहा है....आप एक नशिबवान व्यक्ती हो क्युं की ये सबको नही दिया जाता... गुरु की आप पर कृपा है... लक्ष्मीजी भी आप पर प्रसन्न है..." वगैरे वगैरे ती सुरुवात. म्हणजे माणसाला सायकॉलॉजिकली तयार करण्याची ही प्रोसेस.
...तर आध्यत्मिक सेवेच्या अंतर्गत १४०० रुपयात एक लक्ष्मी यंत्र त्यांच्या आश्रमा तर्फे मला देण्यात येत आहे. हे यंत्र पोस्टाने किंवा कुरीअरने मला पाठविण्यात येईल. POD ने डिलिव्हरी असेल म्हणजे फक्त डिलिव्हरी घेताना १४०० मोजावे लागणार. एकदा का पैसे दिले व यंत्र घेतले की पुढचा फोन येईस्तोवर वाट बघायचे. चार-पाच दिवसानी तिच्या गुरुचा फोन येणार... तो मला मंत्र व यंत्र बांधण्याची प्रोसेस सांगणार. हे सगळं त्यांच्या मार्गदर्शना नुसार करायचे होते. त्या दरम्यान परत पैशाची मागणी होणार होतीच. एकदा हे सगळं उरकलं की मग मी सुखी होणार असं तिनी आश्वासन दिलं. त्याच बरोबर देव धर्म नि चमत्कार वगैरे बरच काही सांगुन झालं. या यंत्रामुळे नि तीच्या गुरुच्या आशिर्वादामुळे मी सुखी होणार हे ती सारखं सारखं सांगू लागली.
"तुम्हे सुखी होना है या नही... सुखी होना है या नही..." हे वाक्य बोलताना एक मानसिक दबाव निर्माण करण्याचा टोन होता. म्हणजे माणसाला सायकॉलॉजिकली कसा घेराव टाकावा याचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देऊनच या पोरीना कामावर रुजु केलं जातं हे मला लक्षात येत होतं. त्याच बरोबर देवाचं नाव घेताना व माझ्या आयुष्यात सुखाचा कसा वर्षाव होईल हे सांगताना स्वरातील व एकुण संवादातील ठामपणा कमालीचा मेंटेन केलेला होता. पुढे हा संवाद ठामपणा ते आदेश असं स्वरुप घेत गेलं... तिच्या एकुण संवादाचा माझ्यावर फारसा परिणाम होत नाही हे कळल्यावर तीनी आक्रमकता अवलंबत माझ्यावर हावी होण्याचा पवित्रा स्विकारला.

"नही, मुझे इन बातोमे भरोसा नही है" माझ्या वरिल वाक्यावर बया चवताळून उठली. 
"...क्यों तुम आपने आपको भगवानसे भी बडे समझते हो क्या. अरे भगवानका प्रसाद तुम्हारे घर चलके आ रहा है और तुम उसे ठुकरा रहे हो. तुम एक ना समझ बच्चे हो. भगवान अंतरयामी होते है. उसने तुम्हे लक्ष्मी यंत्र के लिये चुना है इस लिए मै तुम्हे फोन कर रही हुं. वरना मुझे क्या पडी थी की तुम्हे फोन करु. लेकिन तुम तो भगवानकी आज्ञा का धिक्कार कर रहे हो. भगवानजी बार बार प्रसन्न नही होते. हम भी बार बार फोन नही करते... समझे... समझे ना? तो ज्यादा सोचो मत. उपरवालेने जो देना चाहा है उसे उपकार समझकर स्विकार करलो... समझे ना... क्या बोल रही हुं मै.. समझे ना?" 
एकंदरीत ब्लॅकमेलिंग व धमकीने भरलेला संवाद होता. मी आजवर कित्येक टेलिकॉलिंगच्या पोरींचे फोन अटेंड केले... त्यात त्यांचा सूर मार्केटींगचा असतो. पण हा फोन वेगळा होता. ही मुलगी देवाच्या नावाने थेट धमकी देण्या पर्यंत गेली. म्हणजे हा फोन टेलिमार्केटींगच्या कॅटेगिरीत बसणारा नव्हता. मग कशात बसणारा होता? खंडणी! हो खंडणी मागणा-या गुंडाच्या कॅटेगिरीतलाच होता. कारण सुरुवाती पासूनच तो संवाद दबाव वाढविणारा होता. अन मी विषय तर्कावर नेल्यावर थेट देवाच्या वतीने तिनी धमकीच सुरु केली. अन तिची बडबड सुरु झाली...
"...तुम क्या अपने आपको भगवानसे भी बडे समझते हो क्या... यंत्र बोले तो क्या आपको मजाक लगता है क्या. दो किताबे पढने से भगवान को छोटा समझने लगे हो. इतना घमेंड अच्चा नही होता... समझे ना! सुन रहे हो ना! (मी अधुन मधुन "हुं..." "हां..." करत होतो) क्या तुम सुखी हो... बताओ मुझे. तुम सुखी हो? भगवान को छोडकर कैसे कोई सुखी हो सकता है? हां... बोलो! मै तुम्हारी खुशीया चाहती हुं. और मै कोन होती हूं ये चाहने वाली. ये भगवान का आदेश है... इसलिए मै आपसे बात कर रही हुं... समझे ना आप? समझ रहे हो क्या?... सुन रहे हो क्या?.." अशी तिची अखंड धमकी चालू होती. म्हटलं आता हिला धडा शिकवलाच पाहिजे. 

माझ्यावर तिची मोहिनी चालत नाही हे कळल्यावर तिनी मला तुच्छ लेखने सुरु केले. मग काही ठेवणितली वाक्यं फेकली...


मी सगळं ऐकुन घेतलं व त्या नंतर हळूच माझा प्रस्ताव ठेवला.
अगर आप सचमुच चाहती हो की मै खुष हो जांऊ तो आप को एक रात मेरे साथ सोना पडेगा. मै पैसे भी डबल दुंगा. तो बोल राणी आज रात आओगी?”

त्या नंतर जो भडका उडाला तो सांगु शकत नाही.... प्रचंड मनोरंजन झालं. असो, मी लक्ष्मी यंत्र नाकारुन माझे १४०० रुपये वाचविले. तुम्ही पण वाचवा!

जयभीम
****

१३ टिप्पण्या:

 1. Mr. Ramteke, this was not a gentleman's behavior. Not all telecallers do the job out of their own will. Its a job they do for their living. I agree that she was trying to cheat you. But speaking with a lady like this shows what kind of moral values you carry. I had some respect for you. Today i lost it. Just imagine a lady in your relation is doing such job for living.

  उत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. अमित साहेब,
   अगदी मान्य. पन वरील संवादातील एकुण सूर व तो लुटारुपणा पाहता यापेक्षा चांगला संवाद माझ्याकडून होणे अशक्य होते.

   हटवा
  2. I understand. I have also faced many such calls from telecallers. I suggest, you just disconnect the phone. No need to increase your blood pressure. Dont degrade yourself to their level. I hope you understand what Buddha said about SHANTI.

   हटवा
 2. Not very diplomatic but fitting reply to nonsense people.
  These people will go any length to exploit religious minded and mentally week people.

  उत्तर द्याहटवा
 3. अभिजीत,
  धन्यवाद!
  त्यांचा टोन व त्यातील अधिकारवाणीचा आव... प्रचंड संतापजनक असतो. त्यातून कित्येक कमकुवत मानाच्या लोकांची लूट होते ते वेगळच.

  उत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. I noticed you edited the article and provided more details about conversation. I know it makes us angry. Something need to do to protect society from these thugs.

   हटवा
  2. हो अभिजित,
   पोस्ट एडिट करावी लागली.
   झालेला संपुर्ण संवाद शक्य तितक्या मुळ रुपात मांडण्याचा प्रयत्न केला.
   काय ना... Short Cut मध्ये घटना सांगितल्यामुळे प्रकरण माझ्यावरच उलटायला लागले होते. मग संपुर्ण तपशिलासह लिहणे भाग पडले.

   हटवा
  3. So Mr. Ramteke, i hope now you have understood importance of true and fare reporting. If shortcuts are used in reporting it creates different picture. I remember you have written an article on Kanwariyas accident on railway tracks blaming them for crossing tracks illegally. I have informed you at that time to check reality. Did you tried to check it? Or still base your conclusions on reports in Sakal newspaper on that accident?

   हटवा
 4. माझ्या ओळखीतला एक, अश्याच प्रकारे १ ६ ० ० रुपयांनी फसला ……

  उत्तर द्याहटवा
 5. अरुण साहेब,
  त्यामुळेच मी हा लेख टाकलाय.

  उत्तर द्याहटवा
 6. १ नंबर रामटेके साहेब, आता मला कधी एकदा तिचा फोन येतोय असं झालंय. मी थोडी प्रगती करण्याचा प्रयत्न करीन म्हणतो.

  @अमित : "लक्ष्मी यंत्र" नावाची वस्तू विकणं हा गंडवण्याचा प्रकार आहे. क्रेडीट कार्ड, insurance policy इ. च्या telecaller शी तुलना करू नका. अशा प्रकारात फोन करणारा फसवण्याच्या उद्देशानेच फोन करत असतो.

  उत्तर द्याहटवा
 7. Dharmik goshtincha itaranvar dabav takne hech mulat chukiche ahe. Ti mulgi swatache kam visrun tichyavar bimbavlelya hindu sanskrutikade jat hoti.
  Ramtek siranche je uttar te eka sarvsamanya vyaktisarkhe hote. Tyayt kay chukicha vatat nahi.
  Jaibhim

  उत्तर द्याहटवा
 8. जोपर्यंत जनसामान्यांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न गांभीर्यांने घेतला जात नाही तो पर्यंत अशा यंत्र वाल्यांची दुकाने चालत रहाणार. लोकांना स्वत:ला फसवून घेण्यात देखील आनंद मिळत असतो. मानसशास्त्रज्ञांसमोरील आव्हान कसे अवघड आहे ना! अंनिसने कायमस्वरुपी कौन्सिलिंग सेंटर्स उभे करणे गरजेचे आहे. पण ते तसे राबवणे अवघड आहे.

  उत्तर द्याहटवा